पाडाला पिकलाय आंबा

संपादकीय

ऋणनिर्देश - पाडाला पिकलाय आंबा

- ऐसीअक्षरे

'आला आला आला, आला....' नीट बघा वाचकहो, 'येनार येनार येनार...' म्हणून जाहिरात करून राहिलेला अंक शेवटी आला! आता पॉर्नांक म्हटल्यावर 'यायला' इतका दीर्घ काळ घेतला हे तसं बरंच झालं. जर कैरी दोन दिवसांत पिकून तो आंबा टपाक्कन शीघ्रपतित झाला तर त्याला काय अर्थ राहील? मग पिकलेला आंबा टकामका बघण्याचा आनंद कसा मिळणार? भल्याभल्या तत्त्वज्ञांनी सांगितलं आहे की ध्येय महत्त्वाचं नाही तर तिथपर्यंत पोचायचा प्रवास महत्त्वाचा. थांबला तो संपला, किंवा खरं तर संपला तो थांबला... म्हणून हा रसरशीत, गरगरीत आंबा भर मे महिन्यात सादर करताना आमच्या मनाचा कणा आनंदाने ताठ झाला आहे.

तर, हा पॉर्नांक. त्याचं ऑफ्फिश्शियल नाव आहे 'पॉर्न ओके प्लीज'. नाव वाचूनच हॉर्नचा फुगा दाबावासा वाटतो. ऐसीच्या संपादक-व्यवस्थापकांनी आपली गंभीर चश्मिष्ट दृष्टी या जिव्हाळ्याच्या पण चवचाल विषयाकडे वळवली आहे.

आता इतकं सुंदर आंबटगोड फळ देणाऱ्या झाडाचा उल्लेखही आवश्यकच आहे. पण हा ऐसीचा अंक अनेक पुरुष आणि अनेक स्त्रियांनी केलेल्या वैचारिक ऑर्जीमधून तयार झालेला असल्यामुळे अनेक अर्थाने अपौरुषेय आहे. त्यामुळे सगळं श्रेय व्यवस्थापनाचं. व्यक्तिगत श्रेय कोणाचंच नाही. म्हणजे हे झाड लावण्यातली बरीच कष्टाची कामं - म्हणजे जमीन तयार करणं, झाड लावणं, कलम करणं, त्याला नियमाने खतपाणी करणं, अनावश्यक फांद्यांची कापणी करणं, वगैरे कामं करण्याचं श्रेय मेघनाला नाही. या अंकाची तांत्रिक बाजू सांभाळण्याचं श्रेय अदितीचं नाही. संदीप देशपांडेने चित्रं-सजावट केली, त्याचंही श्रेय अर्थातच टीमचं. चिंतातुर जंतू, नंदन, अमुक, जयदीप, राजेश घासकडवी वगैरे लोकांनी संपादनात जी अत्यावश्यक मदत वेळोवेळी केली, तिचंही श्रेय अर्थातच टीमला.

हा आंबा चोखंदळपणे नुसताच दाबून बघायचा, चोखून खायचा, की साग्रसंगीत सोलून हात ओलेगिच्च करत खायचा हे वाचकांच्या हाती आहे.

- संपादक

---

श्रेयनामावली

संपादक -
मेघना भुस्कुटे

संपादन साहाय्य -
चिंतातुर जंतू, ३_१४ विक्षिप्त अदिती, जयदीप चिपलकट्टी, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी, रुची, नंदन

मुद्रितशोधन -
नंदन, मेघना भुस्कुटे, अमुक, मिहिर, प्रथमेश नामजोशी

टंकन -
मेघना भुस्कुटे, ३_१४ विक्षिप्त अदिती, राजेश घासकडवी, अमुक, मुक्तसुनीत, केतकी आकडे, स्नेहल नागोरी, प्रथमेश नामजोशी

छायाचित्रे, रेखाचित्रे, चित्रनिवड, चित्रसंस्करण व चित्ररचना -
संदीप देशपांडे, ३_१४ विक्षिप्त अदिती, अमुक, कुणाल विजयकर, मंगेश नारायणराव काळे, अवंती कुलकर्णी, ईप्सित

संदर्भ -
धनुष, चिंतातुर जंतू, अमुक

विशेष आभार -
अभिरुचि नियतकालिक, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ - धुळे, पद्मगंधा प्रकाशन, परिवर्तनाचा वाटसरू नियतकालिक, मनोविकास प्रकाशन, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मुक्त शब्द नियतकालिक, मॅजेस्टिक प्रकाशन, खेळ नियतकालिक, गणेश मतकरी, जयंत गाडगीळ, डॉ. अनंत देशमुख, पंकज भोसले, मंगेश नारायणराव काळे, समर खडस, सतीश तांबे

प्रसिद्धी -
संदीप देशपांडे, ३_१४ विक्षिप्त अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी

तंत्रसाहाय्य -
३_१४ विक्षिप्त अदिती

मुखपृष्ठ व सजावट -
संदीप देशपांडे

field_vote: 
4.75
Your rating: None Average: 4.8 (4 votes)

प्रतिक्रिया

हा आंबा चोखंदळपणे नुसताच दाबून बघायचा, चोखून खायचा, की साग्रसंगीत सोलून हात ओलेगिच्च करत खायचा हे वाचकांच्या हाती आहे.

झकास! राघा नेव्हर डिसअपॉइन्ट्स!! नॉट अ सिंगल टाइम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकाच आंब्याचा उल्लेख करुन तुम्ही, बाकीच्या आंब्यांवर आणि ते खाण्यास उत्सुक असणार्‍या वाचकांवर अन्याय करत आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंबाच का... कैर्री...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण किती आंबटशौकीन आहे यावर अवलंबून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रसाळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0