सध्या काय ऐकताय / अलीकडे काय ऐकलंत? - ६
...
जाफर पनाही - The White Balloon
परवा इराणी दिग्दर्शक जाफर पनाही ह्यांचा The White Balloon हा फारसी भाषेतील पण इंग्रजी सब्टायटल्स असलेला चित्रपट यूटयूबवर येथे पाहिला. चित्रपटावरून 'एलिझाबेथ एकादशी'ची आठवण झाली.
सुमारे ७ वर्षे वयाच्या मुलीचे काम ह्यामध्ये प्रमुख आहे. नव्या वर्षाच्या समारंभासाठी तिला एक गोल्डफिश हवा आहे आणि दुकानातील १०० तोमान किंमतीच्या एका गोल्डफिशवर तिचे मन बसले आहे. हट्ट करून ती आईकडून पैसे घेते. आईकडे फक्त ५०० तोमानची एकच नोट आहे. त्यातून ४०० परत आणायचे ह्या बोलीवर आई तिला ती नोट देते. आनंदाने ती दुकानाकडे गोल्डफिश आणण्यासाठी निघते पण वाटेत नोट वार्याने उडून एका बंद घराच्या जाळीपलीकडे ती जाऊन पडते. नोट तिला दिसत आहे पण काढता येत नाही. दुकान संध्याकाळी बंद होण्यापूर्वी ती नोट बाहेर काढण्यासाठी ती आणि तिचा भाऊ कायकाय करतात अशी ही गोष्ट आहे.
अखेर रस्त्यावर फुगे विकणारा एक अफगाण निर्वासित मुलगा त्यांच्या मदतीस येतो आणि मोठ्या प्रयत्नाने ती नोट तो बाहेर काढतो. नोट हाती येताच बहीणभाऊ अफगाणी मदत करणार्याला विसरतात आणि आनंदाने गोल्डफिश आणण्यासाठी धावतात. फुगे विकणार्या अफगाणी मुलाकडे अखेर एक पांढरा फुगा काय तो शिल्लक राहतो
राहुल देशपांडे - ऑडियो ब्लॉग
राहुल देशपांडे यांनी स्वतःचा 'ऑडियो ब्लॉग' सुरू केला आहे. गाण्यांचा सराव करताना एखादा गायक जे स्वातंत्र्य घेऊन गातो, वेगवेगळे प्रयोग करतो नि त्यात त्याला जो आनंद मिळतो, तो लोकांपर्यंत पोहोचावा हा या ब्लॉगचा उद्देश आहे.
इंग्रजी गाणी व नाट्यसंगीत यांचाही ब्लॉग करायचा त्यांचा मानस आहे.
थोडा नॉस्टॅलजिया
५ जूनला विजू शाहचा वाढदिवस होता. आधी कधी लक्षात राहिला नव्हता. पण १५-२० वार्षापूर्वीची जी गाणी आजही आवडतात त्यात या माणसाची काही गाणी आजही खूप आवडतात. काही शेअर करत आहे.
विश्मात्मा आता अत्यंत विनोदी सिनेमा वाटतो. तेव्हा चांगला वाटला होता.
हा सिनेमा म्हणे कुठल्या तरी जेम्स हॅडली चेसच्या गोष्टीवरून घेतलाय. पाहिलाय का कोणी?
या गाण्याने तर मला वेड लावलं होतं
तुमचीही विजू शाह्ची आवडती गाणी शेअर करा!
सुश्राव्य गाणी!!
Puff the magic dragon - https://www.youtube.com/watch?v=Y7lmAc3LKWM (हे लहान मुलांचे गाणे वाटत असले तरी त्याचा दुसरा अर्थही आहे. magic dragon = कोकेन)
My heart is beating like a jungle drum - https://www.youtube.com/watch?v=7tHcjPi-rNg
टिक टिक वाजते डोक्यात या
टिक टिक वाजते डोक्यात या दुनियादारी पिच्चरमधल्या गाण्याची प्रेरणा.
https://www.youtube.com/watch?v=0Q7cDqj3bVg&feature=youtu.be
हा दुवा दिल्याबद्दल रा.रा.अमुकचन्द्ररावजीसाहेब यांचे अनेक आभार!
पंडित विश्व मोहन भट यांची
पंडित विश्व मोहन भट यांची न्यूज-एक्स चॅनेलवर वार्ताहराशी मैफल टाईप मुलाखत ऐकली. त्यांनी विकसित केलेले मोहन विणा नावाचे ऑल इन वन तंतूवाद्य काय आहे हे ऐकायला मिळाले. ऐकायला बरे वाटते यापलिकडे संगीताचे ज्ञान नसणारांस काही मूलभूत संकल्पना कळतील असे बरेच प्रश्न वार्ताहराने विचारले.
=====================================
पंडितजींचे ८० च्यावर देशांत (त्याच वाद्याचे) शिष्य आहेत नि कार्यक्रम झाले आहेत हे ऐकून खूप छान वाटले.
जर्मनी मधील भव्य कुंटणखाना
जर्मनी देशामधील विविध व्यवसायांची माहिती करून घेत असता ही थक्क करणारी फिल्म मिळाली. एवढ्या मोठ्याप्रमाणावर आणि व्यावसायिक रित्या होणारा वेश्याव्यवसाय पाहून आश्चर्य वाटले.
"Unrequited Love" विषयावरची २
"Unrequited Love" विषयावरची २ गाणी एकामागे एक सापडली. एकाच गायिकेने गायलेली.
.
Valaida Snow - You're Driving Me Crazy - https://www.youtube.com/watch?v=gORlG3tAhkY&list=PLmnSQAyQLHsBXRJHJ9pg7…
.
Valaida Snow - I Must Have That Man - https://www.youtube.com/watch?v=jvGjH1hi4_o
_____
Valaida Snow "If You Only Knew" 1946 - https://www.youtube.com/watch?v=3aPTmYlS2t8 ................ सुंदर!! (रात हसीन ये चाँद हसीन ...तू सब से हसीन मेरे दिलबर...और तुझ से हसीन तेरा प्यार) टाइप गोग्गोड आहे. डायबेटिस होइल. ;)
राग धानी मैफिली मध्ये
राग धानी मैफिली मध्ये क्वचितच गायला जातो. नव्या दमाचा सावनी शेंडे यांचा धानी काल ऐकला , जरूर ऐकावा असा.
चतुर बालमा सैया मोरा
ना जाने दुखवा मोरा
द क्राफ्ट ऑफ वर्सः द नॉर्टन लेक्चर्स — हॉर्हे लुईस हॉर्हेझ
द क्राफ्ट ऑफ वर्सः द नॉर्टन लेक्चर्स, १९६७-६८ — हॉर्हे लुईस हॉर्हेझ
हॉर्हे लुईस हॉर्हेझ ह्यांनी १९६७ सालच्या शरद ते १९६८च्या वसंतादरम्यान हार्वर्ड विश्वविद्यालयात "द क्राफ्ट ऑफ वर्स" ह्या विषयावर सहा भागांची नॉर्टन व्याख्यानमाला दिली. त्या व्याख्यानांच्या ध्वनिफिती वरील दुव्यावर ऐकता/उतरून घेता येतील.
हे अप्रतिम म्युझिक पुन्हा
हे अप्रतिम म्युझिक पुन्हा ऐकले.
https://www.youtube.com/watch?v=aUmIELyNGrU
पंधरा वर्षे झाली, पण हा पिच्चर पुन्हापुन्हा बघावासा वाटतो. किमान काही सीन्स तरी वारंवार बघितलेच जातात.
ब्याट्या, खास तुझ्यासाठी -
ब्याट्या, खास तुझ्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=P73Z6291Pt8
तू दिलेली ग्लॅडिएटर ची लिंक माझ्या एका मित्रास पाठवली. तेव्हा त्याने ही दिली. चोख प्रत्युत्तर. :-)
माझा हा मित्र गेली २३ वर्षे मला उत्तमोत्तम वेस्टर्न म्युझिक च्या कलाकृति पाठवत आलेला आहे !!!!
पण मी मात्र फक्त जुनी हिंदी गाणी ..... कवटाळून....
(कूपमंडूक गब्बर)
पं.वेंकटेश कुमार
प्रसिद्ध गायक पं.पं.वेंकटेश कुमार यांचे हे भीमपलासी मधले कानडी भजन मित्राच्या गाडीत ऐकले. गायक आणि राग ओळखला पण अर्थ कडे कडेनेच लागतो. पण गाण्याचा बाज असा की जणू स्वरभास्कर 'इंद्रायणी काठी ' गात आहेत . (आणि नाना मुळे साथीला आहेत)
आज आमच्या शेजारच्यांकडे
आज आमच्या शेजारच्यांकडे शास्त्रीय संगीताची खाजगीशी मैफल होती. सगळी नवोदित गायक/वादक मंडळी.
गायला रोहित धारप, श्रेया सोंडूर, स्वरांगी मराठे आणि दीपिका भिडे.
तबल्यावर अथर्व कुलकर्णी आणि साईनाथ.
संवादिनीवर सुमंत बिवलकर.
शनिवार संध्याकाळ पुरेपूर वसूल, शिवाय अविस्मरणीय वगैरे.
संभाजी भगत
कोर्ट मधले पोवाडे खूपच आवडल्यावर शोध घेतला तर संभाजी भगत असं शाहिरांचं नाव कळलं.
त्यांचा एक धमाल पर्फॉर्मन्स ऐकला. -
https://www.youtube.com/watch?v=9_tteC2yjso
कसली भारी उर्जा आहे त्यांच्या अंगात! मानलं!
वैजयंती माला - "तमाशा" लोककलेत
वैजयंती माला - "तमाशा" लोककलेत, नथ आणि नऊ वारी घालून
.
https://www.youtube.com/watch?v=bnx0Dhsm4EU
शांताबाय...
शांताबाय....
रुपाची खाण दिसती छान
लाखात छान नजरेचा बाण
तीरकमान मारती चकरा
तुझा गं नखरा
इकडून तिकडून मारती चकरा
चकरा नखरा चकरा नखरा चकरा नखरा
शांताबाय...
तेरा ये जलवा
माहिमचा हलवा
जिवाला कालवा
मनाला भुलवा
मामाला बोलवा
कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा
शांताबाय...
अटक मटक चवळी चटक
लटक मटक वार्यानं उडती केस झटक
लटक मटक लटक मटक लटक मटक
शांताबाय...
गिरकी घेतीया गरागरा
पदर उडतोया भराभरा
हिरोईन दिसती जरा जरा
तररीरारी रराररा
शांताबाय...
खटापटा हिचा नटापटा
अहो पटापटा कसा झटापटा,
जीव लटापटा अहो लटापटा
हिचा नटापटा बघा पटापटा
कसा नटापटा, कसा लटापटा,
कसा नटापटा, कसा लटापटा
शांताबाय...
रुपाची खाण दिसती छान
लाखात छान नजरेचा बाण
तीरकमान मारती चकरा
तुझा गं नखरा
इकडून तिकडून मारीती चकरा
चकरा नखरा चकरा नखरा चकरा नखरा
शांताबाय... शांताबाय... शांताबाय
खूप दिवसांनी मस्त गाणं ऐकलं.
This is for all you girls about forty-two
Tossing pennies into the Fountain of Youth
Every laugh, laugh line on your face
Made you who you are today
This one's for the girls
Who've ever had a broken heart
Who've wished upon a shooting star
You're beautiful the way you are
This one's for the girls
Who love without holding back
Who dream with everything they have
All around the world
.
.
https://www.youtube.com/watch?v=oTowId2CWHA
S. D Burman यांची जयंती
S. D Burman यांची जयंती
https://www.youtube.com/watch?v=g9eppdrcyHI - सुन मेरे बंधू रे
https://www.youtube.com/watch?v=9KgO5sRGPiw - वहां कौन है तेरा
https://www.youtube.com/watch?v=AKOf-QXnSzk - मेरे साजन है उस पार
वेड्यासारख्या आवडतात या बाई
एक आग ग़म-ए-तन्हाई की, जो सारे बदन में फैल गई,
जब जिस्म हीं सारा जलता हो, फिर दामने-दिल को बचाएँ क्या।
https://www.youtube.com/watch?v=9EljixrFh04 - फरीदा खानम
_____
सारी दुनिया के रन्ज-ओ-गम देकर
मुस्कुराने की बात करते हो
.
हमको अपनी खबर नही यारों
तुम जमाने की बात करते हो
.
जिक्र मेरा सुना तो चिड के कहा
किस दीवाने की बात करते हो
.
हादसा था गुजर गया होगा
किसके जाने की बात करते हो.................वा!!!
https://www.youtube.com/watch?v=2L1_vL5bBJE - फरीदा खानम
_____________
कमेंटवरुन - ही गझल शकील बदायुनी यांनी लिहीली असुन, फरीदा जींनी यमन कल्याण रागात गायले आहे.
मेरे हमनफस, मेरे हमनवा
मुझे दोस्त बनके दगा न दे..
मैं हूं सोजे-इश्क से जांबलब
मुझे जिंदगी की दुआ न दे
.
मेरे दागे-दिल से है रौशनी...
इसी रोशनी से है जिंदगी
मुझे डर है ये मेरे चारागर
ये चराग तू ही बुझा न दे..................सुंदर!!
.
कभी मुस्कुराके हटा दिया...
कभी जाम लब से लगा दिया
तेरी छेड़छाड़ ये साकिया
मेरी तिश्नगी को बुझा न दे...
.
मेरा अज्म इतना बुलंद है
कि पराये शोलों का डर नहीं
मुझे खौफ अतिशे-गुल से है
ये कहीं चमन को जला न दे .......... आहाहा!!
.
जो लिखे हैं मेरे नसीब में
वो अलम किसी को खुदा न दे
.
https://www.youtube.com/watch?v=wFpK90fPA3A - फरीदा खानम
____
मोहब्बत करने वाले कम न होंगे,
तेरी महफ़िल में लेकिन हम न होंगे।
.
ज़माने भर के ग़म या इक तेरा ग़म,
ये ग़म होगा तो कितने ग़म न होंगे।
.
दिलों की उलझने बढती रहेंगी,
अगर कुछ मशवरे बा-हम न होंगे।
.
अगर तू इत्तेफ़ाक़न मिल भी जाए,
तेरी फ़ुर्कत के सदमें कम न होंगे।.....................अप्रतिम!!!
.
"हाफ़िज़" उनसे मैं जितना बदगुमां हूँ,
वो मुझसे इस क़दर बरहम न होंगे।
https://www.youtube.com/watch?v=HL00C8lvuxw - फरीदा खानम
अकाऊस्टिक संगीत ऐकते आहे. मला
अकाऊस्टिक संगीत ऐकते आहे. मला हा प्रकार माहीतच नव्हता. छान वाटतो आहे.
https://www.youtube.com/watch?v=vavaO0ZlZPY
कोणाला आवड असेल तर भिमसेन
कोणाला आवड असेल तर भिमसेन जोशींची १९५७ मधे गायलेली ही मुलतानी ची द्रुत बंदीश ऐका.
वर्णन करायला शब्द नाहीत. सुरांची अचुकता इतकी की तान ऐकताना पण अंगावर शहारे यावेत.
ही भैरवी ऐका, भिमसेन जोशी आणि
ही भैरवी ऐका, भिमसेन जोशी आणि वसंतराव एकत्र गात आहेत. ५० च्या द्शकातले रेकॉर्डींग असावे. वसंतराव फार नाही गायलेत. पंडीतजींच्या गाण्याबद्दल काय बोलणार, स्वर्गीयच
रस के भरे तोरे नैन
www.youtube.com/watch?v=LxOAOScd0f4
ही पंडीतजींची दुसरी एक भैरवी, ह्यात व्हिडीयो पण आहे.
परवा कंट्री सॉन्ग्स शोधत होते
परवा कंट्री सॉन्ग्स शोधत होते आणि एक एकदम एव्हरग्रीन आवाजाच्या एका कंट्री सिंगरचे गाणे सापडले. ते गाणं ऐकल्यावरती त्याची अन्य सर्व गाणी पाहीली व ऐकली. त्यातील मला सर्वात आवडलेल्या गाण्याची सिच्युएशन अशी -
एक मध्यमवयीन, बाल-बच्चेवालं जोडपं आहे. मुलांना प्रधानक्रम मिळाल्याने, तसेच घरातील mundane chores पुढे एकमेकांकरता जास्त वेळ देता येत नाही. एकमेकांसोबत घलवायचे निवांत क्षणही दुरापास्त झाले आहेत. आणि मुख्य म्हणजे दोघांत अतोनात प्रेम आहे, ओढ आहे.
.
ती आकाश पाताळ एक करत बांधा सुडौल ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. तिला परत १७ व्या वर्षी ती होती तसे बनायचे आहे आणि मग मुलांच्या, कामाच्या रगाड्यातून वेळ काढून ती एक्झरसाइझ बायसिकल, किकबॉक्सिंग असे व्यायाम तिच्या परीने करते आहे ज्यात ती दमून जाते. रात्री पाठ टेकता क्षणी ती झोपी जाते.
.
आणि मग त्याच्या मनात विचार येतात - वेडे हे सारं तू कशासाठी करते आहेस? माझ्यासाठी? अगं पण तुला हे माहीतच नाही की मी तुझ्यावर अजुनही तितकाच अनुरक्त आहे, किंबहुना जास्तच.
you worry about your hips an' you worry about your age
Meanwhile I'm tryin' to catch the breath you take away
.
एकदमच रोमॅन्टिक गाणं आहे हे. व्हिडीओ पहाण्यासारखा आहेच. ट्रेस अॅड्किन्स चा आवाज अन संगीतही सुश्राव्य आहे. हवं तर आधी लिरीक्स वाचा. पण नंतर व्हिडीओ पहाच.
.
लव्हीडव्ही प्रेमापेक्षा, प्रेमाची एक सॉलिड, आश्वासक आणि खास खास मॅच्योर (प्रगल्भ) छटा आहे गाण्यात जी की अतिशय मोहक वाटली मला. ट्रेस अॅडकिन्स छान दिसलाय अन त्यातली मॉडेलही हॉट दिसलीये. दोघेही आवडले.
.
https://www.youtube.com/watch?v=Rd5TJemW_iE
एक नवे आणि सुंदर मराठी गाणे
विदुषी देवकी पंडित यांनी गायलेला यमन !
शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन
शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन या दिग्गजांची नावे ऐकून शनिवारी कार्यक्रमाला गेलो होतो, पण कार्यक्रम नेमका "फ्यूजन" प्रकारातला होता. (मला हे आधी माहित न्हवते). हा फ्यूजन प्रकार म्हणजे मटण बिर्याणी ही आमरसात कालवून खाण्याचा प्रकार होता. एक ना धड, भाराभर चिंध्या. शंकर महादेवनने कर्नाटक भजन गायले (म्हणजे शब्द न्हवेत, नुसतेच आलाप) आणि त्यानंतर मध्येच किशोर कुमारचे इना-मिना-डिका. एकीकडे लुई बँक्स जॅझ संगिताच्या साथीमध्ये, पियानो वाजवत होता (होय, स्टाइनवेचा पियानो पण इलेक्ट्रॉनिक किबोर्डसारखा, मध्येच उभा राहून बडवत होता. शिवाय डोक्यावर टोपी घालून मला तरी आजतागायत कुणाला पियानो वाजवताना बघता आले न्ह्वते. विचित्र दिसते, पण तो योग आला.) दुसरीकडे चेलोवादन सुरू होते आणि संजय दिवेचा यांचे गिटारवादन पण (अगदीच टुकार). स्टेजच्या मधोमध झाकिर हुसेन तबलावादन करत होते, त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही, पण पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांचे चांगलेच कन"फ्यूजन" ऐकायला मिळाले. $२००, $१००, $७०, $४५ वगैरे. म्हणजे तिकिटांच्या किमतीपण काही कमी न्हवत्या. नशीब की कार्यक्रम दीडएक तासातच उरकला. "फ्यूजन" म्हणजे नुसता सावळागोंधळ हे तरी कळले. पुढच्या वेळेपासून या प्रकारापासून चार हात दूर राहता येईल.
From 4:35 to
From 4:35 to 7:00
.
.
.
.
https://www.youtube.com/watch?v=3Stdq_3XjPg
हनुमानचालिसा
सद्ध्या 'संकट मोचन महाबली हनुमान' या सिरीअलमध्ये जी हनुमानचालिसा मध्येमध्ये बॅकग्राऊंड म्युझिकसारखी ऐकवली जाते ती सलग एकसंध मिळाल्यास शोधायचा प्रयत्न करतेय. खूपच सुरेख आणि उत्साहपूर्ण पद्धतीने म्हटलेली आहे. मलातरी विशेष आवडली आहे. खास तेच बॅकग्राऊंड म्युझिक ऐकण्यासाठी मी आईबरोबर ही सिरीअल बघते असे म्हटले तरी चालेल.
गायलेली की लेखी?
लेखी नसणार बहुधा. शोधयंत्रांच्या जमान्यात असे लोकप्रिय पाठ्य सापडत नाही असे होणारच नही.
तरी पाठ्याचा दुवा.
गायलेलीच...
तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, धनंजय. लेखी नाही शोधतेय मी हनुमानचालिसा, छोटे पुस्तक आहे त्याचे घरी. अर्थात वाचले कधीच नव्हते आणि नसतेही. ह्या मालिकेतली गाण्याची पद्धत इतकी गुंगवून टाकणारी आहे की आपोआपच ओठांवर रुळायला लागते ते. मग विचारल्यावर कळले की हे इतर काही नसून हनुमानचालिसा आहे ते. आता सहजच मालिकेत गायलंय तसंच अख्खं हनुमानचालिसा म्हणायचा सोस पडलाय मनाला.. त्यासाठी मूळ चीज शोधणे तर आलेच ना! त्या मालिकेतले तर बालहनुमानाला झोपवण्यासाठी अंजना नेहमी त्याला जे अंगाईगीत ऐकवते तेही माझे खूप आवडते झाले आहे. असो.
She is a WOW!! - - किती सुंदर गाणी आहेत
https://www.youtube.com/watch?v=TtI-tKqDmqU&index=3&list=PL1DC823690784…
You looked inside my fantasies and made each one come true
Something no one else had ever found a way to do
I've kept the mem'ries one by one, since you took me in
And I know I'll never love this way again
.
I know I'll never love this way again
So I keep holdin' on before the good is gone
I know I'll never love this way again
Hold on, hold on, hold on.
__________
.
.
https://www.youtube.com/watch?v=qa-mjjdt24g&list=PL1DC823690784FE1D&ind…
.
https://www.youtube.com/watch?v=bLn_ZZEoWYI&index=8&list=PL1DC823690784…
I wanna feel this way longer than time.
I wanna know your dreams and make them mine.
I wanna change the world, only for you.
All the impossible, I wanna do.
I wanna hold you close under the rain.
I wanna kiss your smile and feel your pain.
I know what's beautiful, looking at you.
Here in a world of lies, you are the truth.
https://www.youtube.com/watch?v=bTt5hM521k4&list=PL1DC823690784FE1D&ind…
आनंद महल रिलीज झाला नव्हता.
आनंद महल रिलीज झाला नव्हता. हे नव्हतं माहीती मला.
बाय द वे याची चाल त्या आनंद चित्रपटातल्या "ना जिया लागे ना ... तेरे बिना मेरा कहीं जियां लागे ना" सारखी वाटते - असं फक्त मलाच वाटतं की इतर कुणाला पण वाटतं ? इथे डकवतोय. ऐका व सांगा.
.
.
(या गाण्याला एक "काकुबाई डिस्काऊंट" द्यावा असे वाटते.)
.
.
>>बाय द वे याची चाल त्या आनंद
>>बाय द वे याची चाल त्या आनंद चित्रपटातल्या "ना जिया लागे ना ... तेरे बिना मेरा कहीं जियां लागे ना" सारखी वाटते - असं फक्त मलाच वाटतं की इतर कुणाला पण वाटतं ? इथे डकवतोय. ऐका व सांगा.
शक्य आहे. सलील चौधरींचंच संगीत आहे. नि सा ग म प नि आणि तेरे बिना मेरा कही हे सिमिलर वाटतात. कदाचित सेम सूर असतील.
'ना जिया लागे ना' आणि 'आ आ रे मितवा'
'ना जिया लागे ना' आणि 'आ आ रे मितवा' ही दोन्ही गाणी राग 'मालगुंजी'वर आधारित आहेत. 'घर आजा घिर आए'हे तुमचं आवडतं (हो ना?) गाणंदेखील त्यातलंच.
http://chandrakantha.com/raga_raag/film_song_raga/malgunji.shtml
--
येशुदास यांनी गायलेलं हे गाणं बाङ्लात 'गा गा रे पाखी गा' असं संध्या मुखर्जींच्या आवाजात आहे. सूर आणि शब्द दोन्ही सलिल चौधुरींचंच आहे.
तसंच 'ना जिया लागे ना'चं बाङ्लात 'ना मोनो लागे ना' लता मंगेशकरांनीच गायलेलं आहे.
एक दर्जेदार संकेतस्थळ, गाणी
एक दर्जेदार संकेतस्थळ, गाणी आणि बरेच काही रेडीओच्या स्वरुपात.
http://www.voisact.work/
एनिग्मा-सॅडनेस
मनोबा, बॅटमॅन, गवि, घाटावरचे भट, मिहिर, आदूबाळ , हे ऐकून पहा. आपल्याकरता, निराकार, निर्गुण आहे कारण शब्द कळत नाहीत. तुम्हाला आवडेल. एकदम वेगळच अन प्रभावी आहे.
थोडेसे ग्रेगेरिअन चँटस सारखे आहे - नवर्याचे मत. हे त्याचे अतिशय आवडते संगीत आहे
.
.