जगज्जेता रोबर पुन्हा जग जिंकण्याचा दावा करतो

जगज्जेता रोबर पुन्हा जग जिंकण्याचा दावा करतो
-कुलस्य जोशी

साल 2025. अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेचे मुख्यालय . सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ एका गुप्त आणि महत्वपूर्ण बैठकीसाठी जमले होते. या बैठकीला खास अध्यक्ष अंकल प्रुडंट (ज्यू.) आणि त्यांचे सेक्रेटरी फिल इव्हांस उपस्थित होते. 2025 पर्यन्त शास्त्रज्ञांनी मंगळावर माणूस पाठवण्याची कामगिरी पार पाडली. पुढचा टप्पा म्हणून परग्रहवरील जीवसृष्टीचा शोध लावण्याचा निकरचा प्रयत्न करायचे ठरले होते. त्यासाठी जवळच्या ग्रहांवर अतिवेगवान याने पाठवण्यासाठी चर्चा चालू होती. त्याला जवळजवळ भांडणाचे स्वरूप आले होते.
तेवढ्यात अध्यक्षांच्या टेबलवर एक कार्ड आले. अध्यक्ष खेकसले : “जरा ऐका. एक माणूस बाहेर उभा आहे. त्याला आपल्या चर्चेत भाग घ्यायचा आहे.”
पुन्हा गोंधळ माजला .
“ही गुप्त चर्चा आहे.”
“बाहेरच्याला भाग घेता येणार नाही “
“हाकला त्याला.”
“जरा ऐकता का? “ अध्यक्ष पुन्हा खेकसले. “त्या माणसाचे म्हणणे आहे की अशी जवळच्या ग्रहांवर याने पाठवणे हा मूर्खपणा आहे.”
“असं काय ? ज्यादाच दिसतोय !”

“बोलवाच ! बोलवाच त्याला आत!”

“पाहुच ! काय तारे तोडतो !”

आणि तो आत आला. अत्यंत रुबाबदार आणि पिळदार शरीरयष्टीचा होता तो ! त्याच्या व्यक्तिमत्वानेच ती सभा स्पेलबाउंड झाली.
“माझं नाव रोबर. “ तो म्हणाला. “मी माझ्या शरीराबद्दल आणि व्यक्तिमत्वाबद्दल काही बोलणार नाही. कारण ते तुम्हाला दिसतच आहे. मी एक शास्त्रज्ञ आहे.आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे”

आता मात्र सभेचा संयम संपत होता. पुढच्या रांगेत बसलेले बैचेन होऊ लागले. वादळापूर्वीची शांतता होती ती !

“तुम्ही तुम्हाला काय म्हणायचे ते लवकर सांगा .” अध्यक्ष म्हणाले

“मला म्हणायचे , की तुम्ही जवळच्या ग्रहांवर याने पाठवण्याचा जो प्रयत्न करताय तो पोरकटपणा आहे. मानवाने इतके वर्ष आपल्या जवळच्या ग्रहांवर जीवसृष्टी शोधण्याचा प्रयत्न केला ; काही उपयोग झाला का ? आपल्या सूर्यमालेतील ग्रहांवर जीवसृष्टी नाही हे नक्की ! “ ““मग महाशय , तुमचे काय म्हणणे आहे ? हे प्रयत्न सोडून द्यायचे का ? परग्रहवासीयांचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा नाही ?” फिल इव्हान्सनि खवचटपणे विचारले.
“याचा अर्थ असा नाही , की मानवाने प्रयत्न करू नये “ रोबर म्हणाला. “पण जीवसृष्टीचा शोध घ्यायची सुरुवात आता आपल्या सूर्यमालेबाहेर करायला हवी. “
आता मात्र अध्यक्षांना राहवले नाही .
“महाशय , आपला सर्वात जवळचा तारा किती दूर आहे माहीत आहे ? सव्वाचार प्रकाशवर्षे! म्हणजे प्रकाशालाच तिथे पोहोचायला सव्वाचार वर्षे लागतात. प्रकाशाचा वेग माहीत आहे ना ? “ त्यांनी खवचटपणे विचारले.
“पण ज्या मानवाने अंतराळात जाण्यासाठी याने बनवली; तो प्रकाशाच्या वेगाने , किंवा कमीत कमी अर्ध्या वेगाने जाणारे तरी यान का बनवू शकणार नाही ? मग 4 वर्षे किंवा 8 वर्षात असा ग्रह सापडू शकतो.” रोबर म्हणाला.
प्रकाशाच्या वेगाने यान जाणार ! बस ! उंटाच्या पेकटवरची शेवटची काडी! त्याचा स्फोट झाला.
‘स्टुपिड , फूल , नॉनसेन्स , हम्बग !’ एवढ्या शिव्या फक्त देऊन त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरळ दिसेल त्या गोष्टी फेकून मारायला सुरुवात केली.
रोबरने सरळ पिस्तूल काढून हवेत बार उडवले. त्या धूरात सभा कोंदटली असतानाच तो पसार झाला .
दुसर्याा दिवशी संपूर्ण अमेरिकेत हाहाकार माजला. तो रोबर तर सापडला नव्हताच , पण साक्षात अमेरिकेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी गायब झाले होते. दोघांना शोधण्याचा सर्व मार्गानी खूप प्रयत्न झाला. पण ते बहुतेक पाताळात गायब झाले होते किंवा पृथ्वीवरच नव्हते.
आणि ९ वर्षांनंतर .........
अचानक अंकल पृडेंट आणि फिल इव्हांस आपल्या ओफिसात आले. पुन्हा हा गोंधळ. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ९ वर्ष उलटूनही दोघांचे वय किंचितही वाढले नव्हते ! दोघेही हरवले तेव्हा होते त्याच स्थितीत आताही होते. आतापर्यंत अर्थातच अमेरिकेत नवे अध्यक्ष आले होते. मग हे परत आल्यावर गोंधळ आणखीन वाढला. ते पुन्हा अध्यक्षा होणार की आहेत तेच कायम राहणार की पुन्हा निवडणुका ? शेवटी या सर्वांचा खुलासा करण्यासाठी मोठ्या मैदानात पत्रकार परिषद बोलवण्यात आली. त्याला अफाट गर्दी जमली.
“नागरिकांनो , मला अध्यक्षंपदाचा कोणताही मोह नाही. आम्ही ही पत्रकार परिषद बोलावली, कारण ९ वर्षात आम्हाला आलेला अनुभव तुम्हाला सांगण्यासाठी !”
सगळ्यांनी उत्सुकतेने ऐकायला सुरुवात केली.
दोघे आळीपाळीने बोलत होते. आणि कथणात व्यत्ययही बरेच आले. ते गाळून आणि पसरटपणा टाळून हे संयुक्त निवेदन वाचुया !
“ आम्ही सगळ्यांसारखे रोबरला शोधायला बाहेर पडलो होतो पण गुप्तपणे. अचानक आमच्या नाकासमोर कोणीतरी क्लोरोफोर्मचा बोळा धरला. दुसर्याक क्षणी आमची शुध्द्ध हरपली.
पुन्हा शुद्ध आली तेव्हा आम्ही एका विमानाच्या सीट वर होतो आणि आमच्या समोर छद्मी हसत रोबर उभा होता.
“हे विमान नाही . याचे नाव अलबाट्रोस. हे अंतराळ यान आहे. पण तुमच्या बैलगाड्यासारखे नाही.” तो डिवचत म्हणाला. “हे प्रकाशाच्या वेगाने जाते. आता आपण निघायला तयार आहोत.”
रोबर हे म्हणाला मात्र , पुढच्याच क्षणी आमच्या यानाला जबरदस्त धक्का बसला. प्रचंड वेगाने आपण वर जात असल्याची जाणीव झाली आणि आमची शुद्ध पुन्हा एकदा हरपली.
शुद्धीवर आलो त्यावेळी रोबर अपराधी चेहरा करून उभा होता. “माफ करा , माझी चूक झाली , मी उड्डाण करताना तुम्हाला गोळी द्यायला हवी होती म्हणजे तुम्हाला त्रास झाला नसता. हरकत नाही. आता देतो ती घ्या ! म्हणजे त्रास होणार नाही. कारण थोड्याच वेळात आपण प्रकाशाचा वेग गाठणार आहोत ! “
आम्ही काहीशा ग्लानीतच गोळी घेतली. पण थोड्याच वेळात आम्हाला पुष्कळ फ्रेश वाटू लागले. आम्ही आमच्या आसनावर बसलो . ते यान तसे विमानासारखेच होते. फक्त आकार छोटा होता. पण इंजिन्स काहीतरी वेगळीच वाटत होती. न राहवून आम्ही विचारले.
“ तुम्ही आम्हाला कुठे घेऊन चालला आहात ? “
“ प्रकाशाच्या वेगाने जीवसृष्टीची सैर करायला.”
“ हा प्रवास किती वेळ चालणार ?”
“ किमान ९ वर्ष ! “
अक्षरशा: हातबुद्ध होऊन आम्ही बसलो. पण यानाने वेग गाठल्यावर लवकरच बाहेरच्या देखाव्यात हरवून गेलो.
ग्रह झपाट्याने मागे पडत होते. रोज पाहतो ते तारे आज काहीतरी वेगळेच भासत होते. जास्तच सुंदर ! हे शांत आणि अफाट अंतराळ आम्हाला खूपच आवडले.
दिवस असेच जात होते. अनेक सुंदर जागा बघायला मिळत होत्या . निसर्गाने अंतराळात सुद्धा किती सुंदर गोष्टी निर्माण केल्या आहेत याची प्रचिती येत होती. या गोष्टी शब्दात सांगणे कठीण आहे .
या ४ ते ४.५ वर्षात दिनक्रम अत्यंत मजेत चालला होता. त्याने आम्हाला कसलाच त्रास दिला नाही. या कलावधीत आमच्या वयात आणि शरीरात कसलाच फरक पडला नाही. आइनस्टाईनच्या रिलेटिविटीचे आम्ही सजीव दाखले होतो.
शेवटी आम्ही दुसर्याो तार्याटच्या ग्रहमालेत पोहोचलो. इथेही आपल्याप्रमाणेच छोट्या आणि मोठ्या आकाराचे ग्रह होते. वेगवेगळ्या रंगाचे !
“मी इथे बर्या्च वेळेला आलेलो आहे. जसे तुमचे वय वाढले नाही तसे माझेही वाढत नाही आणि मी माझे तारुण्य टिकवून ठेऊ शकतो. मी तुम्हाला तीन ग्रहावरच्या तीन जीवसृष्टी दाखवणार आहे. आपण आता पहिल्या ग्रहावर उतरूया.”
आम्ही पहिल्या ग्रहावर पोहोचलो होतो. उतरताना वेगळ्या प्राणवायूचे मास्क लावून उतरलो होतो. इथे प्राणवायू ऑक्सीजन नव्हता.
उतरलो तेव्हा आकाश वेग वेगळ्या रंगांनी रंगले होते. ते दृश्य फारच सुंदर वाटत होते. पण अजूनही सजीव सृष्टीची खूण दिसत नव्हती.
“ मी मागच्या वेळेला आलो होतो , तेव्हा जीवसृष्टी निर्माण होण्याची शक्यता दिसत होती. आता ती सुरुवात झाली असेल. “ रोबर म्हणाला.
थोडे पुढे गेल्यावर आम्ही आश्चर्याने स्तब्ध झालो. जीवसृष्टीची निर्मिती प्रक्रियाच आम्ही पाहू शकत होतो. अणूंचे रेणूत रूपांतर होताना पाहत होतो. ते कसले सजीव होते ते सांगता येणार नाही. पण ते ही एकपेशीय होते. आणि त्यांची निर्मितीप्रक्रिया आम्ही पाहत होतो. डोळे विस्फरून हे सृजन पाहत होतो. रोबरचा चेहरा कृतार्थ वाटत होता.
त्यानंतर रोबरने आम्हाला त्याच मार्गाने दुसर्या ग्रहावर उतरवले. तिथे जीवसृष्टी प्रार्थमिक वाटत होती. म्हणजे जशी आपल्याकडे अश्म्युगात होती तशी. प्राणी पक्षी सारखे जीव तिथे होते आणि सर्वात बुद्धिमान जीवही आपल्यासारखेच होते. आपल्याप्रमाणेच रानावनात राहत होते. काही वर्षानी तिथेही प्रगती होणार यात शंका नव्हती.
आम्ही परत जाण्यासाठी पुन्हा एकदा यानात बसलो. त्या ग्रहाच्या बाहेर पडलो आणि त्याक्षणी आम्हाला दुसरे अंतराळ यान त्या दिशेने वेगात येताना दिसले. ते यान खूपच विकसीत वाटत होते.
“ त्या यानाचा त्या ग्रहाला धोका वाटत आहे. त्यांना वाचवूया” !
“मी तेच करणार आहे ! पण त्यांच्याशी टक्कर घेण्यासारखी आपली शस्त्र नाहीत आणि तंत्रज्ञानही ! “
“मग ?” आम्ही काळजीत विचारले.
“पण मी एक असे रसायन षोडले आहे की जे या ग्रहावर मारल्यावर तो ग्रह इतरांना काही काळासाठी तरी सापडणार नाही. त्यामुळे इथे ग्रह आहे हेच त्यांना कळणार नाही “
एवढे बोलून रोबरने ते रसायन यानातूनच त्या ग्रहावर मारायला सुरुवात केली. आम्ही आशचर्याने पाहत होतो आणि तो ग्रह पाहता पाहता दिसेनासा झाला !
“ चला ! आता काही भीती नाही. “ स्मित करत रोबर म्हणाला. “आता मी तुम्हाला या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर घेऊन जाणार आहे. “
त्या ही वेळी आम्हाला एक गोष्ट जाणवली. म्हणजे अलबाट्रोस मध्ये दुसर्यां ना मदत करण्याचीही क्षमता होती तर !
तिसर्याी टप्प्यावर तो आम्हाला आपल्यापेक्षाही अत्यंत प्रगत अशा जीवसृष्टीकडे घेऊन गेला. त्या ग्रहावरचे जीव मित्रत्वाच्या भावनेने वागत होते. कुठलीही भाषा बोलू शकत होते आणि तिथे अनेक सोयी झालेल्या होत्या. तिथली हवा विनाप्रदूषित होती. जीवनमान अत्यंत सुखी होते.”
एवढे बोलून दोघेही अनपेक्षितरीत्या गप्प झाले. पत्रकारांना राहवले नाही.
“ हे सगळे त्यांनी कसे मिळवले हे तुम्हाला संगितले किंवा दाखवले का ? “
“ हो , पण ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही” अंकल पृडेंट शांतपणे उद्गारले.
हे ऐकताच तिथे पुन्हा ही गडबड माजली. तेवढ्यात आकाशात एक प्रकाश दिसला . ते अंतराळ यान होते. आणि त्यातून रोबर उतरला.
हे पाहताच तिथली सर्व जनता आणि पत्रकार एकदम शांत झाले. टाचणी पडली असती तरी आख्या अमेरिकेत ऐकू गेली असती एवढी शांतता पसरली.
“यूनायटेड स्टेट्स च्या नागरिकांनो, “ रोबरने बोलायला सुरुवात केली. “ ते काही सांगत नाहीत कारण मी त्यांना मनाई केली आहे.”
“का ?”
“कारण त्या माहितीसाठी तुम्ही अजून तयार नाहीत. आपापसातले हेवेदावे आणि भांडण सोडून तुम्ही एक होत नाहीत. आपली पृथ्वी एकत्र येऊन विज्ञानाची कास धरत नाही. मानव पूर्वीसारखा रूढीवादी अजूनही आहे. नवीन गोष्टीचे आपण स्वागत का करत नाही ? का अजूनही माझ्यासारख्या नवीन कल्पना मांडणार्याू माणसाला वेड्यात काढण्यात येते ? का आपण अजूनही आपल्या पूर्वग्रहना चिकटून आहोत ?
तुम्हाला माहीत आहे की जगात पहिले विमानही मीच बनवले होते ? याच अंकल पृडेंट आणि फील इव्हान्स च्या पूर्वजांना मी विमानातून जगाची सफर घडवली होती. पण तेव्हाही तुमच्याकडे मी हवेपेक्षा जड वाहन हवेतून जाऊ शकते हा दावा केला होता तेव्हा मला असेच हाकलले होते जसे आता मी प्रकाशाच्या वेगाने जाणार्यात यानाबद्दल बोललो तेव्हा केले. माला तेव्हाही लक्षात आले होते आणि आजही आले आहे की जगाला क्रांती नको आहे ; उत्क्रांती हवी आहे ! हा विवेक जोपर्यंत तुमच्यात येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही माहिती देऊन उपयोग नाही. तुम्ही त्याचा दुरुपयोगच करणार. तेव्हा स्वत:चा विकास लवकरात लवकर करा. गुडबाय !”
तेव्हा मनाच्या खजील अवस्थेतच जनता घरोघरी गेली. हाच विचार करत :
‘हा विवेक आपल्यात येईल ?’

XXXXXXXXXXXXXXXXXXXXX समाप्त XXXXXXXXXXXXXXX
ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

वा! छान प्रयत्न! मुळ कथेचीच थीम आणि काही वाक्ये तशीच वापरून नवी कथा आकारास आणायची क्लृप्ती थोर.

----

हे सगळे त्यांनी कसे मिळवले हे तुम्हाला संगितले किंवा दाखवले का ? “
“ हो , पण ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही” अंकल पृडेंट शांतपणे उद्गारले.

व्हर्नच्या कथांमध्ये मात्र अशी बोळवण नसते Wink इथे बहुदा शब्दमर्यादेमुळे असेल असे वाटून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसदाबद्दल धन्यवाद ! काही वाक्य तीच वापरली आहेत हे बरोबर आहे. पण यात नक्कल करण्याचा उद्देश नसून ती वाक्ये मला तशीच आवडली आहेत हे आहे. जेव्हापासून ती कादंबरी वाचली तेव्हापासून त्यावर काही लिहावे असे वाटले ती संधी या स्पर्धेत मिळाली. त्यामुळे सुद्धा ही वाक्ये वापरण्याचा मोह झाला असेल. रोबरच्या बाबतीत मला हीच थीम योग्य वाटली.
खरे तर माला सफरीबद्दल आणि ग्रहांबद्दल बरच काही लिहायचे होते. पण शब्दमर्यादा खूपच ओलांडली जाईल या भीतीमुळे. रोबरच्या पत्राला शोभेल असा शेवट करण्याचा प्रयत्न.
पुन्हा एकदा - यात नक्कल करण्याचा उद्देश अजिबात नाही .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात नक्कल नाहीच, उलट तीच वाक्ये तुमच्या कथेच्या अनुषंगाने वापरण्याचे कौतुकच करायचा उद्देश होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सॉरी. माझाच गैरसमज झाला. 'क्लूपती' शब्द वाचून थोडा बिचकलो होतो Wink धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली. कुमारवयीन मुलांकरता असल्याने जे लिहीले आहे तो कल्पनाविलास जमला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा आवडली. चांगला प्रयत्न. रोबरची मूळ कथाच फारशी आवडती नसल्यामुळे कथेवर फार लिहीत नाही. पण कथास्पर्धेसाठी भारांनी अनुवादिलेली कथा निवड्ण्याबद्दल हार्दिक अभिनंदन. केवळ स्वतंत्र लेखक म्हणूनच नाही, तर भाषांतरकार, रूपंतरकार म्हणूनही भारांचे कर्तॄत्व थोर आहे.
पुढील लेखनाबद्दल शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काव्या आणि शहराजद धन्यवाद Smile माझ्या मते अनुवादकर म्हणून भारांचे योगदान जास्त चांगले आहे. रोबरची कथा माझी आवडती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0