येत्या पंचवार्षिक योजनेतील रस्तेबांधणी

लवकरच भारताची पुढची पंचवार्षिक योजना जाहीर होईल. (२०१२-२०१७) . या पंचवार्षिक योजनेमधील अनेक मुद्दे हळुहळू जाहीर होत आहेत. अलिकडे वाचलेल्या एका बातमीनुसार, येत्या पंचवार्षिक योजनेत १ ट्रिलियन डॉलर्स (१००० दशकोटी डॉलर्स) रस्तेबांधणीच्या कामात खर्च होणार असे दिसते. (दुवा : http://www.ibef.org/download/Updates_150710.pdf ).

या आणि अशा बातम्यांमधून काही प्रश्न निर्माण होतात.

गेल्या पंचवार्षिक योजनेच्यापेक्षा ही रक्कम दुप्पट आहे. (गेल्या योजनेमधे ५०० बिलियन डॉलर्स योजलेले होते. ) १ ट्रिलियन डॉलर्स ही रक्कम प्रचंड मोठी आहे यात काहीही शंका नाही. मात्र ती या आपल्या खंड्प्राय देशाच्या रस्त्यांच्या रचनेकरता पुरेशी आहे का ? गेल्या पंचवार्षिक योजनेत या संदर्भात झालेला खर्च आणि एकंदर रस्त्यांची अवस्था यांचा ताळमेळ घातलेला कुठे पहायला मिळेल ?

या संदर्भात काही वर्षांपूर्वी एनाराय लोकांकरता बाँड वितरित करावेत अशी बातमी होती. परंतु केंद्रीय अर्थखात्याने त्याला नकारघंटा वाजवली होती. ( दुवा : http://articles.economictimes.indiatimes.com/2010-07-15/news/28484437_1_... ) १ ट्रिलियन घोषित केले तरी इतके पैसे खरोखरीच मिळवताना नाकी नऊच येणार आहेत. तर निदान या पूर्वीच्याच सुचवणीचा विचार करायला हरकत नसावी.

तुम्हाला काय वाटते ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मी स्वतःही आळशीपणे याची उत्तरं शोधलेली नाहीत. जमेल तसं पहाते. पण तोपर्यंत प्रश्नः

१. एक एकक रस्ता, उदा. दोन लेनचा एक मीटर लांबीचा रस्ता बांधताना काय खर्च येतो?
२. असा रस्ता किती काळ टिकण्याची अपेक्षा असते?
३. भारतात किती लांबीचे रस्ते सध्या आहेत?
४. ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणखी एक-दोन प्रश्न...
४. भारतातील रस्तेबांधणीसाठी येणारा खर्च भारतीय पंचवार्षिक योजनेमध्ये दाखवतांना तो डॉलर्समध्ये का दाखवलाय? रुपयांत का नाही?
५. ज्या गांवांना जायला अजिबात रस्ता नाही तिथे रस्ते बांधणं जास्त महत्वाचं की गोल्डन क्वाड्रिलॅटरल्स बांधणं जास्त महत्वाचं?
६. रस्ते बांधण्यासाठी कॉन्ट्रॅक्टस घेणार्‍या कंत्राटदाराकडून त्या रस्त्याच्या ठराविक वर्षे टिकण्याबाबतीत गॅरंटी लिहून घ्यावी काय?
७. "नवर्‍याचं हृदय जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो" या वचनातला रस्ता बांधण्यास अंदाजे किती खर्च येईल?
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. एक एकक रस्ता, उदा. दोन लेनचा एक मीटर लांबीचा रस्ता बांधताना काय खर्च येतो?
२. असा रस्ता किती काळ टिकण्याची अपेक्षा असते?
३. भारतात किती लांबीचे रस्ते सध्या आहेत?
४. ....

उ.
१. टू मेनी व्हेरीएबल्स. कच्च्याचा पक्का करायचा आहे की डांबरीकरण करायचं आहे की जमीन विकत घेऊन नविन रस्ता बनवायचा आहे. जमीनीवर रस्ता आहे, नदीवरुन आहे, दरीवरुन आहे, की घाट आहे, गावा बाहेरून आहे, भर वस्तीतून आहे.. वगैरे वगैरे.

२. परत मेनी व्हेरीएबल्स. भारताच्या कोणत्या भागात आहे. उन्हाळा किती कडक आहे (डांबर वितळेल का?), पाऊस किती आहे? रहदारी कीती आहे, सायकल वाले जास्त आहेत की डंपर जाणारेत? गावातला रस्ता असेल तर टेलिफोनवाले, इलेक्ट्रीसिटीवाले, गटारवाले कितीवेळा खोदायची शक्यता आहे? वगैरे वगैरे.

३. माहित नाही. पण ह्या आकड्याने काय होईल?

४. ग्लोबलाईझेशनचा जमाना आहे!

५. गोल्डन रस्ते. उगाच का त्यांना गोल्डन म्हणतात? पण अर्थातच देशाच्या दृष्टीने महत्त्वाची शहरं जोडणारे रस्ते बांधणं जास्त महत्त्वाचं. भावनेचा प्रश्न वेगळा.

६. जरूर घ्यावी, बाँड पेपर वर घ्यावी. Wink

७. नवर्‍याला चूलीवरचं आवडत असेल तर पीठ, लाकूड, भाजलेल्या हातांच्या उपचाराचा आणि त्यामुळे लावलेल्या जेवणाच्या डब्याचा खर्च पकडून पाच-सात हजार प्रति वर्ष. सरकारी कंत्राटदारांप्रमाणे पॅचवर्क करून वर्षाची पाच वर्षही करता येतात! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण दिलेल्या दुव्यात इन्फ्रास्ट्रक्चर असा शब्दप्रयोग आहे. त्याचे रस्तेबांधणी असे भाषांतर योग्य वाटत नाही. पायाभूत सुविधा असे म्हणता येईल. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, इमारती, वीज, असे अनेक प्रकार पायाभूत सुविधांमध्ये मोडतात.

ही रक्कम कमी की अधिक, पुरेशी की अपुरे असा प्रश्न असेल, तर माझ्या मते घ्याल तेवढी रक्कम कमीच आहे. प्रश्न आहे, येत्या पाच वर्षांमध्ये ही रक्कम खर्च करण्याची आपली क्षमता आहे काय? माझ्या मते, त्या दृष्टीने विचार करता ही रक्कम खूप जास्त आहे. खर्च होणार नाही. म्हणजे, होईलही, पण पाच वर्षांमध्ये गेल्या योजनेच्या दुप्पट रक्कम खर्च करणे हे जबरदस्त मोठे आव्हान आहे. यंत्रणा आहे तेवढीच आहे. पीपीपी करुन करुन किती करणार. आणि हा पैसा विविध राज्य सरकारांना वाटला जाणार, तिथून पुन्हा जिल्ह्यांना वाटला जाणार. काही मोजके मोठे प्रकल्प केन्द्र सरकार आपल्या अखत्यारीत करायला घेणार. त्यात सगळ्या प्रोसीजर सांभाळत हे अवाढव्य प्रकल्प पाच वर्षांत पार पाडायचे. आणि जे प्रकल्प अवाढव्य नाहीत, ते विखरुन देशभर वाटायचे, आणि त्याचा पाठपुरावा करायचा. अवघड आहे.

बाय द वे, इथे आपल्या सूचना नियोजन आयोगाला पाठवण्याची सोय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरा, फारच उपयुक्त दुवा दिलात. अनेक आभार.
तुम्ही दिलेल्या दुव्यावरून इथे गेलो. इथे सभासदत्त्व घेत्ले की सरकार अनेक विषयांवर चर्चासत्रे उघडली आहेत. त्यात भाग घेता येतो व आपले मत देता येत.

सर्व ऐसीअक्षरेवच्या सभासदांनी तिथे आपापले मत द्यावे असे सुचवतो.

---
सरकारने अनेक 'नेमके' प्रश्न चर्चेला घेतले आहेत. यातील एकेका विषयावर ऐसीअक्षरेवर देखील सर्वंकश चर्चा करता येतील असे वाटते. मी वेगवेगळ्या धाग्यात अशी चर्चा सुरु करतो आहे. (जमल्यास इतरांनीही सुरू कराव्यात)
या धाग्यावर 'इन्फ्रास्ट्रक्चर' संबंधित प्रश्नांवर चर्चा करता येईलच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपण दिलेल्या दुव्यात इन्फ्रास्ट्रक्चर असा शब्दप्रयोग आहे. त्याचे रस्तेबांधणी असे भाषांतर योग्य वाटत नाही.

हेच लिहायला आलो होतो. मात्र आरांचा 'एवढा खर्च पाच वर्षांत कसा करणार?' हा प्रश्न मला सुचला नव्हता. (हा थोडासा 'लाखाची गोष्ट' मधल्यासारखा प्रश्न वाटतो.) मला 'एवढे पैसे उभे कुठून करणार?' असा प्रश्न पडला होता. कारण सध्या जीडीपी १.७ ट्रिलियन आहे. पुढच्या पाच वर्षांत दहा टक्के वाढ वगैरे धरूनही सगळे मिळून अदमासे १० ट्रिलियन होतील. त्यातले सरकारला मिळणार ३ ट्रिलियन. मग इतर सगळे खर्च सांभाळून १ ट्रिलियन पायाभूत सुविधांसाठी खर्च करता येतील का?

कदाचित पीपीपी मधून रहातील उभे. पण जगाचंच जीडीपी ७० ट्रिलियन असताना सगळ्यांचेच सगळे खर्च भागवून भारतातल्या गुंतवणुकीसाठी तेवढे मिळतील का? त्यात एवढा फायदा आहे का? हे गणित नक्की कळलेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंचवार्षिक योजना या नियोजन पद्धतीला किती महत्त्व राहिलं आहे हा एक प्रश्न आहे.
आरा म्हणतात त्या दृष्टीनं या एक ट्रिलियन डॉलरचा विचार करावा लागेल. हा एक ट्रिलियन डॉलरचा खर्च म्हणजे वास्तवात असेट क्रिएशन आहे. ती क्षमता आपल्याकडे नाही. बाकी योजना म्हणून 'कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे पश्चिमेकडे' चालू राहील.
मुसु, बरे आहात ना? मला आधी वाटलं साहित्यात रस्तेबांधणी वगैरे नवा काही सिद्धांत आला की काय! Wink हा माझा स्टिरिओटाईप आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0