सारा अमृता साहिर

सारा शगुफ्ता आणि अमृताची मैत्री खास होती. पत्रातून दोघी एकमेकींजवळ येत असत. सारा पाकिस्तानी लेखिका/कवी होती. त्या काळात एका मुस्लिम बाईनी लिहीणं समाजमान्य नव्हतंच. साराची समाजात चाललेल्या घडामोडी, स्रीयांवर होणारे अन्याय आणि तिच्या वयक्तिक आयुष्यातिल प्राॅब्लेम्स यामुळं होणारी घुसमट ती अमृताशी बोलून म्हणजे पत्रातूनच बोलून व्यक्त करत असे. असंच एक पत्र साराने अमृताला पाठवलं होतं उर्दूतूनच ...खूप उदास ...इमरोज वाचत होता आणि अमृता रडत होती... लहानपणी/तरूणपणी अमृता खिडकीत उभी राहून खुल्या आकाशाकडे पाहून स्वतःला उद्देशून म्हणत असे "अमृता आओ मेरे पास आओ अमृता" ती स्वतःला शोधत असे, स्वतःलाच दिलासा देत असे ... ते पत्र वाचून संपल्यावर पहील्यांदाच तिला साराला "सारा आओ मेरे पास आओ सारा" असं म्हणावंस वाटलं....हे असं एकाच ओळीचं पत्र तिने साराच्या पत्राला उत्तर म्हणून पाठवलं....

अमृताने इमरोज ला लिहीलेली पत्र सुद्धा आहेत वाटतं पब्लिश झालेली...मात्र साहिर अमृता पब्लिश झालेलं नाही ...आखिरी खत मध्ये पुष्कळ बदल करावे लागले असंही वाचण्यात आलं... आखिरी खत साहिरसाठीचंच होतं... ते अमृताने वाचायला दिलं होतं साहिर ला साहिर ने वाचलं नाही काही कारणांमुळे... बऱ्याच काळानी जेव्हा आखिरी खत पब्लिश झाल्याची बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हा साहिर मित्रांना म्हणाला हे माझ्यासाठीचं आहे ... पण त्याला 'हा दारूडा काहीही बोलतोय नशेत' असं म्हणून खुळ्यात काढलं....

अमृताने साराला लिहीलेल्या एका पत्रात असं म्हंटलंय की संपूर्ण स्त्री खूप कमी जणांना मिळते... संपूर्ण प्रेमच मिळालंय अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही ..धन्नो नावाच्या कथेतही अमृता असंच काही म्हणते बहुतांश बायका या 'धेलियाँ' चं असतात...हवं ते प्रेम किंवा कल्पिलेलं सारंच त्यांना मिळतं असं नाही... पण मग मला हे फक्त बायकांच्याच नव्हे तर पुरूषांच्याही बाबतीत आहेच... साहिर आणि इमरोज ही यातंच येतात...

अमृता आणि अमृताबद्दल आणि साहिर-अमृताबद्दल वाचत, ऐकत असताना एक प्रश्न पडतो ...कि का अमृता साहिर एकत्र का नाहीत? किंवा अमृता साहिर एकत्र असते तर काय झालं असतं? उत्तरं अनेक असतील पण एक असं वाटतं की अमृता साहिर एकत्र असते तर अमृता अमृता नसती आणि साहिर साहिर नसता.... त्या दुराव्यातही ते एकत्र होतेच पण त्यातून जे लिहीलं गेलं त्यामुळं अमृता आणि साहिर ची एक स्वतंत्र ओळख आहे ती कदाचित तशी नसती राहीली मग... साहिर पासून वेगळं होऊनही अमृतानी खूप काही मिळवलं... सर्वात महत्वाचं स्वतःचा शोध... स्वतःची जाणीव ... साहिर मात्र अमृताला गमावल्यावर सारंच गमावून बसल्यासारखा होता....

~अवंती

2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

<<< संपूर्ण स्त्री खूप कमी

<<< संपूर्ण स्त्री खूप कमी जणांना मिळते >>> संपूर्ण स्त्री ही कल्पना थोडी गडबडली आहे. पुरुष किंवा स्त्री कोणीही सांत नसतं.

आपण कायम evolve होतंच असतो. एकमेकांना मिळाल्याने आपण अजूनच संपूर्ण होत असतो. ह्या अर्थाने बघितलं तरच मला ते वाक्य सयुक्तिक वाटतं.

शेक्सपियरतुल्य!

पुरुष किंवा स्त्री कोणीही सांत नसतं.

अगदी शेक्सपियरतुल्य वाक्य! (बोले तो, Sounds great, but does not mean a thing.)

..........

श्रेयअव्हेर: पी.जी. वुड्डहौससोा. यांजकडून साभार.

अगदी शेक्सपियरतुल्य वाक्य!

अगदी शेक्सपियरतुल्य वाक्य! (बोले तो, Sounds great, but does not mean a thing.)

मी इतक्या उशीरा या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायला आलोय की जर प्रतिसादाला उपप्रतिसाद देण्याची शर्यत असती तर मी दुसऱ्या रेसमध्ये पहिला आलो असतो. ( बोले तो, He was so slow that he nearly came first in the second race.)
..................

श्रेयअव्हेर: पी.जी. वुड्डहौससोा. यांजकडून साभार.

He was so slow that he nearly

He was so slow that he nearly came first in the second race.

(लोळून हसत) (लोळून हसत)

पुरुष किंवा स्त्री कोणीही

पुरुष किंवा स्त्री कोणीही सांत नसतं.

असं असेल तर "प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे" या महान बोधवचनाचं काय कराल, मालक?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

असं असेल तर "प्रत्येक

असं असेल तर "प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून भाऊ शांत आहे" या महान बोधवचनाचं काय कराल, मालक?

पण भाऊंची शांतता, भाऊ, भाऊ असल्यामुळे सांत आहे. भाऊ जर भाऊ नसते तर कदाचित त्यांची शांतता पण अनंत झाली असती आणि मग सांत शब्दाची व्याप्ती सांत झाली असती.

फ्लेक्स

या महान बोधवचनाचं काय कराल, मालक?

आनंदमालक काय करायचं ते करतीलच. माझी सूचना आहे की फ्लेक्स करावा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या ठिकाणी या माध्यमातून सहमत

या ठिकाणी या माध्यमातून सहमत वगैरे....

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

पुरुष किंवा स्त्री कोणीही

पुरुष किंवा स्त्री कोणीही सांत नसतं.

सहीयोग्य वाक्य आहे. सुरेख आहे.

चंचला, अवंती, जीए आणि अमृता प्रीतम

>>>> हे धागे वाचताना मला चॅट मेसेजेस वाचण्याचा खंडीत अनुभव येतो. <<<<<

"मी ज्ञानाच्या उपासनेत शरीर झिजवले नाही कि तत्वज्ञानाच्या काठिण्याचा अनुभव घेतला नाही . मी वर्तमानाच्या क्षणिक लहरीवर जगणारी एक यःकश्चित युवती आहे. भविष्यकाळाचे विविध, तलम तरंग माझ्यामधून संक्रांत होतात आणि भूतकाळात मिळून जातात, आणि मग मला माझे सत्य त्या भूतकाळात दिसते, भविष्यकाळात नव्हे. चालत असता पावलांची खूण उमटून त्यात पाणी साचावे अन मागे वळून पाहताना त्यात चंद्राचे किंचित प्रतिबिंब दिसावे, तसे सत्य मला दिसते. ते सत्य माझेच, माझ्यापुरतेच असते, कारण त्यावर माझ्या जीवनाची रक्तमुद्रा असते. त्याच दान करता येत नाही की इतरांकडून त्याचा स्वीकार करता येत नाही. प्रत्येकाने आपापले सत्य स्वतःच्या रक्ताच्या स्पंदनांवर पारखून घ्यावे लागते. ज्या सत्याची देवाण घेवाण होवू शकते, किंवा ज्यांबाबत विविध प्रकृतींच्या जनाचे एकमत होते, ती सत्ये क्षुद्रमोलाची असतात. वारा वाहतो, झाडाची पाने येतात, शिलाखंड पाण्यात बुडतात ही निव्वळ घटिते अहेत, त्यांच्यावर माझ्या भोगांची, हर्षाची मुद्रा नाही. म्हणून ती घटिते म्हणजे माझी सत्ये नव्हेत, एवढेच माहीत असलेली मी एक अज्ञ आहे." - चंचला ('विदूषक': काजळमाया - ले. जी. ए. कुलकर्णी) (स्माईल)

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मी नाही त्यातली...

पहिलं वाक्य वाचलं, मग कंसातला मजकूर वाचला. मधला मजकूर वाचणं म्हणजे स्वपीडन हे लगेच लक्षात आलं. मी नाही त्यातली...

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टिंबिका का?

मी सध्या 'डाऊनटन अॅबी' बघत्ये. कथानक खूप पुढे सरकतं असं नाही. सोयीस्कररित्या प्रेमत्रिकोण सोडवणं, पैशांच्या अडचणीही सोयीस्कररित्या सोडवणं असे प्रकार ढोबळ तपशीलांत आहेत. पण सगळी पात्रं बारकाईने रेखाटली आहेत. माणसांमधले हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, त्यात ब्रिटीश सरदार घराणं आणि त्यांचे नोकरचाकर यांनी पाळायचे संकेत, त्यामुळे येणारे चढावउतार, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं दर्शन असे कुंचल्याचे बारीक फटकारे सुंदर काढले आहेत. या बारक्या तपशीलांनी भरलेला एकेक भाग मात्र साधारण तासाभराचा असतो. आणि चॅटवर गप्पा मारताना मित्राला माझ्या विचारांतली एकेक वाक्यं सांगते.

हे धागे वाचताना मला चॅट मेसेजेस वाचण्याचा खंडीत अनुभव येतो. चॅट मेसेजेस वाचून मित्राने 'डाऊनटन' बघावं अशी माझी अपेक्षा असते, परिणाम उलटा होईल की काय अशी शंका आता येते. निदान मी चॅट मेसेजेस टंकताना त्यांची '...' टिंबिका बनवत नाही, एवढंच काय ते समाधान.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फक्त उलट लिहायचं म्हणून नाही

मनाने नितळ वैगेरे ठिक पण मला साहीर-अमृता-इमरोज यांच्या नात्यात फारसं काही विशेष वाटलेलं नाही. कदाचित साहीर-अमृता ही व्यक्तिमत्वे वलयांकीत असल्यामूळे नॉर्मल असणारी गोष्ट खुप ग्लोरीफ्याय केल्यासारखी वाटली. अशी बरीच नाती असतात वलये नसणार्या लोकांची.

वलयांकित

कदाचित साहीर-अमृता ही व्यक्तिमत्वे वलयांकीत असल्यामूळे

'वलयांकित' इज़ राइट!

ते दोघे जेव्हा भेटायचे, तेव्हा हा सिग्रेटींवर सिग्रेटी फुंकून धुराची वलये काढायचा, नि तो निघून गेल्यावर ही त्याची (बोले तो त्याच्या ओढून झालेल्या सिग्रेटींची) थोटके त्या रक्षापात्रातून काढून ती ओढत बसायची (इतके हिचे त्याच्यावरचे प्रेम!), असेही कोठेसे वाचल्याचे (धूसरपणे) स्मरते.

(म्हणजेच, गेला बाजार साहिर वलयांकित होता, हे खरेच. अमृताला मात्र (प्रयत्न करूनही) वलयांकित व्हावयास अखेरीस जमले की नाही, याबद्दल काही निश्चित दाखले मिळत माहीत. (किंवा आम्हांस ते ज्ञात नाहीत.))

असो.

हम्म! हे पहा अमृता म्हणतेय ,

हम्म! हे पहा अमृता म्हणतेय , "वह चुपचाप सिर्फ सिगरेट पीता रहता था, कोई आधी सिगरेट पीकर राखदानी में बुझा देता था, फिर नई सिगरेट सुलगा लेता था और उसके जाने के बाद केवल सिगरेटों के बड़े – बड़े टुकड़े कमरे में रह जाते थे।

कभी…एक बार उसके हाथ को छूना चाहती थी, पर मेरे सामने मेरे ही संस्कारों की एक वह दूरी थी, जो तय नहीं होती थी। उसके जाने के बाद, मैं उसके छोड़े हुए सिगरेटों के टुकड़ों को सम्भाल कर अलमारी में रख लेती थी, और फिर एक – एक टुकड़े को अकेले बैठकर जलाती थी। और जब अंगुलियों के बीच पकड़ती थी, तो लगता था, जैसे उसका हाथ छू रही हूं।”

जिससे एक मर्तबा प्रेम हो जाए, फिर जीवन भर नहीं छूटता। अतीत की स्मृतियों से वह कभी रिक्त नहीं होता। प्रेम की मृत्यु हमारी आंशिक मृत्यु है। हर बार प्रेम के मरने पर हमारा एक हिस्सा भी हमेशा के लिए मर जाता है। जब साहिर की मृत्यु हुई, तो अमृता ने लिखा – “सोच रही हूं, हवा कोई भी फासला तय कर सकती है, वह आगे भी शहरों का फासला तय किया करती थी। अब इस दुनिया और उस दुनिया का फासला भी जरूर तय कर लेगी…”
~अमृता प्रितम

आम्ही अस्सेच आहोत

अगदी शक्य आहे.

अगदी शक्य आहे.

ते आठवले - जगी राजहंसाचे

ते आठवले - जगी राजहंसाचे चालणे डौलदार म्हणुन इतरांनी (विशेषतः बदकाने (लोळून हसत) ) चालूच नये काय? (डोळा मारत)

+

अगदी असेच म्हणतो. अशी नाती अनेकांची असतील पण इथे वलय लाभले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

साहिर मनानी नितळ होता ही

साहिर मनानी नितळ होता ही माहीती माझ्यासाठी खुप नविन आहे. चला आज काहीतरी नविन शिकायला मिळाले.

(अवांतर)

नितळ वगैरे माहीत नाही (असेलही!), परंतु कम्युनिष्ट होता (असो बापडा.), नि म्हणून पाकिस्तान सरकार त्याच्या मागावर होते, आणि म्हणून चांगल्या लाहौरमध्ये सेटल होऊ घातलेल्या त्याला पाकिस्तानातून भारतात पळून येऊन बॉलीवुडात दाखल व्हावे लागले, असे कायसेसे कोठूनतरी वाचून आहे ब्वॉ! (चूभूद्याघ्या.)

म्हणजे कम्युनिष्ट नसतात वाटतं

म्हणजे कम्युनिष्ट नसतात वाटतं नितळ (डोळा मारत) असो असो! डिटेलवार लिहीते नंतर

आम्ही अस्सेच आहोत

?

म्हणजे कम्युनिष्ट नसतात वाटतं नितळ (डोळा मारत)

असा दावा मी नक्की कधी केला?

होता, त्याहीबद्दल येईल

होता, त्याहीबद्दल येईल अमृताच्या आत्मचरित्रात आहेत काही किस्से....

आम्ही अस्सेच आहोत

होता, त्याहीबद्दल येईल

होता, त्याहीबद्दल येईल अमृताच्या आत्मचरित्रात आहेत काही किस्से....

आम्ही अस्सेच आहोत

होता, त्याहीबद्दल येईल

होता, त्याहीबद्दल येईल अमृताच्या आत्मचरित्रात आहेत काही किस्से....

आम्ही अस्सेच आहोत

आवडलं. साहीर- अमृता - इमरोज

आवडलं. साहीर- अमृता - इमरोज या नात्यांबद्द्ल जे वाचलय हे हेवा वाटण्यासारखं आहे. मनाने एवढं नितळ होऊ शकणारी तीन व्यक्तित्व मनानं एकमेकांच्या एवढी जवळ असणं हे दुर्मिळच.

नि-तळ छान शब्द वापरलास अंतरा.

नि-तळ छान शब्द वापरलास अंतरा.

आवडलं. साहीर- अमृता - इमरोज

आवडलं. साहीर- अमृता - इमरोज या नात्यांबद्द्ल जे वाचलय हे हेवा वाटण्यासारखं आहे. मनाने एवढं नितळ होऊ शकणारी तीन व्यक्तित्व मनानं एकमेकांच्या एवढी जवळ असणं हे दुर्मिळच.

हा भागही आवडला.

हा भागही आवडला.
____

त्या दुराव्यातही ते एकत्र होतेच पण त्यातून जे लिहीलं गेलं त्यामुळं अमृता आणि साहिर ची एक स्वतंत्र ओळख आहे ती कदाचित तशी नसती राहीली मग.

पण दोघांची सामायिक अशी फार सुंदर ओळख जगाने पाहीली असती. मॅजिक ऑफ केमिस्ट्री नेवर फेल्स. अशी काही जोडपी माहीत आहेत ज्यांनी सेल्फ-अ‍ॅक्च्युअलाय्झेशन प्राप्त करुन, समाजाची मदत केलेली आहे किंवा कलेचे पिनॅकल गाठलेले आहे.
Alexx & allison Grey - माझे प्रचंड आवडते जोडपे. चित्र्कार.

"एक असं वाटतं की अमृता साहिर

"एक असं वाटतं की अमृता साहिर एकत्र असते तर अमृता अमृता नसती आणि साहिर साहिर नसता.... "

Perfect लिहलय. मस्त लिहितेय अवंती ..

साहीर आणि अमृता महान आहेच . मला इमरोजबद्दल विशेष वाटत.
आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते हे माहित असून तिच्याबरोबर राहणे .. सोपं नाहीये.