अलीकडे काय पाहिलंत - २१
जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
काल 'मुव्हीज-नाऊ प्लस' ह्या चॅनल वर 'शेफ' सिनेमा पाहिला. मागच्या वर्षी भारतात थेटरात आला होता तेव्हाच पहायचा होता पण दुर्दैवाने जमलं नव्हतं आणि असे सिनेमे आठवड्यापेक्षा जास्त चालत नाहीत इथे. भारतीय सिनेमागृहात हॉलीवूड म्हणजे सुपरहिरो, हॉरर, अॅक्शन, स्काय-फाय, कॉमेडी हेच जोमात चालतं असं माझं मत. असो, ह्या सिनेमाबद्दल आधी ऐसीवर लिहीलं आहे का? असल्यास वाचायला आवडेल.
चित्रपटाचा मुख्य विषय नायकाचं 'शेफ' असण्ं हा असला तरी मला खास आवडलं ते चित्रपटातलं भाव-भावनांचं चित्रीकरण आणि त्यातलं बाप-लेकाचं नातं. नायकाच्या आयुष्यात एकाच वेळी (स्वतःहून ओढावून घेतलेले) गहन प्रश्न समोर ठाकलेले असून देखील सिनेमात त्याचं कुठेच भावनाविवश भडक चित्रण नाही. मुलाची आठवण येऊन विव्हळण नाही की तो भेटला तर त्याला गच्च अवाळून कचाकचा पापे नाही. मुलगा टीनेजर होणार म्हणून लगेच दिवसातून हजार वेळा त्याला हाय-फाय द्यायचे, येता-जाता एकमेकांना 'हे बडी/हे ड्यूड' म्हणायचं, त्याची इच्छा असो-नसो त्याच्या आयुष्यात शक्य तितकी लुडबूड करायची आणि तरीही आपण कसे अता फ्रेंड झालो, हे असलं बाप-लेक नातं ह्या सिनेमात नाही. भडक भावनिक संवादाशिवाय, लाडिक स्पर्शाशिवाय, हावभावांशिवाय बाप-लेकाचं प्रेम नी त्याचं नातं पडद्यावर कसं सुरेखपणे येऊ शकतं ह्याचं एक छान उदाहरण हा सिनेमा म्हणावा.
जॉन फेवरो (आडनावाचा उच्चार नक्की माहीत नाही) ह्याने 'शेफ कार्ल कॅस्पर' आपल्या अभिनयातून चोख उतरवला आहेच पण मुळात हे शेफचं पात्रच फार आवडलं. हे काही देखणं, कोरीव शरीराचं पात्र नाही. शेफ हा मुख्य नायक म्हणजे तो कसा तल्लख बुद्धी, चाणाक्ष, जिद्दी, अभिमानी, श्रीमंत, रोमँटीक वगैरे असलंही काही नाही कारण तो शेफ आहे त्याला बाकी ह्या प्रकारात दाखवायची तसदी पटकथेने नी दिग्दर्शकाने घेतली नाहीये ह्यासाठी त्याचं कौतूक. तो हुशार नक्कीच आहे पण गोंधळलेला आहे, ह्या गोंधळात अजून चुका करतो, बालिशपणे वागतो, पण म्हणून त्याला साक्षात्कार होतो आणि एक दिवस अचानक मार्ग सापडतो असं नाही. गपगुमान जे बाकी लोक सांगतात ते नाखुशीने का होईना पण ऐकायचा प्रयत्न करतो. अता बाकी पर्याय तसेही नाहीत तर उगाच कशाला किडे करा, 'ट्राय तर करून पाहू' ह्या तत्त्वावर आपल्या मुळ आवडी-निवडी नी मान-पान बाजूला ठेवून तो आहे तो पर्याय निवडतो बोले तो एकदम प्रॅक्टीकल आणि त्या पर्यायातून त्याला जे नेमकं हवं असतं ते मिळतं - ते म्हणजे त्याचं शेफ म्हणून त्याच्या कामाशी आणि बाप म्हणून मुलाशी असलेलं नातं :) इतकी साधी कथा पण मांडणी लाजवाब. शिवाय मला हा सिनेमा उत्तम 'एडिटींग' चा नमुना वाटला. कुठलाही प्रसंग उगाच प्रेक्षकांवर विचार करायला न सोडता, सगळे प्रसंग अगदी व्यवस्थित दाखवून आणि अख्खे दोन निव्वळ म्युझीकल सिन्स् दाखवूनही सिनेमा दोन तासाच्या आत संपतो, वा काय सुंदर एडिटींग. बाकी काही डाव्या बाजूही आहेतच सिनेमाच्या, पण तेवढं चालतं ;)
शेवटी एवढंच म्हणेन की खूप दिवसांनी एक निखळ आनंद देणारा चित्रपट पाहिला - मजा आली.
"दम लगा के हैशा" सुरुवातीला
"दम लगा के हैशा"
सुरुवातीला पाटी पाहिली नसती तर हा सिनेमा यशराज फिल्म्सने बनवला आहे यावर विश्वासच बसला नसता. कुठे गेले ते बोटॉक्स भरलेले तरुणथेरडे नायक, कुठे हरवला तो आईला हेलिकॉप्टरमधून भेटायला येणारा परिवार, कुठे गेला तो प्रियतमेच्या नावाबरोबर पडदाभर पसरणारा सार्वकालिक ऑटमचा पाचोळा? हर हर.
लठ्ठ बेढब नायिका आणि कमी शिक्षणाचा न्यूनगंड बाळगणारा नायक यांची लग्नोत्तर प्रेमकथा अतिशय छान जमून आली आहे.
बायकोला पाठीवर उचलून करायची "दम लगा के हैशा" शर्यत हा भाग थोडा यशराजी आहे, पण चलता है. नायक नायिकेची शर्यत प्रॅक्टिस आणि त्यातून 'उमलत जाणारं अस्फुट प्रेम' हा कराटे-किड-ते-जो-जीता फॉर्म्युला हानला नाहीये हे एक बरं आहे.
विशेष आवडलेल्या गोष्टी:
- हरिद्वार-हृषिकेशचं चित्रण मस्त जमून आलंय. हरिद्वारचा बाजार, त्यातले दुकानदार, गंगेचा घाट, गंगातटावरचं तिवारी कुटुंबाचं घर वगैरे झकास.
- उत्तराखंडचा प्रभाव असलेली हिंदी
[हल्लीच्या बर्याच सिनेमांत खर्याखुर्या गावा-शहरांचा फ्लेवर आणतात, आणि ते मला बेहद्द आवडतं. कोणत्यातरी जेनेरिक गावात सिनेमा घडवण्याऐवजी खरंखुरं गाव बघायला खूप आवडतं.]
- आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकर अगदी अनयशराजेस्क सामान्य दिसतात. दोघांनीही उत्तम कामं केली आहेत.
- रास्व संघावर कोणतीही स/नकारात्मक टिप्पणी न करता शाखेचा केलेला वापर. त्यापैकी "साखाबाबू" हे एकदम जमलेलं पात्र आहे.
न आवडलेल्या गोष्टी:
- अण्णू मळिकचं मळकट संगीत. कुड ह्याव डन बेटर.
सहमत आहे. शिवाय जुना
सहमत आहे. शिवाय जुना कॅसेट्सचा धंदा व त्याला मिळणारे सीडीजचे आव्हान, नायकाला कुमार सानू आवडत असणे, तरुण मुलांच्या बायकांबद्दलच्या कल्पना व आपसांतली स्पर्धा आणि गल्लीतल्या गल्लीतला क्लास डिफरन्स, जुन्या व नव्या पिढीतल्या स्त्रियांच्या विचारसरणीतला फरक हे अलगदपणे टिपलेले आहे. चित्रपट आवडला आहे.
खरंच?
>> रास्व संघावर कोणतीही स/नकारात्मक टिप्पणी न करता शाखेचा केलेला वापर. त्यापैकी "साखाबाबू" हे एकदम जमलेलं पात्र आहे.
असं तुम्हाला खरंच वाटतं? एक साधा, सहजपणे येणारा, पण (माझ्या मते) निरागसपणे न वापरलेला घटक म्हणजे भाषा : चित्रपटातली इतर पात्रं सर्वसामान्यांप्रमाणे शिव्या-नालस्तीसकटची राकट-रांगडी, भावनाप्रधान पण कानांना गोड वाटणारी आणि म्हणून जवळची वाटणारी हिंदी वापरतात, तर शाखेतली भाषा मात्र संस्कृताच्या तुपात घोळलेली / दूध की धुली! ह्यातून विनोदनिर्मिती होते असं मला वाटतं आणि ती काही संघावरच्या सकारात्मक टिप्पणीतून होत नाही ;-)
पाहीली
बरी वाटली. संवादांची विशेष अडचण वाटली नाही, मात्र कथासूत्रास सुधार करता आला असता. अनेकवेळा कथानक गुंडाळायचा प्रयत्न वाटला. फ्लॅशबॅक किंवा इतर वेळेला खर्या लोकांचे व्हिडिओ का दाखवले आहेत हे कळलं नाही. खर्या व्हिडिओत जोवर मालिकेतील कलाकार नाहीत तोवर ठीक आहे, असे पुर्वीही अनेकांनी वापरले आहे.
तंत्रमार्गामध्ये सर्व जग हेच
तंत्रमार्गामध्ये सर्व जग हेच स्मशान-भूमी मानले जाते. जिथे बुद्धीझम मध्ये "आसक्ती व घृणा" (attachment & aversion) ही दु:खाची दोन कारणे सांगीतली आहेत, साधारण त्याचप्रमाणे तंत्र मार्गामध्ये देखील हेच २ दोष निवारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पैकी attachment(आसक्ती) वरती प्रयत्नांनी जरा तरी ताबा मिळवता येतो, पण घृणेवरती ताबा मिळवण्याचे अनेक भयंकर प्रकार तंत्रमार्गात अवलंबिले जातात. त्याबद्दल इथे नकोच.
.
या (तंत्रमार्ग) पार्श्वभूमीवरती खालील गॅलरीतील काही चित्रे कळू शकतात.
रॉबिन विल्यम्स
इनसाईड अॅक्टर्स स्टुडियोमध्ये रॉबिन विल्यम्सची मुलाखत दहाव्यांदा पाहिली.
https://www.youtube.com/watch?v=gWLFRAXAY7g
पहा आणि तुमचे मत बनवा
कोपनहेगन
'कोपनहेगन' नावाचा चित्रपट बघितला.
विल्यम हा २८ वर्षीय 'बालक' न्यूयॉर्कहून कोपनहेगनला आपल्या आजोबांच्या शोधात आलेला असतो. बॅकपॅकिंग करत कोपनहेगन बघायचं नाही हे त्याने दहा वर्षांपूर्वीच ठरवलेलं असतं. बालिश वर्तनामुळे सोबत आलेला मित्र, त्याची गर्लफ्रेंड, हॉटेलातला डेनिश कर्मचारी वर्ग, तो सगळ्यांच्याच डोक्यात जातो. तरीही जिथे राहत असतो त्या हॉटेलात काम करणारी एक मुलगी त्याला थोडी मदत करते. भाषा न समजणं, नकाशे नीट वाचता न येणं, त्याचा स्वभाव यांमुळे सुरुवातीला विल्यमबद्दल एफीला कीव आलेली असते. प्रेमळ, शहाण्या एफीच्या सुस्वभावामुळे विल्यमही बदलत जातो. त्याला पहिल्यांदाच आपण प्रेमात पडलो आहोत याची जाणीव होते.
पण पोक्त दिसणारी, शहाणपणाने वागणारी एफी त्याच्या अर्ध्या वयाची, शाळकरी मुलगी आहे. तिच्यामुळे विल्यम वयात कसा येतो, कुटुंबियांचा शोध घेताघेता स्वतःलाच कसा शोधायला लागतो याची गोष्ट 'कोपनहेगन'.
टू लाईव्ह्ज
'टू लाईव्ह्ज' नावाचा जर्मन-नॉर्वेजियन चित्रपट बघितला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिक आणि नॉर्वेजियन स्त्रिया यांना झालेली मुलं जर्मनीमध्ये परत नेली गेली. त्यातली एक कत्रीन पूर्व जर्मनीमधून निसटली आणि नॉर्वेत आपल्या आईला भेटली. त्या दोघी, पुढे कत्रीनचा नवरा- ब्यार्ते, त्यांची मुलगी - अॅना, आणि पुढे अॅनाला झालेली मुलगी असे सुखाने राहत असतात. तिथे या स्त्रीप्रधान कुटुंबात चित्रपट सुरू होतो.
जर्मनांनी पळवून नेलेली मुलं नॉर्वेजियन सरकारनेही नीट स्वीकारली नाहीत, यासाठी एक संस्था आपल्या सरकारवर खटला सुरू करणार असते. त्यांच्या दृष्टीने कत्रीनची साक्ष महत्त्वाची असते. कत्रीन साक्ष द्यायला नकार देते. तेव्हा कत्रीनचं दुसरं आयुष्य समोर यायला लागतं. कत्रीन पूर्व जर्मन सरकारच्या गुप्तहेरखात्याची, ष्टासीची एजंट असते. ओळख बदलून, स्वतःचा इतिहास बदलून ती नॉर्वेत निसटल्याचं दाखवते, ओजे इव्हनसन आपली आई असल्याचा दावा करते, आई-मुलीची भेट होते. कत्रीनच्या आयुष्यात सैन्यात काम करणारा ब्यार्ते येतो. या दोन लोकांच्या प्रेमामुळे कत्रीनला एजंट म्हणून काम करणं नकोसं होतं. ते सगळं मागे टाकून काही वर्षं प्रेम, सुख, आनंद उपभोगल्यानंतर हा खटला सुरू होतो. भूतकाळ सामोरा आला तर सगळ्या कुटुंबाची वाताहत होईल म्हणून तिला खटल्यात साक्ष द्यायची इच्छा नसते. पण तेव्हा अॅनवरच्या प्रेमाखातर ती साक्ष द्यायलाही तयार होते.
'आपण आणि ते' अशी जगाची काळीपांढरी विभागणी नसते. लहान वयात अनाथालयात वाढणं, कसलातरी अजेंडा रेमटवण्यासाठी अनाथ मुलांशी दयाबुद्धीने वागणाऱ्यांनाच प्रेमळ माणसं समजणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यामुळे तरुण वयात ष्टासी-एजंट बनण्याची धडपड आणि पुढे खरोखर प्रेम करणाऱ्या आई-नवऱ्यामुळे झालेला सुखावह बदल असा कत्रीनचा प्रवास झालेला आहे.
ही गोष्ट सत्यघटनांवर आधारित, लेखनस्वातंत्र्य घेऊन लिहिलेली. किंचित कम्युनिस्टविरोधी प्रचार वाटावा असे अपवाद वगळता बाकी चित्रपट माणसांचं प्रगल्भ होणं, त्यांचे आपसांतले नातेसंबंध यांच्याबद्दल बरंच भाष्य करतो. मात्र कत्रीन ही आपली मुलगीच नाही, ज्यांच्यावर आपलं म्हणून प्रेम केलं ते आपलं कुटुंबच नाही हे समजल्यावर ओजेचं काय झालं असेल, तिला तिच्या अस्तित्वाबद्दल काय प्रश्न पडले असतील याबद्दल चित्रपट मौन राखतो.
---
वरच्या प्रतिसादाला प्रतिप्रतिसाद देण्याचं कारण आहे.
'कोपनहेगन'ची कथा, सूत्र, मांडणी मला आवडली. पण 'टू लाईव्ह्ज' बघताना जाणवलं की यात एक-दोन प्रसंग वगळता बाकी कुठेही नैसर्गिक आणि हवाहवासा वाटणारा, स्वच्छ, सुखद सूर्यप्रकाश नाही. सतत ढगाळ आणि थंड-बोचरी हवा चित्रांमधूनही जाणवत राहते. हॉलिवूडी आणि बॉलिवूडी सिनेमांना एक चकचकाट असतो तो 'टू लाईव्ह्ज'मध्ये नावापुरताही नाही. एवढ्या सुंदर 'कोपनहेगन'ला स्वच्छ-डेनिश-उन्हाळ्याचं अमेरिकन गालबोट लागलेलं आहेच.
इन्साईड अॅक्ट्रर्स स्टुडियो
इन्साईड अॅक्टर्स स्टुडियोचा रॉबिन विल्यम्सवरचा एपिसोड (दहाव्यांदा) पाहिला....
पहिल्याइतकीच मजा देऊन गेला....
https://www.youtube.com/watch?v=gWLFRAXAY7g
लिटल फॉरेस्ट
लिटल फॉरेस्ट नावाच्या स्लाईस ऑफ लाईफ मँगा वर आधारित दोन फिल्म पाहिल्या. मला स्वतःला बेहद्द आवडल्या. जपानात दूरवर एका छोट्या पहाडी गावात राहणार्या एका युवतीवर बेतलेली सेरिज आहे. तिचं रोजचं आयुष्य आणि प्रत्येक प्रसंगानिशी एकेका डिशसोबत जोडून माऊथवाटरिंग (याच्या चपखल भाषांतरासाठी आवाहन) चित्रपट बनवले आहेत. सुंदर प्रकार आहे एकंदरीत..
वा फार रोचक वाटताहेत ह्या
वा फार रोचक वाटताहेत ह्या फिल्म्स. लगेच तुनळीवर ट्रेलर पाहिलं आणि उत्सूकता अजूनच ताणली गेली आहे, लवकरच पाहिल्या जातील ह्या फिल्लीम :). अनेकानेक धन्यवाद इथे सुचवल्याबद्दल.
अवांतर - जापनीज पदार्थ आणि माऊथवॉटरींग हे समीकरणच पटत नाही समहाऊ मला. शिवाय जापनीज कुझीन म्हणजे 'सुशी' ह्याशिवाय काही ठाऊकच नाही. जाणकार लोक्स कृपया जरा प्रकाश टाकाल का जापनीज खाद्य-संस्कृतीबद्दल?
>>"माऊथवॉटरींग"<< हा प्रकार
>>"माऊथवॉटरींग"
हा प्रकार जरासा सापेक्ष आहे. तरीही "लिटल फॉरेस्ट : विंटर स्प्रिंग" आणि "लिटल फॉरेस्ट : समर ऑटम" या दोन्ही फिल्मस पाहिल्यावर कदाचित तुम्हाला माझी सापेक्षता पटू शकेल.
मला आवडलेली बाब म्हणजे हे जवळपास खाण्याचे कार्यक्रम असावेत असा फील आहे, तरीही त्या मागे एक लहानशी कथा आहे. अर्थातच स्लाईस ऑफ लाईफ हा प्रकार असल्याने त्यांचा पेस हळुवार आहे, लहानमोठे प्रसंग आहेत. शांत एकांत आणि तरीही अजिबात उदासवाणा नसलेला जरासा मला आदर्श वाटणारा आयुष्यक्रम यांच्या प्रेमात मी पडलोय. जापनिज पदार्थ, परदेशी पदार्थ आणि तिथले सीजन्स यांचा घट्ट संबंध, काहीसे पाश्चात्य काहीसे स्थानिक असे साठवणुकीचे प्रकार, मेहनत, पीकवणं-वापरणं, आणि संथ शांततेत जाणारा दिनक्रम ह्या सर्व बाबी भुरळ घालणार्या आहेत.
यावरून अजून काही फिल्मस मी सजेस्ट करेन. एक एदो काळातील ड्रामा आहे. "टेल ऑफ समुराई कूकींग" म्हणून. जरा मसालेदार कथा आहे, पण सगळाच प्रकार मला बेहद्द आवडतो. दुसरी, एका कडक परंपरेवरती असलेली भन्नाट डॉक्युमेंटरी "द बर्थ ऑफ सेक" ही. जिरो ड्रीम्स ऑफ सुशी तुम्हाला ठाऊक असावी असं गृहीत धरतो, नसेल तर बघाच. जाता जाता तुलनेने नवी अशी अन ही फिल्म. ही खाण्याशी संबंधित असली नसली तरीही किरीन किकी आज्जीबाईंची असल्यामुळे नक्कीच केव्हाही पाहिली असती :)
व्वा तुमच्या प्रतिसादाला मी
व्वा तुमच्या प्रतिसादाला मी पुनः:प्रतिसाद दिला आणि तुम्हाला लिटल फॉरेस्ट बद्दल आणि अश्या अजून सिनेमांविषयी बोलतं केल्याबद्दल मी स्वतःचेच आभार मानतो ;) खजिना दिल्यासारखं सुख वाटतंय. येणारा मोठा विकांत कारणी लावतो :) तुम्ही सुचवलेल्या कुठल्याच फिल्म्स मी अजून वा ह्याअधी पाहिलेल्या नाहीत. मी खान-पानावर आधारीत अतापर्यंत
जुलि & जुलिया
टोस्ट
शेफ
हेच सिनेमे पाहिले आहेत आणि ते बेहद्द आवडले आहेत.
पुन्हा तुमचे अनेकानेक धन्यावद :)
(कोणीतरी माहितीपूर्ण द्या हो वरच्या प्रतिसादाला. स्वतःच्या धाग्यावर मला देता येत नाहिये)
शिवाय जापनीज कुझीन म्हणजे
शिवाय जापनीज कुझीन म्हणजे 'सुशी' ह्याशिवाय काही ठाऊकच नाही.
मी कात्सू करी नावाचा आणखी एक प्रकार खाल्ला आहे. एक नंबर लागतो. त्याशिवाय टेंपूरा नावाचा भज्यांसारखा पदार्थ आणि असाही नावाची बीयर.
मोची रोल्स नावाचंही काही असतं म्हणे. इथल्या कोणशाशा सुपरमॉडेलचा तो फेवरिट पदार्थ आहे हा ज्ञानकण कालच्या स्थानिक संध्यानंदमधून गोळा केला.
व्वा, झटकन गुगलून पाहिले हे
व्वा, झटकन गुगलून पाहिले हे पदार्थ. बरंच काही मसालेदार आणि तळकट असतं की म्हणजे जपानी कुझीन मधे. शिवाय 'मोची रोल' नामक काहीतरी गोड प्रकरण दिसतंय म्हणजे गोड-धोड ही असतंच (रवा-नारळाच्या वड्या छाप)...वा वा हे सगळं पाहून आनंद वाटला आणि जपानी लोकांबद्दल असलेली कीव/करुणा जरा कमी झाली :P
धन्यवाद अ.बा. _/\_
अरेरे.
वरणभातको छोडो भाऊ एक दिन! पण सिरियसली 'वागामामा' किंमतीला तुलनेने कमी, चवीला चांगले आणि थोडे फ्यूजन पद्धतीचे ठिकाण आहे. माझ्याकडे त्यांचे पाकृ.पुस्तकही आहे, चांगल्या आहेत त्यातल्या पाकृ. पण अनेक जिन्नस खास पारंपारिक जपानी दुकांनातून आणावे लागतात. तिथली 'यासाय कात्सु करी' आणि 'कारे लोमेन'फार मस्त असते, त्या भागात रहात असताना आमचे ते आवडीचे ठिकाण होते, माझी पोरगी तर नाव काढून काढून हळहळते. इथे उत्तर अमेरिकेत यायला हवे.
"न्यु दिल्ली" - १९५६ - किशोर
"न्यु दिल्ली" - १९५६ - किशोर कुमार आणि वैजयंतीमाला - एकदम धमाल सिनेमा आहे. सर्वधर्मसमभावाचा जरी डोस असला तरी गोड डोस आहे. वैजयंतीमालाची नृत्ये सुंदर. गाणी - "ओ नखरेवाली" व अन्य एक दोन एकदम गोड.
____
"मिस मेरी" - मीन कुमारी व गणेशन - सिनेमा ओके वाटला, मीनाकुमारीने डोळे अति म्हणजे अति फडफडवले आहेत. गणेशन्मध्ये साऊथ इंडियन्स नी काय पाहीलं देव जाणे. असो. देव आनंदची कमी भासली. या सिनेमात किशोर कुमारला अगदीच नगण्य भूमिका दिलेली आहे.
गाणी गोड. "वृंदावनका कृष्ण कन्हैय्या, सबकी आंखोंका तारा, मनही मन क्युं जले राधिका, मोहन तो है सबका प्यारा" - वा! फार गोड गाणं.
पु ल वरील माहितीपट
त्यातील साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषणातील अंश 1:30:31 पासून ऐकण्यासारखे. विशेषकरुन आजच्या परीस्थितीत.
जो जे वांछील तो ते लिहो.
- ओंकार.
एकीला अजून दहा जोर सुद्धा
एकीला अजून दहा जोर सुद्धा काढता येत नाही. त्यापेक्षा आमची लटिनो पहा, हे दणादण!
तुमची लॅटिनोंबद्दलची आवड इतर धाग्यांतूनही तुडुंब वहाते आहे. तुम्हाला लखलाभ! :)
आम्हाला तुमच्याबद्दल आनंदच आहे!
:)
पण आम्हाला 'जोर काढता येणे' ही स्त्रियांची पेशालिटी वाटत नाही ना!
त्या ट्वीनपैकी एकीला दुसरीसमोर केसांचा बुचडा बांधतानाचा सीन तुम्ही पाहिलांत की नाही? पुन्हा पहा...
इट वॉज अल्मोस्ट अ सॉफ्ट पॉर्न!!!
(आता त्यांना 'त्या' देशांत डोकीवरून पदर का घ्यायला लावतात ते कळलं!!)
:)
अजूनतरी अगदी सामान्य वाटतेय
अजूनतरी अगदी सामान्य वाटतेय सिरियल.
मलाही उत्सुकता होतीच ह्या सिरियलची. त्यात म्हंटलं आधी विकीबाबा काय म्हणतात ते पाहू आणि त्यात 'पॉझीटीव' रेव्ह्यू असल्याने मी अगदी रिमांईडर लावून पाहिला एपिसोड पाहिला, पण निराशा झाली. प्रियंकाचा अभिनयातील वावर मला तितकासा सहज्/बिन्धास्त वाटला नाही, दडपणाखाली अभिनय करतेय असं वाटलं (खूप रिटेक्स घेऊन शेवटी डिरेक्टर ने वैतागून आहे त्या शॉट ला "ओके" करावं तसं काहीसं). शिवाय 'अक्सेंट' मधे बोलणं ही त्या पात्राची गरज असावी पण हे असे नेहमीच्या पाहाण्यातले भारतीय लोक अॅक्सेंट मधे बोलायला लागले की एकतर डोक्यात जातात किंवा फार नाटकी वाटतात त्यामुळे ही कदाचित मला तिचा अभिनय आवडला नसावा.
पण हे असे नेहमीच्या
पण हे असे नेहमीच्या पाहाण्यातले भारतीय लोक अॅक्सेंट मधे बोलायला लागले की एकतर डोक्यात जातात किंवा फार नाटकी वाटतात
=)) अगदी खरय. मला कोणी भारतीय्/पाकी/बान्ग्ला , फॉरीन अॅक्सेन्ट मारायला लागला की ढोंगी ( One of most despicable traits) वाटतात. एक कानाखाली वाजवुन म्हणावसं वाटतं - लाज वाटते काय रे/गं भारतीय अॅक्सेन्ट मध्ये बोलायची?
एक कानाखाली वाजवुन म्हणावसं
एक कानाखाली वाजवुन म्हणावसं वाटतं - लाज वाटते काय रे/गं भारतीय अॅक्सेन्ट मध्ये बोलायची?
त्यानं तुम्हाला प्रतिप्रश्न केला तर - की - लाज वाटते काय रे/गं भारतातच राहण्याची ?
( मुद्दा हा आहे - की ती व्यक्ती इथे राहून अनेक वर्षे झालेली आहेत. त्यामुळे अॅक्सेंट मधे बदल झालेला असू शकतोच ना. तसे बोलणे हे स्टाईल मारणे असते असा तुमचा गैरसमज झालेला असेल तर ?? )
धन्यवाद
अर्थात मुद्दा १ चूकीचा असू शकतो हे मान्य आहे.
इंग्रजी भाषा ही भारताबाहेर गेल्यावर जर मुळापासून शिकायचा प्रयत्न केला (अगदी फोनेटिक्ससकट) तर अॅक्सेंट बदलतो.
किंवा तुम्हाला जर इथे जन्माला आलेली मुलं असतील तर त्यांच्याशी संवाद साधण्याचा मनापासून प्रयत्न केला तरीही नकळत आपला अॅक्सेंन्ट बदलतो.
आणि मुळात भारतातून आणलेला रेन अॅन्ड मार्टिन इंग्रजी अॅक्सेंट टिकवून ठेवण्यात काही मोठेपणा आहे असंही नाही.
खरं की खोटं?
एअर शो
गेल्या वीकेन्डला आपल्या नंदनसाहेबांच्या कृपेने २०१५ चा मिरामारचा अमेरिकन एअर फोर्स शो पाहिला...
http://miramarairshow.com/
संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री जवळ्जवळ नऊ वाजेपर्यंत! ही काहीशी जुनी म्हणजे सध्या वापरात नसलेली मशिनरी होती. पण ती पाहून देखिल खात्री पटली की जगभराच्या वृत्तपत्रांत काहीही लिहून येऊं देत पण अमेरिकन मिलिटरीची खरी पॉवर काय आहे ती!!!!
त्यांनी नापाम बॉम्बसनी रनवेवर जेंव्हा आगीची भिंत पेटवली तेंव्हा त्याच्या धक्क्याने, आवाजाने आणि वडवानळासारख्या आगीच्या उष्णतेने आपला पुरोगामी नंदनदेखील अंमळ दचकला!!! :)
https://www.youtube.com/watch?v=Q65KZIqay4E
https://www.youtube.com/watch?v=XPjZpGOtokU
बोथ द लॅन्डस ओफ द फ्री, अॅन्ड द होम ऑफ द ब्रेव्ह!!!
बस्स का?
खाल्लेल्या अन्नाला (आणि मुख्य म्हणजे प्यालेल्या स्कॉचला!) आम्ही कृतघ्न कसे होऊ? अन्नदाता सुखी भव|
काही झालं तरी मराठी लोक आपण....
:)
अवांतरः बाकी नंदनला आपले हे काका पक्के दारूडे आहेत याची इतकी खात्री पटलीये की त्याने शिवास रीगलचं अल्मोस्ट एक पिंपच तयार ठेवलं होतं!!! मग आता त्याचे तसे फोटो कसे देणार?
:)
गेल्या काही दिवसांत चीन मधे
गेल्या काही दिवसांत चीन मधे नेमकं काय घडलं -
नांदा सौख्यभरे - अर्थात महान मालिका.
आधीच सॉरी म्हणतोय, नंतर बोलायचं नाही.
===============
"होणार सून..." म्हणजे कहर वाटत असेल तर कृपया "नांदा सौख्यभरे" हा प्रकार बघावा. डोक्यात तिडीक जाणे म्हणजे काय ते कळेल.
घरात ह्या सिरिअलचा एक प्रेक्षक असल्याने माझ्या ज्ञानेंद्रियांनाही ह्या प्रकाराला सामोरं जावं लागतंय.
बाकी सगळं माफ- पण ह्या सिरिअलचं बॅक्ग्राऊंड म्यूझिक कोणी दिलं रे? पावलोवच्या कुत्र्याचा प्रयोग ही बहुतेक त्याची प्रेरणा असावी.
म्हणजे दुष्ट माणसं खलबत करणारं पार्श्वसंगीत नं १, विनोदी प्रसंगासाठी पा.सं.नं २, करूण प्रसंगासाठी पा.सं.नं ३ . बस्स.
म्हणजे मग न बघताही समजतं की सिरीअलमधे काय चाल्लंय.
.
क्यारेक्टर्स दिव्य आहेतच ते असू दे.
होणार्या नवर्याला "हे, अहो, तुम्ही" वगैरे म्हणणारी आदर्श मुलगी, एक भुवयी उडवून २४X७ खलबतं करत रहाणारी महाखतरनाक बाई-होणारी सासू, हिंदी चित्रपटातल्या डिटेक्टिव्हचा असिस्टंट शोभेल इतपत चंपक प्रश्न विचारणारा तिचा नवरा, मराठीतून इंग्रजी बोलल्यासारखा बोलणारा चित्र-ठोकळा आणि आदर्श मुलीच्या घरातले बाकी साडे चव्वेचाळीस लोक.
.
एक शंका- हे मराठी सिरिअलवाले लोक असल्या "प्रतिगामी गोष्टी" का दाखवतात? एकत्र कुटूंब, सग्ग्ग्ग्ग्ग्गळं ऐकणारी आदर्श सून/मुलगी, वडीलधार्या माणसांचा अनावश्यक आदर आणि त्यांच्या एकाही निर्णयाला विरोध न करणारी गुणी बाळं वगैरे वगैरे.
लोकांची काही behavioral फँटसी वगैरे पूर्ण होते का असलं गुळमट काहीतरी बघून?
=============
इति मराठी सिरिअल भडास संपूर्ण.
मी सॉरी वगैरे म्हणणार नाहीय.
मी सॉरी वगैरे म्हणणार नाहीय. भडास निघताना बघून मला माझी उबळ आवरत नाहीय.
तरी ती ऑफिसातली सिरियल बघ अस्वला. त्यातले लोक सारखे कसलीतरी प्रेझेंटेशन्स करतात. आणि क्लाएण्ट आणतात. याच्यापलीकडे काही ऑफीसच्या कामाची पोच जात नाही. कुठली एवढी प्रेझेंटेशन्स करतात देव जाणे. मागे त्या लग्नाची पहिली की दुसरी गोष्टमध्ये त्यातला हीरो अमेरिकेला जाणे हे एकमेव ध्येय उराशी बाळगून होता. आणि त्याचा बॉस त्याला इतके बाळबोधामॄत प्रश्न विचारत होता, की त्या बॉसच्या अखत्यारीत आयटी कंपनीचे ऑफीस चालणं सोडा, कोपर्यावरचा लॉण्ड्रीवाला तरी आपलं गाठोडं सोपवेल का, असं वाटायचं.
आयला, हापिस आणि हापिसातली कामं आणि इंडस्ट्री आणि वर्क कल्चर यांच्याबद्दल रिअलिस्टिक संवाद लिहायला इतका रिसर्च लागतो काय? आळशी साले.
त्या ऑफिस सीरियलमधला नायक तर
त्या ऑफिस सीरियलमधला नायक तर मेजर खालमुंड्या पा० धु० आहे.
नायक नायिकेला हापीसची प्रेझेंटेशन (definitely) आणि घरी बिछान्यावर गंमतजम्मत (presumably) वगळता प्रत्येक गोष्टीसाठी मित्र "सुहास" लागतो. उदा. कपडे लॉण्ड्रीत टाकणे --> सुहास. नवं घर शोधणे --> सुहास. कुरियर करणे --> सु...
तो श्रीखंड्या तरी इतका का राबतो काय माहीत.
नांदा सौ० भ० पाहतो आता.
बिछान्यावर गंमतजंमत करतात ते
बिछान्यावर गंमतजंमत करतात ते दोघे जण हे आपलं तुझं गृहीतक. तरुण नवराबायको. प्रेम-वगैरे-विवाह. आणि यांच्या आयुष्यभर गप्पा काय, तर हापिसातले लोक किती सदाचारी, आपण कसे दुराचारी, घरमालक काका-काकू कसे संतदांपत्य, आपण कसे भिकारडे-खोटारडे-नादान. हीऽऽ रडारड. अरे, कधीतरी काहीतरी प्रेमाचं बोलाल का नाही? प्रेम फक्त हापिसातल्या लोकांनी नवर्यावर लाईन मारली की मी मग जळण्यापुरतं. इतकाच काय तो रोमान्स. आणि प्रेम - हुह. जगात जणू हा हीरो हाच एकमेव-अखेरचा-उपलब्ध पुरुष उरलेला असल्यासारख्या यच्चयावत तरुण मुली त्याला पटवण्याच्या प्रयत्नात. अरे, कायेऽऽ? बकवास. तो तरी थोबाड काही हलवू शकेलसा असावा? त्याच्या थोबाडावर कायम ए-क-च भाव चिपकवलेले असतात. फडतूस.
लोल
मी आता नव्या उत्साहाने ही सिरीयल बघणार आहे. ते घरातले कोण काका ते नॉर्मल ला आले का, की अजून ते चमत्कारिक ओरडून बोलतात? विवेक लागू त्या हीरोवर एवढा का खार खाउन आहे ते ही समजत नाही. ते लग्न लपवण्याचे कारण - बहुधा हापिस वाल्यांचा नियम असेल - एवढे का स्ट्राँग आहे ते ही अजून कळत नाही. केवळ तेवढ्यासाठी जुने भाग बघणार मी आता.
शिरीश कणेकर हा काही माझा
शिरीष कणेकर हा काही माझा आवडता लेखक नाही. पण त्यांच्या एका लेखातलं एक वाक्य इथे चपखल बसतंय म्हणून देतो...
"सिनेमातल्या लोकांना कॉलेज, न्यायालय, ऑफिस ही ठिकाणं नीट रंगवता येत नाहीत. काहीतरी हास्यास्पद करतात. पण हीच लोकं दारूचा अड्डा, कुंटणखाने वगैरे किती बारकाईने रंगवतात! सहाजिकच आहे, ती ह्यांची नेहमी उठायबसायची ठिकाणं ना!!!!"
:)
दिल दोस्ती दुनियादारी!
सद्ध्याची आवडती सिरीयल सांगायची झाल्यास -
मराठी - दिल दोस्ती दुनियादारी (कुठ्ठलाही एपिसोड बघा - फुल्टू धमाल!), माझे पती सौभाग्यवती (सद्ध्यातरी पहाणेबल आहे असं वाटतंय)
हिंदी - एजंट राघव (टू द पॉईंट इन्व्हेस्टीगेशन.. मिनिमम ड्रामा.. आणि केस झटपट सॉल्व्ह होणार ही गॅरंटी)
डिस्कव्हरी आणि अॅनिमल प्लॅनेट हे ऑलटाईम फेव्हरेट चॅनल्स. चित्रपट अगदीच हटके असल्यास बघते नसता मला चित्रपट बघण्यापेक्षा पुस्तकं वाचायला आवडतात.
ख्वाडा
ख्वाडा चित्रपट पाहिला. आवडला. ख्वाडाच्या दिग्दर्शकावर लिहून आलेल्या या लेखातला हा पॅरा (सद्य भारतीय सिनेमावरला) आवडला.
One of the important turn-of-the-century developments has been the democratisation of cinema. The steady spread of cine literacy, the strong influence of moving images combined with an easier access to technology and emerging online exhibition platforms has meant that potentially anyone who dreams of making a film can now turn it into a reality and find an audience for it. Even at the grass roots. Filmmaking can become a mode of self-expression, of telling a story or highlighting an issue one feels strongly about. In a nutshell, an empowering tool, the voice of the voiceless.
http://www.thehindu.com/opinion/op-ed/bhaurao-karhade-from-farmer-to-fi…
रेड ओक्स
अॅमेझॉन प्राईम वर ही त्यांचीच एक नवीन सिरीज आली आहे - सध्या फक्त एक सीझन (१० भाग). टोटली हुक्ड. लाईट ह्यूमर, कंट्री क्लब मधले "समर" चे वातावरण, तेथील स्टाफ ई च्या गमती, थोडाफार सिरीयसनेस मस्त जमले आहे. जरूर पाहा (त्यातला तो 'डेव्हिड' बघताना सतत जो जीता... मधला आमिर आठवतो :) )
द लॉब्स्टर
'द लॉब्स्टर' ह चित्र्पट कालच पाहिला. एका विचित्र जगाची कल्पना आहे ज्यात प्रत्यकाला पार्टनर असणं बंधनकारक आहे. सिंगल लोकांना 'अटक' करून एका हॉटेलात ठेवतात आणि तिथे एका काल मर्यादेत जोडीदार शोधायचा असतो...जर नाही शोधू शकलात तर तुम्हाला एका तुमच्या आवडीच्या प्राण्यात रूपांतर करून जंगलात सोडतात. एकूण ही विचित्र कल्पना अतिशय कंटाळवाण्या पद्धतीने समोर येते. अजिबात पाहू नका. ऐसीवरच्या उसंत सखू नी जरूर हा चित्रपट पाहून रसग्रहण लिहावं !
"La jetée"
"La jetée" (१९६२)
ख्रिस मार्कर दिग्दर्शित सायन्स फिक्शन लघुपट. ह्याचे वैशिष्ट्य असे की हा पूर्णपणे छायाचित्रांपासून बनवलेला आहे.
"La jetée" by Chris Marker from minneapolis on Vimeo.
..हा काल बघितला. आवडला.
.
.
हा काल बघितला. आवडला. शेवटचा सीन (ज्यात मेक्सिको मधे मुलं फुटबॉल खेळताना .... मागे गोळीबार होतो व सीमेपलिकडे व अलिकडे स्त्रीयांच्या चेहर्यावरचे भाव) एकदम सूचक.
.
.
==================================================================
.
.
.
.
सुचित्रा सेन सेक्सी दिसते नै (या गाण्यात) ?
About Ellyअस्गर फरहादी यांचा
अस्गर फरहादी यांचा हा चित्रपट. मी चित्रपट पाहिलेला नैय्ये. लेकिन बहुत चर्चे सुने है इसके.
"सर्टिफाईड कॉपी" नावाची एका
"सर्टिफाईड कॉपी" नावाची एका इराणी दिग्दर्शकाची आर्ट फिल्म पाहीली. केव्हा संपली तेच कळले नाही. स्क्रीनवरती अक्षरे येऊ लागली तेव्हा कळले की सिनेमा संपला आहे. पण एकंदर अभिय-संवाद यांनी खिळवुन ठेवले. अभिनय तर इतका अस्सल. फक्त नायक-नायिकेचा नाही तर मागे बॅकग्राऊंडला वावरणार्या सर्वच पात्रांचा अभिनय लाजवाब आहे.
आण्टूराज
अॅण्टूराज्/एण्टूराज कोणी पाहता का? अमेरिकेत अॅमेझॉन प्राईम वर आहे. मी टोटली हुक्ड. त्या चारही जणांची केमिस्ट्री, त्या विन्स चा एजंट आरी गोल्ड चा रोल सगळे जबरी आहे. सध्या 'स्लोन' च्या एकदम प्रेमात :). माझ्या लॅमिनेटेड लिस्ट मधे नक्कीच :)
आरी वाल्या जेरेमी पिव्हेन चा आवाज कोठेतरी ऐकला आहे असे सतत वाटत होते. चेक केल्यावर समजले - पहिल्या 'कार्स' मधे मॅक्वीन शी फक्त फोनवर बोलणारा तो त्याचा एजंट
युटोपिया
बर्याच दिवसांत स्टायलिश हिंसा, उत्तम सिनेमॅटोग्राफी, साय-फाय, चांगले प्लॉट्स आणि माइंडफक उत्सुकता देणारे काही पाहण्यात आले नव्हते. कुठुन कशी युटोपिया ही सेरिज हाती लागली आणि सलग दिवसाचे बिंज घडले. सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे ती रंगसंगती. संपूर्ण सेरिज भर ठळक पिवळ्या, हिरव्या आणि निळ्या रंगांचा वेधक उपयोग. त्या खालोखाल संगीत. काही ट्रॅक्स संवादांना लय देऊन बनवले आहेत आणि ताज्या लिंबांइतकी ही मालिका फ्रेश झाली आहे. या मालिकेवर हिंसा दाखवण्यामुळे टीका होत असली तरी मुलांचा लक्षणीय वापर मनात लिंगरत राहतो.
दीपा मेहेताचा "वॉटर"
दीपा मेहेताचा "वॉटर" काहीतरी वेगळ ,महत्वाचं सांगतोय असा आभास निर्माण करणारा आणि बटबटीत दिग्दर्शनामुळे कंटाळवाणा झालेला रटाळपट आहे.छायाचित्रण अप्रतिम आहे पण त्याने उत्सुकता टिकून रहायला फारशी मदत होत नाही.सीमा विश्वास आणि मनोरमा या कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. लिसा रे या एरवी अप्रतिम दिसणाऱ्या सुंदर ठोकळीला यात सुंदर दिसणसुद्धा धड जमलेलं नाही.जॉन अब्राहम इतका झामलट दिसतो आणि ऑकवर्ड वावरतो की याला कुठले निकष लावून घेतलं असेल ब्वा म्हणून आपण नवल करत रहातो. शेवटी गांधीजींचे विचित्र ठिगळ लावून द एंड रुपी गाशा गुंडाळून टाकला आहे.
मस्त आहे परिचय. नक्की बघीन.
मस्त आहे परिचय. नक्की बघीन.