Skip to main content

चारोळी: माणुसकीची भटकंती!

आजकाल माणुसकी भटकल्याने
दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे!
माणसांनी तिला सोडून दिल्याने
ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!

मेघना भुस्कुटे Fri, 28/08/2015 - 16:04

कुठे भटकतेय ही बया? आणि दुर्जनांना सापडलीय म्हणता ना? मग अनाथ कशी?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/08/2015 - 17:20

In reply to by मेघना भुस्कुटे

तू शाळेतल्या सुविचारांबद्दल असे प्रश्न विचारायचीस का? तेव्हा काय उत्तरं मिळायची?

मला ही चारोळी वाचल्यावर शाळेत गेल्यासारखं वाटलं. मी शाळेतच वर्गात, तासाला झोपायला सुरुवात केली.

मेघना भुस्कुटे Fri, 28/08/2015 - 17:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाळेत मी 'या कुन्देंदुतुषारहारधवला' म्हणत असे आणि कबड्डीही खेळत असे. गेले, गेले ते दिवस. सुविचार तेवढे उरले. :(

बॅटमॅन Fri, 28/08/2015 - 18:05

In reply to by मेघना भुस्कुटे

या कुन्देंदुतुषारहारधवला

मधील शेवटच्या शब्दांवर लै हसायचे लोकः "नि:शेष जाड्यापहा". त्यातला ड्या हा ड्ड्या असा उच्चारायचा असतो, मराठीतल्या जाड्या प्रमाणे नव्हे हे नंतर कळालं. कन्याशाळेच्या बाई ते माईकवरून ओरडून सांगताना अजून आठवतेय. (हो हो, बालवाडी ते चौथीपर्यंतची आमची प्राथमिक शाळा ही कन्याशाळेच्या आवारातच होती आणि वर्गातला सेक्स रेशोही नेहमीच्या उलटा होता- ६० च्या वर्गात १५ मुले आणि उरलेल्या मुली.)

मेघना भुस्कुटे Fri, 28/08/2015 - 18:11

In reply to by बॅटमॅन

राष्ट्रगीतानंतर लग्गेच 'या कुंदे' लागायचं / म्हणायचं अशी सवय होती. त्यामुळे अजुनी 'जयजयजयजयहे' म्हटल्यावर मी चुकून 'या कुंदे' म्हणीन की काय अशी मला कायम भीती वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/08/2015 - 23:46

In reply to by .शुचि.

तू हस माझ्या बालपणीच्या दुःखावर. पण मला फार पर्याय नव्हता. ती दुर्लक्ष करायची म्हटल्यावर फार पर्याय नव्हता ना.

पिवळा डांबिस Fri, 28/08/2015 - 23:25

In reply to by बॅटमॅन

मधील शेवटच्या शब्दांवर लै हसायचे लोकः

'शेवटच्या शब्दांवर' हसायचे लोक?
हां, तू कन्याबहुल शाळेत होतास नाही का? मग बरोबर आहे.
मग 'पहिल्या शब्दांचा' रिमेक तुला माहिती असायची शक्यता कमी!!!
;)

निमिष सोनार Fri, 28/08/2015 - 16:38

आजकाल माणुसकी भटकल्याने
दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे!
कारण
माणसांनी तिला सोडून दिल्याने
ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!