इतर

आमची मराठी वेब सिरीज

नमस्कार,

  • आजच्या धावपळीच्या जगात लोकांमधला खरा संवाद हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं का?
  • घरात, बाहेर सगळीकडे सर्वजण आपापल्या मोबाईल-कॉम्पुटर मध्ये डोकं खुपसून बसलेत असं तुम्हाला वाटतं का?
  • पुढच्या पिढीचे गॅजेट ऍडिक्शन मुळे वांधे होणार आहेत अशी तुम्हाला सतत चिंता वाटते का? या चिंतेमुळे तुम्ही एक-दिवसाआड उसासे सोडत आपलं ब्लडप्रेशर वाढवत आहात का?
  • घरोघरी सतत चालू असणारे टिव्ही., त्यावरच्या अमृत-प्राशन केलेल्या मालिका - यात रमणार्‍या कुटूंबातील प्रत्येकाचं घरातल्या माणसांशी नातं आणि संवाद दोन्ही तुटत चाललंय, असं तुम्हाला वाटतं का?
स्पर्धा का इतर?: 

बाबुरावपेंटर

जलवाहिनी

रंगपंचमी

स्पर्धा का इतर?: 

स्वमग्न लोनसम

स्वमग्न लोनसम
त्याला बघितल्या बघितल्या पहिल्यांदा मला आठवलं ते "अलिबाबा चाळीस चोर"...
लहानपणी बघितलेलं...
गिरगावच्या साहित्यसंघात...
सुट्टीत... अशाच रण्ण उन्हाळ्यात.
बहुतेक सुधा करमरकरांचं असावं कारण प्रॉडक्शन खूपच छान होतं.
खास करून गुहेतला खजिना:
त्यातल्या हंड्यातून सांडणाऱ्या धम्मक पिवळ्या सोनमोहोरा...
त्यांचं ते पिवळं गारूड अस्संच!

स्पर्धा का इतर?: 

ऑसम पियानो वर थ्रीसम : अर्थात किती किती सांगू तुला आणि कसं कसं सांगू तुला अर्थात काय लिहू न कसं लिहू ?

गेले सात दिवस पहाटे पाचच्या सुमारास उगवणारा सूर्य एकाच तीव्र स्वरात तळपत रात्री जवळजवळ नऊ वाजेपर्यंत निरभ्र आकाशात त्याचं रॉक संगीत लावून ठेवतो आहे. मे महिन्यात पूर्व युरोपातल्या एकदा देशात अशी घटना घडते आहे , वसंतातच कड्डक उन्हाळा सुरु झालाय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग चा जिताजागता पुरावाच आहे हा ! मे महिन्याच्या सुरुवातीला , म्हणजे वसंताच्या सुरुवातीला छान फुललेले हिरवे हिरवे गार गालिचे आता सुकू लागले आहेत , काळपट तपकिरी पडू लागले आहेत. झाडं आणि फुलं नाही म्हणायला अजून फुललेली आहेत पण पावसाचा शिडकावा झाला नाही तर तीही लवकरच सुकून जातील.

स्पर्धा का इतर?: 

चित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - अरुण खोपकर

Mughal Miniature - frame within frame

चित्रप्रवेशाच्या पायवाटा आणि राजमार्ग - एक mise en abîme

स्पर्धा का इतर?: 

सत्तरच्या दशकातील रॉक

१९२० च्या दशकात ब्लूज आणि स्विंग , १९५० च्या दशकात रॉक अँड रोल हे नवीन जॉन्र आले,स्थिरावले आणि लोकप्रिय झाले .
रॉक म्युझिकची सुरुवात जरी १९६० च्या दशकात झाली असली तरी १९७० च्या दशकात जास्त संख्येने अत्युत्तम रॉक गाणी झाली . इथे त्यांचा थोडा परिचय देत आहे . काय ऐकताय या धाग्यावर सुरुवात केली होती . मॅनेजमेंट च्या आदेशामुळे वेगळा धागा काढत आहे .
मालक जंतू यांच्या आदेश /हुकुमावरून ख फ वरून हि गाणी धाग्यावर आणत आहे .

स्पर्धा का इतर?: 

मूकपट आणि आजचं संगीत:

गेला आठवडा मस्तच बिझी गेला. रविवारी तारनोव्सक्ये गूरं (गूर-याचा अर्थ पोलिश मध्ये डोंगर. संस्कृत गिरी शी अगदीच साधर्म्य असलेला हा शब्द आहे ) या शहरात एक फेस्टिव्हल होता. जुन्या मूकपटांना लाईव्ह संगीत देण्याचा उद्योग करणारे काही ग्रुप पोलंड मध्ये आहेत. आमचा ग्रुप ही त्यातलाच एक. मी , मालविना पाशेक , प्योत्र मेलेख , बोरिस स्लोविकोवस्की असे आम्ही अर्थात "बेदेबेदे आणि पुरंदरे" ग्रुप चे सदस्य गेली काही वर्षे ( दुर्दैवाने फार नियमित नाही) जुन्या मूकपटांना लाईव्ह संगीत देण्याचा उद्योग करतो आहोत. तर या अशा एकमेव म्हणता येईल अशा फेस्टिव्हल च्या तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात आमची वर्णी लागली.

स्पर्धा का इतर?: 

मुले आणि आपण आणि संगीत/वाद्य साक्षरता वगैरे वगैरे

एक मार्च रोजी संध्याकाळी आमच्या साऊंड कार्ट ( मूळ पोलिश नाव देवनागरी मध्ये लिहिणं फारच मुश्किल आहे ) चा परफॉर्मन्स झाला. यामध्ये खरं तर एक ते सव्वा तासामध्ये आम्ही दोन कथा ( परीकथा म्हणता येतील अशा, आणि या दोन्ही इटालियन आहेत) सादर करतो. सादर करतो म्हणजे त्या कथा संगीतातून सांगण्याचा प्रयत्न करतो , त्याला कथेचं musical interpretation असंही म्हणता येईल. माझ्या मनात ही कल्पना फार आधीपासून होती. आणि यामध्ये पूर्ण अंधारात हा प्रयोग करावा असा माझा मूळ इरादा होता. पूर्ण अंधारात यासाठी की ऐकण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित व्हावं.

स्पर्धा का इतर?: 

रंग : उतरणारे , उतरलेले , उडणारे , उडालेले : एका जुन्या अज्ञात चित्राचं ध्यानवृत्त

चार पाच दगडी पायऱ्या उतरून रेस्तराँ मध्ये येतो. मंद जॅझ संगीत (आमच्या पोलंड मध्ये या जॅझ संगीताचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात सारखा सारखा कोमल रिषभ लागतो, धून भैरव थाटाकडे झुकते , ऐकणाराला या कोमल रिषभाच्या जागा आधीच लक्षात येऊ लागतात. दुसऱ्या प्रकारात मात्र हा कोमल रिषभ क्वचित कधीतरी येतो किंवा येतही नाही) , सुरेल प्रकाशरचना , काही भिंती कच्च्या विटांच्या , काही भिंती सुरेख शुभ्र रंगवलेल्या असा एकूण ओळखीचाच माहौल असला तरी हँगर ला कोट अडकवताना आजूबाजूच्या चित्रांवर माझी नजर जातेच.

स्पर्धा का इतर?: 

पाने

Subscribe to RSS - इतर