गद्य

क्षणकथा: 1

Removed

ललित लेखनाचा प्रकार: 

एका व्यक्तीच्या नजरेतून

एका व्यक्तीच्या नजरेतून

#१

ललित लेखनाचा प्रकार: 

आमचा पण पुस्तक दिन

पुस्तक दिन

आज सकाळी सकाळीच आपल्या बावळट बाळूला कळलं की आज पुस्तक दिन आहे ते. सकाळी सकाळी म्हणजे असं की त्याच्या फेसबुक क्रश मातकट माऊने रात्रभरात कुठकुठल्या पोस्टला लाईक केले हे बघायला त्याने गोपाळमुहुर्तावर फेस्बुक उघडल्यावर. पण ही ‘प्रोसेस’ आम्ही जितकी सांगितली तितकी सहज नसते. ती समजण्यासाठी त्याआधी त्याने काय केलं हेही जाताजाता बघून घेऊ.

ललित लेखनाचा प्रकार: 

लिहित्या लेखकाचे वाचन - हृषीकेश गुप्ते

WorldBookDay

मराठीतले आजचे एक आघाडीचे लेखक हृषीकेश गुप्ते यांचे जागतिक पुस्तक दिनानिमित्त मुक्तचिंतन

ललित लेखनाचा प्रकार: 

भाग तीन: वृक्षवल्ली आम्हा सोयरी

आमचा पहिला आठवडा फक्त प्लॉट स्वच्छ करण्यात गेला, तर आमचे अनुभवी शेजाऱ्यांची बाग दृष्ट लागण्यासारखी नटून सजून तयार झाली. ससे/पाखरांनी भाजी खाऊ नये म्हणून चोहीकडे कुंपण, कुंपणाला मधोमध छोटंसं सुबक दार दोन्हीकडे भाज्यांचे वाफे, आणि मधून विटांची पायवाट वगैरे सुंदर रचना होती. बरं, उन्हात काम करून दमायला झालं, तर खुर्च्या, छत्री, बर्फाच्या डब्यात थंड पेय वगैरे घेऊन दोघे दादा-वाहिनी सकाळपासून उन्हं माथ्यावर येईतोवर राब-राब राबत!

ललित लेखनाचा प्रकार: 

भाग 2: The Tiny Seed

पहिला भाग: Pancakes, pancakes! इथे पहा.

आम्ही जमिनीचा तुकडा भाड्याने घ्यायचा ठरवला तर खरं, पण सुखासुखी कोण शेती करायला घेणार? अशा विचारात गाफील राहिल्यामुळे पहिल्या वर्षी तर मला प्लॉट मिळालाच नाही! पण तिथेच पहिला धडा मात्र मिळाला, की आपल्यापेक्षाही कितीतरी वेडी लोकं आधीपासूनच ह्या 'शेतकी उद्योगात' शिरलेली आहेत.

ललित लेखनाचा प्रकार: 

भाग 1: Pancakes, Pancakes!

एरीक कार्लच्या ह्या पुस्तकातला जॅक बाळा, सकाळी सकाळी आपल्या आईला लाडीगोडी लावून म्हणतो, "आई, आज मला पॅनकेक हवे! आज मला पॅनकेक हवे!!" त्यानंतर मला वाटलं, की फार तर फार आई त्याला सांगेल,"मी पॅनकेक करते, तोवर तू ताटं मांड." मग घरची मंडळी मिळून कसा छान ब्रेकफास्ट करतात, जॅक अगदी अमेरिकेतल्या टिपिकल शाण्या-बाळा प्रमाणे आपले आपले पॅनकेक गट्टम करतो, वगैरे वर्णन असेल...

ललित लेखनाचा प्रकार: 

वेदांग शिरोडकर

प्रारंभ:

ललित लेखनाचा प्रकार: 

मी आणि जातीयवाद

गेली अनेक वर्षे दलित हत्याकांड, शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण, अस्पृश्यता यांविषयी बातम्या व चर्चा, ६ डिसेम्बरचा मोर्चा आणि त्याने मागे सोडलेली घाण, ६ डिसेंबरला 'दादरला जाऊ नकोस बरे' अश्या अर्थाची टिप्पणी याव्यतिरिक्त माझा व्यक्तिशः जातीयवादाशी संबंध आहे असं कधी वाटलंच नाही. आणि ते साहजिकच होतं. मुंबईत ट्रेन आणि बसमध्ये आपण कोणत्या जाती-धर्माच्या गर्दीत गुदमरतोय याचा मी आणि आपण सर्वजण विचार करत नाही. तसंच कॉलेजमध्ये मैत्री करताना अथवा नोकरी करतानाही मी जातीपातीचा निकष लावत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

यंदा कर्तव्य आहे

(शर्वरी कुणाची तरी वाट बघत एकटीच एका कॉफी-हाउस मध्ये बसलीय. तिने पंजाबी ड्रेस किंवा not too modern, not too traditional अशा पोशाख घातलाय. अधून-मधून घड्याळाकडे बघतेय, इकडे-तिकडे बघतेय, कॉफीचा सिप घेतेय.. तिच्यासमोर एक बझ्झर ठेवलाय, गेम शोमध्ये असतो तसला. एक तरुण आत शिरतो, इकडे-तिकडे बघतो आणि शर्वरीपाशी येतो. एकच मुलगा सगळ्या मुलांची भूमिका करतो. मुलाने बोलण्या-वागण्यातल्या विविधतेने पात्रांमध्ये रंगत आणावी).
मुलगा १: आपण शर्वरी का?
शर्वरी: हो. आणि आपण...अविनाश?
मुलगा १: हॅलो (मुलगा हात पुढे करतो).

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य