सिनेमे पाहायचेत!

एका इराणी सिनेमाबद्दलची ही प्रतिक्रिया वाचल्यावर डोक्यात आलं की एक थीम घेऊन सिनेमे पाहावेत.

सिनेमे, मग ते कोणते पाहावेत, कोणते पाहू नयेत याबद्दल खूप प्रतिसाद येतील यात शंका नाही. पण आत्ता डोक्यात थीम आहे, ती ८ ते १० वर्षे वयाच्या मुलासोबत कोणते सिनेमे पाहावेत, ही. लहान मुलांची कार्टुन्स आणि तसे चित्रपट तर पाहिले जातातच. पण त्याखेरीज निव्वळ ढोबळ मनोरंजनाच्या पलीकडे काय काय शोधावं, काय पाहिलं पाहिजे? वर उल्लेख केलाय, तसे लहान मुलांवरचे इराणी सिनेमे अनेकदा नावाजले जातात, फेस्टिव्हलमध्ये पाहिलेही जातात. काहीवेळा काही उत्तम व्हिडिओज, शॉर्ट फिल्म्स पाहण्यात येतात.

तर या वयाच्या मुलांना आवर्जून दाखवायलाच हवेत असे कोणते सिनेमे आहेत? या वयाच्या मुलाचे कुटुंबीय कम् दोस्त म्हणूनही कोणते सिनेमे मोठ्यांनी पाहायला हवेतच? भाषेचं, काळाचं बंधन अर्थातच नाही.. फक्त त्यात झोपेत आठवून दचकायला होईल अशी कोणतीही भीतीदायक दृश्यं नसावीत, ही माफक अपेक्षा आहे.

थोडक्यात मुलाची स्वतःची अशी दृक् श्राव्य लायब्ररी तयार करायची असेल, तर त्यात यापैकी काय काय असायलाच हवं?
चित्रपट..
मालिका..
शाॅर्ट फिल्म्स..
इन्स्पिरेशनल व्हिडिओज..

यात एक तांत्रिक उपमदतपण हवीय, हे सिनेमे डाउनलोड कुठून करता येतील त्याचे दुवेपण मिळाल्यास बरे होईल. आणि ते पेनड्राईव्हच्या मदतीने टीव्हीवर प्ले करण्यासाठी कोणता फाॅर्मॅट चालतो? सबटायटल्सपण हवी असतील तर काय डालो करायचं? ती टीव्हीवर कशी पाहता येतात?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी माझ्या मुलीसोबत ती दोनवर्शांची होती तेव्हा पहिल्यांदा साउंड्स ऑफ म्युझिक (तुकड्या तुकड्यात) पाहिला आहे.
त्यांचा अटेंशन स्पॅन कमी असल्याने सुरूवातीला केवळ त्या चित्रपटातील गाणीच दाखवत असे. तीला ती भयंकर आवडत. नंतर ३ वर्षाची झाल्यावर त्यातील १५-२० मिनीटे लांबीचे प्रसंग ती सलग बघते.

---
त्याव्यतिरिक्त अ‍ॅनिमेशन पटांत फायडिंग नेमो तुकड्या तुकड्यात पाहिलाय

--
चार्ली चॅप्लिनचे प्रसंगही तिला प्रचंड आवडतात. ते लावले की/तर ती सलग १०-१५ मिनिटे बघत अस्ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आत्ता आलेला इन्साइड आउट छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हो मीही ऐकलं तसं.. आता बघावाच लागेल. पण आता फारच कमी शोज (उरले) आहेत, ऑलमोस्ट उतरलाय Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इनसाईड आऊट पाहिला. कथेचा जीव खूपच छोटा आहे. एका पॉईंटनंतर तो फारच कंटाळवाणा वाटू लागला. तीच-तीच दृश्ये परत येताहेत असे वाटत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाफर पनाहीचाच 'द मिरर' कदाचित आवडेल. ८-१० वर्षांची मुलं कसा विचार करतात याबद्दल मला अजिबात काही कल्पना नाही. पण या चित्रपट साधारण त्याच वयाची मुलगी प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटाबद्दल मागे ऐसीवर लिहिलं होतं. दुवा

चित्रपट डाऊनलोड करून कसा मिळवावा याबद्दल फार मदत करू शकत नाही. प्ले करण्यासाठी कंप्यूटर -> एचडीएमाय केबल -> टीव्ही असा एक पर्याय आहे. विंडोजमध्ये एचडीएमाय पोर्टातून आवाजही टीव्हीतून येतो असं काहीसं आठवतं. सबटायटल्स गूगल करून सापडतील. ती सिनेमासोबत दिसण्यासाठी व्हीएलसी प्लेयर एकेकाळी वापरत असे. हे तंत्रज्ञान काळाच्या मागे पडलेलं असण्याचीही बरीच शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खाली काही नावे देत आहे. बरीचशी नावे सर्वश्रुत असतील. तरी या निमित्ताने एकत्र येतील -

१. द लायन किंग
२. टॉय स्टोरी (तिन्ही भाग)
३. आईस एज (मला फक्त पहिला भाग आवडतो. पण एकूण चार भाग आहेत.)
४. वॉल-ई
५. अ बग्स लाईफ
६. अँन्ट्झ्
७. फ्रोझन
८. व्रेक इट राल्फ
९. हॅपी फीट
१०. १०१ डाल्मेशियन्स
११. होम अलोन (सर्व भाग)
१२. हूक (रॉबिन विलियम्स वाला)
१३. स्टँड बाय मी (खूप सुन्दर चित्रपट... पण १२-१६ वयोगटासाठी जास्त समर्पक)
१४. Eight Below (आठ कुत्र्यांचा चित्रपट. यातली एक - दोन दृश्ये मोठ्यांनासुद्धा घाबरवू शकतात. पण तेवढं हवं तर वगळून, मुलांना दाखवण्याजोगा…)
१५. स्टुअर्ट लिट्ल (१,२)
१६. कार्स
१७. जुमांजी (काही दृश्ये भीतीदायक वाटण्याची शक्यता आहे. पण "for the sake of fantasy" दाखवावा.)
१८. चिल्ड्रन ऑफ हेवन (माजिद माजिदी या ईराणी दिग्दर्शकाचा अप्रतिम चित्रपट, ज्याची "बम बम बोले" नावाचा चित्रपट काढून आपण वाट लावली!)
१९. सिसेमी स्ट्रीट (मालिका)
२०. अ‍ॅनिमल फार्म (जॉर्ज ऑरवेल च्या अप्रतिम पुस्तकावर आधारित)
२१. हेलो (संतोष सिवनचा एक चांगला चित्रपट)
२२. मि. इंडिया (typical typical चित्रपट. पण पुन्हा "for the sake of fantasy". लॉजिकल चित्रपट पुढे आयुष्यभर बघायचे आहेत. ज्या वयात "Impossible" हा शब्द माहित नाही त्या वयात असले चित्रपट बघण्यास हरकत नसावी… माझ्यामते! पण म्हणून अगदीच जितेंद्रचा "हातिमताई" पण दाखवा असे नाही म्हणणार मी.)
२३. चिल्लर पार्टी
२४. पि-विज बिग अ‍ॅड्व्हेंचर
२५. मि. बिन
२५. चार्ली चॅप्लिनचे - मॉडर्न टाईम्स, द किड, सिटी लाईट्स सारखे चित्रपट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लॉजिकल चित्रपट पुढे आयुष्यभर बघायचे आहेत. ज्या वयात "Impossible" हा शब्द माहित नाही त्या वयात असले चित्रपट बघण्यास हरकत नसावी

वाह!!! एकदम बरोबर बोललात मुळेजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुता इनिगोय यांना अ‍ॅनिमेशनपट नकोयत असे वाटले. तरी वर दिलेली मूळापासून यांची यादी ८-१० वर्शांच्या मुलांना योग्यच वाटते.

मी त्यात
१. हनी आय श्रंक द कीड्स
२. एलिझाबेथ एकादशी
३. बिपीऑन बुकलवार वर आलेले चित्रपट (इथे युट्युब दुवे मिळतील)
४. पक पक पकाक (कदाचित अजुन थोडे मोठे झाल्यावर. कल्पना नाही)
५. पालो मेलो (हा मुलांनी पहावा की नाही माहित नाही, पालकांनी जरूर पहावा Smile )
६. फँटसी प्रकारातील अ‍ॅलिस इन वंडरलँड, नार्निया क्रॉनिकल्स, स्पार्डर्विक क्रॉनिकल्स, गलिव्हर ट्रॅवल वगैरे

याची भर पतकन सुचतेय. अजुन आठवले की सांगतो.

अ‍ॅनिमेशनपटांत कुंग फू पांडा राहिला की! (पहिला) Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रसिद्ध जर्मन बालसाहित्यिक मिखाईल एन्डं याच्या पुस्तकांवर आधारित चित्रपट (दोन्ही कथानकांतील कल्पना अतिशय विलक्षण आहेत.)
१. Neverending Story (इन्ग्रजी‌),
२. Momo (यू ट्यूबवर मूळ जर्मन चित्रपटाला इन्ग्रजी संवादपट दिला आहे)

'नेव्हरएन्डिंग..'चे नंतर दोन भाग आले जे मी पाहिलेले नाहीत. पहिला (मूळ) भाग मात्र अवश्य अवश्य पाहावा अशी शिफारस करतो.

३. दिग्दर्शक सिवनचा (हा संतोष सिवन वा संगीत सिवन नव्हे, तर नुसताच सिवन ‌) मल्याळी चित्रपट 'अभयम्'. 'मैं फिर आउँगा' नावाने हिंदी भाषीकरण केले गेले.
विनू नावाचा मुलगा शाळेत रमत नाही. निसर्गाची ओढ. एक दिवस अभ्यासाला कंटाळून आजोबांच्या गावी पळून जातो. पत्ता मात्र माहीत नसतो. त्याचा आजोबांपर्यंत पोहोचण्याचा सर्व प्रवास म्हणजे हा चित्रपट.

--

मालिका -
१. Wonder Years - १९८८-९३ या काळात ही दीर्घ मालिका अमेरिकेत ABC वाहिनीवर नि नंतर भारतातही दाखवली गेली. केविन आर्नॉल्ड्च्या बालपणातून अमेरिकेतील ७० च्या दशकातील शाळा व कुटुंबांतील दिनक्रमांचे, जीवनाचे केलेले चित्रण.

२. 'स्वामी अ‍ॅन्ड हिज फ्रेन्ड्स' (हिंदी)
'मालगुडी डेज्'चे ७ भाग स्वामी आणि त्याच्या दोस्तांसाठी राखीव आहेत. मणी, सोमू, राजम यांच्या दोस्तीपासून ते राजम मालगुडी सोडून दुसरीकडे जाईपर्यंतचे चित्रण.

मी माझ्या पुतणीला ती 6 वर्षांची असताना 'आमेली'देखील दाखवला आहे नि तिने तो अतिशय आवडीने अनेक वेळा पाहिला आहे. जे कळले नाही ते ती विचारते, मी सांगतो. तिला फ्रेंच येत नाही नि इंग्रजी प्रतिसंवाद वाचण्याइतपत ती इंग्रजीला सरावलेली नाही. तरीही ती आवडीने सगळ्या दृश्यचौकटी पाहते.

तिला जीएंच्या कथेवर आधारित अमोल पालेकर दिग्दर्शित 'कैरी'देखील फार आवडला. जरी कथेचं मर्म कळलं नसलं तरी तानीमावशीसोबतचे मुख्य पात्राचे ('नकटी'चे) प्रसंग, संवाद इ. पाहण्यात तिचं मन लागलं.

सांगण्याचं कारण इतकंच की लहान मुलांना केवळ लहान मुलांसाठी तयार केलेले चित्रपटच दाखवायचे असं न करता अनेकविध गोष्टी दाखवून त्यांना जे आवडेल ते पाहू देणे अधिक श्रेयस्कर वाटते. मोठ्यांना जे मुलांनी 'चांगले पाहिले पाहिजे' असे वाटते, ते लहानांसाठी आवडीचे ठरेलच असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सांगण्याचं कारण इतकंच की लहान मुलांना केवळ लहान मुलांसाठी तयार केलेले चित्रपटच दाखवायचे असं न करता अनेकविध गोष्टी दाखवून त्यांना जे आवडेल ते पाहू देणे अधिक श्रेयस्कर वाटते. मोठ्यांना जे मुलांनी 'चांगले पाहिले पाहिजे' असे वाटते, ते लहानांसाठी आवडीचे ठरेलच असे नाही.

अगदी सहमत. जर ठराविक पद्धतीचेच चित्रपट मुलांना दाखवले तर त्यांना ते बघण्याचा कंटाळा तर येतोच वर त्यांना असही वाटतं कि मोठे लोक आपल्याला सोडुन काही वेगळं पण बघतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

manaamanasi.wordpress.com

'ब्लु अंब्रेला'- हा हिंदी आणि इंग्रजी दोनही भाषांमध्ये सापडेल. ८-१० वर्षांच्या मुलांनी नक्कीच बघावा.
'Jungle Book'- हे कसं काय राहून गेलं?, अताशाच मला युट्युबवर पूर्ण मालिका मिळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

manaamanasi.wordpress.com

बस्टर कीटन - द जनरल
द वे होम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'द वे होम' हा प्रचंड थोर चित्रपट. विसरलोच होतो. आठवण करून दिल्याबद्दल आभार !
त्यातल्या आज्जीबाई खल्लास खजील करून टाकतात मला.
('पथेर पांचाली'त चुनीबाला यांनी साकारलेली आज्जीही एक लक्षात राहणारी).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला… या निमित्ताने विकांताला पाहायला मला नवे काहीतरी सापडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्वा! मुखपृष्ठावरच्या द्वयीचा फोटोच कसला मनाचा ठाव घेणारा आहे.
बघितलाच पाहिजे. आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
मलाही हा सिनेमा अ मस्ट वॉच वाटतोय.
_____
ग्रंथालयात होल्डवरती आहे. लवकरच मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द वे होम अगणित वेळा पाहिला आहे. लहान भावंडांसोबत जेव्हा पाहिला तेव्हा भावंडांनाही तो भावला.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. कितीतरी गोष्टींची उजळणी झाली,आज्जी आणि पंजीच्या स्मृतींनी हळवं व्हायला झालंय.

वरच्या याद्यांमध्ये ह्या चित्रपटाला अ‍ॅडवावं अशी शिफारस करीन : द रॉकेट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे 'मॅजिक स्कूलबस' नावाची कार्टून सीरिज आहे. अन्नपचन कसं होतं, कार इंजिन कसं चालतं, वीज म्हणजे काय वगैरेसारख्या सामान्य विज्ञानातल्या काही मूलभूत कल्पना अत्यंत रंजकपणे आणि अचूकपणे शिकवल्या आहेत. तिसरी-चौथीच्या मुलांसाठी परफेक्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुवा चुकलाय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. दुवा दुरुस्त केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद, चांगली यादी तयार झाली आहे! यातले बरेचसे मीही अजून पाहिले नाहीयत. डाउनलोड करायला सुरूवात केली आहे.

अजून काही जे माझ्या संग्रही आहेत, ते जमेल तसे इथे नोंदवेन.

सिनेमाखेरीज काही शॉर्ट फिल्म्स, व्हिडिओज असतील तर तेही सुचवा जरूर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

शॉर्ट फिल्म्समध्ये पुष्कळ सापडतील. नमुन्यादाखल -

कॅनडाच्या नॅशनल फिल्म बोर्डच्या अनेक फिल्म्सही चांगल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||