विनोदाला साहित्यिक मूल्य कमी का मानलं जातं?

उल्का यांनी लिहिलेल्या पुलंवरच्या कवितेवर आलेल्या अनेक प्रतिसादांत पुलंनी वैचारिक लिखाण केलं का? असा प्रश्न उपस्थित होताना पाहिला. माझ्या मते त्याचं उत्तर हो असं आहे. फक्त त्यांनी ते लिखाण जडजंबाल समीक्षकी भाषेत न मांडता हलक्याफुलक्या भाषेत मांडलं इतकंच. मी दोन उदाहरणं देतो.

'एकअक्षरकळलंतरशपथ' असलेली सौंदर्यशास्त्राची खिल्ली उडवणारी कथा. ही कथा असली तरी त्यात घडत काहीच नाही. दोन मित्र बोलत असतात. आणि एक 'भिंत पिवळी आहे' हे सौंदर्यवाचक विधान कसं आहे हे वेगवेगळी चलं आणि समीकरणं घेऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ऐकणारा नरेटर त्याला प्रश्न विचारत राहातो, मध्येमध्ये विधानं करत राहातो. यातून लेखकाचा सांगण्याचा उद्देश आहे की 'सौंदर्य ही काही समीकरणांत बांधण्याची गोष्ट नाही. ती जेव्हा आतमध्ये भिडते तेव्हा आपण हेलावतो आणि त्या हेलकाव्यांतून सौंदर्यानुभूती दिसते.' यासाठी तो सिल्लू काटपेटिया आणि इतरही सौंदर्यवतींचे दाखले देतो. कोणा अशाच सौंदर्यवतीचा शेपटा आपल्या पेपरवर पडल्यामुळे पेपर कोरा देण्याची गरज वाटते ती सौंदर्यानुभूती. तिला असल्या क्ष, य मध्ये बांधून तिचं गणितीकरण करणं बरोबर नाही असा त्यांचा मुद्दा होता. त्यांचा रोख अर्थातच मर्ढेकरांच्या सौंदर्यविषयक मांडणीबद्दल होता. याचा अर्थ मर्ढेकरांचा प्रयत्न योग्य नव्हता असं नाही. पण त्या प्रयत्नात अपयश येणार किंवा त्यांना मूलभूत मर्यादा आहेत हे पुलंनी हसतखेळत सांगितलं. म्हणून त्यांचा मुद्दा बरोबर असो की चूक असो, पण कमी गंभीर ठरत नाही.

"मी ज्ञानाच्या उपासनेत शरीर झिजवले नाही कि तत्वज्ञानाच्या काठिण्याचा अनुभव घेतला नाही . मी वर्तमानाच्या क्षणिक लहरीवर जगणारी एक यःकश्चित युवती आहे. भविष्यकाळाचे विविध, तलम तरंग माझ्यामधून संक्रांत होतात आणि भूतकाळात मिळून जातात, आणि मग मला माझे सत्य त्या भूतकाळात दिसते, भविष्यकाळात नव्हे. चालत असता पावलांची खूण उमटून त्यात पाणी साचावे अन मागे वळून पाहताना त्यात चंद्राचे किंचित प्रतिबिंब दिसावे, तसे सत्य मला दिसते. ते सत्य माझेच, माझ्यापुरतेच असते, कारण त्यावर माझ्या जीवनाची रक्तमुद्रा असते. त्याच दान करता येत नाही की इतरांकडून त्याचा स्वीकार करता येत नाही. प्रत्येकाने आपापले सत्य स्वतःच्या रक्ताच्या स्पंदनांवर पारखून घ्यावे लागते. ज्या सत्याची देवाण घेवाण होवू शकते, किंवा ज्यांबाबत विविध प्रकृतींच्या जनाचे एकमत होते, ती सत्ये क्षुद्रमोलाची असतात.

वारा वाहतो, झाडाची पाने येतात, शिलाखंड पाण्यात बुडतात ही निव्वळ घटिते अहेत, त्यांच्यावर माझ्या भोगांची, हर्षाची मुद्रा नाही. म्हणून ती घटिते म्हणजे माझी सत्ये नव्हेत, एवढेच माहीत असलेली मी एक अज्ञ आहे."

- चंचला

('विदूषक': काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी)

जीएंनीदेखील प्रचंड वैचारिक लिखाण केलं. पुलंनी जसं ते विनोदाच्या आवरणात दडवलं, तसं जीएंनी अत्यंत रसरशीत भाषेच्या शुगरकोटमधून दिलं. पण नीट पाहिलं तर दोघंही एकच गोष्ट म्हणतात हे स्पष्ट व्हावं. चंचला जे सत्याच्या बाबतीत सांगते तेच पुलंचा नरेटर सौंदर्याबद्दल म्हणतो. मात्र समीक्षक मंडळी जीएंच्या मांडणीने जास्त हेलावून जाताना दिसतात.

दुसरं उदाहरण म्हणजे बटाट्याच्या चाळीतलं सांडग्यांच्या चाळीमध्ये गेलेलं सांस्कृतिक शिष्टमंडळ. कम्युनिझम म्हणजे काय, कम्युनिस्ट राजवटी कशा चालतात, त्या चालवण्यासाठी तिथल्या राजकीय शक्ती सामान्य माणसाच्या अभिव्यक्तीवर कशी बंधनं घालतात, यातून सेन्सॉरशिपचा कसा जन्म होतो, तिथली सामान्य जनता या सगळ्याला गांजलेली असली तरी त्याविरुद्ध बोलू कशी शकत नाही, तरीही या राजवटीची भारतात काय प्रतिमा आहे आणि इथले तथाकथित विचारवंत (नागूतात्या आढ्ये) तिची कशी आणि का तळी उचलतात - या व अशा अनेक विषयांबद्दल भाष्य या कथेत आहे. आता केवळ ती विनोदी आणि रंजक आहे म्हणून त्या कथेत विचारच नाहीत असं म्हणायचं का? किंबहुना तत्कालीन राजकीय-सामाजिक-वैचारिक परिस्थिती ती रंजकता वाढण्याचं कारण ठरते. आणि याचं कारण उघड आहे - ती कथा किंवा प्रसंगचित्रण हे हुबेहुब तत्कालीन परिस्थितीचं चित्रण आहे.

एकंदरीतच वैचारिक लिखाण हे निबंधलेखनाशी संलग्न झालेलं आहे. शाळेत शिकल्याप्रमाणे एखाद्या विषयावर एकामागोमाग एक मुद्दे मांडून आपली बाजू मांडली की ते वैचारिक लिखाण, बाकीचं सगळं ललित किंवा गंमतीदार - अशी काहीशी आपली मनोवृत्ती बनलेली आहे. त्यामुळे रंजकता नसलेलं लिखाण हेच वैचारिक लिखाण समजलं जातं. विचार आणि रंजन हे काल्पनिक द्वैत आहे. वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळू शकतं, पण मिरासदार किंवा चिं. वि. जोशींना ते मिळू शकत नाही हे सत्य आहे. आत्तापर्यंतच्या साहित्यिक नोबेल पारितोषिकांविषयी पाहिलं तरी हेच चित्र दिसतं. डारियो फो हे एकच नाव विनोदी लेखक म्हणून डोळ्यासमोर येतं. आणि त्यालाही ते मिळालं याचं कारण म्हणजे त्याने लिहिलेली परिणामकारक, इटालियन समाजातल्या भ्रष्टाचारावर घणाघाती टीका करणारी, सामाजिक भान असलेली नाटकं. सामाजिक व्यंग अधोरेखित करणारांना हा सन्मान मिळू शकतो, मात्र व्यक्तिगत व्यंगांची चित्रणं कितीही प्रभावीपणे केली तरी ती 'टवाळा आवडे विनोद' या उक्तीनुसार हीण समजली जातात. सिनेमांच्या पारितोषिकांबाबतही हीच गत आहे. आत्तापर्यंत किती आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्समध्ये विनोदी चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झालेली आहे?

थोडक्यात, जीवनविषयक भाष्य प्रभावीपणे करणं हे उत्कृष्ट कलाकृतीचं लक्षण मानलं जातं. मात्र हे भाष्य तुम्ही कुठच्या 'भाषेत' करता यावरून ते भाष्य किती गंभीरपणे घेतलं जातं हे ठरताना दिसतं. विनोदी लिखाण म्हणजे गंभीर नाही असा काहीसा रूढ संकेत आहे का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.166665
Your rating: None Average: 4.2 (6 votes)

साहित्याचा उद्देश काय?

तो जर - लोकांना एखाद्या कृतीला उद्दुक्त करणे- असा असेल, तर बहुतांश विनोदी लेखन या निकषावर खरे उतरत नसावे (आणि म्हणून त्याचे साहित्यिक मूल्य कमी समजले जात असावे).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साहित्यिक मूल्य वगैरे मला कळत नाही त्यामुळे पास. पण .....

मागे एका प्रतिसादात मी विनोदाचा उपयोग करून केल्या जाणार्‍या टिपण्णीविषयी लिहिले होते. विनोदाचा उपयोग करून केलेली टिपण्णी ही ज्याच्यावर टिपण्णी केली त्याच्यासाठी अन्यायकारक असते. कारण त्या टिपण्णीचा प्रतिवाद करणे अशक्य होऊन बसते. टिपण्णीचा प्रतिवाद कोणी करू लागला तर लोक त्याला "अहो विनोद होता तो; काय सिरिअसली घेता !!" अस म्हणतील.

पुलंचंच उदाहरण घेऊ....

"अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

याचा प्रतिवाद एखादा समाजवादी करू जाईल आणि म्हणू लागेल की रामाला शेपूट येणं किंवा पांडबाला हात फ़ुटणं हा समाजवाद नव्हे तर लोक त्याला वरीलप्रमाणे बोलतील. पण ही वाक्ये मात्र समाजवादाचा प्रतिवाद म्हणून लोकांच्या मनात घट्ट बसलेली आहेत. [दुर्दैव म्हणजे पुलंची समाजवादाची स्वत:ची समज अशी असेल असे वाटत नाही].

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अंतू बर्वा हे वैचारिक लिखाण नाही, ते व्यक्तीचित्रण आहे. त्यामुळे त्याने मांडलेले विचार हे समाजवादाच्या विरोधातले विचार नसून तशी विचारपद्धती असलेल्या एका सामान्य माणसाचं चित्रण आहे. त्यातला समाजवाद-विरोध हा लेखाचा आत्मा नसून त्या व्यक्तीमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी एक आहे.

मी लेखात दिलेल्या विचारमांडणीचं तसं नाही. आख्खे लेख, त्यातली पात्रं ही त्या विचारमांडणीसाठी बनवली, वाकवली आहेत. माझा मुद्दा असा आहे की अशा विनोदी पद्धतीने लिहिलेल्या लेखात एक वैचारिक सूत्र आहे हे लोकांना दिसत नाही, किंवा त्याबद्दल लेखकाला पुरेसा मान मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंतू बर्वा वैचारिक नाही, हे पटले नाही.

लुक अ‍ॅट द होल पिक्चर. एका ठिकाणी विचारमौक्तिके उधळून, इतर ठिकाणी विनोदाच्या आवरणाखाली दुगाण्या झाडणे, याला अर्थ नाही. अर्थात विनोदातून विचार मांडता येतात या मूळ विचाराशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे पटले. अंतु बर्व्याची व्यक्तिरेखा पाहिली तर तो सर्वच राजकीय विचारसरणीबद्दल "काही उपयोग नाही" अशा अर्थानेच बोलत असतो. त्यात स्पेसिफिकली हे आलेले नाही पण हिंदुत्ववादाबद्दल जर तो बोलला असता तर असेच काहीतरी बोलला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समाजवादाबद्दल सामान्य लोकांच्या काय संकल्पना होत्या अशा अर्थाने मी तो पॅसेज घेतो. ते पुलंचे स्वतःचे विचार होते का नाही माहिती नाही. पण लोकांचं काय इंप्रेशन होतं ते हा पॅसेज दाखवतो. समाजवाद म्हणजे इनिक्वालिटी कमी करणे असं म्हणतात (इन्कमची/संधीची वगैरे वगिरे). इनिक्वालिटी कमी म्हणजे इक्वालिटीकडे जाणे हे चूक नाही. समाजवाद हे सगळ्या समस्यांवरचं उत्तर आहे असा प्रचार स्वातंत्र्योत्तर काळानंतर चालू होता असं ऐकलं आहे. त्यावरची ही प्रतिक्रिया वाटते.
बाकी समाजवाद म्हणजे नक्की काय हे मुलायमसिंगसुद्धा सांगू शकतील का देव जाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येथे अंतू बर्वा ऐवजी मी "खुर्च्या - एक न-नाट्य"चे उदाहरण देतो.

पु. ल देशपांडे यांचे हे लेखन विनोदी आहे, हे निश्चित.

परंतु त्यात "वाईट वठवलेले नाटक" आणि "न-पटणार्‍या धाटणीचे नाट्य" या दोहोंची मिश्र टीका केलेली आहे. विनोदनिर्मितीसाठी हे जरी ठीक असले, तरी "न-नाट्य (antiplay) ही पद्धत मुळातच पटत नाही" या साहित्यिक मुद्द्याचा प्रतिवाद करणे अशक्य होऊन बसते. कारण हे मूलगामी टीकेचे मुद्दे आणि वाईट वठवणीची खिल्ली या दोन्ही गोष्टी इतक्या घट्ट गोवलेल्या आहेत, की "पण ते-ते वाक्य वाईट नटा/दिग्दर्शनाबाबत विनोद आहे" ही पळवाट नेहमीच शिल्लक असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हसरी, टवाळ , विनोदी व्यक्ती ही approachable असते. विनोदाने हास्यनिर्मीती होते आणि हास्य हे २ हृदयातील अंतर दूर करण्याचे सर्वाधिक परिणामकारक एकक म्हणता येईल. उदा - आजोबा (किंवा आजी) जितके आठ्याळ्,रागीट तितके कमी approachable. पण तेच हसतमुख आजोबा पटकन मैत्रीच करावीशी वाटणारे. मग जर लेखकात आणि वाचकात हा आदरमिश्रित दुरावाच राहीला नाही तर वाचक, लेखकाला taken for granted करु शकतो. पटकन लेखकाला आपल्यातीलच मानण्याची चूक करु शकतो. म्हणजे लेखक हा बुद्धीने, श्रमाने कैकपट मोठा असेलही,पण त्याची रिलेटिव्ह किंमत घसरली जे की साहीत्यीक अवमूल्यनात प्रतिबिंबित होत असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

सहमत आहे. विशेषतः सांडगे चाळीबद्दल.

(अपूर्ण)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेखाशी सहमत आहे. यात भर म्हणजे त्यांनी बाबा-बुवांची यथेच्छ केलेली टिंगल. असामी असामीमधले गुरूदेव, रेडिओवरचा बुवावाणी कार्यक्रम, तुझे आहे मधले आचार्य या पात्रांमधून त्यांनी अध्यात्म किंवा इतर बुवाबाजी करणार्‍यांवर खूप परिणामकारक टीका केली आहे. जे आजचे पुरोगामी लोक साधं क्रिटिसाइज करतात तेच पुलं तुफान विनोदी अंगानी करतात.

पुलंनी स्वत: विनोदी लिहिणार्‍याला साहित्यिक/लेखक कसं गणलं जात नाही याबद्दल लिहिलं आहे. ऑफ्कोर्स विनोदी शैलीतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुझे आहे तुजपाशी मधल्या आचार्यांचं नाटकाच्या शेवटच्या प्रवेशातील मनोगत हे वैचारिक आहे (आणि ते विनोदी नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो. पण नाटकात त्यांची जी टर बाकीचे उडवतात काकाजी, सतीश वगैरे त्याबद्दल बोलतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत आहे.

विनोदाच्या अवमूल्यनामागे महत्वाचं कारण म्हणजे त्याच्या परफॉर्मिंग आर्टमधील सादरीकरणाच्या अफाट शक्यता व त्यामुळे होणारं ओवरएक्स्पोजर.आणि त्यामुळे विनोद म्हटलं की विनोदी सिनेमा,नाटक,स्टॅंडअप शोज, नकला इ.इ. मुळे एक वेगळी प्रतिमा व अपेक्षा आस्वादकाच्या मनात असते. लेखन यात सर्वात शेवटी येतं.उलट वैचारिक ,निबंधी लेखनाला वाचन हा अलमोस्ट एकमेव अ‍ॅप्रोच आहे म्हणून ते सामान्याला अप्राप्य असतं आणि वर कठीण भाषा .अधिक वैचारिक लेखनाला पॉप्युलर दृष्टीकोनातून मनोरंजन मूल्य नसतं.त्यामुळे मी नेहमी म्हणत असल्याप्रमाणे कमी मनोरंजक ते अधिक अभिजात,वैचारिक,बौद्धिक वगैरे या विचारसारणीच्या प्राबल्यातून वैचारिक ते श्रेष्ठ आणि मनोरंजक(विनोदी)ते हीन असा विचार शिकलेल्या व अतिशहाण्या वर्गात वाढला.

(अपूर्ण--लंच ब्रेक)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

विनोदी किंवा तिरकस लिहीणार्‍या लोकांना स्वतःला जे कळलंय ते इतर लोकांना समजावून सांगत बसायची इच्छा नसते (कारण काहीही असू शकते). विनोदाच्या आडचे सत्य समजून घेण्याएवढी लोकांची इच्छाशक्ती नसते (असती तर त्यांनाही ते आधीच कळले असते) किंवा ज्याने विनोदी लेखक अस्वस्थ होतो त्यात त्यांना काहीही वाटत नाही. त्यानुळे विनोदी लेखन कित्येकांना फालतू वाटत असेल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is NOT a plan!

+१ विनोदी किंवा तिरकस लिहील्यामूळे कदाचित जवाबदेही/कटकट टळत असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय,विनोदाला साहित्यिक मुल्य कमी असतं,कारण विनोदामध्ये सामाजिक भान नसतं असं म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

वरील प्रतिसादास निरर्थक श्रेणी देणे हे कुणीतरी उग्गं खुन्नस काढल्यासारखं वाटतंय असे नोंदवितो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

निव्वळ हास्यनिर्मीती गृहीत धरला आहे. पोट्भर हसा अन मग ते विसरुन कामाला लागा, भलेही त्याची अतिषय गरज असेल. पण इतर लिखाणांचे तसे नाही. ते अशा उद्देशासाठी लिहले जाते की ते लक्षात रहावे, परिणामकारक गणावे, विसरले जाउ नये. म्हणून त्याला ज्ञान/किमती/मुल्यवान गणले जाते.

...कितीही महान व यशस्वी कलाकार असला तरी गोविंदा सिंगल स्क्रिन थेटर हिरोच ठरतो. अन रॉकॉनवाला फरहान अख्तर मल्टीप्लेक्स हिरो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

कारण थोडावेळ हसा व विसरून जा अशा उद्देशामुळे जर विनोदी साहित्य कमी दर्जाचे असेल तर सगळे ललितही तसेच होईल. मग फक्त समाजसुधारणे करता लिहीलेले वैचारिक साहित्य हेच दर्जेदार म्हणावे लागेल.

माझ्या दृष्टीने अत्यंत उच्च दर्जाचे विनोदी साहित्य असू शकते (ज्या पुलं येतात) व अत्यंत फालतू दर्जाचे गंभीर ललित्/वैचारिक साहित्य असू शकते. उद्देश हा फार थोडा भाग झाला. प्रत्यक्ष साहित्य जे लिहीले जाते त्याचा दर्जा कसा आहे यावरही आहे ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोद निर्मीतीचे परिणाम-मुल्य हा भागही मुल्यात्मक तुलनतेत ग्रुहीत धरला जात असावा. आज मल्यावर शेकडो विनोद निघत आहेत काही तर अप्रतिम आहेत पण त्याचा (समाजमनावर) प्रत्यक्ष परिणाम काय ? काहीही होत नाही. मल्या अजुन काही भारतात येत नाही ?

आता असे समजु मल्याविरोधात एखादे सुसुत्र आंदोलन छेडले गेले, आंदोलनाची धुरा सांभाळणार्‍यांनी सत्यशोधक परीणामकारक भाषणे केली लोक संतप्त होउन रस्त्यावर आले आहेत. शक्य आहे सरकार काही हलचाल करेल. अन यात विनोदनिर्मीतीचा वापर केला जाउन समजा आंदोलनाचा जनाधार वाढवला गेला तरीही व्यवस्थीत लक्षात येइल की विनोद हा इथे सपोर्टींग अ‍ॅक्ट्रेस (अ‍ॅक्टर) आहे. मुख्य नायक न्हवे. आफ्टराल आंदोलन इज नॉट जोक.

आय थिंक ह्युमर इज कॅटालिस्ट(एंड इज नॉट लिमीटेड टु राय्टींग ओन्ली)... बट इट इज सो डॅम्न एफ्फेक्टीव दॅट वी आर कंपेल्ड टु फर्गेट धिस फॅक्ट.

ताक.:- आफ्टराल आंदोलन इज नॉट जोक.
वाह..! जोक चा अर्थच गांभिर्याने न घेण्यासाठी केलेली कृती होय, आणी विनोद याचा गाभा आहे, आणी जर विनोद गांभिर्याने न घेण्यासाठी केलेली कृती आहे तर इतर लेखन जे एक्स्प्लीसीटली गांभिर्याने घेण्यासाठी केलेली कृती असताना ( अथवा किमान जोक म्हणून घेतले जाउ नये असे असताना) इतर लिखाणांच्या तुलनते विनोदाला किंमत का बरे दिली जाइल ? कितीही क्रीएटीवीटी दाखवली तरी सोन्याची किंमत वेगळी अन चांदीच्या दागीन्याची किंमत वेगळीच. वी शुड नॉट कंपेर अ‍ॅपल विद ऑरेंजेस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

एकूणच विनोद ही टवाळांनी करायची नीच दर्ज्याची गोष्ट असे जुन्या काळापासून शिष्ट लोकांचे म्हणणे होते. "टवाळा आवडे विनोद" या समर्थोक्तीतूनही हेच दिसून येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुर्जींच्या लेखाशी सहमत. पण मला वाटतं, विनोदच काय, एकूण आनंदालाच साहित्यात फार मानाचं स्थान नाही. सुखात्मिका आणि सुखान्तिका लिहिणार्‍या लेखकाला असलेलं वजन आणि शोकान्तिका वा शोकात्मिका लिहिणार्‍या लेखकाला असलेलं वजन पाहिलं, तरी हे सहज लक्ष्यात येईल. मानवी दु:खावर उपाय सापडलेला नसणं हे या आकर्षणाचं कारण असेल का? हे फारच तत्त्वज्ञानात्मक (आणि माझ्या पे ग्रेडच्या वरचं) झालं. पण मला दुसरं काही कारण सुचत नाही खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सुखात्मिका आणि सुखान्तिका लिहिणार्‍या लेखकाला असलेलं वजन आणि शोकान्तिका वा शोकात्मिका लिहिणार्‍या लेखकाला असलेलं वजन पाहिलं, तरी हे सहज लक्ष्यात येईल.

याला अनेक कारणं असावीत. मला काही सुचतात ती अशी.
१. कलाकृतीचा विषय काय आहे त्यावर आपण किती प्रमाणात 'ह्यॅ, हे फालतू आहे!' असं म्हणायचं ते ठरवतो. म्हणजे दलितांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल सिनेमा असेल तर तो कितीही वाईट प्रकारे काढलेला असला तरीही 'याला वाईट म्हटलं तर ती कुठेतरी त्या दुःखाशी प्रतारणा ठरेल का?' असा काहीसा प्रश्न मनात येतो. वैयक्तिक दुःखावरच्या कलाकृतीबद्दलही तेच. एखादीच्या वेदनांचं पिळवटून टाकणारं चित्रण असेल तर त्याला वाईट म्हणणं हा तिच्या दुःखाचा अपमान ठरेल या अव्यक्त भीतीपोटी आपण ते चित्रण जास्त गांभीर्याने घेतो. सुतकाच्या वेळी टिंगल करायची नाही हा अलिखित नियम असतो तसं काहीतरी.
२. आयुष्य हे दुःखमय आहे, तेव्हा त्याचा अर्थ लावण्याचा मार्ग हा दुःखातूनच जातो असा काहीसा समज असावा.
३. चांगला विनोद करणं हे चांगली शोकांतिका लिहिण्याइतकंच कठीण असतं. मात्र शोकांतिका लिहिणाराला कणव असते, आणि वाचकाची सहानुभूती त्या कणवेला मिळते. याउलट विनोदी लेखक म्हणजे टिंगल करणारा माणूस, टवाळ अशी प्रतिमा असते. त्यामुळे त्याच्याबरोबर स्वतःवरच व आसपासच्यांवर हसलो तरी ती सहानुभूती मिळू शकत नाही.
४. विनोद हा बोचरा असू शकतो आणि ती बोच अंगाला लावून घ्यायची नसेल तर नुसतं हसून सोडून देणं सोपं जात असावं.

एवढं सगळं लिहिलं तरीही काही उत्तम विनोदाला समीक्षकांचीही दाद मिळालेली आहे. चार्ली चॅप्लिनचा मॉडर्न टाइम्स चटकन डोळ्यासमोर येतो. त्यातला तो एका जगड्व्याळ यंत्रात अडकून पिळला जाण्याचा विनोदी प्रसंग कुठच्याही गंभीर मांडणीइतकाच प्रभावी आहे. आणि त्याची दखल घेतली गेलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैचारीक लेख लिहीण्याकरता अतोनात श्रम घ्यावे लागतात जे की त्या लेखाच्या दर्ज्यामध्ये दिसून येतातच.
विनोदी तसेच ललीत लेखनिर्मीती करता श्रम लागतात का? नाही.
मग वैचारीक साहीत्यास अधिक मान का नसावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुभवावरून सांगतो. मला हजार-दोन हजार शब्दांचा वैचारिक लेख लिहायला कष्ट पडतात. पण त्याहून अधिक कष्ट तितकाच मोठा विनोदी लेख लिहायला पडतात. तेवढी किंवा त्याहून मोठी कथा लिहायची किंवा त्याच दर्जाचं ललित लिखाण करायचं तर त्याहून अधिक कष्ट पडतात. मेघनाचं याबाबतीत बरोब्बर उलट असेल. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, आवडनिवड वेगळी. मात्र असं असताना विनोदी लिखाणाला सन्मान कमी मिळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जनरली वैचारिक लेख लिहिणं फार सोपं असतं असं मला वाटतं. कारण बरेच संदर्भ उपलब्ध असतात.

विनोद करण्यात मात्र नाविन्य लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त संदर्भाच्या मदतीनं वैचारिक लेख लिहिता आले असते, तर अच्युत गोडबोले विचारवंत म्हणून गणले गेले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हम्म.

मला वाटतं बऱ्याच वैचारिक लेखांचे स्वरूप असे असते.

एक काहीतरी गोष्ट ठरवायची - "to prove". मग तिला प्रुव्ह करण्यासाठी इकडून तिकडून इतिहासातले दाखले शोधायचे, मान्यवर लोकांच्या quotes शोधायच्या. झालं काम!

यात ओरिजिनल कल्पना ही जर नवीन असेल तर तेवढ्यापुरते नाविन्य मानता येईल. बाकी सगळे कष्ट संदर्भ शोधण्यात आणि त्यांचे डब्बे योग्य क्रमांकाने जोडण्यात असावेत.

(वरती फक्त मला जे वाटतं ते लिहिलं आहे, खरोखरच वैचारिक लेखनाची प्रोसेस कुठे लिहिली असेल तर वाचायला आवडेल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोदी तसेच ललीत लेखनिर्मीती करता श्रम लागतात का? नाही.

हा निष्कर्ष कसा काढला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऑब्विअस श्रम न दिसल्याने. अर्थात मनुष्स्वभावातील विसंगती टिपण्याचे नीरीक्षण जबरी लागतं हे मान्य. अनुप तुम्हाला अदर्वाइज वाटत असेल तर तशी उदाहरणे द्या. इथे किंवा खवत कुठेही. मला कुतूहल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठरवून कोणत्याही "एका ठराविक" प्रकारचा साहित्यिक लेख लिहायला व तो चांगला लिहायला जेवढी मेहनत लागते किमान तेवढी मेहनत विनोदी लिहायलाही लागते असे मला वाटते. रोमॅण्टिक, सामाजिक, गंभीर, विनोदी यातील कोणत्याही प्रकारच्या चांगल्या कथेला सारखीच मेहनत व कल्पनाशक्ती लागत असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'पार्टनर'सारख्या कादंबर्‍या किंवा दवण्यांच्या कादंबर्‍या यांना साहित्यिक मुल्य नसते असे तुम्ह का बरे म्हणताय गुर्जी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मूल्य हे सापेक्ष असतं हे जर खरं मानलं तर एकंदरीत दर्जेदार विनोदी साहित्याला मिळालेला/मिळणारा प्रतिसाद पाहाता विनोदाचं साहित्यिक मूल्य कमीच असतं असं मला वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोण रे कमी मूल्य देतोय? मढं बशिवलं त्याचं! गुर्जी, तुमी लिवा हो. आम्ही देतोय पाच मूल्य त्या धाग्यावर. टेंशन नको!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बादवे हा लेख वैचारिक होता का विनोदी? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुला यात किती साहित्यिक मुल्य दिसतंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

साडे-तीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साडेतीन हा आकडा जातीयवादी घोषित करण्यात यावा असे या ठिकाणी सुचवतो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा, भारी, हे लक्षातच नव्हतं आलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर: साहित्यिक मूल्य कशात मोजतात? म्हणजे एका वैचारिक पुस्तकाचे साहित्यिक मूल्य १० असेल आणि विनोदी पुस्तकाचे ५, तर अशी दोन विनोदी पुस्तके जोडून वाचली तर टोटल साहित्यिक मूल्य त्या वैचारिक पुस्तकाएवढे होईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घासकडवी साहेब. लेखाचे गृहीत आणि टायटल बरोबर नाही असे वाटते. सरसकट विनोदी लेखनाला पेक्षा टायटल असे काहीतरी पाहिजे होते

"पुल, रमेश मंत्री, विआबुआ, दमा ह्याच्या विनोदाचे साहित्यिक मुल्य कमी मानले जाते का?"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१११११११

माझ्या कडुन अतिमार्मिक. काही लोकांना नीट विनोदी लिहीता आले नाही म्हणुन घासुगुर्जींनी एकदम संपुर्ण विनोदी साहित्यावरच प्रश्न निर्माण केला हे फारच भोचक पणाचे काम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शीर्षक थोडं गोंधळात टाकणारं आहे खरं. मला म्हणायचं होतं की साहित्यिक वर्तुळांत विनोदी साहित्याला आणि साहित्यिकांना त्यांच्या क्षमतेकडे लक्ष न देता केवळ विनोदी लिहितात म्हणून कमी सन्मान मिळतो का? आत्तापर्यंत मिळालेले पुरस्कार पाहाता मलातरी तसंच वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित साहीत्यिक कुठली भुमीका घेतो आहे आणि मांडतो आहे हे महत्वाचे असावे त्याला महत्व संन्मान मिळण्यात. लिखाणाचा प्रकार कोणता आहे हे तितके महत्वाचे नसावे. त्यामागे कंसीस्टंट अशी काही भुमिका आहे का हे जास्त मॅटर करत असावे. उदा भैरप्पा किंवा नेमाडे, अगदी तेंडुलकर वगैरे. कित्येक वेळा ही भुमिका पॉप्युलर नसेल तर सन्मान मिळणार ही नाही मोठ्या प्रमाणावर, पण छोट्या कंपुत तरी मिळेल.

बरेसचे विनोदी साहीत्यिक प्रत्येक प्रसंगावर शाब्दीक कोट्या करुन हशे टाळ्या मिळवत असल्यानी त्यांना महत्व दिले जात नसावे. किंवा त्या साहितिकांना स्वताचे महत्वच कमी केले असावे हे जास्त बरोबर.

ह्याचे पॅरलल सिनेमातले उदाहरण म्हण्जे लॉरेल हार्डी किंवा थ्री स्टुजेस ( अगदी चॅप्लीन ) ची कॉमेडी नक्की हसवुन जाते पण त्यांना सन्मान द्यावा का खरचं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोदी लेखनाचा प्रतिवाद करता येत नाही; असं वाटत नाही. मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधक (किंवा भक्त वि. इतर) अशी तुंबळ जालयुद्धं सुरू असतात त्यात दोन्ही बाजूंनी चांगले विनोद होतात असं दिसतं. याच हिशोबात ‌विनोदी लेखकांच्या मतांची, लेखनाची टिंगल करता येणं शक्य आहे. जर नवनाट्याची टिंगल करता येते तर टिंगल करणाऱ्यांना कसं ठराविक विषयाचं महत्त्व समजत नाही अशीही टिंगल करता येईल. पण विरोध होत नसेल याची दोन कारणं संभवतात - एकतर लोकांना विनोद सहन करता येतो (पण टीका सहन होत नाही) किंवा विनोद सहन झाला नाही तरीही उलट विनोद करता येत नाही.

सातत्याने भगव्यांची किंवा मोदी भक्तांची टिंगल करणारं लेखन केलं, तशा पोस्ट्स फेसबुकवर पसरवल्या तर आरोप होतात की तुम्ही एकाच बाजूवर टीका करता. दुसऱ्या बाजूने टिंगल करायला कोणी कोणाला रोखलेलं नाही, असा विचार होतो असं दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसर्‍या बाजूने टिंगलच होऊ शकते. प्रतिवाद होऊ शकत नाही.

Both sides get trivialized.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुद्दा वाद-प्रतिवादाचा नाही. साहित्यात विनोदी लिखाण या विधेला तथाकथित गंभीर लिखाण या विधेपेक्षा कमी महत्त्व दिलं जातं हा आहे. 'राग दरबारी'सारखी एखादीच कलाकृती साहित्य अकादमी पुरस्कारासाठी लायक ठरते, आणि तीही सामाजिक प्रश्नांवर भाष्य केलं म्हणूनच. उत्कृष्ट फार्सिकल लिखाणासाठी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळेल असं वाटत नाही. किंवा मध्यमवर्गीय मराठी जीवनावर भाष्य केलं म्हणून चिं. वि. जोश्यांच्या 'चिमणराव'ला कोणी कोसलाच्या तोडीचं मानेल असं वाटत नाही. पण कुठच्या निकषावर कोसला श्रेष्ठ ठरते हेही तितकंसं उघड नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वडार मुलाचं आयुष्य खेळकर शैलीत मांडणार्‍या 'फँड्री'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यातला बोचरा, काळा विनोद अतिशय उच्च दर्जाचा आहे.

मला वाटतं, विनोद करूनही पुरेसं महत्त्वाचं काही म्हटलं असेल तर पुरस्कार मिळतीलही. सहसा विनोद खाऊनपिऊन सुखी लोकांच्या आयुष्यांबद्दल असतात; काहीशी 'पहिल्या जगातली दुःखं'. "माझा मोबाईल कसा चार महिन्यात मोडला" आणि "मला रोज चार हंडे पाणी डोक्यावर वागवत आणावं लागतं" ह्यांतल्या कोणाकडे अधिक लक्ष जाणार हे वेगळं लिहायची गरज नाही. चिमणरावांना बहिणीच्या लग्नाची चिंता होती तेव्हा कितीतरी मुली-मुली सहा वर्षांची होण्याआत मरत होती.

मध्यमवर्गाकडून विनोद होण्यापेक्षा उपेक्षित वर्गाकडून काळा विनोद झाला तर तो नक्कीच अधिक भाव खाईल.

---

विनोदांची 'देवघेव' चर्चा असावी अशी मुद्देसूद असेलच असं नाही; पण "आम्हाला तुमच्या ट्रोलिंगला बळी न पडता तुम्हाला उत्तर द्यायचंय" प्रकारचा विनोद असू शकतो. मोदी समर्थक, आप समर्थक, बिनझेंड्याचे यांच्यात असं 'युद्ध' दिसतं. ५६ इंच, 'सब का विकास होगा, बराबर होगा', झाडूवरून पळून जाणारे केजरीवाल ही काही उदाहरणं पटकन आठवली. त्यांत अर्थातच व्यक्तिगत मानहानीकारक विनोदांना गणलेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असहमत. फॅंड्री हा कुठच्याच अर्थाने विनोदी चित्रपट नव्हता. त्यात काळा विनोदही नव्हता, उलट समाजाच्या एका स्तराच्या काळ्याकुट्ट परिस्थितीचं चित्रण होतं.

याउलट मध्यमवर्गीय जीवनाचं केविलवाणेपणाचं चित्रण चिमणरावमध्ये होतं. चार्ली चॅप्लिनच्या वेगवेगळ्या सिनेमांतून जगण्याची धडपड विनोदी पद्धतीने दाखवली आहे त्याच्याशी तुलना करता यावी अशा प्रकारचं. (त्यातलं कुठचं सरस यावर वाद घालता येईल, पण जातकुळी तीच.) त्यावेळी सहा वर्षांच्या आत अनेक मुलं मुली मरत असत हा त्या चित्रणाच्या पलिकडचा विषय आहे. तो घेतला नाही म्हणून त्या चित्रणाची शक्ती कमी होत नाही. कारण अशी व्हॉटअबाउट्री प्रत्येक कलाकृतीला लागू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तपशीलातल्या मतभेदांबद्दल नंतर वाद घालू.

चार्ली चॅप्लीनने मांडलेला पट आणि चिमणरावांचा पट ह्यांच्यात कोणाचं आयुष्य लोकांसमोर मांडण्याची प्रकर्षाने गरज आहे हे स्वयंस्पष्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही चर्चा 'चार्ली चॅप्लिन श्रेष्ठ की चिमणराव श्रेष्ठ' या पातळीवर कशी आली, आणि त्यातही स्वयंस्पष्ट काय आहे ते कळलं नाही. माझा मुद्दा असा होता की 'चिमणरावची जातकुळी चार्ली चॅप्लिनच्या विनोदाच्या जवळची होती तरीही नेमाडे, वि. स. खांडेकर यांचा विचार ज्ञानपीठ पारितोषिकासाठी होतो, पण चिं. वि. जोशांचा होत नाही. आणि हे बरोबर नाही.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जींशी सहमत. सविस्तर नंतर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गुर्जींशी सहमत.

सहमतीशी समहत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी असेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चाली चॅप्लीनची लोकप्रियता व समीक्षकप्रियता दोन्ही बघता विनोदाला न्यून दर्जा मिळतो असे म्हणायची भिती वाटेल. महाराष्ट्रानेही पुलं, अत्रे, चि.वि.ना जितके प्रेम दिले तितके जीए, नेमाडे वा खांडेकरांना नाही. तेव्हा नक्की प्रश्नच मला कळलेला नाहीये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तथाकथित उच्चभ्रू-समीक्षकी चश्म्यातून ठरवल्या जाणार्‍या मूल्याबद्दल आणि कालातीतपणाबद्दल गुर्जी बोलत असावेत. लोकप्रियतेबद्दल नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उच्चभ्रू-समीक्षकी चश्म्यातून ठरवल्या जाणार्‍या मूल्याबद्दल

ते होय! त्यांना सामान्य लोकं कुठे विचारतात! त्यांना काय वाटते याने किती फरक पडतो?
आणि उलटही
आता जीएंना समीक्षकांन्बी आणि हुच्चभ्रु वाचकांनी कितीही डोक्यावर घेतले तरी बहुतकरून लोकांना वाचताना झोपच येते, त्याउलट मिरासदारांची 'माझ्या बापाची पेंड' वाचु लागल्यावर येणारी झोप उडून वाचक मिरासदारीतील पुढिल कथा उघडतो. तेव्हा साहित्यिक मुल्य कोणाचे अधिक हे तिथल्यातिथे स्पष्ट होते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला हा दृष्टिकोन थोडा 'अधिक एसेमेस करा विजेता बनवा'छापाचा वाटतो. (आणि मला मिरासदार का कोण जाणे, फार क्लिक झाले नाहीत कधी. :प) पण ठीक, या आवडीनिवडी व्यक्तीगणिक बदलतात हे ठीकच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तसे नव्हे. साहित्यिक मूल्य ठरवायचा मक्ता त्या समीक्षकांकडे कोणी दिला असा तो प्रश्न आहे.
का फक्त लोकप्रिय आहे म्हणून साहित्यिक मुल्य कमी असे गणित आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"लोकप्रिय आहे म्हणून साहित्यिक मुल्य कमी असे गणित आहे?" हे तर ऋच्या मनाचे श्लोक आहेत! त्यामुळे ते असो. बाकी साहित्यिक मूल्याबद्द्दल: समीक्षकांचं गिल्ड बनवायचं का आता? आपण नाही मानायचं समीक्षकांचं मत. ज्यांना मानायचं आहे, त्यांना पडतात प्रश्न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण मग हे प्रश्न समीक्षकांना विचारायल हवेत ना?
आमच्यासारख्या सामान्य जनतेला विचारले तर ते म्हणतील "काहीही हं मे! माम्हाला तर उलट विनोदी लेखक/कलाकारच लै उच्च वाटतात."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन