Skip to main content

तुझ्याचसाठी...

(ईथले मुळ लेखन उडविले असुन धागा मोकळा न राहावा यासाठी एक कविता टंकत आहे.)
.............................................................

आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलताना,
मागे वळून पाहताना,
पहाटेचा सडा
बाभळीच झाडं
उजाड माळरान
पाण्याचा माठ
भरलेला.
तिथेच असेन मी कुठेतरी,
तुझ्यासाठी हरवलेला...
.
.

भरत्या सागरास पाहताना,
आहोटिला चंद्र वाहताना,
चमचम मोती
अवखळ किनारा
भरली मासोळी
वादळी वारा
सुटलेला.
तिथेच असेल कुठेतरी मी
तुझ्याच प्रितीत रमलेला...
.
.

डोळ्यांत श्रुंगार भरताना,
सौभाग्याचं लेणं लेताना,
भरजरी शालू
सैरभर नजर
हिरवा चुडा
जरीचा पदर
फुललेला
तिथेच असेल कुठेतरी मी
नि:शब्द आणि गहिवरलेला...

.शुचि. Wed, 02/09/2015 - 01:05

कुछ जमी नही. मचाक वरती शोभेल.
ना मनोरंजन ना वैचारीक चालना ना माहीती - माझ्याकरता कोणताच हेतू साध्य झाला नाही.

.शुचि. Wed, 02/09/2015 - 01:14

In reply to by .शुचि.

अरेच्च्या कशाला काढलीत? इट्स ओके. Never ever apologize for what you did. Because that moment it was need of the moment.
It was TRUE for that moment.
मी देखील आत्ताच बुद्धीझम वरचा एक प्रतिसाद काढून टाकला का तर मला अवांतर वाटला.
____
माझी एक असाच धागाही अप्रकाशित केला. पण तो टीकेच्या भीतीने. बाकी it was need of the moment the same.
____
सो अर्थात मला जमत नाहीच आहे जो फुकटचा सल्ला मी तुम्हाला देतेय ;)
___
माझा हा कन्फर्मिटी वरचा धागा - http://misalpav.com/node/16604
माणसाला कळपात सामील केले जावे याची किती इच्छा असते. :)

.शुचि. Wed, 02/09/2015 - 01:28

In reply to by .शुचि.

अजुन एक तुम्ही जर लघुकथा/कविता जे काय होतं ते टाकण्याचं धाडस करणार असाल तर मी देखील माझे कोडे पुनर्प्रकाशित करेन. ;)
.
तुम्ही विचाराल का? मी इतकी का मागे लागले आहे. याची कारणे २ -
(१) मला जितकं व्हल्नरेबल वाटलं तितकं तुम्हाला वाटतय म्हणून तुम्ही हा धागा काढलात
(२) कन्फर्मिटी चा धागा मी परत वाचला आणि त्यातील "धाडस+ स्वातंत्र्य" मूल्ये किंवा त्यांची वानवा (The qualities OR the lack thereof) मला एकदम जाणवली.

.शुचि. Wed, 02/09/2015 - 01:41

In reply to by XYZ

:) पण मी माझा प्रकाशित करते कारण त्यावेळेला ती उर्मी (धागा निर्मीतीची) होती मे बी दुसर्‍या क्षणी मी चुटपुटले असेन, घाबरले असेन, टीकेच्या भीतीने काढला असेल. Let me be true to myself.

.शुचि. Thu, 03/09/2015 - 00:08

बरं झालं एक कविता टाकलीत ते. उगाच ते डीलीटेड आवडत नाही. स्वसंपादनाची सोय आहे म्हणून वाट्टेल तशी मुभा घेतल्यासारखे. तुम्ही घेतलीत असे म्हणायचे नाही.
.
कविता आवडली.

XYZ Thu, 03/09/2015 - 00:33

धन्यवाद शुचि.
एक बेसिक प्रश्न विचारतो.
तुम्हाला खालीलपैकी काय काय वाचायला/ लिहायला आवडेल.
१. साध्या सोप्या कविता/कथा
२.बोजड कविता/कथा
३.वैज्ञानिक कथा/ कादंबरी
४.बोजड ऐतिहासिक माहिती.
५.बोजड तांत्रिक व इतर माहिती
६. बोजड चर्चा.

का विचारले ते नंतर सांगतो.

XYZ Thu, 03/09/2015 - 00:46

In reply to by .शुचि.

विचारण्याचा उद्देश वेगळा आहे.
उत्तर पटले नाही.
तुमचे काही लेख मला व्यक्तिगत बोजड (म्हणजे सहजासहजी समजायला अवघड, किंवा अभ्यासु वगैरे) वाटले.
ईतरही पर्याय तुम्हाला आवडतच असतील.

(हे अवांतर होतय मान्य)

.शुचि. Thu, 03/09/2015 - 00:55

In reply to by XYZ

ह्म्म्म समजायला अवघड असतील कारण मांडता येत नसेल, पण माझे लेख अजिब्बात अभ्यासू नसतात. :( त्यामुळे इतर हुषार लोकांचे कौतुक वाटते ज्यांनी खूप वेळ वेचून, किंवा अतिशय पॅशनेटली लिहीले आहेत त्यांचे.
.
मला कविता जीवापाड आवडतात जव्हेरगंज जी. बाकी अलाहिदा. चर्चांमध्ये तर प्रचंड मानसिक थकवा येतो.

XYZ Thu, 03/09/2015 - 01:15

In reply to by .शुचि.

ओक्के.
चर्चा नेहमी बोजडच होतात. अजिबात वाचवत नाहीत. साहीत्य vs माहिती vs चर्चा यात साहित्य आघाडिवर असायला पाहिजे. माहिती त्या खालोखाल , व शेवटी चर्चा.
पण ईथे याच्या बरोबर उलट घडतय.
शेवटी साहित्य हिच बाय डिफॉल्ड सर्वांची एक नंबरची आवड असावी.
असो, ही माझी वैयक्तिक मतं.
तुम्हाला पकवल्याबद्दल क्षमस्व.