फिरसे आइयो....

"अजीब है हमारी मिठू.. गुस्सेली भी बहुत है और शांत भी बहुत है, दुःखी भी बहुत है और हंसती भी बहुत है.. बस, पागल नही है बाकी सब कुछ है..."
मिठू.. एकाकी आणि निराश आयुष्य जगणारी मुलगी. ढगासारखी सतत दिशा, जागा बदलणारा गेरुलाल तिच्या आयुष्यात आशेचा किरण आहे असं तिला वाटत असतं, त्याच्यातंच ती स्वतःचा आनंद शोधत असते, प्रेम करत असते त्याच्यावर. गेरुलाल ट्रक ड्राईवर आहे आणि त्यामुळे तो फार काळ एका जागी टिकू शकत नाही, याच्याशी तिला काहीच घेणं देणं नसतं...एवढंच नव्हे तर तिचं त्याच्यावर प्रेम आहे याची किंचीतही जाणीव गेरुलाल ला नाहीये याचीही तिला पर्वा नसते, ती त्याला तशी जाणीव करुन देण्याचा कधी प्रयत्नही करत नाही कारण त्याच नुसतंच असणं सुद्धा तिच्यासाठी खूपकाही असतं...

हा सिनेमा पाहताना जाणवलं, इजाजत मधली माया आणि आंधी मधला जेके या दोघांसारखीच नमकीन मधली मिठूपण कविता करते...
मिठू बोलू शकत नसते, मुकी असते आणि तिच्या कविताच तिच्या भाव-भावना असाव्यात असं वाटत... ती तिची दुःख, भिती ,तिची स्वप्नं आणि तिच्या आकांक्षा तिच्या कवितांतून मांडते.
तिच्या आयुष्याचं ते 'तसं' आहे, हे वास्तव नाकारण्यासाठी माया आणि जेके प्रमाणेच मिठूसुद्धा कवितांचं माध्यम वापरते...
"माया".... प्रियकराचं लग्न होऊनही त्याच्यावरचं निरातिशय प्रेम करत राहणारी आणि यातून आपण कुठेच पोहोचणार नाही याची पुरेपुर जाणीव असणारी एक प्रचंड हळवी मुलगी,
"जेके"....एका अतियशस्वी, सत्तेवर असणा-या आणि संसारात त्याला अर्ध्यावर सोडून गेलेल्या बायकोचा नवरा,
आणि "मिठू".... कायमंच दारिद्र्यात राहीलेली, हाल सोसलेली, म्हाता-या आईसोबत, दोन बहीणींसोबत राहणारी एक मुकी मुलगी...
- अनिश्चितता आणि दुःख, निराशा आणि वेदना, यातून सुटका...सुटका नव्हेच केवळ सुटकेचा आभास म्हणून शब्दांच्या, कवितांच्या माध्यामातून व्यक्त होणा-या या तिघांतही मला मेजर साम्य वाटतं...
---------------------------------------------------------------------------------------------

पदोपदी गुलझार जाणवतो हा सिनेमा पाहताना, संवादातून, जास्त मिर्च मसाला नसलेला हा सिनेमा आवडून जातो, गुलझारच्या सिनेमा मध्ये शर्मिला टागोर सुद्धा ग्लामर नसलेली भूमिका उत्तम करू शकते हे जाणवत इथे.
या सिनेमातील हे गाणं विशेष आहे,
.....नेहमीप्रमाणे या तिघांनी(गुलजार, आर् डी, आशा) एकत्र येऊन जीवघेणं सुंदर असं काहीतरी आपल्याला दिलंय ...पण हे गाणं बघताना शबाना च्या (मिठू) प्रेमात पडायला होतं...(ती नेहमीच उत्तम काम करते) एकही शब्द न बोलता(उच्चारता) या गाण्यातून (खरतर संपूर्ण सिनेमातूनच) ती खूप काही सांगून जाते. पूर्ण गाण्यात तिच्या चेह-यावर एक नाजूकस हास्य आहे, तिचे डोळे पण हासतात गाणभर... ज्यातून अगदी सहज तिच्या मनातलं समजून जातं... डोंगर द-यांत, दाट धुक्यात अनवाणी फिरताना ती अतिशय तृप्त आणि आनंदी दिसते... जगाची तिला पर्वाच नाहीये, कोणी समजून घेवो ना घेवो...ही धून, हे शब्द, तिचे...तिच्यासाठीचे आणि तिच्या 'त्याच्या'साठीचे आहेत
..बास एवढंच!!!!

"फिर से आईयो, बदरा बिदेसी
तेरे पंखो पे, मोती जड़ूंगी
भर के जाईयो, हमारी तलय्या
मैं तलय्या किनारे मिलूंगी
तुझे मेरे काले कमलीवाले की सौंध

तेरे जाने की रुत, मैं जानती हूँ
मूड के आने की रीत, है के नहीं
काली दरगा से पूछूंगी जा के
तेरे मन में भी प्रीत, है के नहीं
कच्ची पुलियां से, हो के गुजरीयो
कच्ची पुलियां किनारे मिलूंगी

तू जो रुक जाए, मेरी अटरिया
मैं अटरिया पे झालर लगा दूँ
डालू चार ताबीज़ गले से
अपने काजल से बिंदीया लगा दूँ
छू के जाईयो, हमारे बगीचे
मैं पीपल के आड़े मिलूंगी
-गुलज़ार"

~अवंती

https://youtu.be/s-wG3o_z_vw

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हा सिनेमा पाहीला आहे, दोनदा.

शेवटी जेव्हा पोक्त, अनुभवाने प्रगल्भ झालेली शर्मिला, संजीव कुमारला भेटते आणि यावेळेला नेहमीसारखी सतत सतत आढेवेढे न घेता, संकोच न ठेवता त्याच्या मीठीत आश्वस्तपणे स्वतःला सोपवते - तो भाग फार आवडला. कारण सतत कुटुंबाचा भार उचलणारी, कुटुंबाकरता त्याग करणारी ती सारखी अगदी हवहवसं प्रेम नाकारत रहाते पण शेवटी तिला ते मिळतं.

वहीदा रेहमानचे कामही सुरेख.

मिठू छान आहेच पण शर्मिला फार फार आवडली.
_____
गाणं ऐकते आहे. अतिशय सुंदर. कोवळं... सुरेल.
___
Unrequited love - या विषयावर इतकं काव्य आणि साहीत्य होऊ शकतं. अनंत वेदनांचं, Longing, प्रेम आणि अभिलाषेचे भांडार. मला अतिशय आवडणारा प्रेमाचा प्रकार आहे. कारण सच्चेपणा, वेदना आणि इन्टेन्सिटी .... एकदम जीवघेणं.

खरं आहे, शर्मिला कधी नव्ए ते चांगली वाटते या सिनेमात, एक म्हणजे डोक्यावर तो डोंगर नाही आणि दुसरं म्हणजे लचकणं मुरडणं नाहीये. पण सिनेमा खास मिठूमुळंच वाटतो, गेरुलाल आहेचं...वहिदासुद्धा छानच, शेवटी मात्र शर्मिला लक्षात राहील इतकं सुंदर काम केली आहे. शबाना फक्त हावभाव आणि डोळ्यांतून अख्खा सिनेमा खातेय ...

आम्ही अस्सेच आहोत

हं! शबाना काम छानच करते. तिचा मासूम सिनेमा .... मला डोळ्यात पाणी येतं तिची घालमेल पाहून.