Skip to main content

मराठी सर्च इंजीन

तुमच्या पैकी कोणी Google वर मराठीतून सर्च करता का? तुमचे इंग्रजी सर्च च्या तुलनेत मराठी सर्च terms/विषय वेगळे असतात का? Relevant पाने सापडतात का नेहमी?

मला वाटतं लोकं काही शब्द वेगवेगळ्या प्रकारे (वेलांटी, अनुस्वार) देवनागरीत लिहीत असल्याने सर्चला अवघड जात असेल. मराठी वर्तमानपत्रातील लेख, ऐसी सारख्या वेबसाइट्स मधल्या चर्चा, वैयक्तिक ब्लॉग शोधायला सोपे जाण्यासाठी काय करता येइल. एक मार्ग म्हणजे लिखाणासोबत English Tags वापरणे. अजून काही..?

ऋषिकेश Fri, 16/10/2015 - 14:19

देवनागरीतून शोधायचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे मराठी ऐवजी हिंदीच लिंका अधिक मिळणे. मग मी 'आहे' वगैरे सारखी खास मराठी क्रियापदे सर्चमध्ये देतो मग फक्त मराठी लिंका येतात.
वेलांट्या व उकार यांचे र्‍हस्वदीर्घ योग्य लिहिल्यास अधिक लिंका मिळतात

अतिशहाणा Fri, 16/10/2015 - 15:59

हिंदी लिंका येतात पण अनेकदा हवे ते रिझल्ट्स मिळून जातात.

मेघना भुस्कुटे Fri, 16/10/2015 - 16:26

देवनागरीत सर्च करते. र्‍हस्वदीर्घाची निरनिराळी चूकबरोबर मिश्रणं करून पाहते. अनेकदा हवं ते मिळून जातं.
हिंदी गोष्टी येतात, पण सुरुवातीला नसतात. आधी मराठी, मग हिंदी लिंका येतात.

.शुचि. Fri, 16/10/2015 - 19:52

कवितांच्या साईटस शोधायला उपयोग होतो. एखाद्या साईटवरती एखादी छान कविता असते ती दुसर्‍या साइटवरती असतेच असे नाही पण दोन्हीत जर माझी सर्च असलेली कविता सामाइक असेल, तर अर्थात दोन्ही साईटस सापडतात.
.
बरेचदा सुंदर शब्द देते. उदा - मी जर भावगर्भ, अर्थवाही असा शब्द दिला तर पहा खालील मायबोलीचे पान मिळाले. केवढा सुंदर लेख सापडून गेला.
http://www.maayboli.com/node/7457
____
सन्जोप्रावांचा ब्लॉग मला आवडतो. त्यातील विशेषतः हे वाक्य मी क्वचित कोणाला व्यनि/खरडीतून कोट करते आणि हे माझे अत्यंत आवडीचे वाक्य आहे - विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते ‘सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही’ असे म्हणतात.
आता या वाक्यात २ शब्द नक्की आहेत - (१) विद्रोही (२) सतत
परंतु विद्रोही sanjopraav या सर्च वर ते वाक्य कधीच येत नाही.
याउलट
सतत ओरडून sanjopraav या सर्चवर ते सापडतं.
.
ते वाक्य मी बरेचदा सर्च केलेल आहे आणि गुगलचे हे लिमिटेशन काही माझ्या पल्ले पडले नाहीये.

चिंतातुर जंतू Fri, 16/10/2015 - 20:48

तुम्ही कशावर सर्च करताय त्यावर ते अवलंबून आहे. विशेषनामं, गाण्यांच्या किंवा कवितांच्या काही ओळी वगैरे गोष्टींवरचे सर्च बरे चालतात, एखाद्या विषयावर माहिती शोधत असाल, तर मात्र खात्री देता येत नाही - अनेकदा असंही होतं की त्या विषयावर मराठीत जालावर फार काही उपलब्धच नाही. उदा. 'मराठी लघुकथा समीक्षा' किंवा 'आशा काळे यांची आवडती गाणी' ;-)

-प्रणव- Fri, 16/10/2015 - 22:20

In reply to by चिंतातुर जंतू

हो, ती समस्या आहेच, तेवढं लिखाण नाही. आणखी एक म्हणजे काही बोलीभाषेत नसलेले शब्द वापरणे - उदा. "संस्थळ" , शोध घेणाराला (typo) असे अवघड शब्द माहीत नसण्याची शक्यता आहे.

रुची Fri, 16/10/2015 - 20:55

सर्च काही खास मराठी शब्दांसंदर्भात असेल वापरते आणि अनेकदा हमखास उपयुक्त दुवे सापडतात. मराठी खाद्यपदार्थांसाठीही (पाककृतीच असे नव्हे पण त्यासंदर्भात माहिती वगैरे) मराठी सर्च उपयुक्त ठरते असे लक्षात आले आहे.

अस्वल Fri, 16/10/2015 - 21:48

लिखाणाच्या शेवटी इंग्रजी टॅग्स वापरणे हा एक चांगला पर्याय आहे.
.
मराठी बहुतेक वेळा "मराठी" गोष्टींच्या संदर्भातच वापरतो.
उ.दा. एखादं पुस्तक किंवा कविता/गाणं लेखक शोधायला बरा पडतो - आठवणीतली गाणी हे एक उदाहरण.
पण मुदलातच मराठीत लिहिलंच गेलं नाहीये त्यामुळे दर वेळी मिळेलच असं नाही. आणि चित्रपटाबद्दल इंग्रजीतून खूप जास्त चर्चा झालेली असते त्यामुळे शेवटी तेच वाचतो.
मराठी पुस्तकं, त्यांचे रिव्ह्यू किंवा त्यावर चर्चा- हे मात्र मराठीतूनच असलं पाहिजे. मला तरी असं फार काही आढळलं नाही- कुणाला कल्पना आहे का अशा एखाद्या सायटीबद्दल?

मिहिर Sat, 17/10/2015 - 01:54

In reply to by अस्वल

मराठी पुस्तकं, त्यांचे रिव्ह्यू किंवा त्यावर चर्चा- हे मात्र मराठीतूनच असलं पाहिजे. मला तरी असं फार काही आढळलं नाही- कुणाला कल्पना आहे का अशा एखाद्या सायटीबद्दल?

पुस्तकविश्व.कॉम म्हणून एक साईट होती. मिसळपावचं धाकटं भावंड म्हणा वाटल्यास. सुरुवातीला चांगली चालली होती. नंतर नंतर बऱ्याचदा बंद पडायला लागली आणि चालू असताना फक्त 'वा सर! मोलाची माहिती दिलीत' उरले तिथे! ;)

Nile Fri, 16/10/2015 - 22:33

मराठी संस्थळांवरील चालत्या बोलत्या इनसायक्लोपेडियांना मेसेज करून विचारतो! ;-)

पिवळा डांबिस Fri, 16/10/2015 - 22:42

घरात मराठी आणि ऑफिसात इंग्रजी सर्च इंजिन वापरतो.
त्यांना अनुक्रमे बायको आणि सेक्रेटरी अशीही नांवे आहेत!!
;)
काय माहिती हवीये ते त्यांना सांगतो, त्या ती शोधून आणून देतात!!
देव त्यांचं भलं करो!!

धर्मराजमुटके Mon, 19/10/2015 - 19:38

मुळात प्रत्येक गोष्ट गुगलायलाच कशाला लागते हे गुगलोत्तर पिढिला विचारली पाहिजे एकदा. किंबहुना गुगलव्यतिरीक्त बाकी काही सर्च इंजिन आहेत काय हेही विचारले पाहिजे.
माझ्या पाहण्यातले काही नमुने :
उदा. १ : लॅपटॉपचे किंवा डेस्कटॉपचे ड्रायव्हर्स हवे असतात तेव्हा आजचे इंजिनिअर डायरेक्ट त्या त्या वेबसाईटवर न जाता (उदा. एचपी किंवा डेल वगैरे) गुगलमधे सर्च मारतात. मग तिथे तिच लिंक दिसते तिच्यावर जाऊन क्लिक करतात.

उदा २ : मला जीमेलवर किंवा याहूमेलवर जायचेय तरी बरेचसे नग गुगलच्या सर्च बारमधे ते टाईप करतात. मग तिथे दाखविलेल्या लिंकवर क्लिक करुन पुढे जातात.

उद्या मिसळपाव किंवा ऐसीअक्षरे संस्थळावर येणारा एखादा नग याचप्रकारे संकेतस्थळावर येत असेल तरी मला आश्चर्य वाटायचे नाही.

-प्रणव- Mon, 19/10/2015 - 20:10

In reply to by धर्मराजमुटके

हाहा खरंय! म्हणून मी मुद्दाम काही गोष्टी गुगल न करता मित्रांना विचारतो.

बादवे security च्या द्रुष्टीने URL टाईप करणे हानीकारक होऊ शकते.
https://en.m.wikipedia.org/wiki/Typosquatting

.शुचि. Mon, 19/10/2015 - 20:19

आदिंचे सुब्रह्मण्य भुजंगाष्टम वाचून कळले की शंकराच्या पाच मुखांची नावे - सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष व ईशान ही आहेत.
पैकी जर वामदेव, अघोर अशी सर्च दिली तर खालील डॉक्युमेन्ट मिळते.
.
एकंदर माझी हीच मोडस ऑपरंडी आहे.

https://books.google.com/books?id=yQrPTN0By1cC&pg=PT72&lpg=PT72&dq=%E0%…
____
अशा रीतीने मत्स्य आणि ब्रह्म पुराणं सापडली आहेत. गरुड पुराण अर्थासहीत शोधायचे आहे. कारण व्यक्ती मृत झाल्यावरती काहीतरी १३ दिवसांच्या आत नातेवाईकांनी गरुड पुराण वाचायचे असते. त्यात पारलौकिक जगतातील टप्पे वर्णिले आहेत. मला त्या पुराणाचे कुतूहल आहे.

माहितगारमराठी Mon, 19/10/2015 - 23:10

तुमच्या पैकी कोणी Google वर मराठीतून सर्च करता का? तुमचे इंग्रजी सर्च च्या तुलनेत मराठी सर्च terms/विषय वेगळे असतात का? Relevant पाने सापडतात का नेहमी?

१) मी एक्सटेन्सीव्हली गूगल मराठी भाषेतून सर्च करतो, (पण गूगल सर्च इंजिन चा मेनु कधी मराठी इंग्रजी आलटून पालटून चालू असते) मराठी टंकण्यासाठी गुगलची इनपुट मेथड आहे तीही सर्चण्याच्या दृष्टीने मला येते पण मी स्वतः कमी वापरतो.

२) हिंदी किंवा इंग्रजी शब्दांशी केव्हा सरमिसळ होणार याचा अंदाजा सवयीने बराच येतो सरमिसळ होण्यासारखी स्थिती असेल तर 'आहे' किंवा 'म्हणजे' हे शब्द जोडून शोध घेतो. पहील्या पानात अपेक्षीत शोध नाही मिळालातर पाच पाने जवळपास नित्याने शोधतो, तेवढ्यात नाही जमले तर दहाव्या पानावरून मागे प्रवास करतो, पहिल्या दहापानांपलिकडे शोध घ्यायचा झाल्यास (अशी उपलब्धता मराठी सर्च टर्मसाठी क्वचितच असते) दहाव्या पानानंतर अल्टरनेट पाने शोधत पुढे जातो.

३) माझे बरेच सर्च मराठी शब्दावर राइट क्लिक करून मग सर्च गूगलने केले जातात; या प्रकारात सोबत 'आहे' हा शब्द न जोडल्यास पुर्वी केवळ हिंदी शोध नको असताना कडमडत असत पण गेल्या चार सहा महिन्यापासून गूगल महाशयांनी मराठी शब्द शोधास अ‍ॅटोमॅटीक इंग्रजी ट्रांसलिटरेशनची सोय जोडली असावी असे शोध नंतर आले तर हरकत नव्हती पण आपण नेमके मराठी शोध शोधत असताना इंग्रजी शोध अगदी पहिली पाच-दहा शोध पाने भरवताहेत आणि मराठी शोध खूपच मागे जात असावेत असे वाटते. न मागताच इंग्रजी शोध जोडणे हा गूगलचा नवा अवतार अगदी वैतागपूर्ण आहे. कुणी गूगलच्या या नव्या मर्यादेचा लाभ घेऊन केवळ हिंदी अथवा केवळ मराठी शोध देणारे शोध यंत्र तयार केल्यास मी बर्‍यापैकी वापरेन.