Skip to main content

फिरकी

23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला.
नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) .
तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.
8 मजल्यावर दुरूस्तीसाठी संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या होत्या,मात्र याची जाणीव कोणालाही न्हवती.
इथे ही हत्या की आत्महत्या हा प्रश्न पडतो.
पुढील तपासात आढळले की, नवव्या मजल्यावरच्या खोलीत एक वृद्ध माणूस व त्याची बायको राहते. त्यांच्या वैयक्तिक वादात तो नेहमीच बायकोच्या डोक्यावर बंदुक रोखायचा. पण त्या दिवशी चुकून झाडलेली गोळी बायको ऐवजी रोनाल्डला लागली .
बंदुकीत गोळी असल्याची जाणीव म्हातारा व म्हातारीला नव्हती . ते नेहमीच रिकाम्या बंदुकीने भांडत.
हा प्रकार त्यांच्या मुलाला चांगलाच माहीती होता . म्हातारी त्याला खर्च करायला कमी पैसे द्यायची , म्हणून तिला मारण्याच्या उद्देशाने त्याने म्हणजे मुलाने बंदुकीत १५ दिवसांपुर्वी गोळ्या भरल्या होत्या. परंतु स्वत: च्या आईची हत्येत मिळणारे सततचे अपयश त्याची निराशा वाढवत गेले.
आणि म्हणून त्या मुलाने म्हणजे रोनाल्डने दहा मजली इमारतीवरून उडी मारली.
संदर्भ : विकी.

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

1 minute

बॅटमॅन Thu, 27/08/2015 - 12:44

!!!!