Skip to main content

'शटर आयलंड ' सिनेमाचे कोडे

स्पोईलर अलर्ट : कृपया ज्यांनी अजून हा सिनेमा पाहिलेला नाही त्यांनी हा धागा वाचू नये .

'शटर आईलंड' एक अत्यंत भन्नाट सिनेमा आहे. तो जितक्या वेळेला पाहावं तितका जास्त समजतो आणि घोटाळ्यात पडतो. या सीनेमाबद्दल मी पुढे कधीतरी लिहिन. पण आज मला या सीनेमाबद्दल चर्चा करायची आहे .
स्पोईलर अलर्ट सुरू : ज्यांनी पाहिला आहे त्यांना हे लक्षात येईलच की हा सिनेमा विचारात पाडणारा आहे . यात उघड दाखवलेला शेवट असा आहे की टेड ला हे सगळे भास होत असतात आणि तो मिशन वर आलाय आणि इथे जे काही वाईट चालू आहे असे त्याला वाटते हे सर्व काही त्याच्या डॉक्टरने केलेले नाटक आहे तो ज्याला त्याचा जूनियर सहकारी मानतो तो ही एक डॉक्टर आहे. हा शेवट आहे तसा मानला तरी हा सिनेमा एक सुंदर कलाकृती आहे यात शंका नाही. पण दूसरा अर्थ जो दाखवला नाही पण मला आणि इतर अनेकांना जाणवला तो म्हणजे त्याला मान्युप्युलेत केले गेले आहे . एखादी गोष्ट वारंवार ठसवली गेली आणि उलट सिद्ध करण्यासाठी त्याला कुठलीच वाट नसली की माणूस हार मानून ती मान्य करतो तसा प्रकार. स्पोईलर अलर्ट संपला
आता यापैकी कुठला अर्थ हा खरा मानायचा हा प्रश्न आहे . यावर भरपूर मते आणि वाद आहेत. सिनेमात दोन्ही गोष्टी असतील असे वाटणारे भरपूर दृश्य आहेत. मग दिग्दर्शकाने तो प्रेक्षकवर सोडला आहे का ? जरी तसे असेल तरी कुठला शेवट खरा याची चर्चा इथे करणे नक्की आवडेल .

मला वाटले की याची चर्चा इथे करावी. हा धागा कुठल्या कारणाने नियमात बसत नसेल तर जिथे पोस्ट करायचा असेल तिथे करू शकता.

दाह Wed, 13/01/2016 - 20:55

दिग्दर्शकाने तो निर्णय प्रेक्षकांवर सोडलाय असे म्हणायला हरकत नाही. कारण खुद्द लिओला एकदा हा प्रश्न विचारला होता की नक्की शेवट काय आहे ? पण त्यानेदेखील 'मी confused आहे' असेच उत्तर दिले होते. गंमत अशी की हा विवाद निर्माण होतो तो टेड ने म्हटलेल्या शेवटच्या डायलॉगमुळे.
मला वैयक्तिकदृष्ट्या असे वाटते की टेड हा खरोखर मनोरुग्ण आहे आणि त्याने आपल्या पत्नीचा खून केलाय. आपल्या मनाची ही अवस्था समजून आणि या निरर्थक आयुष्यातून मुक्ती मिळवण्यासाठी जाणूनबुजून त्याच्या डॉक्टरसोबत बसलेला असताना आपण अजून सुधारलो नाहीये असे दाखवण्याचे नाटक त्याने केले असावे.
Which would be worse? To live as a monster or to die as a good man? हाच तो डायलॉग.
आणि ज्या पुस्तकावरून हा चित्रपट बनवलाय त्यात असं कुठलं वाक्यच नाहीये.

कुलस्य Wed, 13/01/2016 - 21:11

In reply to by दाह

माला तो फक्त संवाद आहे म्हणून असे म्हणायचे नाही. वातावरण , सगळ्यांच्या नजरा , वागणे , बोलण्याची पद्धत ही मदत करण्यापेक्षा अडकवण्याचीच जास्त वाटते.

दाह Wed, 13/01/2016 - 21:36

In reply to by कुलस्य

हो. डायलॉग बाजूला ठेवू. पण उदाहरणार्थ जर तू गुहेतला प्रसंग घेतलास तर rachel त्याला तिथे लाईट हाउस बद्दल सांगते. हे वर वर confuse करणारे असले तरी मुळात त्या कडेकपारीत दडलेल्या गुहेत प्रतिकूल परिस्थितीत इतके दिवस कोण जिवंत राहू शकेल? मला नाही वाटत असं शक्य आहे. हा टेडच्या hallucination चाच एक भाग असु शकतो.

.शुचि. Thu, 14/01/2016 - 13:13

खरच भन्नाट दिसतेय कथा. "मुलहॉलंड ड्राइव्ह" सीणँआआ तसाच काहीसा होता... हॅल्युसिनेशन आणि वास्तव हे की ते असा विचार करायला लावणारा.

कुलस्य Thu, 14/01/2016 - 19:45

आता गुहेतला प्रसंग बरेच लोक त्याला मुद्दाम manupulate केल्याचा पुरावाच मानतात. पहिल्यांदा जेव्हा असे काही नाही आणि दाखवलेला शेवटचं खरा म्हणणारे लोक लोक बोलले तेव्हा ह्या सीन चा उल्लेख झाला होता की मग मुद्दाम ही बाई तिथे कशी ठेवतील ? त्याचा संशय वाढवा म्हणून ? यावर असेच म्हणले गेले की हा hallucination चा भाग आहे. पण त्याला होणारे बाकीचे भास , आणि हे दृश्य पहिले तर फरक जाणवतो ना ! मी काही त्यातला फार मोठा तज्ञ नाही . पण फ्रेम , शॉट घेण्याची पद्धत , म्यूजिक सगळेच वेगळे आहे hallucination सीन्स मध्ये. आणि ते अगदी थोड्या वेळा पुरते दिसतात त्याला शेवटचा प्रसंग सोडून. मग तो cavegirl चा प्रसंग जर भास असेल तर एवढा वेळ आणि इतका तपशीलवार कसा चालला ? त्यात त्याला होणारे भास हे भूतकालीन होते कायम. हाच एवढा वर्तमानकालीन ?