१५०

रात्रीच्या शांत काळोखात तुम्ही कधी 'धडाम्' असा आवाज ऐकला आहे काय? झोपेत असतानाही हा आवाज कधी कधी ऐकू येतो. मी जिथे राहतो तिथून जवळूनच एक हायवे गेलाय. आणि असे आवाज आम्हाला नेहमी ऐकायला येतात. थरकाप उडतो. तो नक्की ट्रक, टेम्पो, लक्झरी की अजून काही. मी एका झोपड्यात राहतो. झाडी तशी बरीच आहे. आणि हायवे इथून फारसा लांब नाहीये. कधी आवाज आलाच तर मी झोपड्याबाहेर येऊन दुरुनच कानोसा घेतो. आवाज तसा लहानच असतो. पण कधी कधी जमीन हादरते. आणि पुन्हा सगळे चिडीचूप. शांत. भयाण काळोख. आणि मग पुन्हा 'सायरन'चे आवाज. रात्रभर.
त्या दिवशी असाच आवाज आला 'धडाम... खळ्ळळ्ळ' . हा तसा बऱ्यापैकी मोठा आवाज. मी झोपड्यातून लगबगीनं बाहेर आलो आणि हायवेकडं नीट निरखून बघितलं. वाहनं जास्त नव्हती. पण कुठे काही मागमूस लागेना. मग माळरानावर एका ऊंच जागेवर चढून जमेल तितका हायवे डोळ्याखालून घातला. कुठेच काही गडबड वाटत नव्हती. हा भास तर नव्हता. मी स्कुटर काढून तडक हायवेवर निघालो. डिव्हायडर ओलाडून स्लो लेन मध्ये घुसलो. रस्त्यावर ना कोठे गर्दी ना कोठे ट्राफीक जाम. सरळ जातच राहीलो. पाच-सहा कि.मी. वर मला एक टेम्पो आढळला. फरफटत गेलेला. झुडपात. बहुतेक रुळ ओलांडत असताना त्याची चाकं अडकली असतील.
आमच्या इथुन एक रेल्वेचा ट्रॅकपण जातो. फाटक असणारा. म्हणजे रेल्वेने टेम्पोला धडक मारली असणार. रेल्वेचे डबेही त्या माळरानावर विखुरलेले. फारच विदारक दृश्य.

मी नंबर डायल केला. 2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल गोज डाऊन अगेन, अॅन्ड रिंग्ज द फोन.
"हैलो"
"हा"
"ईमरजन्सी, कम फास्ट"

तातडीचं संभाषण आम्ही इंग्लिशमध्येच करतो. लॉरी घेऊन 'सत्या' आला. लगेच. याला दम निघत नाही. चैन पडत नाही. हातात 'फावडं' घेऊन खाली ऊतरला. याच्या हातात कायम फावडं असतं. त्याचा तो स्टेटस सिंबॉल आहे.
रेल्वेच्या डब्यांतून काही ठिकाणी धुर निघत होता. कुठे ठिणग्या, तर कुठे आग पण लागली होती.
"किती गेले असतील रे, दिडशे तर नक्कीच" सभोवतालावर नजर फिरवून सत्या म्हणाला.
"ते बघ तिकडून दोन पळतायत, धर त्यांना" सत्या पुढं होत फावडं घेऊन त्यांच्या मागं राक्षसासारखा धावू लागला.

"वेट अ मिनीट, पण मला काहितरी खटकतयं" चित्रगुप्तानं शेवटी तोंड उघडलं. मघाचपासून समोरच्या खुर्चीवर बसून मी एकटाच बडबडत होतो.

" ट्रॅक कसा काय आला?, हायवेवर रेल्वेचा ट्रॅक कसा काय आला. तो ही फाटक असलेला. हे जरा विसंगत वाटतय. संशयाला जागा राहतेय. आय थिंक यू हॅव नॉट प्रिपेयर्ड वेल. कॅन्सल धिस प्लॅन, थिंक समथिंग डिफरंट ."
चित्रगुप्त एखादाच पॉइंट टाकतो, पण सॉल्लिड काढतो, त्याच्यामुळं सगळा प्लॅनच फिसकाटतो.
" डिलीवरी तर अर्जंट आहे, ती ही दिडशेची, नाऊ व्हाट वुई हॅव टू डू?"
"डू युवर बेस्ट, क्लायंट इज ओव्हर माय हेड" साला हा तर वैतागला.

बराच वेळ शांततेत गेला. एकदोन ची केस असती तर ठीक. पण एवढी मोठी अॉर्डर पुर्ण करायची म्हणजे प्लॅनिंग फुलप्रुफ पाहीजे. आणि ती क्लायंट समोर प्रेझेंट करताना संशयाला कोणतीही जागा नको. चित्रगुप्त माझ्याकडून अगोदरच सगळं वदवून घ्यायचा.
मी पाठीमागच्या काही नोंदी तपासायला घेतल्या. चित्रगुप्तही डोकं खपवत होताच आणि तेवढ्यात,

2000 माईल्स हाय, अराऊंड 3 लॅक किमी पर सेकंद, सिग्नल कमस् अप & अप अॅन्ड रिंग्ज माय फोन.
"हा बोल सत्या"
"टँकर, फुल अॉफ पेट्रोलियम गॅस, कमिंग ओव्हर हायवे लेन 6, इन आवर एरिया, लॉक द स्टेअरींग, फास्ट"
"कॉपी" आता मला तंत्रखातं सांभाळावे लागणार. मी डोळे मिचकावून चित्रगुप्ताकडे पाहीले.
"अॅप्रुव्हड" मंद हसत तो म्हणाला.

साला आता क्लायंटला लॉक झालेल्या स्टेअरींगची कारणं देत बसावी लागणार.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

कथा आवडली. त्रोटक तपशील कथेची धार अधिक वाढवतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0