Skip to main content

.

.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 24/08/2015 - 23:34

In reply to by अंतराआनंद

बघा 'वेदों में विज्ञान' म्हणतात ते हेच. त्याकाळी पण आपल्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया होत असत.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 25/08/2015 - 07:30

In reply to by आदूबाळ

"ऐसी लागी लगन, मीरा हो गयी मगन"

ऐसीचा यात काहीही हात नाही असं एकदा पुन्हा किंचाळून घोषित करते.

गब्बर सिंग Tue, 25/08/2015 - 07:45

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असं एकदा पुन्हा किंचाळून घोषित करते.

म्हंजे "वो तो गली गली हरि गुनगुनाने लगी" तसे ??

.शुचि. Mon, 24/08/2015 - 23:41

शंकराचे वेदबाह्य वर्तन, स्मशानात राहणे, भुतांचा सहवास, नागांची भुषणे व अघोरी वागणे आवडत नसे.

चुकून विवाहबाह्य वाचले :(

अपरिमेय Tue, 25/08/2015 - 01:12

शंकर पुढे म्हणाले दहा हजार वर्ष झाल्यावर तुला हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी जन्म मिळेल आणि हरितालिका व्रताच्या प्रभावाने पुन्हा आपला विवाह होईल.

संपली का ती दहा हजार वर्षे?

बॅटमॅन Tue, 25/08/2015 - 11:45

In reply to by अपरिमेय

दहा हजार वर्षे कुणाची? माणसाची की देवाची?

"हजार वर्षे झाल्याशिवाय ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदानेही पुढे सरकत नाही".

-अंतू बर्वा.

नितिन थत्ते Tue, 25/08/2015 - 06:46

या व्रताच्या माहितीवरून आर्य पूर्वी युरोपात रहात असत हे सिद्ध होते.

लहानपणी मोरावळा बनवण्यासाठी आई आवळे किसायला देत असे तेव्हा हाताची बोटे आवळ्याचा राब बसून काळी पडत असे आठवते. हा राब बरेच दिवस जात नसे. या व्रतात अंगाला आवळ्याचा लेप लावण्यास सांगितले आहे. त्या अर्थी अंग काळे करून घेण्याची (टॅनिंग) गरज ज्या ठिकाणी वाटत असेल त्या प्रदेशातले हे व्रत असणार हे उघड आहे. अंग काळे करून घेण्याची गरज भारतापेक्षा युरोपात जास्त असणार. म्हणजेच हे व्रत करणार्‍या महिला युरोपात रहात असणार.

पु न्हा ठोक.

अंतराआनंद Tue, 25/08/2015 - 11:26

हेला, अधिक महीन्यात अधिक पगार देण्याचं व्रत कुठली कंपनी करते का हो? असेल तर सांगा प्लीज. आणि मग कोकीळव्रत केलं तर मिळेल का तिथे नोकरी?

हेमंत लाटकर Wed, 26/08/2015 - 09:08

In reply to by अंतराआनंद

हेला, अधिक महीन्यात अधिक पगार देण्याचं व्रत कुठली कंपनी करते का हो? असेल तर सांगा प्लीज. आणि मग कोकीळव्रत केलं तर मिळेल का तिथे नोकरी?

आहे ना! "सासुरवाडी अँड कंपनी". येथे नौकरी सहज मिळते. पण घरजाव्ई व्हावे लागते. हा! हा!

चिंतातुर जंतू Tue, 25/08/2015 - 14:15

Rely on Kokilaben

बद्धा माटा प्रतिसाद थई गया पण अद्याप किसी माय के लाल को माझी कशी आठवण होईना! अनिल-मुकेस, एन्ला बद्धु ठोसे लगाव जरा...
- कोकिलाबेन

नंदन Tue, 25/08/2015 - 15:59

जानराव कीट्स यांनी या ओळी 'Ode to a Nightingale'च्या सुरुवातीलाच का लिहिल्या, त्याचा आता उलगडा झाला!

My heart aches, and a drowsy numbness pains
My sense, as though of hemlock I had drunk,
Or emptied some dull opiate to the drains
One minute past, and Lethe-wards had sunk:

हेमंत लाटकर Tue, 25/08/2015 - 22:11

सगळे मेसेज वाचून एक विचार मनात आला. लग्नात सुद्धा एवढे विधी करायची गरज नाही. लाॅनवर 500-1000 लोकांना बोलावून 200 लाेकाचे अन्न वाया घालवणे. सासुरवाडी कडून हुंडा घेणे. हे सगळे बंद करून फक्त रजिस्टर लग्न करून मुलाकडचे 10 नुली कडचे 10 हाॅटेल मध्ये जायचे जेवण करून सगळे घरी यायचे. नवरा-बायको सध्याकाळी मधुचंद्रासाठी रवाना.

शहराजाद Tue, 25/08/2015 - 23:06

In reply to by हेमंत लाटकर

लग्नसमारंभाविषयीच्या आपल्या विचाराशी सहमत आहेच, पण हा विचार कोकिळाव्रतावरून कसा सुचला असावा हे उमगले नाही.

अस्वल Tue, 25/08/2015 - 23:12

In reply to by हेमंत लाटकर

मोठ्यांनी घरच्या समारंभात मिरवण्याची हौस जरा बाजूला ठेवून सगळा पैसा पोरांना मधुचंद्र व्रतासाठी द्यावा. हे सगळ्यात उत्तम.
वंशसातत्यासाठी एवढं करणं भाग आहे.

बिटकॉइनजी बाळा Wed, 26/08/2015 - 09:48

In reply to by अस्वल

अस्वला, वंशसातत्यासाठी मधुचंद्र नको. तो फ़क्त आपण मजेसाठीच पर्याय ठेवू. मात्र सर्व खर्च कोकीळव्रता साठी वापरू शकतो. कोकीळ तशीही कावळयाच्या घरटयात अंडी घालते. आपण सरोगेट मदर्सवर सगळा पैसा उधळू शकतो!

पिवळा डांबिस Thu, 27/08/2015 - 10:38

In reply to by हेमंत लाटकर

फक्त रजिस्टर लग्न करून मुलाकडचे 10 नुली कडचे 10 हाॅटेल मध्ये जायचे

"मुलीकडचे दहाच येणार,
नवरी मनातून कावणार!
संसाराची होळी बोंबलणार,
घटस्फोट होणार निश्चित!!!"
:)

तिरशिंगराव Fri, 25/09/2015 - 10:42

व्रतांबद्दलच चर्चा चालू आहे म्हणून विचारतो, पांढरा बुधवार, करतात, त्या व्रताबद्दल कुणाला माहिती आहे का ? त्याच्या उद्यापनाला म्हणे गोर्‍या बाईला पांढरी साडी देतात, असं ऐकलं! हा वर्णभेद नव्हे का ?