एकेकांच्या 'सकाळी'

ललित-
सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली.
नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले.
किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती.
ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती.
टक्क जागा झालो.

ग्राम्य-
रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं.
उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं.
मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.
जाउंदी तिच्यायला, बारक्या हाईच की.
कांभरून घीउन तसचं झुपलु.
तसं म्हातारं खेकसलं.
ताडदिशी ऊठलू.

वैताग-
अंग कसं ठणकत होत.
पाठीचा खुबा पण जडावला होता.
हि किरणं कशी काय आली आत.
साली सकाळ पण लवकरचं झालीय.
आता ही अंबाबाई डोकं खाणार.
ह्यो व्यायाम पण डोक्याला ताप आहे.
अॉफिसला दांडीच मारतो आज, पण साला तो खवीस बॉस. छ्या.
डोळे उघडावे काय आता.
ते टमरेल कुठे ......... असो.

बेवडा-
थगल कत दलदलदल.
क्वाल्टल दला द्यात्तत दाली.
ह्यंगलायला दाव लादनाल.
ही थतालाय का थंद्याखाल?
थाल पानी थमी थल्लं
"बिव्रे ... थिंब्वान "

पाशवी-
हा सुर्य अनन्वित अत्याचार करत आहे.
सृष्टीचा निर्माता असला म्हणुन काय झालं.
आमच्या साखरझोपेत व्यत्यय आणण्याचा अधिकार याला दिलाच कोणी"
आम्ही याचा निषेध करतो.
तु कितीही उगवलास तरी आम्ही झोपुन राहु.
ढाराढुर...

हामेरीकन-
सकाळी सकाळी फकिंग मॉर्निंग झालीय.
इट्स टू मच्.
डीजे-डिस्कोत फुल नाईट संपवली.
ती व्हाईट गर्ल , वॉव.
नाईटभर ओन्ली सिड्युस करत राहीली.
बड्वायजर, ओल्डमंक देऊन सगळी पर्स एम्प्टी केली.
गुडबायताना हातात केवळ बनाना ठेऊन गेली, शीट.
स्लिपींग पील्स आता घेतल्याच पाहिजेत.

'मटणा' चा हिरो-
फरशीवर गार झोपलो होतो.
पक्या सकाळीच कुठेतरी उलथला होता.
रात्रीचं मटण फक्कड होतं.
आळस देत फरशीवरच उलथा पालथा झालो.
कुठुनतरी भिरभिरत आलेलं एक लाटणं पेकाटातच बसलं.
धुम पळालो.

ग्रेसप्रेमी (क्षमा मागुन)-
बुबुळांच्या आरक्त प्रक्षोभनातुन,
मी हजारदा सांडलो असतो.
तप्तघनीचा हा ओंगाळला वृक्ष,
बांडगुळ पांघरुन घेतो.
हा सुर्य हांडगा आहे.
त्याच्या आवशीचा घो.
ऊठतोच एकदाचा.

भिडू-
ऐ...., आरं कुठं, एवढ्या वरती का गेलायस?
थांब तिथचं, नाहीतर बापुसाहेबांकडं खंप्लेंट करीन, आन ते ऊन सोडनं पहिलं बंद कर.
आरं तिच्या, हे काय तिर्थरूप फोक घेऊन हिकडचं यायलेत.
आये, आंघुळीला पाणी काढ.

राजकारणी-
हरहर...
सुर्यमहाराज काही खबरबात न देता उगवले.
कार्यकर्ते बंगल्याभोवती उच्छाद मांडून बसले होते.
जयघोषांचा तर पाऊसच पडत होता.
तेवढ्यात चँनलवरचा रिर्पोटर बराळला.
दुनियेचे कान टवकारले.
पक्ष्याला फक्त एकच शीट.
अवसानघातच की..
आता दिवसभर फुकाचे लोळणे आले.

हांडरवर्ल्ड-
वंटास सकाळ झालीय भिडू.
काल रात्री भिक्याला टपकावला.
भेजातच घोडा घातला.
भाईकडून दोन पेटी नक्की.
पण मागुन माझ्या टाळक्यात दांडा कोणी घातला हुता?
आणं हा हवालदार कसा हितं?
भेंडी मी डायरेक्ट तुरूंगातच हाय की.
साला पाच वर्षे बांबू.

चाळ-
शेजारील तिंबुनानाच्या लांबलचक खाकरण्याने झोप जरा चाळवली.
किंवा, समोरील आपटेबाई गाण्याचा रिवाज करत असणार.
दोन्ही आवाजात विशेष असा काही फरक जाणवत नाही.
हे असे अगम्य विचार डोक्यात असतानाच अर्धांगाचा 'सुमधूर' आवाज कानी आला.
"अहो, नळाला पाणी सुटलयं, तेवढे दोन हंडे घेऊन रांगेला लागा"
न उठुन काय करता?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त चौफेर विनोदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हामेरीकन सगळे असे नसतात बर्का Wink

हामेरीकन शुचि-

अरेरे झाला का गजर?
आई गं दुलई सोडवत नाही.
त्यात काल रात्री ऐसीवर लॉगिन झालेले
बोंब उठण्याची
ऊट ऊट नाहीतरी
ऑफिसात जाऊन ऐसीवरच जाणारेस ना? Wink
____

"ललित" हे कडवं एकदम आवडलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0