Skip to main content

छुपे अर्थ

.

विवेक पटाईत Sun, 23/08/2015 - 19:03

मस्त लेख.
काही शब्द
विचारजंतू
धर्मनिरपेक्ष
यांचे हि अर्थ

खोडसाळ Sun, 23/08/2015 - 19:06

रुमाल टाकून ठेवतो

मूळ अर्थ - जागा राखून ठेवतोय

आंजा अर्थ - प्रतिसाद देण्यात मी नेहमी पहिला-दुसरा क्रमांक लावत असतो. पण आता काही सुचत नाहीये, आणि नंतर प्रतिसाद दिला तर ईज्जत का फालुदा होईल ना, भाय!

राजेश घासकडवी Mon, 24/08/2015 - 03:44

In reply to by खोडसाळ

बूच मारणे - म्हणजे मुद्दामून उपप्रतिसाद देऊन प्रतिसाद संपादित करण्याची सोय ठेवायची नाही. विशेषतः रुमाल टाकून ठेवतो आहे म्हणणारे खिडकीशेजारची जागा अडवून शांतपणे चहा प्यायला निघून जातात, आणि हवं तेव्हा येऊन आपली जागा (पहिल्या काही प्रतिसादांमधली) व्यापून 'तर मी काय म्हणत होतो' असं पाल्हाळ लावतात. त्यांची खोड मोडायची असेल तर त्याला उपप्रतिसाद देऊन बूच मारायचं. म्हणजे त्या जागेवर त्यांचा रुमाल फक्त राहातो. आणि झक मारत त्यांना कुठच्यातरी लांबच्या डब्यात जाऊन उभं राहावं लागतं.

आदूबाळ Sun, 23/08/2015 - 21:00

- चान चान
- अभ्यास वाढवा!
- संदर्भचौकट (हे नेमकं काये हे मला माहीत नाही)
- विदा ("तुम से विदा हो कर, मुझे दूर जाना है" किंवा "विदा हो के भी, तू मुझ में कहीं बाकी है" वगैरे उगाच विडंबनं सुचतात)

बॅटमॅन Sun, 23/08/2015 - 23:07

In reply to by आदूबाळ

"ऑ: अच्चं जालं तल" हाही एक वाक्प्रचार, तुलनेने कमी प्रचारात असला तरी उद्बोचक स्केलवर बर्‍यापैकी वर जाईलसे वाटते.

पिवळा डांबिस Mon, 24/08/2015 - 10:36

बाजार उठवला.
टेंपोत घालून धाडला.
धाग्याचं काश्मीर केलं.
(तिघांचा अर्थ जवळपास एकच!)
:)

चिंतातुर जंतू Mon, 24/08/2015 - 10:55

In reply to by पिवळा डांबिस

>> टेंपोत घालून धाडला.

नव्हे, 'बसवला टेंपोत' (मराठीत आवडीनं दिल्या जाणाऱ्या एका शिवीशी ह्याचं ध्वनिसाधर्म्य आहे म्हणून तो प्रचारात आला.)

पिवळा डांबिस Mon, 24/08/2015 - 23:01

In reply to by चिंतातुर जंतू

तुमचा या(ही) विषयातील अभ्यास थोर, तेंव्हा आम्ही काय बोलणार? :)
आम्ही हा शब्दप्रयोग पहिल्यांदा मराठी आंतरजालावरच वाचला. हा बहुदा घाटावरला शब्दप्रयोग असावा.
तेंव्हा तुम्ही म्हणता तसाही शब्दप्रयोग असेल. चूभूद्या घ्या.

बाकी ती आवडीने दिली जाणारी शिवी आम्ही ओळखली बरं का! :)
(सध्या अदितीने ठरवून दिलेल्या सिलॅबसवरून आमचा अपशब्दांचा अभ्यास सुरू आहे!!)

नंदन Wed, 26/08/2015 - 03:55

In reply to by पिवळा डांबिस

बहुतेक 'बशिवला टेम्पोत' ही टार्‍याच्या डोक्यातून आलेली कल्पना. 'अंजीर केळे' आणि 'भयानक पाठलाग' यांच्याप्रमाणेच ;)

पिवळा डांबिस Wed, 26/08/2015 - 10:30

In reply to by आदूबाळ

आणि "व्यर्थेश कळबडवी" पण!!!!
=))

ओ गुर्जी/अदिती, त्या टार्‍याला बोलावून आणा ना इथे!
माझ्या फेसबुकावर आहे तो. पाहिजे तर मी पण त्याला विनंती करतो.
जरा जमवा!
(काय नाय तरी त्या निळ्याला शह द्यायला म्हणून तरी बोलवा!)
:)

Nile Sat, 05/09/2015 - 03:00

In reply to by पिवळा डांबिस

आमच्या सारख्या सामान्य, निरूपद्रवी अन संस्थळावर वारंवार हेळसांड होत असलेल्या सदस्याची तुलना टारेंद्र कुमारांशी केल्याचे पाहून अंमळ हळवा झालो!

पिवळा डांबिस Sat, 05/09/2015 - 09:47

In reply to by Nile

तुझ्या पराक्रमाला वाव निर्माण करून देतोय!
दुर्योधनाचा सामना भीमाशीच व्हायला हवा. उगाच नकुल-सहदेवांना काय कुत्र्यासारखं मारतोस? :)
-डांबिस भीष्म

XYZ Mon, 24/08/2015 - 21:52

स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देता येत नाही.

आणि

आजच्या दिवसात 25 प्रतिसादांना श्रेणी देऊ शकता. )))))))))))

अरे हा काय अजब प्रकार सुरू झालाय आजकाल...?:-O

चिमणराव Wed, 26/08/2015 - 06:37

आपण प्रस्थापित बिल्डर गणले जात असताना कोणी सोम्यागोम्याने येऊन एक छान चौसोपी वाडा अगोदरच बांधल्यास-
• अँ ? अच्च झाल्ल तल!

एक सणसणीत प्रतिक्रिया?
• हाण तेज्जायला!

•आपली ती अभ्यासू प्रतिक्रिया;
दुसय्राचा तो ट्रोल.

गवि Fri, 04/09/2015 - 08:03

..आपले अमुक विधान वाचून करमणूक झाली.
..आपले ढमुक विधान वाचून मजा वाटली.
..आपले चमुक विधान वाचून कीव आली.

....

.उपरोक्त सर्वांचा अर्थ = "आपले विधान माझ्या बरोब्बर वर्मी लागले.पुरेसा मनस्ताप झाला.तुमचा मला प्रचंड राग आलाय.आता माझी आदळआपट पुढील परिच्छेदात वाचा.."

बॅटमॅन Fri, 04/09/2015 - 14:26

In reply to by गवि

अमुक विधान उदहरणार्थ रोचक/उद्बोधक/गंमतीशीर वाटले.

हा क्यानॉनिकल फॉर्म विचारात न घेतल्याबद्दल गविंचा निषेध का करू नये, हे कुणीतरी सांगा.

.शुचि. Fri, 04/09/2015 - 19:33

In reply to by गवि

चमुक

=))

.उपरोक्त सर्वांचा अर्थ = "आपले विधान माझ्या बरोब्बर वर्मी लागले.पुरेसा मनस्ताप झाला.तुमचा मला प्रचंड राग आलाय.आता माझी आदळआपट पुढील परिच्छेदात वाचा.."

हाहाहा