फुसके बार – २३ जानेवारी २०१६

फुसके बार – २३ जानेवारी २०१६

१) दातार जेनेटिक्सची कॅन्सरच्या निदानासाठीची चाचणी

दातार जेनेटिक्स या कंपनीची लिक्विड बायोप्सी या तंत्रावर आधारीत कॅन्सरची चाचणी करण्याची जाहिरात सध्या टीव्हीवर चालू आहे. ही चाचणी रक्ततपासणीच्या आधारावर होते व त्यातून कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरच्या पेशी ओळखल्या जातात असा दावा केला जातो.

कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचे निदान या चाचणीद्वारे होऊ शकते हा दावा योग्य आहे काय?

ही चाचणी जनसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखी असते काय?

एकूणच हे लिक्विड बायोप्सीचे तंत्रज्ञान कॅन्सरच्या निदानासाठी मोठी क्रांती आहे असे म्हणत येईल काय?

कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.

२) लग्नाआधीचे हुंडाबळी

आईवडलांवर आपल्या लग्नासाठीच्या हुंड्याचा भार पडायला नको या भावनेने तीन बहीणींपैकी एकीने लातुरजवळ फास घेऊन आत्महत्या केली.

या मुलींना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे शिक्षण व त्यासाठीची शिकवण दिलेली असते का? की न शिकलेली किंवा जुजबी शिकलेली मुलगी घरात ठेवून तिला उजवण्यासाठी ठरवले जाते? लग्न एके लग्न यामुळे घरात या मुलींच्या कानावर सतत तोच विषय पडून त्यामुळे मनावरचे दडपण वाढत असेल काय?

तेव्हा लग्न केव्हा जमेल तेव्हा जमेल, मुलींना स्वावलंबी बनवणे हे किती पालकांना जमते? किंवा कमीत कमी किती त्यासाठी प्रयत्न तरी करतात? असे न करता केवळ सहानुभूती वाटून त्याचा काय उपयोग होईल?

३) शिवराज दत्तगोंडे यांची एक पोस्ट. आपण ज्या क्षेत्रात जाऊन काम करण्याचे ठरवतो, त्यांच्याशी संवाद करता येण्यासाटी त्यांची भाषा समजणे सर्वात मह्त्त्वाचे. गडचिरोली भागात राणी बंग यांच्यापुढेही तेच आव्हान होते. शिवाय हा प्रकार असा की आंब्याने लगडलेले झाड असेल तरी या मुलांनी, या लोकांनी या झाडाकडे येण्याचा कंटाळा केला, तर त्या झाडानेच त्यांच्याकडे जायला हवे.

शिवराज यांची पोस्ट.

पालघर जिल्ह्यात बहुसंख्य वारली आदिवासी समाज वास्तव्यास आहे ..तो वारली भाषा बोलतो..वारली भाषा जाम भारी आहे ..सहा वर्षे काम करतोय या भागात तेव्हा थोडीफार भाषा शिकलोय..या भाषेत दिसण्याला नांगणे,बोलवण्याला वार्हने,आजोबाला वाडगो,आजीला वाडगीन,वडीलाला बापूस, संडासला झाडा,उलटीला वांती म्हणतात ..
सुरूवातीला पोरांना प्रमाणभाषा कळतच नाही ..यासाठी मग आम्हा शिक्षकांना त्यांच्या भाषेत संवाद साधावा लागतो..त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी मग एखादा दहावीतला ठीक ठाक प्रमाणा भाषा समजणारा पोर्या दुभाषा म्हणून मदतीला घ्यावा लागतो..मास्तरांनी प्रमाण भाषेत विचारायच दुभाषाने ते वारलीत ट्राँन्सलेट करुन त्याला सांगायच त्याने वारलीत सांगायच दुभाषाने ते परत प्रमाण भाषेत आम्हांला सांगायच.असा हा मजेदार प्रकार बर्याचदा घडत असतो..
आमच्या सारख्या घाटावरुन आलेल्या लोकांना वारली भाषा बोलण्यास व समजण्यास थोडीशी कठीणच जाते..पण प्रयत्न केला की लवकरच शिकताही येते..तर मास्तरांच्या प्रमाण भाषेतील सांगण्याचा अर्थ चुकीचा काढून अर्थचा अनार्थ होऊन कधीकधी मजेदार प्रसंग घडतात..
खालील प्रसंग त्यातलाच..
आमच्या एका गुरुजींनी पोराला दहा रुपये देऊन व्होडाफोनचा रिचार्ज आणायला पाठवले होते तर ते जाऊन वडापाव घेऊन आलत..."
हे सगळं भाषेच्या गफलतीमुळे घडल होत..हा प्रकार आजही आठवला की ओठांवर हसू फुटल्याशिवाय रहात नाही.

४) व्हॉट्सअपवर खोडसाळ मेसेज प्रसारित केले जातात त्यांच्यापैकी एक.

QUOTE
सध्या वादात असलेल्या, महिलेने केलेल्या शनी देव मूर्ती स्पर्शाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टी अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय....
सविस्तर माहिती अशी----
शनी हा देव नसून ग्रह आहे त्याला छाया ग्रह असे म्हणतात. शनि ग्रहा पासून बाहेर पडणारी स्पंदनं स्त्रीयांसाठी घातक असतात, कारण मुर्ती विज्ञाना मध्ये काही मुर्ती विशिष्ट प्रकारची स्पंदने परावर्तीत करत असतात, मुळात स्त्रीयांची शारीरिक ठेवण स्पंदने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, सावित्री धाम मध्ये पुरुषांना ही प्रवेश नाही,
अगदी साधं उदाहरण, देवीची ओटी स्त्रीया भरतात, कधी पुरुषाला ओटी भरतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे पुरुषांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. पुरुषाच्या पोटी अपत्याचा जन्म होत नाही,
सृजनाचा अधिकार स्त्रींयानाच आहे, म्हणून त्या ओटी भरतात. आणि ह्या सृजन शक्तिवरच शनि ग्रहाच्या स्पंदनाचा प्रभाव पडतो.

जसं गाईचं दुध चांगलच, पण विषमज्वरात ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शारीरिक क्षमतांचा होय.

कावीळ झाल्यावर आपण तेलकट खात नाही, कारण आपले शरीर त्या वेळी तो आहार घ्यायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला तेलकट देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला तेलकट द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा?
सहमत असाल तर प्रतिक्रिया द्या, सदर लेख संकलीत आहे, पण शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा, आणि स्त्री पुरूष समानतेच्या बोम्ब मारत सूटलेल्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवा.
शनिशिंगणापुर विटंबना संबंधीत हा अगदी योग्य संदेश आहे.
आपल्या धार्मिक भावना आपणच जपायला हव्यात.
मीडिया आणि सेक्युलर वाल्यांना फक्त हिंन्दु धर्म च दिसतो .त्यांना म्हणाव हिंमत असेल तर कुठल्याही मस्जिद मध्ये महीलांना घुसवुन दाखवा...
तेव्हा हा मेसेज जास्तीत जास्त पसरवा..
जय हिंदुराष्ट्र.
UNQUOTE

धर्माच्या नावाखाली आपल्याला जे सोयीचे वाटेल तसा युक्तिवाद केला जातो. त्या प्रकारात तो किती हास्यास्पद होईल याचा विचारदेखील केला जात नाही.१ मुळात ओटी भरणे वगैरे प्रतिके आहेत. प्रतिकांना किती महत्त्व द्यायचे?

दूध व तेलाची उदाहरणे मूर्खपणाची आहेत. स्त्रीच्या सृजनशीलतेबद्दल बोलायचे, तर पुरुषाच्या वीर्यात काय निव्वळ पाणी, दूध की तेल भरलेले असते? मग शनीदर्शनाने पुरुष नपुंसक होतात असे समजायचे का?

शनिग्रहाच्या स्पंदनांचा बायकांवर प्रभाव पडतो असे म्हणतात, तर बायकांनी घरातच काय तळघरात, बंकरमध्येच बसायला हवे की. कारण त्या कुठे उघड्यावर आल्या आणि चुकून अवकाशात शनिग्रह असला तर काय घ्या! मूर्ती दगडाची असली, मग ती शनीची असो वा विठ्ठलाची, काय फरक पडतो? आणि दगडी मूर्तीतून निघणारी स्पंदने ही काय भानगड आहे? शिवाय अवकाशातला शनी व शनीचा दगड वा मूर्तीचा काय संबंध की तेथे जायला मज्जाव करावा स्त्रियांना?
धर्माच्या नावावर काहीही खपवतात हे निर्बुद्ध लोक.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

वारंवार सांगूनही योग्य ठिकाणी लेखन न केल्यामुळे धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0