Skip to main content

याकूबला फाशी

याकूबला शेवटी फाशी दिलीच. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचेही शेवटपर्यंत एकमत होत नव्हते. हाच न्याय पंजाब, तमिळनाडूतील आरोपींना लावला गेला नाही. राजकीय पाठिंबा नसल्याने शेवटी याकूब गेलाच.

असो लोकसत्ताचा अग्रलेख आवडला. एकंदरीत टायगर आणि दाऊद ह्या मुख्य जबाबदार व्यक्तींच्या कृत्याची शिक्षा याकूबला झाली अशी भावना हा लेख वाचूून झाली आहे. असंगाशी संग प्राणाशी गाठ या म्हणीचा चोख प्रत्यय या घटनेतून येतो. बाकी देशभक्तांचा उन्माद बघवत नाही. अनेकांना शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर समाधानही वाटले आहे. असो.

ऋषिकेश Fri, 14/08/2015 - 11:01

In reply to by नितिन थत्ते

अफजल गुरूला फाशी देण्यात झालेल्या विलंबामागे राजकीय समीकरणे होती असे मला वाटते. सदर अर्ज कित्येक काळ गृहमंत्रालयाकडे पडून होता.
राजीव गांधीच्या मारेकर्‍याच्या मर्सी पिटीशनवर ११ वर्षे निर्णय न होणेही मला राजकीय असमंजस/अपरिपक्वता असण्याचेच द्योतक वाटते.

अतिशहाणा Tue, 11/08/2015 - 18:13

In reply to by वैमानिक हत्ती

आजच सरकारने म्हटले आहे की १९९१ पासून फाशी दिलेल्या २६ जणांमध्ये चारच जण मुसलमान आहेत

आता याचा प्रतिवाद इ.स. २००० पासून फाशी दिलेल्या ४ जणांमध्ये ३ मुसलमान आहेत असा करु का? १९९१ पासून फाशी दिलेल्या २६ जणांमध्ये ४ मुसलमान आहेत याने नक्की काय सिद्ध होतं?

वैमानिक हत्ती Wed, 12/08/2015 - 11:49

In reply to by अतिशहाणा

अगदी १९४७ पासूनचे आकडे ध्यानात घेतले तरी हाच रेशो आहे. तेव्हा इथल्या काहींचा मुद्दा-- याकूबला फाशी दिले जाणे म्हणजे मुसलमानांना त्रास द्यायच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात त्याचे उदाहरण आहे हा बाद होतो.

आता याचा प्रतिवाद इ.स. २००० पासून फाशी दिलेल्या ४ जणांमध्ये ३ मुसलमान आहेत असा करु का?

तुम्हाला हवे ते खुशाल करा हो. पण यातून तुमचाच आतापर्यंतचा स्टॅन्ड वीकन होतो आहे हे तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही. त्या ३ मध्ये आहेत कसाब, अफझल आणि याकूब मेमन---- तिघेही दहशतवादी. म्हणजे तुम्ही असे म्हणत असाल तर त्यातूनच "सर्व दहशतवादी हे मुसलमान असतात" या दाव्यालाच पाठबळ मिळेल.

राजेश घासकडवी Wed, 12/08/2015 - 12:08

In reply to by वैमानिक हत्ती

त्यातूनच "सर्व दहशतवादी हे मुसलमान असतात" या दाव्यालाच पाठबळ मिळेल.

किंचित दुरुस्ती. 'सर्व फाशी गेलेले दहशतवादी हे मुसलमान असतात' इतका मर्यादितच दावा सिद्ध होईल. बाकी चालूद्यात.

अनु राव Wed, 12/08/2015 - 12:23

In reply to by राजेश घासकडवी

मला तरी ऐसी वरच्या चर्चेने इतकेच समजले आणि अगदी पटलेपण - की जे फाशी गेलेले मुसलमान होते ते तर संत होते पण ह्या मुसलमान विरोधी देशानी ( पक्षी भारत ) आणि त्यातल्या न्यायव्य्वथे ने आणि पोलिसांनी कट रचुन ह्या संतांना अडकवले आणि वर फक्त तुरुंगात टाकुन थांबले नाहीत तर डायरेक्ट फाशीच दिले ह्या संतांना.

गवि Wed, 12/08/2015 - 13:02

In reply to by राजेश घासकडवी

किंचित दुरुस्ती. 'सर्व फाशी गेलेले दहशतवादी हे मुसलमान असतात' इतका मर्यादितच दावा सिद्ध होईल. बाकी चालूद्यात.

असेच आणखी भरपूर अतिसावध, समानन्यायोफिलिक, तांत्रिक, शब्दरचनासंबंधित, इंटरप्रिटेशनसंबंधित, शब्दच्छलयुक्त, किसाचाही कीस पाडणारे युक्तिवाद अन तराजूकाटे आरोपींना वर्षानुवर्षे, काही केसेसमधे दशकभराहून जास्त वर्षे, उपलब्ध झालेले असतानाही इतक्या वर्षांनी झालेल्या फाशीविषयी काहीजण असमाधानी असतात आणि तिला बायस्ड, प्रोसेस फॉलो न करणारी असल्याचा संशय घेतात हे देशाचं दुर्दैव,

काळासरदार Wed, 12/08/2015 - 16:11

In reply to by गवि

'असेच आणखी भरपूर अतिसावध, समानन्यायोफिलिक, तांत्रिक, शब्दरचनासंबंधित, इंटरप्रिटेशनसंबंधित, शब्दच्छलयुक्त, किसाचाही कीस पाडणारे युक्तिवाद अन तराजूकाटे उपलब्ध झालेले असतानाही'

काहीजणांना काय खरं आणि काय खोटं, किंवा काय चूक आणि काय बरोबर ह्याची सोप्पी मांडणीच बरी वाटते हेही देशाचे दुर्दैव काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/08/2015 - 17:46

In reply to by गवि

काही दहशतवाद्यांच्या केसेस आणि फाशी एवढी रखडते, एवढी रखडते की खूप वेळ लागला म्हणून फाशी रद्द होते. Voila! हे दहशतवादी हिंदू असतात. काहींना फाशीसंबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न करता फाशी देतात, तो अफजल गुरू मुस्लिम होता.

अजो१२३ Thu, 13/08/2015 - 16:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

http://www.hrln.org/hrln/criminal-justice/pils-a-cases/1474-sc-commutes…

सिडोसेक्यूलरांच्या दुर्दैवाने ज्यांनी फाशी डिलेमुळे कम्यूट झाली आहे, त्यांच्यापैकी एक मुसलमान आहे.

अजो१२३ Wed, 12/08/2015 - 15:41

In reply to by राजेश घासकडवी

सगळा विदा, मग तो वास्तवात काहीही म्हणो, स्वतःला जे वाटतं तेच सिद्ध करण्यासाठी कसा वापरावा याची हातोटी ... असाधारण आहे.
=======================
एकीकडे तुमचा भारताच्या न्यायपालिकेसारख्या संस्थेवर विश्वास नाही मात्र दुसरीकडे अ‍ॅनिमल हजबंडरी खात्याचे, न्यायपालिकेच्या मानाने जिथे कोणाला काहीही अक्कल नसते, कस्सेही जमा केलेले आकडे वापरून, प्रत्येकाला पकडून पकडून तूप पिऊ घालायला मात्र तुम्ही मागे पुढे पाहत नाही.

जे लोक फाशी देताना नीच नीच कंसिडरेशन्स समोर ठेवतात, त्यांचे (अ‍ॅनिमल हजबंडरीमधले) जातबंधु आपल्या डीपार्टमेंटचा पर्फॉर्मन्स वाढवून सांगायला, जास्त बोनस मिळवायला, मांडी थोपटायला, आकडे चढवून चढवून सांङत नसतील कशावरून?

राजेश घासकडवी Fri, 14/08/2015 - 10:45

In reply to by अजो१२३

विदा आणि तर्कशास्त्र यात गल्लत होते आहे. वरच्या विधानात मी विदा नाही, तर तर्कशास्त्रातली, म्हणजे निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीतली त्रुटी दाखवून देत होतो. दहशतवादी या गटाचे फाशी गेलेले आणि फाशी न गेलेले असे उपगट आहेत. एका उपगटाविषयी बोलताना त्याचे गुणधर्म सर्व गटाला लावणं ही तर्कशास्त्राची चूक आहे. एक उदाहरण देतो.
दहशतवादी - चेंडू
मुस्लीम - हिरवे
हिंदू - भगवे

आता एका डब्यात काही चेंडू आहेत. त्यातून तीन बाहेर काढले. ते तीनही हिरवे निघाले. तर 'चेंडू फक्त हिरवे असतात' हे विधान बरोबर नाही. 'बाहेर काढलेले चेंडू हिरवे आहेत' एवढंच म्हणता येतं.

इतकाच मुद्दा होता. यात विदा नाही, तर्कशास्त्र आहे.

गवि Fri, 14/08/2015 - 11:38

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या उद्देशाबाबतीत अजिबात शंका नाही राघा, पण इन केस तीनही भगवे चेंडू निघाले तर अशी तर्कशुद्धी, करेक्षन, त्रुटीदर्शन, त्रुटीनिर्मूलन इत्यादि करायला कोणी तत्परतेने येईल का? असं काहींना (कदाचित उगीच) वाटतं असा प्रश्न आहे.

अजून एक प्रश्न आहे, अनेकदा चेंडू काढण्याचा प्रयोग करुन हिरवेच निघत राहिले तर आत सर्व हिरवे आहेत असं न मानता काहीजण म्हणतात की आत भगवे असणारच तरी हे नेमके टिपून टिपून हिरवेच बाहेर काढतात..

किंवा मधे भगवा हाती लागला होता पण यांनी तो बाहेर काढलाच नाही. इत्यादि.

.............आणि हे सर्व "तर्कानेच" बरं का.. प्रत्यक्ष बघून नव्हे.

...अजून असं की अशी तर्कशुद्धी अनेकदा होऊनही हिरव्या चेंडूंवर अन्याय झाला असं म्हटलं जातं.

या सर्वांमधे आपल्या देशाच्या न्याययंत्रणेवर प्रचंड अविश्वास दाखवला जातो हे वाईट वाटण्याजोगं आहे.

गब्बर सिंग Fri, 14/08/2015 - 12:03

In reply to by गवि

या सर्वांमधे आपल्या देशाच्या न्याययंत्रणेवर प्रचंड अविश्वास दाखवला जातो हे वाईट वाटण्याजोगं आहे.

निकाल मनासारखा लागला नाही की लगेच "आम्हाला सेकंड क्लास सिटिझन असल्यासारखी वागणूक मिळतेय", "पार्शलीटी होत्ये", "मायनॉरीटीज चा आवाज दाबला जातोय" वगैरे कोल्हेकुई सुरु होते.

अनु राव Fri, 14/08/2015 - 13:30

In reply to by गवि

अजून एक प्रश्न आहे, अनेकदा चेंडू काढण्याचा प्रयोग करुन हिरवेच निघत राहिले तर आत सर्व हिरवे आहेत असं न मानता काहीजण म्हणतात की आत भगवे असणारच तरी हे नेमके टिपून टिपून हिरवेच बाहेर काढतात..

ह्या बद्दल गवि तुम्हाला सलाम.

अतिशहाणा Fri, 14/08/2015 - 18:28

In reply to by गवि

अजून एक प्रश्न आहे, अनेकदा चेंडू काढण्याचा प्रयोग करुन हिरवेच निघत राहिले तर आत सर्व हिरवे आहेत असं न मानता काहीजण म्हणतात की आत भगवे असणारच तरी हे नेमके टिपून टिपून हिरवेच बाहेर काढतात..

गवि,

आतमध्ये नाही हो.. बाजूला. उदा. मुंबईच्या दंगलीत हजारो लोक मेले. किती जणांना शिक्षा झाली? माझ्या माहितीप्रमाणे शून्य! ठाकऱ्यांपासनं ते कायदेरक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या हवालदारापर्यंत सगळ्यांची माहिती मिळूनही कुणालाही शिक्षा झालेली नाही. ठाकरे वृद्धापकाळानं गेले, मधुकर सरपोतदार खासदारकी भोगून जामीनावर सुटून आरामात राहिले, अनेक पोलीस अधिकारी निवृत्त होऊन आता गोल्फ वगैरे खेळत असतील. पण मग दंगल झाली ती दहशत नव्हती का? होती. पण आम्हाला ते चेंडू वेगळ्या रंगाचे असल्याने, पकडून बॉक्समध्ये आणायचेच नाहीत.

आणि न्याययंत्रणा म्हणजे न्यायमूर्तींनी आसनावर बसून दिलेला निष्पक्ष निर्णय असं एवढंच नाही. आता त्यात (काहीवेळा चुकीची) माहिती टिपून घेणारे कारकून, ती कळवणारं फ्याक्स मशीन, फ्याक्समशीनला वीजपुरवठा करणारं एमएसीबी असं सगळंच असतं. सलमानच्या खटल्यात वेळेवर वीज गेल्यामुळं फ्याक्स वेळेवर पोचला नाही त्यामुळं निष्पक्ष न्याययंत्रणेला अंमलबजावणीत कित्ती कित्ती अडचण झाली ना! वेळेवर वीज गेल्यामुळं हाताशी येऊन पुन्हा निवांत राहिलेला सलमान किंवा फाशीची वेळच न आल्यामुळं आरामात सुटलेले राजीवगांधींचे खुनी हे सगळे त्याच निष्पक्ष न्याययंत्रणेचे लाभार्थी आहेत.

बरं वादासाठी सगळेच चेंडू हिरवे असतात असं मान्य करुया. आता भारतात उदा. २५ कोटी हिरवे चेंडू आहेत. काय करणार या चेंडूंचं? अ‍ाम्ही फक्त हिरवे चेंडूच पकडणार हे सारखं दाखवून देणार की सगळ्या हिरव्या चेंडूंना अरबी समुद्रात बुडवणार?

अस्वल Fri, 14/08/2015 - 23:49

In reply to by अतिशहाणा

एक प्रश्न आहे - दंगलीमुळे बळी पडलेल्यांबाबत न्याय मिळाला आहे का? त्यातले दोषी पुढे येऊन त्यांना शिक्षा झाल्या आहेत का?
मग ते हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन कोणीही असो.
विकीमुशाफिरी/ श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावरून नजर टाकली तर बळींची संख्या ९०० आहे.(~५०० मुस्लीम, २७० हिंदू आहेत). ही संख्या बाँबस्फोटात बळी पडलेल्यांपेक्षा जास्तच आहे. निव्वळ "बळी पडलेल्यांची संख्या" ह्या एका मुद्द्यावरून त्याबद्दल जास्त चौकशी होऊन त्यातले गुन्हेगार पुढे यायला नकोत का?
==============
की दंगलीतल्या जमावाला चेहेरा नसल्याने अटक करणं कठीण जातं?
किंवा -एखादया सामान्य माणसाला एखाद्याचा खून करावासा वाटेल अशाप्रकारे लोकांच्या भावना भडकावून त्यांना भयानक कृत्यं करायला लावणं (हिंदू मुस्लीम कोणीही)- हा तितकासा गंभीर गुन्हा नाही?

एकूणच दंगलीत ज्यांच्यावर गुन्हे शाबीत झाले आहेत आणि त्यांनी त्याबद्दल शिक्षा भोगली, त्यांबद्दल तपशील मिळू शकेल का?

राजेश घासकडवी Fri, 14/08/2015 - 20:09

In reply to by गवि

या सर्वांमधे आपल्या देशाच्या न्याययंत्रणेवर प्रचंड अविश्वास दाखवला जातो हे वाईट वाटण्याजोगं आहे.

कोणाला तर्काचा सर्रास खून होतो आहे याची पडलेलीच नाही का? योग्य तर्क करणं ही कुतर्क टाळण्यासाठी आवश्यक गोष्ट नाही का? न्याययंत्रणेवर विश्वास-अविश्वास ही गोष्ट संपूर्णपणे नंतरची आहे. आधी तो अ/विश्वास रास्त आहे की नाही हे पाहायला नको का? मुळात 'सगळे अतिरेकी मुसलमान असतात हे सिद्ध होतं' असं ठार चुकीचं विधान केलं तर देशात सत्य काय आहे आणि असत्य काय यावर चुकीचा गदारोळ निर्माण होणार नाही का? आणि हा कोलाहल होऊ द्यायचा कारण न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखवायला हवा?

अनेकदा चेंडू काढण्याचा प्रयोग करुन हिरवेच निघत राहिले तर आत सर्व हिरवे आहेत असं न मानता काहीजण म्हणतात की आत भगवे असणारच तरी हे नेमके टिपून टिपून हिरवेच बाहेर काढतात..

या प्रकारची विधानंही चुकीच्या अगर बरोबर तर्कशास्त्राने होऊ शकतात. पण लोक चुकीचं तर्कशास्त्र वापरून विचित्र निष्कर्ष काढतील म्हणून तर्कशास्त्रातल्या चुका काढू नयेत... हा युक्तिवाद काही हजम होत नाही.

आणि न्यायव्यवस्था ही वेगवेगळ्या पातळ्यांवर ठरते. आता माया कोदनानी यांच्याबाबत मृत्युदंड न्यायालयाकडे मागायचा नाही असं गुजरात सरकारने ठरवलं. यात भगवा चेंडू आतच राहू द्यायचा हा निर्णय सरकारने घेतला की नाही? बजरंगी का कोण ते जामिनावर मुक्त आहेत की नाहीत?

असो, माझा युक्तिवाद हा युक्तिवाद कसा करावा याबाबत होता. चूक मान्य करा, पुढे जा, आणि त्यानंतरचा वाद घाला.

गवि Sat, 15/08/2015 - 06:30

In reply to by राजेश घासकडवी

तुमच्या उद्देशाबाबतीत अजिबात शंका नाही राघा, पण

..सुरुवातीचं वाक्यच नजरेतून निसटलेलं दिसतंय तुमच्या..

राजेश घासकडवी Sat, 15/08/2015 - 14:26

In reply to by गवि

प्रश्न माझ्या उद्देशाचा नसून तर्कशास्त्र स्वच्छ असावं असा आग्रह धरणाऱ्याकडे संशयाने का पाहिलं जातं, असा आहे. तसं संशयाने बघून मग 'राघांची एकंदरीत संतुलित हिस्टरी बघता, आणि त्यांचं विदा-लॉजिकप्रेम पाहाता त्यांचा उद्देश केवळ तर्कशास्त्राच्या चुका काढणं इतकाच असावा' असं कॅरेक्टर सर्टिफिकेट का द्यावं लागतं? आपण प्रत्येक विधानांत काही ना काही अंतस्थ हेतू पाहातो का? याचं उत्तर बहुधा हो आहे, म्हणून पुढचा प्रश्न - आपण बहुतेक सगळेच लोक विधानं काहीतरी अंतस्थ हेतूंनी करतो का? काय विधान आहे यापेक्षा कोणी ते केलेलं आहे, काय विधान आहे यापेक्षा काय हेतूने ते केलेलं आहे.... यांना महत्त्व देणं कमी करून 'खरोखर काय विधान आहे' याला महत्त्व कधी देणार आपण?

गवि, तुम्हाला हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे हेतूचा संशय येऊ नये अशी विधानं करण्याची कला तुम्हाला सहजगत्या अवगत आहे. त्यामुळे तुम्ही या विषयावर काही ना काही विचार केलेला आहे हे उघड आहे. आता मी वर केलेलीच विधानं स्वच्छ विधानं म्हणून घेता येत नाहीत. त्यांमध्ये असलेला 'त्रागा व्यक्त करणं' हा हेतू जाणवतो. ओळींच्या मध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात, त्या वाचाव्या लागतात. पण बऱ्याच वेळा लोक ओळींच्या मध्येच जास्त वाचतात.

साधारण या विषयावर तुम्ही काहीतरी एक स्वतंत्र लेख लिहावा अशी माझी विनंती आहे.

गवि Sat, 15/08/2015 - 14:45

In reply to by राजेश घासकडवी

हेतूचा संशय येऊ नये अशी विधानं करण्याची कला तुम्हाला सहजगत्या अवगत आहे.

..आणि समोरच्याला विचार करायला भाग पाडण्याची कला तुम्हाला सहजगत्या अवगत आहे.
..त्रासदायक कुठचे.
.लेख लिहीन पण पुढच्या वेळी बिनमिरचीचं चॉकलेट आणणार असलात तरच.

गब्बर सिंग Sun, 16/08/2015 - 03:00

In reply to by राजेश घासकडवी

काय विधान आहे यापेक्षा कोणी ते केलेलं आहे, काय विधान आहे यापेक्षा काय हेतूने ते केलेलं आहे.... यांना महत्त्व देणं कमी करून 'खरोखर काय विधान आहे' याला महत्त्व कधी देणार आपण?

काय विधान आहे ते तपासून बघितल्यानंतर ते विधान पटले, रुचले, आवडले, आचरणीय वाटले तर - त्यानंतर - ते कोणी केलेले आहे - याकडे लक्ष दिले तर चालेल का ??

राजेश घासकडवी Sun, 16/08/2015 - 05:12

In reply to by गब्बर सिंग

मला प्रश्न नीट कळला नाही. विधानबाह्य सत्यं विधानाविषयी विचार करताना घ्यायचीच नाहीत, ओळींच्या मध्ये लिहिलेलं वाचायचा प्रयत्नच करायचा नाही ही शिस्त जर अंगी बाणवली तर लोकं आपल्याला जे म्हणायचं आहे ते विधानांमध्येच लिहिणार नाहीत का? Then why would someone need to read between lines? I think the problem is that too much reading between the lines is going on, which leads to misinterpretation. And you ask, can I do some of it? त्याने नक्की काय साध्य होणार आहे ते सांगितलंत तर विचार करता येईल. अशी कुठची वेळ आहे जिथे स्पष्टपणे सांगण्यापेक्षा अस्पष्टपणे सांगण्याने फायदा होतो?

योगेश्वर Fri, 28/08/2015 - 06:08

याकुबच्या फाशीवरचा अग्रलेख कुबेरांच्या कारकिर्दीतला (एकमेव) बकवास लेख. अभिव्यक्तीस्वातंत्र्याखाली तो खपवायचा जरी ठरवला तरी त्याला विवेकाचा आधार नव्हता. कुबेर त्यादिवशी कसल्यातरी अंमलाखाली असावे.