कोर्ट

(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. )
(मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या)

काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.
हाच प्रकार कुणीतरी करावा अशी माझी अपेक्षा नाही परंतु अश्याच प्रकारचा प्रयत्न एखाद्या व्यवस्थेला किंवा संस्थेला चित्रित करण्याचा व्हावा असे मला वाटायचे.
कोर्ट या चित्रपटाने न्यायालयात कामकाज कसे चालत असेल हे हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच चित्रपटातून जी न्यायालये समोर आली त्यामध्ये भाषणबाजी, वकिलांचे तारखा घेण्यासाठी आजारी पडणे वगैरे वगैरे पाहायला मिळाली. पण कोर्ट याबाबतीत वेगळा आहे. इथे एकतर सत्र न्यायालय आहे आणि मोठ्याच्या मोठ्या चेंबर मध्ये खूप लोक फक्त हीच केस ऐकायला बसले आहेत असे नाही. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या अगदी जवळ जाणारं हे न्यायालय आहे.

चित्रपटाची कथा एक लोकशाहीर नारायण कांबळे यांच्या भोवती फिरते. त्यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे वासुदेव पवार यांनी आत्महत्या केली असा आरोप ठेवून पोलिस त्यांना अटक करतात. कोर्टात बऱ्याच तारखानंतर नारायण कांबळे यांना जामीन दिला जातो. नंतर त्यांना दुसऱ्याच कायद्याखाली परत अटक केली जाते आणि तो मुद्दा परत त्याच न्यायाधीशांसमोर येतो. पुढची तारीख देऊन कोर्टाला महिनाभराची सुट्टी पडते.एका अर्थाने इथेच चित्रपट संपतो (चित्रपट इथे संपवला असते तरी चालले असते, पण अजून काही सीन्स न्यायाधीशांच्या संदर्भात घडतात आणि मग चित्रपट संपतो.)
चित्रपट जसा जसा पुढे जातो तसे सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांचे वैयक्तिक आयुष्य दाखवले जाते. सरकारी वकील एका मध्यम वर्गीय घरातून आल्या आहेत तर बचाव पक्षाचे वकील एका श्रीमंत घरातून आले आहेत. त्यांच्या आवडीनिवडी यामध्येही खूप फरक आहे. सरकारी पक्षाचे वकील नाटक पाहायला जातात जे मराठी - अमराठी वादावरती आहे तर बचावपक्षाचे वकील एका बार मध्ये जाऊन परदेशी सहलींवर आपल्या मित्रांशी चर्चा करतात. तिथे बसून ते एक पोर्तुगीज गाणेही ऐकतात. दोघेजण आपापल्या घरच्यांसोबत जेवायला बाहेर कुठे कुठे जातात यावरही एक सीन आहे. एका बंदी आणलेल्या पुस्तकाच्या बाजूने बचावपक्षाचे वकील बोलतात तर दुसऱ्या दिवशी त्यांना लोकांच्या रागाला सामोरे जावे लागते. अश्या विविध गोष्टी दाखवत चित्रपट पुढे सरकतो. या गोष्टी objectively दाखवल्या गेल्या आहेत. त्यावरती कसलेही समालोचन चित्रपटात नाही. जो प्रेक्षक चित्रपट पाहतो आहे त्याने स्वतः त्याचा अर्थ लावणे अपेक्षित आहे.

चित्रपटातील पात्रांची निवड अतिशय उत्तम आहे आणि वास्तवाच्या जवळ जाणारी आहे. चित्रपटाचे छायाचित्रण उत्कृष्ट आहे विशेषतः रुंद आणि बर्याच वेळ चालणाऱ्या फ्रेम्स. पहिल्या काही सीन्स मध्ये एवढा वेळ चालणारी एकच फ्रेम पाहून वैताग येऊ शकतो पण पुढे पुढे त्याची सवय होते.
एकंदरीत एका कोर्ट केस च्या निमित्ताने समाज, न्यायव्यवस्था, सरकारी व्यवस्था यावरती भाष्य करण्याचे काम हा चित्रपट करतो.कुठल्या समीक्षकाने काय म्हटलंय किंवा आपले मित्र मैत्रिणी काय म्हणताहेत यावरती न जाता आपण स्वतः जाऊन एकदा अनुभव घ्यावा असा हा चित्रपट आहे!

ता.क.: काल मी हा चित्रपट कलकत्त्यात पाहिला. जेव्हा जायचे ठरवले तेव्हा वाटले कि पूर्ण थीएटर मध्ये आपण एकटेच असू आणि तसे असेल तर शो रद्द तर नाही होणार ना अशी शंका चाटून गेली. परंतु तसे काही झाले नाही. थीएटर छोटेच होते पण चित्रपट पाहायला साधारण ३० जण तरी हजर होते. हे चित्र पाहून खूप समाधान वाटले. चित्रपट संपला तेव्हा अगदी टाळ्याही पडल्या.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कालच 'कोर्ट' खूप काळानी चित्रपटात पाहील. गेल्या एका वर्षात मला जसं उमगलं, बहुतेक तसच चैतन्य ताम्हणेला दिसलं असं वाटतय. कोर्टाव्यतिरिक्त इतर गोष्टींवर केलेलं ह्या चित्रपटातलं भाष्य वस्तुस्थितीपासून जराही दूर वाटत नाही.

जवळ जवळ रोजच 'कोर्ट' अनुभवल्यावर डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे ते गाणं आठवतं 'हे असे आहे परंतु हे असे असणार नाही......' पण कृती शून्य.

भारतीय दंडविधान आणि भारतीय घटना ह्या पेपरमध्ये जे ज्ञान वाटलं ते पण आठवलं......

Justice delayed is justice denied.

Audi alteram partem - nobody should be condemned unheard.

Freedom of everybody is paramount - Constitution of India

Bail, no jail - Late Justice V. R. Krishan Iyer

Everybody is presumed to be innocent unless proven guilty.

Fundamental Right to Life under Article 21 of the Constitution of India does not include filthy and unhygienic life.

and much more ........

इतकंच वाटतं जसा शिक्षणाच्या आयच्चा घो, तसा न्यायाच्या होण्यापासून आपण अजूनही टाळू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ता.क.: काल मी हा चित्रपट कलकत्त्यात पाहिला. जेव्हा जायचे ठरवले तेव्हा वाटले कि पूर्ण थीएटर मध्ये आपण एकटेच असू आणि तसे असेल तर शो रद्द तर नाही होणार ना अशी शंका चाटून गेली. परंतु तसे काही झाले नाही. थीएटर छोटेच होते पण चित्रपट पाहायला साधारण ३० जण तरी हजर होते. हे चित्र पाहून खूप समाधान वाटले. चित्रपट संपला तेव्हा अगदी टाळ्याही पडल्या.

आं? कुठे? मी लिस्टिंग्स पाहिले तेव्हा फक्त लांब नागेरबाजार जवळ कुठेतरी एक शो होता. दक्षिणेत कुठेतरी लागलाय का? मला पहायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साउथ मध्ये कुठे नाही असे दिसते. फक्त दोनच ठिकाणी लागला आहे. पीवीआर जेस्सोर रोड आणि मणीस्क्वेअर मॉल. मणिस्क्वेअर त्यातल्या त्यात जवळ आहे.
बुधवारपर्यंतचे शो दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो आत्ताच मणीस्क्वेरला आहे हे दिसलं. तिथे जाता येईल का पाहते, आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दक्षिणेत कुठेतरी लागलाय का? मला पहायला आवडेल.

अत्यंत अवांतर शंका. मुंबईप्रमाणे कोलकात्यातही उत्तरेपेक्षा दक्षिण भारी /महाग / एलिट आणि पूर्वेपेक्षा पश्चिम भारी /महाग / एलिट असा संकेत आहे का? किंवा उलट काही दिशाधारित मान्यता आहेत का? चेन्नईविषयी अशीच कोणाला माहिती आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्वपश्चिमेबद्दल तितकेसे माहिती नाही, पण येस, उत्तरेपेक्षा दक्षिण कोलकाता लैच भारी आहे - अपवाद तो सॉल्ट लेक भागाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा प्रश्न पुण्याच्या बाबतीत विचारायचेही कोणी धाडस करत नै नै? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुण्यात एकच दिशा / विभाग आहे..

"मध्य".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण पुण्याच्या ज्या काही मर्यादा ठरल्या आहेत त्यांपलीकडे कुठल्याही दिशेने गेलात की मर्त्य जगच सुरू होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो, परवाच आंजावर एके ठिकाणी "पश्चिम पुणे" हा शब्दप्रयोग वाचला आणि एकदम शहारे आले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुण्यात पूर्व आणि पश्चिम पुण्यातच काय ती हुच्चपणासाठी कॉपिटिसन आहे!
उत्तर व दक्षिण दोन्ही भागांना पुणे म्हणतात हेच खूपे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मलाही आवडला हा सिनेमा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

परवा ठाण्यात मल्टिप्लेक्समधे प्रेक्षक नसल्याने याचा शो रद्द झाला. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही 'कोर्ट' आवडला. ट्रेलरवरून चित्रपट पूर्ण गंभीर असेल असा ग्रह झाला होता. प्रत्यक्षात बरेच विनोदी प्रसंग आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा चित्रपट मराठी आहे का? मग कलकत्त्यात ...?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नावाला मराठी आहे. प्रत्यक्ष सिनेमात मराठीबरोबरच हिंदी + गुजराथी + इंग्रजी असेही संवाद बरेच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले असतील तर साधारणपणे मेट्रो मध्ये लागत असावेत. फँड्री पण लागला होता महाराष्ट्राबाहेर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://drishtiad.blogspot.com/2015/04/blog-post_17.html हा लेखदेखील चांगला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाही आवडला. पण सगळ्यांत जास्त हा.

हा माचकरांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एक असाच आलेला विचारः "कोर्ट" सिनेमात कोर्टाचं वास्तववादी चित्रण आहे वगैरे म्हणणार्‍या किती लोकांनी खरंच कोर्ट पाहिलेलं असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मन१ने झपाटलं काय हो आबा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसचं कसचं! मन१ बहुत पहुंचा हुवा क्वेश्चन मार्क हय. मनोबा परत भेटले की त्यांच्या लहानपणाचे अजून किस्से विचारून घेणार आहे.

---

कोर्ट चित्रपट बघितल्यावर सविस्तर लिहीन मला काय म्हणायचंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मनोबा परत भेटले की त्यांच्या लहानपणाचे अजून किस्से विचारून घेणार आहे.

ते किस्से खास मनोबांच्याच लेखनशैलीतून वाचणे हे जास्त मणोरञ्जक आहे. तस्मात मनोबाच्या लहानपणीचे किस्से नामक नवीन धागामालिका सुरू करावी असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील सगळे खदुस ड्य्म्बिस आहात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकच शब्द एकदा कमी अशुद्ध आणि एकदा जास्त अशुद्ध लिहिण्याचे कौशल्य कुठून अआत्मसत केलेत ते मअला साम्गा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मन१ बहुत पहुंचा हुवा क्वेश्चन मार्क हय.

अगदी अगदी.
काय तो मनोबाचा उद्वेग!
काय वर्णावा त्यांचा विषाद!!
तसं हे मानवतेचं नशीब कि मनोबा आजयुगात आहेत, एक १०००-२००० वर्षांपूर्वी ते असते तर कध्द्धी मंजे कध्धीच विज्ञान विकसित झालं नसतं याची गॅरंटी. या ब्रह्मांडातले इतके विरोधाभास ते इतक्या समपर्कपणे पुढे आणतात कि हे विश्व अचल, अढळ, सुसूत्र नियमांनी चालते अशी विज्ञान विकासाला आवश्यक पूरक, प्राथमिक भावना कुणाचीच त्यांचे प्रश्न ऐकून होऊ शकली नसती! खुंटलं असतं सगळं!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मनोबा = व्हाय.

अजो = व्हॉट & हाऊ.

तितकेच पोचलेले क्वेश्चन मार्क्स. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं