टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक कोणते ?

माझ्यापुरते एखाद दोन प्रसिद्ध कविता, लेखनाचे काही अंश अधे मध्ये या पलिकडे टागोर आणि सावरकर हे दोन्हीही मी वाचलेले नाहीत, सावरकरांचा जिवन काळ मे १८८३ ते फेब्रु १९६६ तर टागोरांचा जिवनकाळ १८६१ ते १९४१. टागोरांचा जिवन काळ सावरकरांच्या एक पिढी अलिकडे २२ वर्षे आधी चालू होतो तसा सावरकरांच्या २४ वर्षे आधी संपतो. पण मोठा कालखंड दोघांसाठीही समकालीन राहीला असावा.

सावरकर आणि टागोर यांची राष्ट्रवादावरची मते अभ्यासली म्हणजे दोन परस्पर विरोधींची तुलना चालू आहे असे वाटेल, एकदा राष्ट्रवाद विषय डोक्यात आला की बाकी सर्व विसरल्यामुळे साम्य शोधणे कदाचित कठीण जाईल म्हणून विज्ञानवादाशी दोघांचीही नाळ जुळत असे, शब्द प्रामाण्य हे बहुधा दोघांनाही स्विकार्य नसावेत (चुभूदेघे) हि साम्यस्थळे असण्याची शक्यता असेल.

कुणि म्हणेल जाई आणि जुई दोन्ही स्वतंत्र आणि सुवासिक फुले आहेत त्या दोन्हींच्या सुवासाची तुलना का करावयाची किंवा असे काय निमीत्त झाले आहे की या दोघांची तुलना करावी ?

अलिकडील देशभरातील संकुचित सेक्टेरीअनीझमचे महाराष्ट्रातही जे पडसाद पडले त्यात कालची महाराष्ट्राच्या विधानसभेत एमाआयएमच्या एका विधानसभा सदस्याला भारतमाता की जय म्हणण्यास नकार दिल्यामुळे विधानसभा अधिवेशन संपेपर्यंत बडतर्फ केले गेले-इथे भारतमाता की जय या विषयाचा उहापोह वेगळा करावयास हवा-, राजकीय पक्ष कोणताही असो सावरकरांचा समर्थक अथवा विरोधक पण बहुसंख्य महाराष्ट्रातील राष्ट्रभक्तीची सळसळ ही जहालच आणि या महाराष्ट्रातील राष्ट्रभक्तीचे एक तत्वज्ञानी साहित्यिक पुजक म्हणून सावरकर इथे तुलनेस घेतले. एमाआयएमचे नेते ओवेसी यांनी त्यांच्या संकुचित विचारांसाठी चक्क रबिंद्रनाथ टागोरांची दुहाई दिली.

रविंद्रनाथ टागोरांच्या खालील वाक्याची दुहाई देणारे ओवेसी एकटे नव्हेत खालील वाक्य अनेक मान्यवरांनी क्वोट केले आहे

I LOVE INDIA, not because I cultivate the idolatry of geography, not because I have had the chance to be born in her soil, but because she had saved through tumultuous ages the living words that have issued from the illuminated consciousness of her great sons

पण living words that have issued from the illuminated consciousness of her great sons.. म्हणजे काय ? हे कुठेही स्पष्ट होत नाही. टागोंरांचे हे वाक्य कोणत्या संदर्भात आहे कोणत्या पुस्तकातून आले आहे पहावे म्हटले तर ‘A vision of Indian History’ आणि ‘A vision of Indian History’ या टागोरांच्या वेगवेगळ्या (?) निबंध-पुस्तकाचे संदर्भ दिसतात. आणि हि पुस्तके लगोलगतरी आंजावर सहज वाचण्यास उपलब्ध झाली नाहीत.

रविंद्रनाथ टागोरांची मला आंजावर सहजपणे जी मते दिसली ती इतरांशी नव्हे त्यांच्या स्वतःच्याच विचारांशी विरोधाभासी नाहीत ना अशी शंका येत राहीली. रविंद्रनाथ टागोरांनासुद्धा देशभक्ति हवी आहे, हिंदूंनी संघटीत असावे संघटीत नसल्यामुळे त्यांना पराभव पत्करावे लागले हा इतिहास त्यांना मान्य आहे पण राष्ट्रवादी असणे त्यांना संकुचितपणाचे वाटते -गांधींना राष्ट्रवादी असणे संकुचितपणाचे वाटत नाही सावरकर आणि गांधी यातला एक फरक हिंसाअहिंसावाला आहे तो या धागाचर्चेचा विषय नाही पण दोघेही राष्ट्रवादी - टागोरांना राष्ट्रवादापेक्षा मानवता ह्युमॅनिझम मोठा वाटतो टागोरांचा ह्य्मॅनीझम बहुधा गौतम बुद्धाच्या जवळ पोहोचणारा असावा. टागोरांची दुहाई देणार्‍या ओवेसींनी त्यांचा संकुचित धर्मवाद टागोरांच्या मानवतेच्या व्याख्येवर कुठे बसतो हे स्पष्ट करण्याची त्यांच्यात क्षमता आहे का ? ह्याची चर्चा व्हावयास हवीच पण तत्पुर्वी बंगाल आणी महाराष्ट्रातील राजकीय विचारातील फरक समजून घेण्यासाठी सावरकर आणि टागोर यांची साम्य आणि फरक यावर कुणि अधिक प्रकाश टाजू शकत असेल तर पहावे हा या धाग्याचा उद्देश

त्यामुळे टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक हे मला इतरांकडून जाणून घेण्यात रस आहे

* रबिंद्रनाथ टागोरांची अवतरणे (इंग्रजी विकिक्वोटवर)
* सावकरांची अवतरणे (इंग्रजी विकिक्वोट्सवर)

टागोरांसाठी काही आगेमागे समकालीन समाज आणि राजकीय पटलावरच्या व्यक्तिंचे जिवनकाळ, केवळ संदर्भासाठी, बाळ गंगाधर टिळक १८५६ ते १९२०, महात्मा गांधी १८६९-१९४८ , विवेकानंद १८६३ ते १९०२, श्यामा प्रसाद मुखर्जी १९०१ ते १९५३ , सुभाषचंद्र बोस १८९७ - १९४५

चर्चा सहभागासाठी आभार.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

माझ्यापुरते एखाद दोन प्रसिद्ध कविता, लेखनाचे काही अंश अधे मध्ये या पलिकडे टागोर आणि सावरकर हे दोन्हीही मी वाचलेले नाहीत,

तरी पण तुमची धागा काढायची हिम्मत बघुन माझी ही हिंम्मत वाढलीय, आता मी पण हा धागा काढणार आहे.

मृणाल सेन आणि कांती शहा : दिग्दर्शनातले साम्य काय आणि फरक कोणते?

त्यातले पहिले वाक्य असे असेल "माझ्यापुरते एखाद दोन प्रसिद्ध सिनिमांचे अंश या पलिकडे मृणाल सेन आणि कांती शहा ह्या दोघांचे सिनीमे मी पाहिलेले नाहीत,"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile @ अनु राव, मला आपले उपहास मनापासून आवडावयास लागले आहेत. मी आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी खुल्या मनाने पोच देतो. आभार.

बाकी, मृणाल सेन आणि कांती शहा : दिग्दर्शनातले साम्य काय आणि फरक कोणते? हे इतरांकडून जाणून घेण्याची जिज्ञासा असण्यात जसे काही वावगे नसावे तसे टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक कोणते ? ते जाणकारांकडून जाणून घेण्याची जिज्ञासा असण्यात काही वावगे नसावे. आमच्यातल्या आणि तुमच्याकडेही लागण झालेल्या हिम्मतीचे क्रेडीट आमच्या जिज्ञासेला. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

जिज्ञासा असण्यात काहीच वावगे नाहि.
पण काहिहि ??

मी तर मृणाल सेन आणि कांती शहा यांच्या पलिकडे जाइन.
स्पायडर मैन आणी चिंटु यांच्यातील साम्य काय आणि फरक कोणते असे विचारले तर ? किंवा नारायण धारप आणी नथुराम गोडसे यांच्यातील साम्य काय आणि फरक कोणते असे विचारले तर ? किंवा गेम्स ओफ थ्रोन मधील जोन स्नो आणी दुनियादारी तील दिग्या यांच्यातील साम्य काय आणि फरक कोणते असे विचारले तर ? ?

काहिहि ह माहितगार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समोर एक आव्हान ठेवलेले आहे, - जगात काहिही असे काही असते का ? दोन परस्परांपेक्षा वेगवेगळ्या विचारप्रणालीचे लोक भारतात होऊन गेले शिवाय अजूनही चर्चा व्हावी किमान पक्षी टिका व्हावी असा जर त्यांचा प्रभाव असेल तर तुलना का होऊ नये ? बाकी हे धनुष्य पेलणे झेपते का नाही आणि पेलायचे का नाही ही ज्याची त्याची मर्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुम्हाला खरंच काही जाणून घ्यायचं असेल तर टागोरांचे राष्ट्रवादावरचे निबंध (भाषणे निबंधरूपाने प्रकाशित) वाचा असं सुचवते. छोटे, सोप्या भाषेतले आहेत. सावरकरांचे लेखही सहज उपलब्ध असतात. उदा. इथे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण दिलेला टागोरांचा दुवा वाचून झाला. वरच्या धागा लेखात फारसा बदल करावा लागेल असे दिसत नाही. अर्थात पण living words that have issued from the illuminated consciousness of her great sons.. म्हणजे काय ? याचा आगापिछा मिळाल्यास अधिक बरे पडेल असे वाटते.

आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

टागोर आणि सावरकर यांच्यातील मूलभूत फरक :
टागोरांची प्रत्येक उक्ती आणि कृती संपूर्ण भारतीय समाजाचे हित पाहणारी होती.
सावरकरांची प्रत्येक उक्ती ब्राह्मणांचे हित पाहणारी होती.

या प्रमुख कारणामुळे टागोरांना संपूर्ण भारताने स्वीकारले. भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतो.
सावरकरांना मात्र ब्राह्मणेतरांकडून त्यांच्या हयातीतही विरोध होत होता. हयातीनंतरही विरोधच होत आहे. बहुतांश भारतीय सावरकरांचा द्वेषच करतात.
................
दोघांत कोणतेही साम्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या मन मोकळे करणार्‍या प्रतिसादा बद्दल आभार

दोघांत कोणतेही साम्य नाही.

सर्व विसरल्यामुळे साम्य शोधणे कदाचित कठीण जाईल म्हणून विज्ञानवादाशी दोघांचीही नाळ जुळत असे, शब्द प्रामाण्य हे बहुधा दोघांनाही स्विकार्य नसावेत (चुभूदेघे) हि साम्यस्थळे असण्याची शक्यता असेल. असेल असे मी धागा लेखात म्हटलेले आहे. तरी सुद्धा माझे मत खोडून तेजांशी कुणि सहमत होऊ इच्छित आहे का ?

सावरकरांची प्रत्येक उक्ती ब्राह्मणांचे हित पाहणारी होती.

सावरकरांनी ब्राह्मणांचे हित पहाणार्‍या कोणकोणत्या कृती केल्या असे आपणास वाटते, कृपया ससंदर्भ नमुद करावे.

टागोरांची प्रत्येक उक्ती आणि कृती संपूर्ण भारतीय समाजाचे हित पाहणारी होती.

या बद्दल आपल्याला विश्वास आहे हि आनंदाची गोष्ट आहे परंतु टागोर हे इतर समकालीन विचारवंतापेक्षा उजवे असतील आणि सर्व समाजाचे हित पहाणारे होते तर इतर नाही तर त्यांचा समकालीन बंगाली मुस्लिमांवर प्रभाव का पडू शकला नाही बंगाली मुस्लिम फाळणीच्या मागणीला का अडून बसले आणि समकालीन बंगाली लोकांनी ज्यात मुस्लिमही आले हिंदूही आले दंगलींमध्ये सहभाग का घेतला ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.