संघाची नव्वद वर्षे व अजूनही असलेली आव्हाने

संघाची नव्वद वर्षे व अजूनही असलेली आव्हाने
.
.

इतर संघटना फुटल्या व गेल्या नव्वद वर्षात संघात फुट पडली नाही अशा आशयाचे श्री. रमेश पतंगे यांचे लिखाण पाहण्यात आले. तसे पाहिले तर हे कौतुक करून घेण्याचे कारण आहेच, पण त्यावर् समाधान मानायचे का हा मोठा प्रश्न आहे. कारण नव्वद वर्षे जाऊ दे, स्वातंत्र्यानंतरच्या काळात तरी ही संघटना जेवढी वाढायला हवी होती, तसे झालेले दिसते का, याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.

अजूनही संघ पाकिस्तान, अफगाणिस्तानसह अखंड भारत अशा कल्पनांमध्ये अडकून पडलेला आहे. थोडा फरक दिसतो, तो म्हणजे अखंड भारताऐवजी या भुप्रदेशांचे कमीत कमी सहकार्याच्या दृष्टीने एकत्रीकरण तरी व्हावे असा मतप्रवाह दिसू लागला आहे. पण हे फारच क्वचित ऐकू येते.

भारतातील सा-या समाजांचे प्रतिनिधित्व संघ करतो असे चित्र दिसते का? उलट जातीनिहाय संघटना वाढताहेत. दलित व अनेक ओबीसी संघटना तर संघाला त्यांचे शत्रू मानतात, एवढी मोठी विश्वासाची दरी त्यांच्यामध्ये आहे. जातपंचायती, खाप पंचायती यांना वेसण घातली जात असल्याचे दिसत नाही.

गुरूजींची व संघसंस्थापकांची काही मते आजच्या संदर्भात लागू होणार नाहीत. दलित किंवा हिंदूविरोधक मनुस्मृतीतील अन्यायी संदर्भ जसे उठसुट काढून फडकावताना दिसतात, तसेच गुरूजींच्या काही मतांबद्दलही केले जाते. संघ त्याबद्दल कधीही जाहीर प्रतिवाद करताना दिसत नाही. कधी फारच लावून धरले, तर अमुक वर्षांपूर्वी अमुक सरसंघचालक होते तेव्हा त्यांनी अमुक विधान केले होते याचा पुरावा दिला जातो. अर्थात या गोष्टींवरून पसरलेले गैरसमज दूर होण्यासाठी याबाबतचा प्रचार सातत्याने समाजापुढे यायला हवा. ते होत नसल्यामुळे संघावर एकतर्फी टीका होत राहते व विरोधकांना आपोआपच कोलित मिळते. कोणी प्रतिवाद करताना दिसलेच, तर तोही आडवळणाने केला जातो, किंवा तो अनेकदा इतका लंगडा असतो की कोणाचाही त्यावर विश्वास बसू नये. त्यांची काही मते सद्यपरिस्थितीत लागू होत नाहीत हे मान्य करण्याचे धैर्य कोणाकडेही दिसत नाही. पूर्वसरसंघचालकांची सारीच मते आताच्या संघाच्या सा-याच मोठ्या नेत्यांना मान्य असतील असेही नाही, पण शिस्तीच्या नावाखाली ते उघडपणे बोलण्याचे धैर्य त्यांच्यात नाही हे निश्चित. या दुष्टचक्रामधून बाहेर पडून समाजातील सा-या घटकांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये त्यामुळे खिळ बसते व दुर्दैवाने अशा मूलभूत मुद्द्यांबाबत संघनेतृत्व काही करताना दिसत नाही.

शिवाय तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अनेक संघटना आहेत, त्या अनेक तोंडांनी बोलत असतात. अनेकदा देशाच्या घटनेच्याविरोधी वक्तव्ये केली जातात. संघ त्यांना गप्प बसवताना दिसत नाही, त्यामुळे आधीच असलेले संशयाचे वातावरण अजिबात कमी होण्यास मदत होत नाही. केवळ हिंदुत्व-हिंदुत्व म्हणजे त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे हे त्यामुळे लोकांना कळत नाही, उलट त्यांच्या अनेकदा गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमुळे चुकीचा संदेश लोकांपुढे जातो. अशा परिस्थितीत सारा हिंदू समाज तर सोडाच, पण बहुतांश हिंदू समाज तरी संघाबरोबर जाईल याची अपेक्षा कशी करत येईल?

जातपात नष्ट करण्यासाठी कोणतेही भरीव प्रयत्न केले जात नाहीत. सामाजिक समरसता अशे लोभस नाव दिले व मधूनमधून त्याचा उद्घोष केला म्हणजे समाजातील सा-या घटकांना विश्वासात घेतले जाते अशा समजात राहून चालणार नाही. प्रत्यक्ष कृती दिसायला हवी. आता समविचारी सरकारच केंद्रामध्ये असताना याबाबतीत भलेही काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले तरी ते घेण्याची हिम्मत का कोण जाणे पण दिसत नाही.

संघाचे सदस्य नसलेले; मात्र संघाबद्दल आत्मियता असलेले अनेक जण समाजात आहेत, पण अनेक वेळा घेतल्या जाणा-या विसंगत भुमिकेमुळे संघाला पाठिंबा देण्याचे त्यांचे धाडस होताना दिसत नाही.

संघामध्ये पारदर्शकपणा अजिबात नाही. सारे निर्णय नेहमीच वरून खाली येताना दिसतात. त्यात कार्यकर्त्यांची मते, सहानुभूतीदारांची मते लक्षात घेतली जाताना दिसत नाहीत. एवढेच काय, संघाला विरोध करणा-यांची मतेही संघटनेत सकारात्मक बदल घडवून आणताना दिसत नाहीत, उलट अशा मतांविरूद्ध संघटनेत धृवीकरण होताना दिसते. त्यामुळे आपल्या मतांचे अवलोकन होणे हे तर सद्यस्थितीत अशक्यच.

आज भाजपचे सरकार आहे, त्यामुळे संघाचा उच्चार आधी कधी नव्हता एवढा ऐकू येत आहे. ही सत्ता पुढच्या निवडणुकांच्यावेळीही आणणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. काहीही कारणाने पुढच्या निवडणुकांमध्ये हे शक्य झाले नाही, तर संघाचा विस्तार पुन्हा एकदा मंदावेल.

संघामध्ये लोकशाही आली की पारदर्शकपणा आपोआप येईलच. पारदर्शकतेमुळे लाथाळ्या सुरू होतील, वेगवेगळे मतप्रवाह उघड होतील, या भितीपोटी ती नकोच हे म्हणणे योग्य नाही. कारण त्यातूनच विश्वासार्हता वाढेल आणि सामाजिक पाया विस्तारता येईल. भारतीय विचारांच्या दलित व विविध समाजातील नेत्यांना संघटनेत मानाचे स्थान द्यावे लागेल. भलेही त्यासाठी त्यांना संघटनेबाहेरून आणावे लागले तरी. ते करायचे झाले की आधी त्यांच्या अतिशय अवघड प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील, त्याची तयारी ठेवावी लागेल. दिसते का हे करण्याची कोणाची तयारी?

प्राचीन संस्कृतीचा आदर मनात ठेवतानाच पुराणातली विमाने, गणपतीचा ब्रेन/हेड ट्रान्सप्लॅंट, वगैरे गोष्टी पुराणातच ठेवावी लागतील. कोणत्याही भंपक गोष्टींना विज्ञानाचा मुलामा चढवून त्या लोकांच्या गळी उतरवण्याचा जो प्रयत्न केला जाताना दिसतो, तो कोणालाच कसा दिसत नाही? वाटते का की आताच्या संघाच्या नेत्यांची तयारी असेल या गोष्टीला?

राजीव दीक्षित यांनी स्वदेशीचा पुरस्कार करताना विदेशी ते सगळेच वाईट असा जो एकतर्फी दुष्प्रचार केला त्याचे तर फार चुकीचे परिणाम झालेले आहेत. किती तरी वेळा ते धादांत खोटे बोलत असत. असा एकतर्फी व चुकीचा प्रचार लोकांच्या कधीच लक्षात येणार नाही व आल्यावर त्याचा उलटा परिणाम होईल अशी शंकादेखील संबंधितांच्या मनात आला नाही का? ते सगळ्याच मुद्द्यांवर तेवढ्याच अधिकारवाणीने कसे बोलू शकतील, त्यामुळे त्यांचे हसू होणार नाही का असेही इतकी वर्षे कोणाला वाटले नाही का? दीक्षित यांची काही भाषणे आता ऐकली तर विनोदी वाटावीत एवढी ती एकांगी आहेत.

समाजातील अंधश्रद्धा दूर झाल्याशिवाय या समाजाचे व पर्यायाने देशाचे भले होणे केवळ अशक्य. संघाची ताकद पाहता त्यांना हिंदू धर्मातीलच काय, पण इतर धर्मातील अंधश्रद्धांना हात घालणे शक्य व्हावे. पण मुळात या स्फोटक गोष्टींना हात घालण्याची हिम्मत तरी हवी ना! कारण राजकारणीदेखील मतांकडे लक्ष ठेवून अंधश्रद्धांना हात घालायची हिंमत कधीच करत नाहीत. संघालाही समाजात असलेले मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून समाजात काहीच न्यून नाही य भ्रमात पुढे जायचे आहे का? इतक्या दशकांमध्ये सत्ता नसताना संघाने यावर काम केले असते तर व्होटबॅंक, जातीच्या आधारावरील राजकारण हे सारेच एव्हाना नामशेष झाले असते. पण आता काय दिसते आहे, भाजपदेखील तशाच राजकारणात गुरफटलेला आहे. तर मग ही परिस्थिती बदलणार कधी?

वर म्हटल्याप्रमाणे हिंदू धर्मियांमध्येच संघाला स्वत:बद्दल विश्वास निर्माण करता येत नाही, तेव्हा हिंदुत्वावादी भुमिकेमुळे इतर धर्मियांमध्ये अविश्वासाची भावला असणे तर अगदीच नैसर्गिक. उठसुट काही झाले की पाकिस्तानात जा अशा वक्तव्यांमुळे याबाबतीत देशाचे काय भले होणार आहे? इतकी वर्षे कॉंग्रेसप्रणित भंपक सर्वधर्मसमभावामुळे इतर धर्मीयलोकांचे केवळ तुष्टीकरण झाले असे म्हणत असताना त्या धर्मातील कडव्या लोकांना बाजुला सारून तरूणांना, महिलांना साद घालण्याची त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची संघाची तयारी दिसते का? तसा प्रयत्न दिसतो का? अन्यथा शिवसेनेसारख्या गुंडांच्या संघटनेप्रमाणे; ज्यांना हिंदुत्व म्हणजे काय हेच माहित नाही, केवळ भगवा टिळा लावून आणि भगवा झेंडा हातात घेऊन इतरधर्मियांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करत, सामाजिक सौहार्दासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी महाआरतीसारखे पराक्रम करून दोन्ही धर्मियांच्या भावना भडकावणे हीच संघाचीही हिंदुत्वाची कल्पना आहे असे संघाबाहेरील हिंदूंनी व इतर धर्मियांनी समजायचे का?

संघामध्ये राष्ट्रसेविकादल ही स्त्रियांसाठी स्वतंत्र आघाडी आहे. २१व्या शतकातही अशी वेगळी आघाडी ठेवण्याचे कारण काय? कोणी स्त्री सरसंघचाललपदापर्यंत जाऊ शकेल अशी परिस्थिती आहे काय? की फक्त पुरूषच देशाच्या भल्याचा विचार करू शकतात असे संघाला वाटते? आज अभाविपसारख्या संघटनांमध्ये अनेक युवती पुढे आलेल्य दिसतात, पण मी म्हटले तसे पुरूष व स्त्रियांसाठी वेगळ्या रांगा ही मानसिकता बदलून स्त्रियांना संघाच्या मुख्य विचारधारेत स्थान द्यायला हवे.

मुख्य म्हणजे संघाबद्दल ज्यांना गंभीर आक्षेप आहेत, त्यांना थेट भिडण्याची तयारी संघाने ठेवली पाहिजे. हे आक्षेप संघ ब्राह्मणबहुल आहे, इतर धर्मियांच्यादृष्टीने संघ हा एक मोठा धोका आहे, संघ बुरसटलेल्या विचारांचा आहे, गांधीहत्येत सहभाग असण्यापासून संघाचा हिंसेच्या मार्गावर विश्वास आहे व कोणतेही प्रागतिक विचार पुढे येऊ देण्यास संघ विरोध करतो, संघाचे अनेक छुपे अजंडे आहेत असे अनेक स्वरूपाचे आहेत. जोपर्यंत संघावरची टीका जितक्या तोंडांनी होते त्याला पुरसे होईल इतके प्रभावी उत्तर देन्यात संघाची यंत्रणा कमी पडते हे वास्तव आहे. त्यामुळे संघ हे राजकारण्यांचे उठसुट धोपटण्याचे साधन बनलेले आहे.

तेव्हा जोपर्यंत संघाकडे आधुनिक विचारांचे नेतृत्व येत नाही आणि बुरसटलेल्या विचारांची खोडे बदलली जात नाहीत, तोपर्यंत संघाची खरी व मोठी वाढ होणे अशक्य! त्यामुळे नव्वद वर्षांनंतर संघ अस्तित्वात आहे याबद्दल कोणाला अभिमान वाटत असेल, तर तो केवळ संघटना टिकण्यापुरताच आहे असे खेदाने म्हणावे वाटते. केंद्रात समविचारी सरकार असल्यामुळे कधी नव्हे ते संघटनावाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे, पण एकूणच विविध आघाड्यांवरील आपल्या भुमिकांचे पुनरावलोकन करण्याची इच्छा नसल्यामुळे फार बदल होताना दिसतील असे वाटत नाही.

काही महिन्यापूर्वी सरसंघचालकांनी हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी नाहीशा करण्याबद्दलचे विधान केले होते. केवढे आशादायी वक्तव्य होते ते! त्या विधानाचे मी स्वागत केले होते. मात्र यावेळच्या दस-याच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भाषणामध्ये याचा वा वर उल्लेख केलेल्या काळजीच्या विविध मुद्द्यांवर विशेष भर दिसला नाही, त्यामुळे त्यांच्याकडून ही मोठी संधी गमावल्यासारखे वाटले.

अखेर देशहिताचा निर्णय कोणी मुठभर लोक पोलादी पडद्यामागे राहून करू शकतील आणि देशाच्या जनतेच्या गळी उतरवू शकतील असे संघाला वाटते का? तेही स्वत:बद्दल आधीच संशयाचे वातावरण सभोवताली असताना!

संघाने आजवर केलेल्या सेवाभावी कार्याबद्दल कोणीच काही वावगे बोलू शकत नाही. संघाच्या चांगल्या कार्याचा येथे उल्लेख केलेला नाही, कारण तो या लेखाचा हेतु नाही. वर म्हटल्याप्रमाणे संघासारखी मोठी संघटना नव्वद वर्षे फूट न पडता अस्तित्वात राहिली यावरच समाधान न मानता संघासमोर कोणती आव्हाने आहेत त्यांचा विचार करण्याचा हेतु आहे.

तेव्हा स्वत:बद्दलचे संशयाचे वातावरण निवळण्यासाठी संघ लवकरात लवकर प्रभावी पावले उचलेल ही अपेक्षा व त्यासाठी शुभेच्छा!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

जरा जास्तच मोठा झालाय हा भाग. संपुर्ण वाचता आला नाही. साईझ जरा कमी करावी असे सूचवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगवेगळे भाग करता आले असते. पण त्याने पोस्ट्स वाढल्या असत्या. इतक्यात यावर आणखी वाढवण्याचा विचार नाही. पण तुम्ही म्हणताय तशी मोठी पोस्ट झाली आहे खरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघात जाण्याची, सभासद बनण्याची, संघाचे कार्य करण्याची कोणावरही बळजबरी नाही. स्वेच्छेने जाऊ शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संघात फ़ूट पडली नाही या विषयी.....

एखाद्या संघटनेत फ़ूट केव्हा पडते? ती संघटना कोणत्या मार्गाने जावी (संघटनेचे ध्येय कोणत्या मार्गाने अधिक चांगले प्राप्त करता येईल) याविषयी संघटनेत मतभेद होतात आणि मतभेद झाल्यावर दोन्ही गट संघटनेची लीगसी क्लेम करू पाहतात तेव्हा संघटनेत फूट पडते. त्यासाठी क्लेम करण्यासारखी (म्हणजे ज्या लीगसीला मार्केट व्हॅल्यू आहे अशी) लीगसी असावी लागते. म्हणजे मग दोन्ही गट फुटल्यावर आमची संघटना मूळची आहे असा क्लेम करतात.

आजवर कॉंग्रेस पक्ष, जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष, कम्युनिस्ट पक्ष या संघटना अशा प्रकारे फुटल्या आहेत. फुटणार्‍या गटांनी आपले नाव मूळ पक्ष (अमुक गट) अशी घेतली. त्यांना मूळ संघटनेची असलेली लीगसी हवी होती. अगदी स्त्रीमुक्ती संघटना किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती फुटतानासुद्धा त्यांनी मूळ संघटनेचे नाव घेतले.

तशी फूट संघात पडली नाही कारण मार्केटेबल लीगसी संघाकडे नव्हती/नाही. त्यामुळे काही काळापूर्वी माणसे संघाबरोबर काम करीत होती आज संघाबरोबर करत नाहीत (कदाचित स्वतंत्रपणे करत असतील). पण ते केवळ बाहेर पडणे म्हटले जाईल. फूट म्हणली जात नाही. कारण सोडून गेलेली माणसे "आम्हीच खरे संघाचे पाईक" असा क्लेम करत नाहीत.

हीच परिस्थिती काही प्रमाणात शिवसेनेची आहे. जोवर अशी लीगसी निर्माण झाली नाही तोवर शिवसेना फुटली नाही. याचा अर्थ माणसे शिवसेना सोडून गेली नाहीत असा नाही. [भुजबळ, राणे यांनी सरळ लीगसी सोडून दुसर्‍या पक्षात जाणे पसंत केले].

बूच मारू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तशी फूट संघात पडली नाही कारण मार्केटेबल लीगसी संघाकडे नव्हती/नाही.

हे निरीक्षण रोचक आहे.

शिवसेनेबाबत असा प्रयत्न बंडू शिंगरे यांनी केला होता पण तो अयशस्वी झाला.

राज ठाकरे यांचा प्रयत्न थोडाबहुत यशस्वी म्हणता येईल.

संघाबाबत असे झाले नाही हे मात्र खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बंडू शिंगरे पुण्यातले. त्याकाळी शिवसेना ज्या कॉजसाठी लढत होती ते पुण्यात अस्तित्वातच नव्हते. बंडू शिंगरेंनी माझी शिवसेना खरी असा दावा केला होता का हे ठाऊक नाही.

शिवसेनेची मार्केटेबल लीगसी म्हणता येईल अशी ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात निर्माण झाली. त्यानंतरच शिवसेना 'फुटणे' या शब्दाला काही अर्थ होता.

----------------------------

संघाकडे मार्केटेबल लीगसी* नाही. आज जो काही फायदा झालेला दिसतो आहे तो बहुतांश मोदींचा पराक्रम आहे.

*भाजप वेळोवेळी आम्ही संघापासून वेगळे आहोत असे सांगते याचे कारणही हेच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमती आहेच.. थोडी पुरवणी (बुच आधीच लागले असल्याने उपप्रतिसादच देतोय)
संघ परिवार (हा हिंदुत्त्ववादी असल्याचे भासवत असल्याने की काय कोण जाणे Wink ) कितीही नव्या संस्था आल्या तरी जसे बुद्धाला विष्णुचा अवतार करून टाकावे तसे व्हिएच्पी असो, वनवासी कल्याण असो वा बजरंग दल एका मोठ्या "संघ परिवार" यात ते फिट्ट बसतात. घरातून निघुन जाणार्‍या मुलाला वाड्यातच वेगळी खोली व एक नवे दुकान उघडून द्यावे तसे काहीसे! त्यामुळे म्हटल्या तर या सबसिडीअरीज आहेत.. म्हटले तर त्यातील काही वेगळी संस्थाने (अंगलट येऊ लागल्यावर व्हिएच्पी, बजरंग दल हे वेगळे असतात. जसे केस झाल्यावर त्या त्या 'लीगल एंटिटी'वरच होते अख्ख्या कंपनीवर नाही तद्वतच!)

कित्येक सामान्यांच्या चर्चेतही.. अरे काय बोलतोय हा! म्हटले की तो संघाचा नाही रे 'बजरंग दल' वाला आहे असे उत्तर असते. तर त्यांच्याशी सहमती असल्यावर चेन्नई वगैरे पुराच्यावेळी मदत वगैरे केल्यावर स्तुती मात्र 'संघ परिवार' या परिवाराची होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बुच आधीच लागले असल्याने उपप्रतिसादच देतोय

अरेरेरे. सुचना लक्षातच आली नव्हती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0