खलिल जिब्रान - The Earth Gods - उतारा

खलील जिब्रानचे "The Earth Gods" नावाचे उच्च, लोफ्टी पुस्तक वाचते आहे. या पुस्तकाची सुरवातच ३ भूदेवांच्या भेटीने व गप्पांनी होते. पैकी पहीला भूदेव हा कनवाळू व भावनाप्रधान आहे तर दुसरा निष्ठुर, गर्विष्ठ आणि नार्सिसिस्ट रेखाटलेला आहे तर तीसरा उदासीन अन कलेमध्ये रममाण होणारा व निरीक्षण करणारा असा रंगविलेला आहे. जिथे पहील्या भूदेवाचा दुसर्‍या भूदेवाबरोबर खडाजंगी वाद सुरु आहे की मनुष्य महान की भूदेव महान, तिथे तिसरा भूदेव मात्र पृथ्वीवरी एका नर्तकी मुलीच्या नर्तनाचा व एका तरुण गायकाच्या मधुर आवाजाचा आस्वाद लुटतो आहे. हा तिसरा भूदेव परोपरीने पहील्या दोघा जणांना सांगतो आहे की अरे बाबा तुमचा वाद थांबवा आणि जरा खाली बघा २ तरुण-तरुणी कसे प्रेमात पडत आहेत. पण पहील्या भूदेवाला आणि दुसर्‍या भूदेवाला त्यांच्या वादातून डोके काढण्याची उसंत नाही.
.
मला दुसर्‍या भूदेवाचे व्यक्तीचित्र आवडले कारण त्याच्या निवेदनात मला मनुष्यजन्माची एक कटू यथार्थता दिसून आली. या दुसर्‍या भूदेवाने निवेदन केलेल्या एका उतार्‍याचे हे स्वैर रुपांतर आहे -
.
मित्रांनो तुम्हाला कळत नाही का की आपण, आपण बलशाली भूदेव, मर्त्य अशा मनुष्याला निबिड अंध:कारातून वर तर काढतो अन तरीही त्याचे पाय मात्र पृथ्वीवरती घट्ट रोवलेले राखतो.
त्याला जिजीविषेची, जीवनेच्छेची अतिव तृष्णा तर देतोच पण अंती त्याच्या हाती मृत्युरुपी वैफल्याचा पेला देतो.
आपण मनुष्याला जेव्हा प्रेमासारख्या उदात्त भावनेची अनुभूती देतो तेव्हा तेच प्रेम अंती दु:खात विलीन करतो. जे प्रेम मीलनोत्सुकतेने भरतीस येते तेच प्रेम पहील्या मीठीनंतर ओसरते.
मनुष्याच्या रात्री आपण पुढील दिवसांच्या सुखी स्वप्नांनी रंगीन करतो तेच त्याचे दिवस मात्र गतकाळाच्या स्मृतींनी कोळपून टाकतो.
मनुष्याच्या आकांक्षेमध्ये जिथे गरुडभरारी अन विचारांमध्ये जिथे समुद्राची गाज ओवतो तिथे त्याचे हात अन पाय मात्र नियतीच्या साखळदंडाने बांधून टाकतो.
.
मित्रांनो होय आपण आपण शक्तीवान अन अमर भूदेव जिथे मनुष्याचे मन असिम आनंदाने भरुन, त्याच्या गायलेल्या गोड गाण्यांनी , स्वतःचे मन रिझवतो तिथे काही काळातच आपण मनुष्यास अशा दु:खाच्या निष्ठुर डागण्या देतो की ज्यायोगे तो आपला धावा करेल.
पृथ्वी, आपली माता जेव्हा क्षुधार्ततेने आक्रोश करते तेव्हा मनुष्याचे जीवन संपवून आपण त्याला मातीत मिसळून टाकतो, तिची क्षुधा शांतवतो.
मनुष्याच्या आत्म्याला इतका उन्नतीचा, भव्यतेचा असा ध्यास देतो की त्याची नजर भविष्याचा वेध घेइल पण त्याचवेळी त्याचे शरीर मात्र भूतकाळाच्या स्मृतींच्या दलदलीत धसवून ठेवतो.
.
स्वतःच्या मातेच्या अश्रूमय प्रसूतीवेदनेपासून ज्या मनुष्यजीवनाची अथ होते, त्याच जीवनाची इति त्याच्या स्वतःच्या पुत्रादिकांच्या शोकाने व रुदनाने करतो.
आणि मधल्या काळात मित्रांनो, आपणच त्याला आशा-निराशा, स्वप्न-वैफल्य, सुख-दु:खाच्या थपडा देत हेलकावत ठेवतो.
.

Second God: I would not be so vain as to be no more.
I could not but choose the hardest way;
To follow the seasons and support the majesty of the years;
To sow the seed and to watch it thrust through the soil;
To call the flower from its hiding place
And give it strength to nestle its own life,
And then to pluck it when the storm laughs in the forest;
To raise man from secret darkness,
Yet keep his roots clinging to the earth;
To give him thirst for life, and make death his cupbearer;
To endow him with love that waxeth with pain,
And exalts with desire, and increases with longing,
And fadeth away with the first embrace;
To girdle his nights with dreams of higher days,
And infuse his days with visions of blissful nights,
And yet to confine his days and his nights
To their immutable resemblance;
To make his fancy like the eagle of the mountain,
And his thought as the tempests of the seas,
And yet to give him hands slow in decision,
And feet heavy with deliberation;
To give him gladness that he may sing before us,
And sorrow that he may call unto us,
And then to lay him low,
When the earth in her hunger cries for food;
To raise his soul high above the firmament
That he may foretaste our tomorrow,
And to keep his body groveling in the mire
That he may not forget his yesterday.
.
Thus shall we rule man unto the end of time,
Governing the breath that began with his mother's crying,
And ends with the lamentation of his children.
ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet