ब्रिटिशकालीन भारत, भारतीयांना झालेले फायदे

खरडफळ्यावरील गप्पांत

ज्या ब्रिटिशांचे कौतुक सांगताहात त्यांनी शून्यातून केलेली कामे ना के बराबर आहेत. हे लक्षात घ्यायचे नसेल तर नका घेऊ. तुमच्या वाटण्या न वाटण्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. तुम्हीच म्हणता तसे, 'काय फरक पडतो'?

असे श्री बॅटमॅन कुणालातरी म्हणाले.
म्हटलं उत्तर द्यावं --
ब्रिटिशकाळात चांगल्यापैकी झाली अशी मला वाटणारी कामे :-
१. रेल्वेचे जाळे
२. कायदा सुव्यवस्था (काठीला सोने लावून...)
३. सामाजिक न्याय व समतेची रुजुवात
४. मुस्लिमांना एकदाचा थोडाफार का असेना प्रतिबंध.
५. भारताचे इंटिग्रेशन. एकछत्री कारभार. पाच साततरीपैकी कैक संस्थाने एकाला एक लागून असली तरी आपसांतील युद्धे पूर्ण थांबली.
६. भारतीयांना आलेले आत्मभान ( इंग्रजांची अभिजनांना लाथ बसणे हा एक महत्वाचा फ्याक्टर)
७. ज्या त्या गोष्टीत standardization and organization (हे बॅट्यानेच मला लक्षात आणून दिले)
ठराविक तास सैनिक म्हणून काम केल्यावर ठराविक पगार निश्चित मिळणार. अनिश्चिती दूर झाली. लुटालुटीची गरज संपली.
८. सार्वत्रिक शिक्षण
९. भूमापन व इतर सर्व्हेतली मोठ्ठी कामगिरी (अजिंठा,वेरुळ, ओरिसातील उदयगिरी अशी कित्येक ठिकाणे प्रकाशात आली, दणकून अभ्यासली गेली.)
खुद्द भारतीय आपल्या ब्राम्ही लिपे आणि इतर ठेवयंना विसरल्यासारखे झाले होते. त्यांचा पुन्हा अभ्यास झाला. विविध मौर्य कलीन लेख शिलालेख वाचले,
नोंदले गेले.
१०. शिवाय एकसमान चलन देशभर रुळवणे ही देखील मोठी अचिव्ह्मेण्ट वाटते. त्यातही पेपर करन्सी आणि कॉइन करन्सी . लिखित ब्यांकिंग पद्धती सुरु करणे हेही.
११. समुद्रात आतमध्ये खोलवर आणि दूरवर जाणारी, जाउ लढाई करणारी नाविक क्षमता. एतद्देशीय नाविक वीरांबद्दल आदर ठेवूनही असे म्हणावेसे वआटते की एकूणात युरोपीय, त्यातही ब्रिटिशांची नाविक शक्ती ,तंत्रज्ञान , नाविक व्यवस्था अधिक चांगली होती. त्यांनी इथे नौदल उभारले अधुनिक. ते स्वातंत्र्योत्तर भारतास आयतेच मिळाले.
.
.
रेल्वेबद्दल बॅट्या मह्नतो की --

रेल्वेचे जाळे इ. चे कौतुक नाही कारण ते स्वतःच्या फायद्याकरिता राबवले गेले. ब्रिटिश नसते तरी कधी ना कधी ते आलेच असते.

उद्दीष्ट "स्वतःचा फायदा" हे होते. मान्य. पण कामाचा दर्जा त्या काळाच्या मानाने बर्‍यापैकी बरा होता. शिवाय ते ऑफिशियल जे कोर्ट कचेरी , कायदा अशी भाषा करत; त्याची खूपच मजा वाटते. त्यापूर्वी एकाच गुन्ह्याला एकच सजा, असा प्र्कार कुठे होता. सजा ही सजा देणार्‍याच्या इच्छेवर फार जास्त अवलंबून होती. (मुघलकालिन काझी)
.
.

.
.
आणि अजून एक म्हणजे "तुम्ही चुकीचे आहत.तुम्हाला घालवलं पाहिजे" असं म्हटलं तरी ते ऐकून घ्यायची त्यांची तयारी होती. (अपवाद जनरल डायर प्रकरण आणि लाला लजपतराय ह्यांचा लाठीहल्ल्यात झालेला मृत्यू.) तुम्ही बंदूक उचललीत तरच ते उचलणार. अदरवाइज बंदुकीशिवाय जे काही करता येइल ते करणार. म्हणजे तुम्हाला शिव्या घालणे, फार तर राजकिय कैदी बनवणे. फार फार तर लाठीहल्ल करतील. ह्या सगळ्यामुळे "सिव्हिल मूव्हमेण्ट" , "जन आंदोलन" हा प्रकार रुअळला. कारण तो रुळणे शक्य होते. पूर्वी असं काही केलं तर गुरु तेग बहादूर ह्यांना चांदणी चौकात जसं फाशी दिळं औरंजेबानं तसं होइ. "तुला घालवून दिला पाहिजे " असं तुम्ही अशा राज्यकर्त्यांना म्हणू शकायचात काय ?

.
.
मुद्दा क्र.२ बद्दल --
म्हणजे कायदा सुव्यवस्थेवर पब्लिक खुश होती म्हणतात. म्हणून तर १८५७ला तितकासा सपोर्ट नाही मिळाला. नाहीतर तो फक्त उठाव न राह्ता एक चळवल झाली असती. सतत लोक त्यात जोडले जात रहिले असते. (फ्रेंच उठावासारखं. ठिणगी पडली, आणि दारुगोळा आधीच गच्च भरलेला होता. इतेह ठिणगी पडली...पण ओल्या लाकडावर.)
.
.
मुद्दा क्र. ७ बद्दल --
आधी सैनिकांना बारमाही सैनिक म्हणूनच काम मिलण्याचे प्रमाण कमी होते. बरेचसे सैनिक हंगामी सैनिक असत. "प्रोफेशनल आर्मी " म्हणतात तसा प्रकार भारतात होता; पण अगदिच कमी. बहुसंख्य लोक सैन्यात एखाद्या मोहिमेवेळी भर्ती केले जात; आणी नंतर सगळेच काही कामावर नसत. त्यात पुन्हा खर्च भागवायचा तर लुटालूट करुन भागवायचा अनाहूत , अलिखित सल्ला असे. ("खणती लागणे" हा वाक्प्रचार माह्ति असेल्च.)
बारमाही काम नसणारा माणूस...तयचा सैनिक म्हणून कामाची एफिशियन्सी कशी असणार ?
नि:शस्त्र पब्लिकला लुटायची संधी मिळाल्यावर तो सोडणार आहे का ?
.
.
ही यादी माझ्या समजुतीनुसार बनवली आहे. त्यात दुरुस्त्या असल्यास,अवश्य करा. भर घालाविशी वटल्यास अवश्य भर घाला.
संदर्भ वगैरे फारसे मजकडे नाहित. सामान्य ज्ञानावर आणि शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकावर विसंबून लिहिले आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

मनोबा - तू माझे मुद्देच विसरला आहेस.

१. ब्रिटीश कालीन भारत असे काही नव्हतेच असे मी म्हणले तर. भारतीयांनी ब्रिटीशांना कामाला ठेवले होते त्यांच्या फायद्या साठी. हे अजाणते पाई असेल पण तसे होते खरे. कदाचित भारतीयांना अजुन राज्य वगैरे करण्याची अक्कल आली नाही इतकी समज जमिनीवरच्या लोकांना असावी.

२. आत्ता जेव्हडे मनोबा आणि मला स्वातंत्र आहे - तितकेच किंवा त्याच्या पेक्षा जास्त दर्जाचे स्वातंत्र १९३० मधे त्यावेळच्या मनोबाला होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रिटिशांनी भारताला एक नवा धर्म दिला - क्रिकेट नावाचा.
कलेचं लोकशाहीकरण झालं - पूर्वी नाचगाणं हे वेश्यांचं काम समजलं जाई आणि चित्रकार वगैरे कारागीर खालच्या जातीचे समजले जात. आता ब्राह्मण घरातल्या स्त्री-पुरुषांनाही नृत्य, संगीत किंवा चित्रकला शिकावीशी वाटू लागली. कलांचं रीतसर शिक्षण देणारी विद्यालयं सुरू झाली.
पूर्वीच्या शिक्षणातून पढतपंडित निर्माण व्हायचे तर ब्रिटिश शिक्षणातूनही तेच होऊ लागलं - फक्त आता ते निव्वळ मंत्रपठण करून पैसे उपटण्यापेक्षा सरकारी ऑफिसात बाबूगिरी करून लाच खाऊ लागले आणि सामान्य जनतेचं जिणं त्यांनी हराम करून सोडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कलेचं लोकशाहीकरण झालं - पूर्वी नाचगाणं हे वेश्यांचं काम समजलं जाई आणि चित्रकार वगैरे कारागीर खालच्या जातीचे समजले जात. आता ब्राह्मण घरातल्या स्त्री-पुरुषांनाही नृत्य, संगीत किंवा चित्रकला शिकावीशी वाटू लागली. कलांचं रीतसर शिक्षण देणारी विद्यालयं सुरू झाली.

हे जास्तकरून उत्तरेकरिता लागू आहे. दक्षिणेत ब्राह्मणांचा नृत्य-नाटक-गायनादि कलांमधला सहभाग पाहता असे सरसकट म्हणणे योग्य नाही. केस इन प्वाइंट- तंजावरचा सर्फोजी २ याचे दरबारातील कलाव्यवहाराबद्दल इंदिरा पीटरसन यांनी काही रोचक पेपर्स लिहिलेत. ते इथे पाहता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दक्षिणेकडेही देवळात नाचणाऱ्या मुली देवदासी परंपरेतून येणं वगैरे होतंच. रुक्मिणी देवींनी उच्चवर्णीय असूनही भरतनाट्यम् पुनरुज्जीवित केलं आणि त्यामुळे दक्षिणेत ब्राह्मण मुली भरतनाट्यम् शिकू लागल्या. आता हे ऐकायला मजेशीर वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इंदिरा पीटरसन यांचे पेपर्स वाचलेत तर "उच्चवर्गीय लोक या कलांपासून फटकून होते" हे विधान सरसकट आहे हे लक्षात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विधान सरसकट असेलही, पण देवदासी परंपरा होती ही नाकारण्यासारखी गोष्ट नाही. (मंगेशकर कुटुंबियांबद्दलही 'अखेर त्या भाविणीच!' अशी खडूस टिप्पणी मी ऐकलेली आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इतर पैलूकडे लक्ष वेधले याचा अर्थ देवदासी परंपरा नाकारणे असा होतो हे सुचवू पाहणं रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> केस इन प्वाइंट- तंजावरचा सर्फोजी २ याचे दरबारातील कलाव्यवहाराबद्दल <<

संबंध कळला नाही. मी 'पूर्वी' म्हणतो तो काळ ब्रिटिश वसाहतीच्या खूप आधीपासूनचा. सर्फोजी २ तर वसाहतकालीन होता ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सर्फोजी वारला १८३२ साली. तेव्हा ब्रिटिशांचा शिरकाव झाला असला तरी लार्जस्केल इंटरअ‍ॅक्शन झाली नव्हती.

शिवाय त्याअगोदर नायक राजांच्या दरबारातही उच्चजातीय लोक यात इन्व्हॉल्व्ह्ड होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> सर्फोजी वारला १८३२ साली. तेव्हा ब्रिटिशांचा शिरकाव झाला असला तरी लार्जस्केल इंटरअ‍ॅक्शन झाली नव्हती. <<

विकीपिडियातून -

Raja Thulajah, the king of Thanjavur adopted him as his son on January 23, 1787 by duly performing all of the religious rites. The boy was entrusted to the care of Rev. Christian Freidrich Schwartz, a Danish missionary.

But Thulajah died soon afterwards and his half-brother Amar Singh who had earlier been appointed regent to the boy-king usurped the throne in 1787. Amar Singh denied the young prince the benefits of basic education.

At this juncture, Rev. Schwartz intervened to save the young prince and sent him to Madras where he was educated by Rev. Wilhelm Gericke of the Lutheran Mission. Soon, he became proficient in Tamil, Telugu, Urdu, Sanskrit, French, German, Danish, Greek, Dutch and Latin.

Meanwhile, the British interposed on his behalf and Serfoji ascended the throne of Thanjavur on June 29, 1798. In return for their assistance, Serfoji was forced to cede the administration of the Kingdom to the British and, in return, was granted an annual pension of 100,000 star pagodas and one-fifth of the state's land revenue.

हा पाश्चात्यांनीच शिकवलेला आणि सिंहासनावर चढवलेला राजा होता. मी म्हणतो तो हा काळ नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वार्झचा सर्फोजीवरील प्रभाव निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. पण कर्नाटकी संगीतातील ते त्रिकूट की चौकडी- त्यागराज, मुत्तुस्वामी दीक्षितर आणि इतर हे त्याच्याच पदरी किंवा जवळपास होते. त्यांच्या सांगीतिक इन्व्हॉल्व्हमेंटमागे युरोपियन प्रभाव होता हे कशावरून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझं म्हणणं हे की उदाहरणासाठीचा काळ चुकतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ठीक. त्याअगोदरचीही उदाहरणे आहेत, शोधून सांगतो.

ही घ्या.

https://en.wikipedia.org/wiki/Carnatic_music#Origins.2C_sources_and_history

इथे पुरंदरदास, वेंकटमखिन वगैरे अप्परक्लास लोकांनी कर्नाटक म्युझिकमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वाचायला मिळेल. आणि यांचा काळ ब्रिटिश प्रभाव दृढमूल होण्याअगोदरचाच आहे. पुरंदरदास तर १४८४ साली जन्मले आणि १५६४ साली वारले. त्यांनी कर्नाटक संगीताचे सिस्टिमॅटायझेशन ज्या रूपात केले त्याच रूपात ते आजही शिकवले जाते असे म्हणतात.

https://en.wikipedia.org/wiki/Purandara_Dasa#Purandara_Dasa_and_Carnatic...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझा ह्या विषयात अभ्यास नाही, पण मुथु तांडवर (१५६०-१६४०), अरुणाचल कवी (१७१२-१७७९) आणि मरिमुत्थु पिल्लई (१७१७-१७८७) ह्यांना कर्नाटक संगीतातली तमिळ त्रिमूर्ती म्हणून ओळखलं जातं आणि ते बहुधा ब्राह्मणेतर होते. पुरंदरदास ह्यानुसार वैश्य होता. इसाई वेलालार म्हणून जी ब्राह्मणेतर जात होती ती परंपरेनं संगीतकारांची होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुरंदरदास एका धनाढ्य व्यापार्‍याघरी जन्मलेले होते. त्यांना नीचवर्गीय म्हणणे धाडसाचे आहे. वेलालार लोकांबद्दलही असेच म्हणता यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा पैशाचा नसून जातीचा आहे. गावातला ब्राह्मण गरीब झाला तरी ब्राह्मणच असे आणि ब्राह्मणेतर कितीही श्रीमंत असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बॅट्या, जंतुसो, तुम्ही नक्की कशाबद्दल वाद घालत आहात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राह्मणेतर ते सर्वच नीचजातीचे हे फॉर्म्युलेशन अतिशय फसवं आहे इतकंच सांगू इच्छितो. त्यामुळे उच्चजातीय हे लेबल, तदनुषंगिक सर्वच अर्थनिर्णयन अतिशय संकुचित होतं. तत्कालीन समाजस्थितीशी ते सुसंगत आजिबात नाही हे तर आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नीचच असं मी म्हणत नाही. कारागीर, कलावंत वगैरेंमध्ये जातपात असे (जशी ती इतर क्षेत्रांतही असे.) व्यवसाय जातीनिष्ठ होते (थोडंफार इकडेतिकडे झालं तरी.) ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीत ते मोडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओ दुर्जनसिंह - हिंदुंमधे कर्मावरुन जात ठरते ना. पटाईत काकां ना एकदा भेटा मेट्रोमधे दिल्लीच्या तुम्हाला नीट समजावुन देतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दाक्षिणात्य संगीतात उच्चजातीय लोक येणं ही गोष्ट ब्रिटिशपूर्वकालीन आहे इतकाच मुद्दा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे तर होतेच ना. गोपाळ नायक पण ब्राह्मणच होता ना, का नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिती नाही, पाहिले पाहिजे.

शिवाय संस्कृतात पाहिले तर नाट्यगायनवादनादि कलांबद्दलचे ग्रंथ लिहिणारी सगळी भटंच तर दिसतात. अजून उच्चजातीय कोण पाहिजेत मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सैद्धांतिक मांडणी करणारे वेगळे आणि सादरीकरण करणारे (पक्षी : अंगमेहनतीचं काम करणारे) कलावंत वेगळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे तत्कालीन प्रॅक्टिशनर्समध्येही भटे नव्हती असा निष्कर्ष निघतो. जर असे असेल तर त्यावर ग्रंथ कशाला लिहितील उगीचच? मान्य की सर्व प्रॅक्टिशनर्स सैद्धांतिक मांडणी करत नव्हते, पण या केसमध्ये व्हाईसे व्हर्सा अशक्यप्राय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्याच्या मते ब्रिटीश येण्यापूर्वी हिंदु राजांच्या राजवटीत आनंदी आनंद होता. रामराज्य्च म्हणाना फक्त पुष्पक विमान नसायचे.
मुसलमान यायच्या आधी पुष्पक विमान पण असायचे, पण ते मुसलमानांनी मोडले.

तरी पण ब्रिटीश यायच्या आधी सर्वच बाबतीत भारत आत्ता जग आहे त्याच्या पेक्षा फार्फार पुढे होता.
ब्रिटीश आले आणि त्यांनी पाण्यात गुंगीचे औषध मिसळले. म्हणुन सर्व लोक झोपी गेले. ( बॅट्याच्या मते ९९% लोक झोपले होते ). ते लोक झोपले असताना ब्रिटीशांनी पॉकेटमारी केली. इतिहास बदलुन खोटा इतिहास लिहुन काढला.

पण मग कोणी तरी भुल उतरवली आणि मग ब्रिटीश मागे पाय लाऊन पळुन गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भक्तांशी बोलण्यात अर्थ का नसतो ते वरील प्रतिसाद पाहिल्यावर खासच समजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>स्त्री-पुरुषांनाही नृत्य, संगीत किंवा चित्रकला शिकावीशी वाटू लागली. कलांचं रीतसर शिक्षण देणारी विद्यालयं सुरू झाली.

याबाबतीत बरेचसे श्रेय आपल्या भारतीय (त्यातही मराठी) लोकांनाच जाते. मान्य आहे की संगीताचे रीतसर विद्यालय काढणे ही कल्पना जरी पाश्चात्य असली तरी तशी विद्यालये भारतभर काढून त्याकाळी दुर्लक्षित आणि तुच्छ समजल्या जाणार्‍या शास्त्रीय संगीतासारख्या (गाणीबजावणी!!)कलेकडे मध्यमवर्गीय सुसंस्कृत घरांतील स्त्री-पुरुषांचे लक्ष आकर्षित करणे हे भारतीय लोकांनीच केले (पलुसकर, भातखंडे वगैरे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मान्य आहे की संगीताचे रीतसर विद्यालय काढणे ही कल्पना जरी पाश्चात्य असली तरी <<

माझा मुद्दा तोच होता. शिवाय, हे झालं शास्त्रीय नृत्य-संगीताचं. जे.जे. कला महाविद्यालय ब्रिटिशांनीच स्थापन केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

महत्वाचे म्हणजे ब्रिटीशांनी आडकाठी केली नाही भारतीय संगीत शिकायला आणि शिकवायला.

नॉर्मली जेते आधीची संस्कृती पुसुन टाकायचा प्रयत्न करतात.

पण ब्रिटीश हे भारतीयांनी नेमलेले नोकर असल्यामुळे त्यांनी कधीही कसलीही संस्कृतिक दडपशाही केली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

****नंदन मोड ऑन ****

कला क्षेत्रात जे जे चांगलं झालं ते ब्रिटिश काळात झालं Smile
.
.
जे जे वांछिल तो ते लाहो " असं वातावरण ब्रिटिशकाळात झालं.
.
.
इतकच नव्हे आधुनिक वैद्यकीय क्षेत्राची बी. जे. सुद्धा ब्रिटिशकाळात रोवली गेली.

****नंदन मोड ऑफ ****

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याच धाग्यावर टाईमपास करेल त्याच्या चहात माशी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ब्रिटिश नसते तर कोणत्या गोष्टी तितक्या प्रभावीपणे झाल्या नसत्या ही यादी फार मोठी नसावी. जगभरात अनेक म्हत्त्वाच्या ऐहिक गोष्टी (जसे रेल्वे, पोस्ट वगैरे) होत असताना त्या इथेही झाल्या व त्यावेळी ब्रिटिश होते त्यामुळे ते ब्रिटिशांमुळे झाले असे होत नाही तर ते केवळ ब्रिटिशांनी केले असे होते. (हेच ब्रिटिशपूर्व काळातील राज्यकर्त्यांनाही लागू आहे).

ब्रिटिशांनी माझ्या मते भारताला पिरिऑडीकली बदलू शकणार्‍या लोकनियुक्त व लोकांना उत्तरदायी प्रतिनिधींची सवय लावली ही मुळातूनच उपखंडाला नवीन असलेली गोष्ट दिली असे वाटते. (हे अनभ्यस्त मत कोणीतरी खोडा प्लीज)

त्या व्यतिरिक्त नगररचना करण्याचा दृष्टीकोन, लेखी दस्तऐवजीकरण करण्याची सवय लावणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी भारतात आणल्या. पाने, फुले, पक्षी, किडे, प्राणी यांचा शास्त्रीय अभ्यास त्यांच्या आधी किती डॉक्युमेंटेड आहे कल्पना नाही. नकाशाही डॉक्युमेंट करणे त्यातच आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे ऐसीवरच कोणाचीतरी 'जर भारतावर ब्रिटिशांचे राज्य आले नसते तर फ़्रेंचांचे आलेच असते. प्रवाहात एकमेकांवर आदळणारी भांडी ----------------------------------------------- ' अशी कोणाची तरी स्वाक्क्षरी वाचली होती ती आठवली.
एकूण या सगळ्याबद्दल ब्रितिशांचे उपकार मानावेत किंवा त्यांच्या तत्कालीन कर्तबगारीचे गोडवे गावेत काय ?
काही जुने संदर्भ (आत्ता पुस्तकांची नावे वगैरे आठवत नाहीत ) वाचल्याचे आठवते की एकंदरच ब्रिटिश साम्राज्यात भ्रष्टाचार, बजबजपुरी इत्यादी चांगल्यापैकी बोकाळला होता. बाकी काही नाही तरी वानगीदाखल 'साउथ सी बबल' किंवा 'ब्रिटिश साम्राज्याचे पैसे खाणारे मुंबई बंदरातले अधिकारी' या घटना वाचल्याचे निश्चितपणे आठवते.

तसेही उपकार मानायचे असतील तर ब्रिटिशांचे न मानता 'प्रबोधनाच्या काळाचे युरोपिअन नायक' जे आहेत त्यांचे मानावे लागतील. कारण सतराव्या अठराव्या शतकात हिंदुस्थानात कोणत्यातरी युरोपीय सत्तेचे वसाहत वसवणे जवळपास निश्चित होतेच.

बाकी योग ही भारतीयांची जगाला देणगी, शून्य ही भारतीयांची जगाला देणगी किंवा मेकेनिकल इंन्व्हेनशन ही युरोपीयांची जगाला देणगी असे म्हणणे जितके वृथा तितकेच हे असे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंटरेस्टिंग चर्चा आहे. इथेच वरती ऋषिकेश ने म्हंटल्याप्रमाणे 'लोकशाही' हे सर्वात मोठी देणगी असावी. स्वातंत्र्य १९४७ ला मिळाले पण त्या आधीच सुमारे २० वर्षे लोकनियुक्त प्रतिनिधी हा प्रकार सुरू झालेला होता काँग्रेस मधे. त्यामुळे लोकशाही सरकारची तयारी आधीपासूनच होती.

मला एका बाबतीत कुतूहल आहे. ब्रिटिश अंमल येण्याआधी भारतात विविध "राजे" होते. मग ते परत जाताना ब्रिटिश इंडिया नक्की कोणाकडे जाणार होता? तेव्हाच्या जनतेचे प्रतिनिधीत्व काँग्रेस करत होती, म्हणून काँग्रेस कडे व काँग्रेस ही एक अंतर्गत ("ऑल्मोस्ट" Smile ) लोकशाही असलेली संघटना म्हणून स्वतंत्र भारतात लोकशाही सरकार आले - असे काहीतरी झाले का? यात "ब्रिटिश इंडिया" म्हंटले आहे कारण संस्थानांना त्यांनी काय करायचे ते ठरवण्याचे स्वातंत्र्य कागदोपत्री होते. मग त्यांनाही सामील करून घेतले गेले वगैरे तो भाग वेगळा (ज्यांना शब्द माहीत नाही त्यांच्याकरता - १९४७ साली भारतात बराच भाग संस्थानांच्या अमलाखाली होता, तर उरलेला भाग थेट ब्रिटिश अमलाखाली -त्याचा बहुधा 'खालसा मुलूख' असा उल्लेख जुन्या पुस्तकात वाचलेला आहे. कागदोपत्री काँग्रेस सुरूवातीला सत्तेवर आली ती "ब्रिटिश इंडिया" या भागाकरता.).

#४ - मुस्लिम म्ह्णजे राज्यकर्ते या अर्थाने का? ती राज्ये बरीचशी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश स्थिरावण्या आधीच मोडकळीला आलेली होती ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खफवरून साभार...

आजच्या सर्वसामान्य ब्रिटिश लोकांचं भारताबद्दल - विशेषतः ब्रिटिश साम्राज्याबद्दल - काय मत असतं हा एक प्रश्न मला पडला होता. म्हणून ओळखीच्या (खर्‍याखुर्‍या) ब्रिटिश लोकांना विचारत असतो. (हे अर्थातच प्रातिनिधिक नाही, माझ्या मर्यादित वर्तुळातले आणि मेट्रोपोलिसमधल्या लोकांचे अनुभव, वगैरे...)

- साम्राज्यवादाबद्दल काहीही "वाटायची" धार आता जवळजवळ गेली आहे. म्हणजे दोन्ही अर्थांनी. कॉलनीजवर आपण अत्याचार केले असंही वाटत नाही, आणि द्वेषही नाही. न्यूट्रल भाव.
- बर्‍याच जणांच्या पूर्वजांचा कॉलनीजशी काही ना काही संबंध होता. व्यापारी, सैनिक, खलाशी, कारकून म्हणून. ते लोक त्या कॉलनीबद्दल जरा आत्मीयतेने बोलताना दिसतात.
- कॉलनीजमधून जे काही ब्रिटिश लोक घेऊन आले, त्याने मूठभर लोकांच्याच समृद्धीत भर पडली. बाकी प्रजा तशी गरीबीतच होती. (साहित्यातही त्याचं प्रतिबिंब आहे - डिकन्स, वुडहाऊस वगैरे.)
- आपण कॉलनीला काय दिलं (पोस्ट, रेल्वे, इ.) याबद्दल मतं विचारली असता त्यांचा ओव्हरऑल सूर "इट वॉज अ कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस" असा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ब्रिटिशांपासून घेता येण्यासारखा एकच महत्वाचा गुण आपण घेतला नाही, तो म्हणजे शिस्त! त्यामुळेच आपल्याकडे अगदी गल्लीपासून लोकसभा,राज्यसभा , इथपर्यंत गदारोळ पहायला मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक दोन मुद्दे(!)घेऊनच वाद चाललाय.माशीचे पंख भिजततील एवढा चहातरी ओता.(गम्मत)
फक्त ब्रिटिशांमुळेच इथे काही उलथापालथ झाली समाजव्यवस्थेत असं नाही.इतर कोणी युअरोपिअन्स आले असते /बरेच वर्ष राहिले असते तर हा मुद्दा आहेच.मुसलमानी राजवट चालू राहिली असती तर शष्प फरक झाला नसता.
१) त्यांच्या हपिसरांनी फावल्या वेळात प्राणी पक्षीजगत,जातीजमातींच्या नोंदी केल्या.भाषेंचे शब्दकोश बनवले.
२) ज्याला जे काम येतं तो योग्य जागी नेमला जाऊ लागला.जातीव्वस्था अशी आपसूकच मोडून पडू लागली.कामाशी मतलब.
३) एकछत्री कारभार आला.
४) दारूला राजमान्यता मिळाली.जी अगोदर नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुसलमानी राजवट स्टॅटिक नव्हती. त्या काळात मध्यपूर्वेतून अनेक इन्व्हेन्शन्स आपल्या इथे आलेली आहेत. केस इन प्वाइंट- तोफखाना, कागद, आणि किल्लेबांधणीतील तंत्रे. बंदूकही त्याच काळात आलेली आहे.

बाकी दारूला राजमान्यता होतीच. जसे लोक आज नाक मुरडतात तसेच तेव्हाही होते, पण कलाल म्हणजे दारू विकणारा हा फॉर्मली रेकग्नाईझ्ड व्यवसाय होता. त्याच्यापासून कर घेतला जात असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तरी वातते की ब्रिटिश आले हे खूप चांगले झाले.१८०० च्या सुमारास भारत अशी अनागोंदी होती की इतर कोणीतरी आलेच असते.त्यात कोणीतरी अफगाण वगरे येऊन राज्य करण्यापेक्षा ब्रिटिश बरे होते.लोकमान्य टिळकांवर १९१६ मध्ये राजद्रोहचा तिसरा खटला झाला होता आणि त्यात ते निर्दोष सुटले.म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधी असलेल्यांबाबतही कायद्याचे राज्य ब्रिटिशनी दाखविले होते. ब्रिटिशांनी जिझिया कर लादला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0