.
.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
कोकिला व्रत रखने वाली
कोकिला व्रत रखने वाली स्त्रियों के लिए नियम है कि पहले आठ दिन तक आंवले का लेप लगाकर स्नान करे। इसके बाद आठ दिनों तक दस औषधियों कूट, जटमासी, कच्ची और सूखी हल्दी, मुरा, शिलाजित, चंदन, वच, चम्पक एवं नागरमोथा पानी में मिलाकर स्नान करने का विधान है।
इसके अगले आठ दिनों तक पिसी हुई वच को जल में मिलाकर स्नान करें और अंतिम छह दिनों में तिल, आंवला और सर्वऔषधि से स्नान करना चाहिए। प्रत्येक दिन स्नान के बाद कोयल की पूजा करें और अंतिम दिन कोयल को सजाकर उसकी पूजा करें। पूजा करने के बाद ब्राह्मण अथवा सास-श्वसुर को कोयल दान कर दें।
मला राणी क्लिआेपात्रा
मला राणी क्लिआेपात्रा म्हणायचे होते. राणी क्लिआेपात्रा गाढवीनीचे रोज वाटीभर दुघ घेऊन अंगाला लेप लावून आघोळ करत असेे.
ही राणी खुप सुंदर होती तिच्याशी लग्न करण्यासाठी अनेक राजांमध्ये लढाया झाल्या. शेक्सपिअर साहेबांनी राणी क्लिआेपात्रावर नाटक काढले ते अजरामर झाले.
शेक्सपिअर साहेबांनी राणी
शेक्सपिअर साहेबांनी राणी क्लिआेपात्रावर नाटक काढले ते अजरामर झाले.
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?
नाही बाॅ, हे नाटक काढल्याने म्हणजे लिहल्याने शेक्सपिअर अजरामर झाले
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत
शेक्सपिअर तुमचे साहेब आहेत होय! त्यांच्याकडे १३व्याचा पगार मागायचा आहे ह्ये ध्यानी असूंद्या.
एक अवांतर शंका : नाटक काढल्याने श्क्सपिअर साहेब अजरामर कसे काय झाले?
नाटक काढणे व ल्हिणे यात काय फरक आहे?
नाही बाॅ, हे नाटक काढल्याने म्हणजे लिहल्याने शेक्सपिअर अजरामर झाले
हे व्रत ज्यांना महिनाभर
हे व्रत ज्यांना महिनाभर करावयाचे आहे त्यांनी पहिले 8 दिवस तीळ व आवळा कल्प, नंतरचे 8 दिवस सर्वैषधी चूर्ण (आयुर्वेदिक दुकानात मिळते), पुढचे 8 दिवस वेखंडाचे चुर्ण व नंतर 6 दिवस सर्वैषधी चूर्ण लावून स्नान करावे. म्हणजे हे व्रत केल्याने पुण्य आणि सौंदर्य दोन्हीचा लाभ होईल. पण हे व्रत ईतके सोपे नाही, महिनाभर केले तर रोज दिवसभर उपास करून संध्याकाळी पुजा करून जेवण, महिनाभर पंलगावर न झोपता चटई टाकन जमिनीवर झोपावे लागते. नवरे मंडळीनां महिनाभर संन्यासी व्हावे लागते.
नवरा सोफ्यावर आणि बायको चटईवर
नवरा सोफ्यावर आणि बायको चटईवर झोपायच्या व्रतात असली छचोर गाणी? त्यापेक्षा आमच्या स्काउटपथकाचे गाणे म्हणा-
'कोकिळ गाई मंजुळ गान,
सुखी अनन्न्दी राहो त्यान'
पुढच्या दोन ओळी लक्षात नाहीत. त्याऐवजी ह्याच ओळी परत एकदा गायल्या तरी चालतील. शेवटी 'कुहुकुहुकुहुकुहुकुहुकुहुकुहु' असे कूजन करावे आणि त्याच वेळी हाताचे पंजे अंगाच्या दोन्ही बाजूंना फडफडवत धावत आपल्या गटाच्या नियोजित जागी जाऊन उभे रहावे.
इथे नियोजित जागा म्हणजे चटई असल्यामुळे खोटेखोटेच धावावे. चटई फरशीवरून घसरते. नपेक्षा चालतच चटईवर जाऊन तेथे नियोजन करावे.
मजबुरी का नाम....
ही शक्यता जरी विचारात आली असती
या व्रतामध्ये बायकोला सतरंजी/चटईवर झोपायला लागण्याची शक्यता विचारात घेतली तर,
बायकू अर्ध्या रातीला हळूच नवर्याच्या (आणि तिच्या) पलंगावर घुसून झोपण्याची शक्यता नाकारता येत नाही!!!! :)
"ईश्कोंके लिये ना सही, बिछाने के लिये आय!
रंजिश ही सही...."
माझ्या बायकोने व आईने आताच
माझ्या बायकोने व आईने आताच शुक्रवार-रविवार या तीन दिवसाचे व्रत केले. पहिल्या दिवशी नदीवर, विहिरीवर, हे शक्य नसल्यास बाथरूम मध्ये पुर्वकडे तोंड करून सुर्याला अर्ध्य देवून आघोळ करायची नेतर चौरंगालर सोन्याची किंवा पितळेची कोकीळा झाडावर बसलेली स्थापित करूत सगळे मांडायचे. दिवसभर उपास करायचा. संध्याकाळी पुजा करन नंतर दुसर्या दिवशी असेच तिसर्या दिवशी उद्यापन करायचे. हे सर्व विधी ब्राम्हनाकडून करून घ्यायचे. सवाष्ण ब्राम्हणाला जेवू घालायचे. या तीन दिवसात पलंगावर न झाेपता चटई टाकून जमिनीवर झोपायचे. (नवरे मंडळीनी बैठिकीत सोफ्यावर पडायचे. ha! ha!) नौकरी करणार्या स्त्रियांनी एका दिवसात केले तरी चालते. . पूजेचे साहित्य पुजाविधी उद्या सांगतो
चालेल.
आमच्याकडे कोकिळा नाही, म्हणून रिमा लागूंचा फोटो ठेवायचा प्लॅन आहे.नुसताच, झाडावर चढलेला वगैरे नाही.
आणि मी हे विधी आमच्या रद्दीवाल्या काकांकडून करवून घेईन म्हणतो. आणि सवाष्ण ब्राम्हणाऐवजी माझ्या चौथीतल्या गणिताच्या शिक्षकांना जेवू घालायचा विचार आहे. असं केलं तर चालेल का?
सावकाश उत्तर द्या.. घाई नाही काही.
हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.
हे व्रत 18 वर्षानी एकदा येते. ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते.
हे मला नीट कळलं नाही. अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. तेव्हा आषाढ अधिक मास असल्याची परिस्थिती दर ३६ वर्षांनी यायला हवी. आयुष्यात जास्तीत जास्त तीन वेळा वरूनदेखील १८ वर्षं पुरेशी नसावीत असं दिसतं. तेव्हा नक्की काय हे कोणी सांगेल का?
भटभिक्षुकांच्या बाबतीत इतक्या
भटभिक्षुकांच्या बाबतीत इतक्या तुच्छतेने बोलायची गरज नव्हती. (मी भट भिक्षुक नसुनही असे म्हणतोय)
जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्याून सुटून विशाऴगडाकडे निघाले (21 मैलाचे अंतर) तेव्हा घोडखिंड अडवून धरायला बाजीप्रभू देशपांडे (भट) नसले असते तर?
याच भटाच्या (बाळाजी विश्वनाथ) वंशावळीने शिवशाही चाळीस वर्ष पुढे चालवली. माधवराव पेशव्यानंतर प्रराक्रमी पेशवा नव्हता. (राघोबाबादादा होते पण ते पराक्रमी होते पण चंचल होते, त्यामुळे शेवटपर्यंत पेशवे झाले नाहीत.) तरी नाना फडणीसांनी काही काळ शिवशाही चालवली. पण इंग्रज प्रबळ झाल्यानुळे दुसरा बाजीराव पराक्रमी नसल्यामुळे हिंदवी स्वराज्य संपले ब
मर्दुमकी गाजवणारे काही लोक
मर्दुमकी गाजवणारे काही लोक भटांमध्ये होते तसे इंग्रजांमध्ये पण होते. पण म्हणून काही इतर इंग्रजांनी आपल्याला आठ टक्क्यांनी गंडवायचा प्रयत्न केला नाही असं नाही ना... तसंच, पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.
पण त्यांनी सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात आहे. येथे बाम्हणाला जेवायला घालणे म्हणजे मुंज झालेला मुंजा चालतो.
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक
पौरोहित्य करणारे लोक 'अमुक व्रत करा, तमुक व्रत करा' असं सांगत असतीलच ना. त्यांना त्यात फायदाच आहे की. प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला जेवायला घाला असं म्हटलेलंच असतं.
पण त्यांनी सांगितले तरी करणे न करणे आपल्या हातात आहे. येथे बाम्हणाला जेवायला घालणे म्हणजे मुंज झालेला मुलगा.
जाऊद्यात हो. इथे सीरियस कशाला
जाऊद्यात हो. इथे सीरियस कशाला व्हायचं? पण ब्राह्मणांचा पौरोहित्याचा धंदा हा पूर्णपणे त्यांनी सांगितलेल्या भाकडकथांवर लोक कितपत विश्वास ठेवून ती व्रतं करतात यावर होता. त्या प्रत्येक व्रतात ब्राह्मणाला अमुक भोजन द्या, तमुक दक्षिणा द्या वगैरे सांगून ठेवलेलं होतं. तुम्ही म्हणता तसे खरे तर सगळे लग्नाचे विधी, सत्यनारायण, गणपती-उत्सव वगैरेंमधले धार्मिक विधी काढून टाकले तर फार बरं होईल.
अवांतराबद्दल क्षमस्व.
फाल्गुन ते अश्विन अधिक होतात तर ९*३ = २७ वर्षांनी एकदा असायला पाहिजे. त्यासाठी अधिक महिने ओळीने यायला पाहिजेत असंही नाही. यादृच्छिक आले तरीही सरासरी २७ वर्षांनंतर तोच महिना पुन्हा अधिक येईल.
महिना कोणता हे कसा ठरवतात - ज्या नक्षत्रात चंद्र पौर्णिमेला असतो त्या नक्षत्रावरून महिना कोणता हे ठरवतात. चित्रा नक्षत्र - चैत्र महिना, विशाखा - वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ... अधिक महिन्याचं नक्की काय गणित ते माहीत नाही, पण ज्या दोन नक्षत्रांच्या मध्ये चंद्र असेल त्यावरून ठरवत असतील, असा अंदाज. त्यात कार्तिक, मार्गशीर्ष, माघ हे महिने का गाळले जातात याचं खगोलीय कारण चटकन समजत नाहीये. धार्मिक, रूढींचं कारण आहे का?
अवांतराबद्दल क्षमस्व.
घ्या, हे तुम्हाला माहिती
घ्या, हे तुम्हाला माहिती नाही? वॉट यु?
http://www.aisiakshare.com/node/1136#comment-15128
माझीही ऐकीव माहिती होती. गुगल करता वरचा दुवा मिळाला.
अजून एका ठिकाणी
सरासरी ३२ महीने १६ दिवसांनी हा अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन हे ७ महीने अधिक वेळा, तर फाल्गुन कधीतरी अधिक येऊ शकतो. पण पौष, माघ हे महीने कधीच अधिक येत नाहीत. ४ जानेवारीला सूर्य-पृथ्वी किमान अंतर असते. त्यामुळे या काळात सौरमास लहान असतो. त्यामुळे एका सौरमासात चांद्रमास पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या काळात येणारे पौष, माघ हे चांद्रमास अधिक येत नाहीत. ४ जुलै रोजी सूर्य-पृथ्वी अंतर कमाल असते. या काळात सौरमास मोठा असतो. त्यामुळे या काळात येणारे ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण, भाद्रपद हे जास्त वेळा अधिक येतात.
प्रत्येकाची अधिक माहिन्याची टर्न झाली की मगच पुन्हा तो महिना अधिक असही नसावं.
जर चांद्रमहिन्यात एकही
जर चांद्रमहिन्यात एकही संक्रांत नसेल तर तो महिना अधिक महिना म्हणून धरतात. जर दोन संक्रांती असतील तर त्या महिन्याचा लोप होतो (हे खूपच क्वचित होते). चांद्रमहिन्यात एकही संक्रांत नाही हे पॄथ्वी aphelion च्या जवळपास असतानाच होऊ शकते, (orbital angulr velocity कमी असल्याने), कार्तिक ते माघ पॄथ्वी perihelion च्या जवळपास असल्यामुळे त्या चांद्रमहिन्यात एकतरी संक्रांत होतेच.
हे पहा
सुमारे ३ वर्षांपूर्वी आनंद घारे ह्यांनी लिहिलेल्या 'अधिक मास' ह्या धाग्यावर अधिक मास ह्यावर बरीच चर्चा खगोलगणितीय अंगाने झाली होती.तेथे माझाहि प्रतिसाद होता. त्यामध्ये अधिकमासाचे गणित कसे असते आणि ते मास पावसाळ्यातच का येतात हे मला जमले तसे उलगडून दाखविले होते. तोच प्रतिसाद येथे पुनः चिकटवत आहे.
मन ह्यांच्या वरील प्रतिसादात लोकप्रभेच्या एका लेखाचा उल्लेख आहे. त्या लेखात पुढील वाक्य दिसले: "मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे महिने कायम ३० दिवस अगर काही तास जास्त कालावधीचे असतात म्हणून ते कधीच अधिक मास नसतात."
ह्याचा अर्थ मला समजला नाही. पूर्वी मी कोठेतरी वाचल्याप्रमाणे हिवाळ्याचे महिने अधिक न होण्याचे कारण केपलरचा दुसरा नियम, Equal areas are swept in equal time, हे आहे.

विकिपीडियामधून घेतलेल्या वरील आकृतीप्रमाणे जानेवारी ३ ला पृथ्वी आपल्या लंबवर्तुळाकृति कक्षेमध्ये सूर्यापासून सर्वात कमी अंतरावर असते आणि जुलै ३ ला सर्वात अधिक. केपलरच्या दुसर्या नियमानुसार जानेवारी ३ च्या पुढेमागे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गति सर्वात अधिक म्हणजे ३०.२९ किमी/से (१०९०४४ किमी/ता) असते कारण केपलरच्या नियमानुसार सारख्या वेळात सारखे क्षेत्रफळ राखण्यासाठी पृथ्वीला कक्षेचा अधिक लांबीचा चाप चालून जायचे असते. पृथ्वीची तीच गति त्याच कारणासाठी जुलै ३ च्या पुढेमागे २९.२९ किमी/से (१०५४४४ किमी/ता) इतकी असते. (पहा http://nssdc.gsfc.nasa.gov/planetary/factsheet/earthfact.html)
ह्याचा अर्थ असा की जानेवारी ३ च्या पुढेमागे पृथ्वीवरून सूर्याकडे पाहिले तर सूर्य अधिक वेगाने आणि कमी वेळात तारकामंडलाच्या पार्श्वभूमीवर हलतांना दिसेल आणि सरासरीपेक्षा कमी वेळात एक राशि पार करेल.
चन्द्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर ह्याचा परिणाम न झाल्यामुळे सूर्याच्या राशीत चन्द्राने प्रवेश केला आणि तदनंतर अमावास्या होऊन पुढचा चान्द्रमास प्रारंभ झाला तर त्याच सूर्यराशीत तो चान्द्रमास संपण्याची शक्यता कमी होईल किंवा संपूर्ण नष्ट होईल. ह्याचाच अर्थ अधिक मास सुरू होणार नाही.
ह्यामुळे असे म्हणता येते की ३ जानेवारीच्या पुढचेमागचे चान्द्रमास - हिवाळ्याचे चान्द्रमास - अधिक मास होऊ शकत नाहीत किंवा तशी शक्यता कमी असते आणि जसजशी पृथ्वी जुलै ३ कडे सरकू लागते तसतशी अधिक मासांची शक्यता वाढते.
>>
ते झालंच,
पण कोकिळ व्रतात नक्की करायचं काय असतं?