अक्कल दाढ ????

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.

आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल. मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का? डॉक्टर मिस्कील हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीवघेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील, काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळाठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. पोंर ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आपल्या सौभाग्यवतीला घेऊन, भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. घरी जाऊन मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो. आरश्यात मला माझा चेहरा काळाठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.

दात तोड डॉक्टर मित्रांकडून प्रतिसाद अपेक्षित

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile हाहाहा! सुपर्ब!!! तुम्ही कर्क चंद्र राशीचे का हो?
_______
त्यावरुन आठवलं शरद उपाध्ये "कर्क-चंद्र" राशीच्या स्त्रीच्या कल्पकतेबद्दल बोलताना विशेषतः तिच्या खर्‍या अथवा काल्पनिक ,आर्थिक असुरक्षिततेच्या हळवेपणाबद्दल जोक सांगतात.
की एका सुखवस्तू भित्र्या , कर्क राशीच्या (ही खरं तर द्विरुक्ती होतेय पण असो) स्त्रीला खरच वाटलं की तिला चाकाच्या गाड्यावर बसून भीक मागावी लागली तर अन मग तिला दिसू लागले की रस्त्यावरुन आपण गाड्यावरुन भीक मागत फिरतोय, लोक एखादं नाणं टाकतायत, बरेच जण तुच्छतेचा कटाक्ष टाकून पुढे जातायत वगैरे वगैरे.
मग उपाध्येंनी विचारलं "गाडा कोण ओढत होतं" तर ती म्हणाली "हे अजुन कोण?" ROFL
____
लिंडा गुडमननेही कर्क स्त्रीच्या याच असुरक्षिततेबद्दल टिप्पणी केलेली आहे - When she's weeping, and he doesn't know why, he shouldn't storm out of the room impatiently. He should take her in his arms, and lullaby her with tender reassurances, ..... we're almost sure to be rich someday. And as for me, I love you even more than other people do, and that's really a bunch. You don't have to offer to do the neighbor's laundry. We're not quite that poverty-stricken, and we never will be. ROFL
_____
अन हे खूप खरं आहे मुलगी झाल्यानंतर भारतात काही काळ मी नोकरी शोधत होते. अन तेव्हा खूप असुरक्षित वाटे. मला एकदा स्वप्न पडलेलं - मी रस्त्यावरचे लोखंडाचं भंगार गोळा करत फिरतेय अन ते भंगार विकून माझे व कुटूंबाचे पोट भरतेय ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एसीच्या सुज्ञ वाचकांसाठी - कथा स्पष्ट करतो
मी= कनिष्ठ सरकारी कर्मचारी
अकलेचा किडा = अंतरात्मा - फाईल वाचून त्यात दडलेले सत्य पाहून अंतरात्म्याची तळमळ होत होती. काय करावे त्याला सुचत न्हवते.
डॉक्टर = अनुभवी सहकर्मी - यांचा सल्ला घेतला. सत्य बाहेर आणले तर त्याचे फळ काय मिळेल, हे त्याला कळले. फाईल नेहमी करता बंद करून टाकली. अंतरात्म्याला मारून. त्याच मुळे त्याला दर्पणात स्वत:चा चेहरा काळाठिक्कर पडलेला दिसला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एसीत बसलं ना, की सूज्ञ वाचक पण अज्ञ होतात. म्हणून आपल्या रुपककथेची कायमच अशी फोड करुन सांगत जा. म्हणजे आम्ही एसीत बसायला मोकळे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0