Skip to main content

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)

(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे)

मागासलेली गरीब अनाडी जनता आपल्या समस्या सोडविण्यासाठी गावातल्या सयाना (मांत्रिक म्हणा, ओझा म्हणा ) कडे जाते. या सयानाचे सरळ देवा सोबत कॅनेक्शन असते. भूत, प्रेत, हडळ, चुड़ैल या सर्वाना काबूत ठेवण्यात तो समर्थ असतो. गावात किंवा पंचक्रोशीत काहीही वाईट घडले असेल, कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल किंवा कुणाचे नवजात मुल दगावले असेल. तर कुणाच्या करणी मुळे असे झाले हे सयाना बरोबर हुडकून काढतो. एकदा जादू टोना, करणी करणार्या हडळ / चुड़ैल कोण आहे हे कळले कि मग काय विचारावे. लोक त्या हडळीला पकडून आणतात, तिची गावातून धिंड काढली जाते, त्या स्त्रीला हाल हाल करून मारले जाते. कुणी हि त्या स्त्रीची बाजू ऐकून घेण्याच्या भानगडीत पडत नाही.

आता फेसबुक वर येऊ या. फेसबुक हा जागतिक महासागर आहे, त्याच्या पुढे सयानाला 'कुएं का मेंढकच' म्हणावे लागेल. फेसबुक वर येणारे लोक सुशिक्षित अतिविद्वान आणि विचारवंत असतात, असे समजले जाते. पण या फेसबुक वर कुणाला ही जगातून उठविण्यासाठी फ़क्त एक पोस्ट प्रकाशित करायची गरज आहे. एक फोटो टाकला की त्या व्यक्तीच्या अब्रूचे धिंडवडे सुशिक्षित लोक उडवू लागतील. सत्य शोधण्याचा किंवा दूसरी बाजू पहाण्याचा प्रयत्न कुणी ही करणार नाही.

दाः आत्ताच दिल्लीत घडलेली एक घटना. इथे फेसबुक वर पोस्ट टाकणारी आणि पोलिसात शिकायत करणारी एक तरुण, सुंदर स्त्री होती. आता शिकायत करणारी जर स्त्री त्यात हि तरुण स्त्री असेल तर तपास करायची काय गरज. पहिल्या २४ तासांत फेसबुक आणि मिडिया वर सर्वांनी त्या मुलाच्या अब्रूची लक्तरे उडविली. पोलीसने हि एकीकडे शिकायत दर्ज केली आणि दुसरीकडे पुरस्कार घोषित केला. पोलिसांना ही पुरस्कार देण्याच्या आधी घटनास्थली असलेल्या लोकांची विचारपूस करून सत्यता तपासायची गरज वाटली नाही. मग मुख्यमंत्री ही मागे का राहणार त्यानी पोलिसपेक्षा जास्त पुरस्कार घोषित करून टाकला. थोडक्यात फेसबुक, मिडिया, पोलीस आणि नेता सर्वांनीच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले.

हे सर्व पाहताना एकच विचार मनात आला एकीकडे सयाना आणि दुसरीकडे फेसबुक व मिडिया. माणसाला जगातून उठविण्याचे कार्य दोघेही व्यवस्थित बजावतात. एका पक्षाला दोषी ठरवून त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करतात. फरक एकच आहे सयाना वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आपण अडाणी, अंधविश्वासी इत्यादी म्हणतो. फेसबुक व मिडीयावर होणार्या चर्चांवर विश्वास करणार्याना काय म्हणावे .....

Node read time
2 minutes

ललित लेखनाचा प्रकार

2 minutes

.शुचि. Fri, 28/08/2015 - 01:49

मी तर फुले आणि कविता सोडून काहीही फॉरवर्ड करत नाही. ना ते गोग्गोड, भाबडे (=महामूर्ख?) विचार ना लापता मुलं ना काही सनसनाटी.

योगेश्वर Fri, 28/08/2015 - 05:40

या सगळ्यावर कडी करतो अर्णव गोस्वामी. टाईम्स नाऊच्या त्याच्या कार्यक्रमाला जलदगती न्यायालयाचा दर्जा देऊन त्याला त्याचे न्यायाधिश जाहीर करून टाकावं आता सरकारनं.पाकिस्तानच्या चॅनलवरचे अँकर सुद्धा चांगले असतात असे एक से एक नग आहेत.