श्‍वेता नावाचं फिनिक्‍स

हल्ली कामासाठी बऱ्याचदा माझं ‘फँटम फिल्म्स’च्या अंधेरीमधल्या ऑफिसमध्ये जाणं होतं. ‘फँटम फिल्म्स’ म्हणजे अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने, विकास बहेल आणि मधु मंतेना या चौघांनी मिळून सुरू केलेलं, प्रॉडक्शन हाऊस. तर ‘फँटम’चा स्वतःचा असा एक स्क्रिप्ट डेव्हलपमेंट विभाग आहे, जिथे त्यांच्याकडे वेगवेगळ्या लेखकांनी पाठवलेल्या चित्रपट संहिता वाचणे, नवीन कथानक डेव्हलप करणे अशी कामे चालतात. तिथे एक छोट्या चणीची सुंदर मुलगी नेहमी, तिच्या लॅपटॉपवर काही तरी वाचत असताना दिसायची. जेव्हा वाचत नसायची, तेव्हा ऑफिसमध्ये उत्साहीपणे भिरभिरत असायची. तिला कुठे तरी पाहिलं आहे, असं सतत वाटायचं. पण नेमकं आठवत नव्हतं. एकदा मी असाच ऑफिसमध्ये आलो असताना जिच्यासोबत माझी मीटिंग ठरलेली होती, ती सोनम नेमकी ऑफिसमध्ये नव्हती. मला सोनमचा मेसेज आला की, मी ऑफिसमध्ये नाहीये, माझी कलिग तुला भेटेल आणि नेमकी ती सुंदर मुलगीच समोर उभी राहिली. तिने हसतमुखाने हस्तांदोलन केलं, ‘हाय, मी श्वेता बसू प्रसाद. तू अमोलच ना?’ श्वेता बसू प्रसाद नाव ऐकताच मला धक्का बसला, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. इनमीन दोन वर्षांपूर्वी एका आयुष्य भोवंडून टाकणाऱ्या प्रकरणात अडकलेली अभिनेत्री हीच श्वेता बसू प्रसाद आहे, हा धक्का ओसरायला थोडा वेळ लागला. श्वेता बसू प्रसादचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट म्हणजे विशाल भारद्वाजचा ‘मकडी’. अकरा वर्षांच्या श्वेताने चुन्नी आणि मुन्नी या जुळ्या बहिणींच्या रोलमध्ये धमाल उडवून दिली होती. नंतर आलेल्या नागेश कुकनूरच्या ‘इक़्बाल’मध्ये श्रेयस तळपदेच्या बहिणीच्या भूमिकेत तर ती एकदम ‘छा’ गयी. नेक्स्ट बिग थिंग वगैरे विशेषणांचा तिच्यावर पाऊस पडला. पण घवघवीत यश तिच्या नशिबात फार वेळ नव्हतं. अनेक यशस्वी बालकलाकारांचं जे होतं तेच तिचं झालं. अपेक्षांचं ओझं तिला पेलवलं नाही. मोठी झाल्यावर तिने काही अयशस्वी हिंदी चित्रपट केले. ‘क्यूँ की सास भी कभी बहू थी’सारख्या गाजलेल्या मालिकेत काम केलं. पण अपेक्षेप्रमाणे आपली प्रगती होत नाहीये, हे लक्षात येताच अनेक अभिनेत्रींप्रमाणे तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा रस्ता धरला. एक गुणवान, पण अयशस्वी ठरलेली अाणखी एक यशस्वी बालकलाकार एवढीच श्वेताची ओळख राहणार, असं वाटत असतानाच एक दिवस असा आला की, आता सगळंच संपलंय की काय, असा प्रश्न पडला. हैदराबाद पोलिसांनी एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यामध्ये ‘श्वेता वेश्या व्यवसाय करताना रंगेहाथ पकडली गेली’ अशा बातम्या एका दिवशी सर्व आघाडीच्या वर्तमानपत्रांत झळकल्या. तिच्यासोबत तिचा ‘एजंट’ आणि ‘क्लायंट’ पण पकडले गेले, असेही बातमीमध्ये नमूद करण्यात आले होते. अशा केसमध्ये संबंधित संशयितांचे (विशेषतः स्त्रीचे) नाव गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी घोषित करू नये, असा एक संकेत आहे. पण हा संकेत हैदराबाद पोलिसांनी पायदळी तुडवला. पण त्याहून संतापदायक हे होतं की त्या पुरुष ‘क्लायंट’चं नाव मात्र कधीच जगाला कळलं नाही. हा भेदभाव का? श्वेता एक स्त्री होती म्हणून की, आपल्या सेलिब्रिटी असण्याची किंमत तिला चुकवावी लागत होती? पोलिसांनी श्वेताला कोर्टासमोर उभे केले. कोर्टाने तिला दोन महिन्यांसाठी महिला सुधारगृहात पाठवले. नंतर लगेच श्वेताचे आपण वेश्या व्यवसायात कोणत्या मजबुरीने स्वीकारला, याचं स्पष्टीकरण देणारे कबुलीजबाबटाइप निवेदन माध्यमातून फिरू लागले. श्वेता जेव्हा मुंबईला परत आली तेव्हा तिला या ‘तथाकथित’ कबुलीजबाबाबद्दल कळलं तेव्हा तिला जोरदार धक्का बसला. कारण तिने असे कुठलेही निवेदन प्रसृत केले नव्हते. तिचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला होता. श्वेता सुधारगृहात असताना कुठल्याही प्रकारे माध्यमांशी संपर्क करण्याचा प्रश्नच नव्हता. मग हे निवेदन प्रसारमाध्यमांना कुणी दिले? हैदराबाद पोलिसांनी कानावर हात ठेवले. माध्यमांनी कुठल्याही प्रकारे शहानिशा न करता हे निवेदन सरळ छापून टाकले. स्त्रीचे नाव छापू नये, असा संकेत असताना श्वेता वेश्याव्यवसायात गुंतली असल्याचा आरोप केला गेला. माध्यमांचे म्हणून जे काही संकेत असतात, ते सर्व माध्यमांनी वारंवार पायदळी तुडवले. यथावकाश कोर्टात केस उभी राहिली.
आपण हैदराबादला एका पुरस्कार सोहळ्यासाठी आलो होतो, हे श्वेता आणि तिच्या वकिलांनी कोर्टात सिद्ध केले. पुरस्कार सोहळ्याचं आमंत्रण, बुक केलेली तिकिटे वगैरे कोर्टात दिली. अपेक्षेप्रमाणेच कोर्टाने श्वेताची सर्व आरोपांमधून मुक्तता केली. अजून एक केस संपली. मीडिया टीआरपीसाठी दुसऱ्या केसच्या मागे धावण्यात गुंतून गेला. पण श्वेताचं काय? तिचं तर जग उद्ध्वस्त झालं होतं. समाजाने तिच्यावर ‘वेश्या’ असा ठप्पा मारून टाकला होता. तिला अभिनेत्री म्हणून काम मिळणं यापुढे शक्य नव्हतं. दुसरं कुणी अशा प्रसंगी खचून गेलं असतं. झालेल्या बदनामीमुळे आपल्या कोशात निघून गेलं असतं. पण श्वेताने ठामपणे असं करण्याचं नाकारलं. तिने लढा द्यायचा ठरवलं. सर्वप्रथम माध्यमांना ‘उघडं’ पाडण्यासाठी तिने एक निवेदन प्रसृत केलं. त्यामध्ये तिने या अनावश्यक व बदनाम करणाऱ्या ‘मीडिया ट्रायल’चा समाचार घेतला. हे निवेदन इंटरनेटवर शोधलंत तर सहज मिळेल. बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी तिने जोरदार प्रयत्न सुरू केले. पण सगळीकडे पदरी निराशाच पडत होती. या प्रसंगी तिच्या मदतीला धावून आले, ते अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने हे दिग्दर्शक. त्यांनी तिला ‘फँटम फिल्म्स’च्या स्क्रिप्ट डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची ऑफर दिली. जवळपास विजनवासात गेलेल्या श्वेताने ही संधी घेताना मागचा-पुढचा कसलाही विचार केला नाही. ‘शो मस्ट गो ऑन’ हे सूत्र बालपणापासून शो बिझनेसमध्ये असलेल्या श्वेताला कुणी सांगायची गरज नव्हतीच. श्वेताचं वाचन लहानपणापासूनच खूप चांगलं होतं. त्याचा फायदा तिला तिच्या नवीन जॉब प्रोफाइलमध्ये होतो आहे. श्वेता सध्या खूप आनंदी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, तिला आता पुन्हा अभिनयाच्या ऑफर्स पण मिळू लागल्या आहेत.
पण श्वेतासोबत जे काही घडलं त्यामुळे काही प्रश्न पडतात. न्यायालयांनी निकाल देण्यापूर्वीच जी मीडिया ट्रायल होते, तिचे कायदेकानून काय आहेत? माध्यमांनी न्यायाधीशाची भूमिका बजावावी काय? मीडिया ट्रायलमुळे एखादे निरपराध आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर त्याची जबाबदारी कुणाची? श्वेताला देवदूतासारखे अनुराग आणि विक्रमादित्य भेटले. प्रत्येकाला तसेच कुणी भेटेल, हे शक्य नाही. वाईट परिस्थितीतून स्वतःला सावरून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्या श्वेताचं कौतुक करावं तितकं कमीच. फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा उड्डाण घेतो, अशी एक दंतकथा आहे. ही दंतकथा श्वेता प्रत्यक्ष जगली आहे...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

असं म्हणता येईल की एखाद्या समाजातली प्रसारमाध्यमे ही त्या समाजाच्या मानसिकतेपेक्षा जास्त प्रगल्भ असू शकत नाहीत. प्रसारमाध्यमांचा उतावीळपणा हा एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो याचे ही केस म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

श्वेताचे मन:पूर्वक अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर श्वेताचा वेश्याव्यवसायामध्ये काही सहभाग नव्हता आणि मिडियाने जर तिच्या कबुलीजबाबासकट खोटी निवेदनं केली असतील तर आता निर्दोष सुटल्यानंतर तिने मिडियावर काही करोड रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा लावायला काय हरकत आहे?
जर मिडिया सर्वतोपरी दोषी असेल तर कोर्टात केस उभी रहाण्यापूर्वीच बहुतेक सेटल्मेंट होईल, तिच्या पुढील आयुष्याची तरी तरतूद होईल.
मग तिला कुठे दुसरीकडे नोकरी तरी करावी लागणार नाही...
अ‍ॅम आय मिसिंग समथिंग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटत तिला ती controversy वाढवण्यात जास्त रस नसावा . At the end of the day its her call . संदर्भासाठी श्वेताच निवेदन देत आहे . http://indianexpress.com/article/entertainment/entertainment-others/shwe...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

At the end of the day its her call .

इट इज हर कॉल, आय रिस्पेक्ट दॅट.
मग इतरांनी ही मॅटर आता चर्वितचर्वण करण्यात काय मतलब आहे?
विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट, शुडन्ट वुई ऑनर हर विशेस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आला असता. व एका क्ष मुलीच्या बाबतीत असे असे झाले होते असे जरी सांगितले असते तरी भावना पोहोचल्या असत्या.
पुन्हा तिचे नाव वापरुन लेख देण्याची गरज मला तरी कळली नाही.
हे पुन्हा एकदा सर्व नावासकट समोर आणण झाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुनही एडिट करुन,क्ष" घालता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑलरेडी हा लेख अगदी फोटोसहित दै. दिव्य मराठीच्या रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिध्द झालेला आहे. सो....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बदनामी जर नावासकट झाली तर त्याचा प्रतिकारही नावानिशी व्हावा हे योग्यच नव्हे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किंबहुना ज्या कोणाला या लेखात तिचे नाव छापायला नको होते असे वाटते त्यांना सुप्तपणे श्वेता दोषी होती असे वाटते की काय हां प्रश्न विचारावासा वाटतो. मग लपवा छ्पवी कसली ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

लपवा छ्पवी कसली ?

लपवा छपवी नकोय पण मग उकरुन तोच मुद्दा चघळण्यात काय पॉइन्ट आहे? परत लोकांची मेमरी रिफ्रेश होणार. दोषी आहे की नाही हा प्रश्न नाहीये. तिच्या व्यक्तीगत आयुष्यातील एक यातनामय आठवण आहे. मग ती पुरलेलीच बरी. The sooner ppl forget the better नाही का? असो.
मला तर माहीतही नव्हते जे की आता माहीत झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात लज्जास्पद काहीच नाही तर फिकिर का ? तुमचा मुद्दा कळलाय पण भावना पुरेश्या स्पष्ट नाहीत असं वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

फँटम जॉईन केल्यावर तिने अनेक प्रसारमाध्यमांना आपल्या या नवीन 'इनिंग ' बद्दल माहिती दिली होती . तिचे 'कोट ' असणाऱ्या अनेक बातम्या तिच्या भूतकाळाचा संदर्भ देऊन पेपरमध्ये आल्या होत्या . माझ्या आयुष्यातला एक वाईट भाग मागे सोडून मी आता पुन्हा नवीन इनिंग सुरु करायला तयार आहे असा एक मेसेज तिला द्यायचा होता अस वाटत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

तिच्या नावाने खोडसाळ पत्र प्रकाशित करण्याबद्दल कज्जे न करण्याबद्दल तिची भूमिका समजली नाही; पण 'एवढं सगळं होऊनही आता माझं व्यवस्थित सुरू आहे' हे प्रसिद्ध होऊ देण्यामागची भूमिका पटली.

श्वेताला शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परंतु दुर्दैवीसुध्दा. तिला पुढील वाटचालीसाठी भरपुर शुभेछ्चा. श्वेता दोषी असती तरी तिला हवं ते करीअर करायला माझा सदैव पाठींबाच राहिला असता. ती मोकळीक आपल्याला राज्यघटनेनेच दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्यायालयांनी निकाल देण्यापूर्वीच जी मीडिया ट्रायल होते, तिचे कायदेकानून काय आहेत? माध्यमांनी न्यायाधीशाची भूमिका बजावावी काय? मीडिया ट्रायलमुळे एखादे निरपराध आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, तर त्याची जबाबदारी कुणाची?

प्रश्न कळीचे आहेत. पण दुर्दैवाने उत्तरे नाहीत. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!