स्क्रिवेनरविषयी अनुभव/माहिती हवी आहे

स्क्रिवेनर सॉफ्टवेअर उबुन्टूवर कोणी वापरले आहे का? असल्यास अनुभव कसा आहे, प्रणालीच्या मर्यादा, येणार्‍या सर्वसाधारण/तांत्रिक अडचणी, व मराठीत (देवनागरी युनिकोड) लिहिण्यास येणार्‍या विशिष्ट अडचणींविषयी माहिती हवी आहे. संगणकक्षेत्राबाहेरील, गीक नसलेल्या, सामान्य उबुन्टू उपभोक्त्यास वापरता येण्याजोगे आहे का?

आगाऊ आभार.

field_vote: 
0
No votes yet

मी वापरलं आहे. मी गीक नाही, नूब आहे.

मी माझं डिसर्टेशन (इंग्रजीतून) लिहिण्यासाठी वापरलं. मला खूप आवडलं स्क्रिवेनर. मुक्तपणे बदाबदा लिहिण्यासाठी एकदम मस्त आहे.

उबंटू व्हर्जन अजून बीटा आहे. माझं वेळोवेळी क्रॅश होत असे. पण फायली ड्रॉपबॉक्समध्ये ठेवल्याने डेटा जात नसे. थोडाफार वैताग येत असे, पण तितकंच. स्क्रिवेनरचं अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप नाही हा अजून एक वैताग.

स्क्रिवेनरवर मराठी वापरून पाहिलेलं नाही. पण एका सहाध्यायिनीला जपानी वापरताना पाहिलं आहे. जर युनिकोड जपानी सपोर्ट होत असेल, तर युनिकोड देवनागरी व्हायला काहीच हरकत नाही.

उत्सुकतेपोटी: कादंबरी वगैरे लिहिणार आहात का? स्क्रिवेनरचा शोध तुम्हाला कसा लागला? उबंटूवर मराठी कसं टाईप करता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

आदूबाळ, माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.

बहुतेक लेखन सॉफ्टवेअरमध्ये थोड्या थोड्या वेळाने ऑटोसेव्ह फिचर असते, स्क्रिवेनरमध्येही असावे. त्यामुळे डेटा सुरक्षित राहील. मीही लेखन ड्रॉपबॉक्समध्ये सेव्ह करतो, तेव्हा ती चिंता नाही. अर्थात वारंवार क्रॅश झाल्यास वैताग येणे व विचारांची लिंक जाणे आलेच.

आज सकाळी लाईफहॅकेर साईटवर Write! नावाच्या एका नव्या लेखन सॉफ्टवेअरविषयी पोस्ट होती. (ती केवळ विन्डोजसाठी आहे). प्रतिसादांमध्ये स्क्रिवेनरविषयी काहींनी लिहिले होते. त्यांचा लिनक्स वर्झन आहे जो दीर्घकाळ बीटामध्येच आहे, पण अधूनमधून अपडेट केला जातो. त्यांच्या साईटवर त्याविषयी थोडे वाचले व इथे प्रश्न टाकला.

उबुन्टूवर मराठी टाईप करण्याविषयी:
४-५ वर्षांपूर्वी जालभ्रमंती करताना उबुन्टूशी संबंधित कुठल्यातरी संकेतस्थळावर baraha-maps नावाचे keymaps सापडले. ते SCIM व m17nबरोबर वापरता येतात. विन्डोजवर वापरता येणार्‍या Baraha प्रणालीसारखे लेआउट आहेत ते. त्यात हिन्दी, कन्नड, गुजराती इत्यादी कीमॅप आहेत, मराठी नाहीत. मी त्यातील हिन्दी कीमॅप वापरून मराठी टंकतो (ओके, अगदी कटाक्षाने म्हणायचे तर मराठी कीमॅप वेगळा हवा, पण मला तरी अडचण येत नाही.). त्यांच्या सूचना अशा आहेत (कॉपी-पेस्टेड):

1. You will need to have the scim, and scim-m17n packages installed.
2. Copy the file( s ) to /usr/share/m17n. Thus,
sudo cp *.mim /usr/share/m17n
for all keymaps, or
sudo cp hi-baraha.mim /usr/share/m17n
for just Hindi.
3. Restart SCIM, and the new keymap should show up as XX-baraha under
the section for the corresponding language, e.g., hi-baraha under
the Hindi section.

त्या वेळी iBus नव्हते, आता उबुन्टूत डिफॉल्ट iBus आहे. त्यात हे वापरता येते. scim, आणि scim-m17n मात्र आधी इन्स्टॉल करावे लागतात. मला गेली बरीच वर्षे ह्या फोनेटिक हिन्दी कीमॅपची एवढी सवय झाली आहे की इन्स्क्रिप्ट वापरूच शकत नाही. तुम्हाला वापरून पाहायचे असल्यास झिपड फाईल इथून उतरून घ्या.

नाही, मी कादंबरी लिहीत नाही आहे. परंतु मला अनुवाद करण्याची हौस आहे. ते करत असताना संदर्भ, संबंधित माहिती, दुवे वगैरे जमा करून हाताशी ठेवावे लागतात. ते लिब्र रायटरमध्ये करणे जमत नाही. डोक्यात ठेवलं की काहीतरी विसरतो. त्यावर उपाय म्हणून स्क्रिवेनरसारखं काहीतरी हवे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

धन्यवाद.

स्क्रिवेनरच्या फीचर्सची सवय व्हायला थोडा वेळ लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

पीसी व नेटबूक दोन्हीवर इन्स्टॉल करून वापरत आहे. लर्निंग कर्व्ह निश्चित आहे, पण ट्यूटोरियल, मॅन्यूअल, व यूट्यूबवरील व्हिडिओंनी बरीच मदत केली. लिनक्स वर्झनमध्ये काही त्रुटी व किरकोळ बग्ज आहेत. पण मी स्क्रिवेनरच्या प्रेमात पडलो आहे. दोन-चार पानांहून अधिक लांबीचे काही लिहावयाचे असेल तर हे अवश्य वापरावे असे माझे मत झाले आहे. फायदे - यादी बरीच लांब होईल. तोटे - लर्निंग कर्व्ह, लिहिण्याच्या जुन्या सवयी बदलाव्या लागतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

प्रतिसाद वाचून साॅफ्टवरबद्दल उत्सुकता चाळवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.