Skip to main content

मासेमारीचा छंद - तीन पीढ्या - भाग २

3 minutes

.
.

मला नीट आठवत नाही पण माझी १००% खात्री आहे की बाबा, पुढे अनेकदा आम्हाला घेऊन मासेमारीला गेले. मासेमारी हा बाबांनी देऊ केलेला छंदच नव्हता तर तो माझ्या कुमारवयातील स्वप्नांचा , कल्पनाराज्याचा अविभाज्य भाग होता. माझ्या कुमारवयीन कालखंडाचा हा छंद साक्षी होता. इतक्या उत्कट माझ्या भावना आहेत. या छंदामुळे मला अनेक hideouts सापडले जसे Sandusky नदी, रेल्वेचा ढासळलेला भग्न लाकडी पूल्,अंधारी चुनखडी वाली गुहा, माझे आवडते धबधबे, ओहळ,ओढे अन कितीतरी.
.
भलेही Ohio नदीमधून , उत्तरस्थित Erie तळ्यात येणारे अनेक प्रसिद्ध मासे जसे - Walleye, Smallmouth, White Bass हे माझ्या गळाला कधीच लागले नाहीत एवढेच काय साधा Carp मासाही मी कधीच पकडू शकलो नाही. पण त्या Carp माशाच्या तळ्याकाठी वहात आलेल्या चंदेरी वर्खाच्या मढ्यांशी खेळायला मला फार आवडे. मी या माशांच्या कुजलेल्या पोटामध्ये pussywillow च्या काड्या खुपसून मजा पहात असे. काडी खुपसली रे खुपसली की अनेक maggots(अळ्या) वळवळत बाहेर पडत अन हिरव्या चकचकीत पंखाच्या गोमाशांचा तर थवाच उडे. थोडा वेळ घोंगावून माशा परत त्या पोटाच्या खळगीत स्थिरावत अन मी परत परत काडी खुपसे.

Carp सुंदर होता....मृत्यु मोहमयी होता!

मी Sandusky नदीच्या ओढ्या-ओहोळातही मासेमारी करत असे. या ओढ्याच्या काठी एक Tiffany State Hospital म्हणून वेड्यांचे इस्पितळ होते. ज्याला मनोरुग्णालय असे पॉश नाव दिलेले होते. नाव बदलले म्हणून काय झाले, वेड्यांचे इस्पितळ ते वेड्यांचे इस्पितळच. मोठी माणसे त्याला वेड्यांचे इस्पितळ म्हणूनच ओळखत असत. जसे "गेल्या महीन्यात सोफीला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केले" वगैरे.
.
आम्हा मुलांकरता हे इस्पितळ विशेष आकर्षण राखून होते. त्या दवाखान्याच्या आवारात अनेकानेक लहान झरे व त्यातून निर्माण झालेली डबकी होती. या डबक्यांमध्ये सुरेख रंगीबेरंगी sunfish सापडत असत. हे मासे पकडणे किती मजेचे होते. कधी मासे पकडायचे त्याचे आडाखे अन मनसुबे, ३ दिवसापासून रचले जात. मग आदल्या रात्री परसातली भुसभुशीत माती खोदून त्यातून गांडुळे काढली जात. नंतर ती गांडुळे गळाला लावून आम्ही मुले जय्यत मासेमारी करण्यास निघत असू. ते धुकट , कुंद वातावरण अन तो ओल्या दगडांचा कुंद वास मला अजुनही आठवतो. मासा गळाला लागला की त्याची नाजूक धडपड, गळाला लागलेली ओढ अन आमच्या हृदयात कोणता मासा लागला हे पहाण्याची धडधड हे मी कसे विसरु शकेन?
.
एका आरामाच्या दिवशी तर मला बादलीभर पॅनफिश सापडले. मी सर्वच्या सर्व घरी नेले. किती लहान असतात पॅनफिश. त्याच्यामध्ये walleye च्या कल्ल्यांएवढेही मांस नसते पण तरीही बाबांनी कौतुकाने या माशांचे लिपते केले व मासे तळले.
Breeder's Association Pond मध्ये तर विपुल प्रमाणात bullhead मासे सापडत. पण ती राखीव जागा होती अन अन्य लोकांना तिथे मासेमारी करण्यास बंदी होती. पण आम्हा मुलांना मात्र तिथे चोरुन मासे पकडण्यात अतिशय थ्रिल वाटत असे. कारण त्यात एक धाडस, थरार असे की कोणी आता पकडेल...मग पकडेल. शिवाय तारांच्या कुंपणामागे बैल चरत असत. हे बैल कधी उधळून आपल्या अंगावर येतील याचीही भीती असेच.
बाबा नेहमी सांगत की तिथे जाऊ नका, कोणीतरी पकडून आत टाकेल. पण बाबांनी कधी शिक्षा मात्र केली नाही. अर्थात ते शिक्षा करतच नसत असे नाही जसे मी जेव्हा अँन्जी च्या नव्या कोर्‍या सायकलच्या सीटाला रंग फासला तेव्हा बाबांनी बेदम शिक्षा केलेली होती. पण या मासेमारीच्या साहसाचे कदाचित त्यांनाही सुप्त आकर्षण होते. धंद्याच्या व्यापात अतिशय ओढाताण, कष्ट करणार्‍या माझ्या बाबांना कदाचित आमचे escapades कळत असत. का शिक्षा केली नाही ते शेवटपर्यंत संदीग्ध्/अनाकलनियच राहीले.
.

मी जसजसा मोठा होत गेलो तसतशी मासेमारी मागे पडली. खरं तर बालपणीच्या अनेक गोष्टी जसे दगडगोट्यांचा खजिना, बेसबॉल, ट्रेनचे आकर्षण, मॉडेल विमाने बनविण्याची हौस अशा अनेक गोष्टी मागे पडल्या अन त्या गोष्टींबरोबरच माझी स्वप्ने, श्रद्धा, Longings (आसुसलेपण), अन आशा ही. पण या सर्वांबरोबर बाबांच्या अन माझ्यातला जिव्हाळा, सामीप्य देखील ओसरत होते काय? हे आठवून आता पोटात खड्डा पडतो. असो.!

.

क्र-म-शः

Node read time
3 minutes

शुचि. Mon, 13/04/2015 - 22:04

"क्रमशः" राहीले होते जे की आता टाकले आहे. या सप्ताहांतास पुढील भाग टाकेन.... कदाचित ;)
पण ही फार आवडीची गोष्ट आहे. त्यामुळे लिखाणास कधी नव्हे ते एक नैसर्गिक ओघ येतो आहे..... माझ्या मते!