Skip to main content

चित्रपट

यंदा (तरी) ऑस्कर्तव्य आहे ?

नुकताच लिओनार्डो डी’केप्रियोचा ‘द रेवेनंट’ पाहिला. आलेजन्द्रो इनारीतू ( ‘birdman’ चा दिग्दर्शक) याने दिग्दर्शित केलेला आणि याच नावाच्या एका कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट एक भन्नाट सूडकथा आहे.

समीक्षेचा विषय निवडा

ते विश्वच निराळ

परग्रहावरची सृष्टी, पृथ्वीचा नाश ,अंतराळाची सफर हे सर्व हॉलीवूडचे अनेक वर्षांपासूनचे अतिशय आवडते विषय. आजवर अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी या विषयावर चित्रपट बनवलेले आहेत. अनेक प्रचंड गाजलेलेदेखील आहेत.काही सपशेल आपटलेत. पण हाच विषय घेऊन २०१४ साली प्रदर्शित झालेला ख्रिस्तोफर नोलनचा इंटरस्टेलर हा चित्रपट भन्नाट असाच म्हणावा लागेल. यापुर्वी नोलनने द डार्क नाईट आणि इन्सेप्शन सारखे जबरदस्त चित्रपट दिग्दर्शित केले आहेत आणि यावेळीदेखील अफाट कल्पनाशक्ती आणि भौतिकशास्त्र यांचा योग्य तो मेळ घालून अत्यंत विचारपूर्वक हा चित्रपट बनवण्यात आलाय.

समीक्षेचा विषय निवडा

रॉकस्टार : फिर से उड चला

"फुकट तिकिटाच्या मोहाने माणूस काय काय करेल सांगता येत नाही रे. 'आ अब लौट चले' किंवा 'कोयला' जर मी २-२ वेळा थेट्रात बघू शकतो तर रॉकस्टार का नाही?", एरवीदेखील तिडीक आणणार्‍या लक्ष्मीकांत बेर्डे सुरात जेव्हा माझा मित्र मला हे सांगायला लागला, तेव्हा मला त्याच्या इंटरनेट कनेक्शनचा गळा घोटावासा वाटला. साली एवढीशी तर असते इथरनेट केबल. दोन मिनिटात खेळ खलास.

पण ती उर्मी आवरल्यावर मी त्याच्याच हातचं वडासांबार खाता खाता दोन मिनिटं आत्मचिंतन केलं. मला तरी पहिल्यांदा कुठे आवडलेला रॉकस्टार?
गाडीत सदैव ती रॉकस्टारी गाणी वाजवणार्‍या मित्राला मी "गाडी किंवा गाणी" असा अल्टिमेटम दिलाच होता ना?

समीक्षेचा विषय निवडा

अगं बाई अरेच्चा २ अर्थात एक सुण्दर चीत्रपट

शीर्षकातली चूक मुद्दाम केली आहे, कारण काहीच नाही, एक प्रतीकात्मक विरोध म्हणून. आपण प्रतिकात्मक निषेध्/विरोध करण्यात तसे चँपियन आहोत. परवाची कलबुर्गींची हत्याच घ्या- जाऊ दे, भरकटलो वाटतं.
.
तर "अगं बाई! अरेच्चा भाग २" पाहिल्यावर मन सुन्न झालं.
हा चित्रपट नक्कीच एडिटिंग, काही खास लोकांसाठी असलेले निवडक खेळ, पैसे देऊन बोलावलेल्या पत्रकारांचे रिव्हयूज -असल्या भानगडीतून गेलाच असेल ना?
तेव्हा कुणालाच सांगावसं वाटलं नाही की "बघवत नाही रे चित्रपट, भिकार आहे"
किंवा "एकाही जोकवर हसायला येत नाही हो, काहीतरी करा"
किंवा "महा गचाळ बनवलाय हो चित्रपट.. जरा बघा काही बदलता आलं तर.." ?
=====

समीक्षेचा विषय निवडा

उमेश कुलकर्णीचा 'हायवे' - बहुस्तर हा घाट

(चित्रपट पाहताना रसभंग होईल असे कोणतेही तपशील ह्यात उघड केलेले नाहीत. त्यामुळे ज्यांनी चित्रपट पाहिलेला नाही त्यांनीही हा आस्वादात्मक परिचय वाचायला हरकत नाही.)

समीक्षेचा विषय निवडा

मसान: एक आधुनिक शोकात्मिका

मसान: एक आधुनिक शोकात्मिका

‘मसान’ या अनुराग कश्यप स्कूलमधून निघालेल्या नव्या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय नाव आहे ‘फ्लाय अवे सोलो’. आणि हेच शीर्षक अधिक समर्पक आहे असं ‘मसान’ बघितल्यावर वाटलं. मसान नावावरून या चित्रपटात काहीतरी स्मशानासंबंधी, भुताखेताचं , अतर्क्य, गूढ कथानक असेल असा समज होण्याची शक्यता आहे. पण ही कहाणी तशी नाही. ती एकाच वेळी समाजातील वर्गघर्षणाची (संघर्ष हा शब्द जरा कठोर होईल) आणि पात्रांच्या वैयक्तिक संघर्षाचीही आहे.

समीक्षेचा विषय निवडा

गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर

Gurudutt Cover Page

अरुण खोपकरांचं गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका हे पुस्तक अनेक वर्षं अनुपलब्ध होतं. अखेर त्याची नवी आणि देखणी आवृत्ती उपलब्ध झाली आहे. त्या निमित्तानं जुन्या आवृत्तीचा मी दिलेला परिचय पुन्हा प्रकाशित करतो आहे -

समीक्षेचा विषय निवडा

किल्ला: आहे मनोहर तरी........

तर मराठीत सध्या ' वयात येता ' नाच्या गोष्टी सांगणार्‍या सिनेमांची लाट आली आहे. किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला '. सिनेमाची तपशीलवार कथा सांगून समीक्षेने रसिकांच्या रसभंगाचं पाप करू नये असं मला वाटतं. म्हणून सरधोपटपणे कथा सांगणं इथे टाळलं आहे .

समीक्षेचा विषय निवडा