थिअरी आणि प्रॅक्टिकल

लेख.

इशारा

- लेखक आणि संपादक

थांबा, थांबा - मागे बघा की राव!

'पॉर्न ओके प्लीज' वाचल्याबरोब्बर तुम्ही ट्रकच्या जवळ आलात खरे, पण लक्षात ठेवा - 'मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक'. उगाच जास्त जवळ येऊन अॅक्सिडेंट व्हायला नको. अंक वाचल्यावर 'हस मत पगली, प्यार हो जायेगा' अशी तुमची परिस्थिती होईल अशी खात्री आहे. मात्र 'बुरी नजर वाले, तेरा मूंह काला' असं ड्रायव्हरवरच ओरडण्याची पाळी येऊ नये म्हणून खबरदारीची सूचना.

पण सिरियसली -

या अंकाचा विषय कामव्यवहार, कामसाहित्य आणि पॉर्न याच्याशी संबंधित आहे. सदर अंक हा १८ वर्षांवरील सुजाण व्यक्तींसाठी आहे याची नोंद घ्यावी. विषयाच्या अनुषंगाने यातील अनेक लेखांत, कवितांत, चित्रांत आणि चित्रफितींमध्ये शरीरसंबंध, लैंगिक अवयव यांचा स्पष्ट, क्वचित प्रसंगी बीभत्स, तर काही वेळा सौम्य वा सूचक उल्लेख असणार आहे. पुढील मजकूर आपल्या जबाबदारीवर उघडावा.

सदर लेखात केलेली वर्णनं, उल्लेख प्रक्षोभक, बीभत्स, अश्लील, सभ्यतेच्या मर्यादा मोडणारी, इ. असू शकतात. हा सदर लेख वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या, सज्ञान वाचकांसाठीच आहे. लेखाचे दुवे पुढे दिलेले आहेत; ते आपापल्या जबाबदारीवर उघडावेत.

थिअरी आणि प्रॅक्टिकल - भाग १, भाग २

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

थिअरी रॅडिकल वाटली. प्रॅक्टिकल थोडेtitillating वाटले थोडे अंगावर आले. पण थिअरी intrigued me most. थिअरी सॉलिडे. बाकी प्रॅक्टिकल Acrobatics आहे.
अजुन एक भावनोत्कटता किंवा भावनिक पातळीवर किती गुंतागुंत असते त्याचे विश्लेषण अपुरे वाटले.
राम जर सेडिस्ट असेल तर शामला नेहमी यातना = दु:ख नसेल आणि मग masochist लोकांच्या भावनेचे तरंग अजिबतच स्पष्ट केलेले नाहीत. अ बिग व्हॉइड!
______
खरं तर जेव्हा सेडिस्ट व्यक्तीला आपण कंट्रोल करतो आहोत, असा आनंद मिळत असतो, त्या पॉवरची जी सुखद जाणीव होत असते तीच त्याला इन फॅक्ट ऑर्गॅझमकडे नेत असते. आणि त्याचा हा कडेलोट पहाण्यातून कदाचित masochist व्यक्तीला आनंद आणि परत तीच पॉवरची जाणीव मिळत असते. तेव्हा दिसायला जरी सेडिस्ट व्यक्ती आक्रमक वाटली तरी masochist व्यक्ती हीच पॅसिव्हली आक्रमक आणि inciting असते - पण हा ट्विस्ट नाटकात अजिबातच नाही.
________
प्रचंड आदिम तसेच फक्त आदिम नाही तर baser instincts चाळवणारे प्रॅक्टिकलमधील संवाद आहेत. पण लिबिडो आणि क्रौर्य याच मूळ आदिम भावना का? इन फॅक्ट सर्व्हायव्हल ही सर्वाधिक बेसिक इन्स्टिन्क्ट असते आणि तीदेखील सेक्स मध्ये jeopardize होऊ शकते/होते. याबद्दल अवाक्षर नाही. अर्थात नाटककाराने स्र्वच इन्स्टिन्क्टस हाताळाव्या असाही काही नियम नसतो. पण काही व्हॉईडस जाणवतात त्यातील हा एक.
_________
मार्क द साद हा स्त्री असता तर .... काश! भावनांचे किती सुंदर पापुद्रे उलगडले असते असा विचार मनात आल्याखेरीज रहात नाही. याचा अर्थ साद कमी पडले असा नाही. पण परत तेच - काश ते स्त्री असते!!! एकंदर या नाटकाची ओळख अतोनात आवडली.
_________
चिपलकट्टींनी उगाच साजूक तुपाळ शब्द ब्वापरले नाहीत - हा प्लस पॉइन्ट आहे. जी वापरली आहे तीच भाषा अगदी योग्य आहे. जर फ्रेन्चमध्ये कंटला समानाअर्थी, समान फ्लेव्हरचा जो शब्द असेल तिथे उगाच योनी म्हणून रसभंग केलेला नाही.

प्रोफेश्वर आपल्या गांभीर्य आणणाऱ्या चेहेऱ्याने द सादच्या नाटकाबद्दल बोलत आहेत, नाटकाचं भाषांतर वाचून दाखवत आहेत, आणि त्यात 'हलके' लोक वापरतात अशी भाषा आहे, या सगळ्या विचारांनी हसायलाच आलं.

ह्याला पॉर्न म्हणावं का, असा प्रश्न पडला. द सादने वर्णन केलेले साडो-मासोकीस्ट प्रकार पॉर्नफीतींमध्येही किती दिसत असतील ह्याबद्दल शंका आहे. राहून राहून हा प्रश्न पडत राहतो, 'हे सर्व कुठून येतं?'. मार्की द सादची सरंजामी पार्श्वभूमी, त्याच्या काळात होत असलेली फ्रेंच राज्यक्रांती, त्याचं तुरुंगात खितपत पडणं, त्या काळात सरंजामांचा केलेला विध्वंस ह्या गोष्टी आठवतात. त्यातही द सादचं लेखन टिकून राहिलं हे आश्चर्यच.

मला सहसा सांस्कृतिक धक्के बसत नाहीत, मी सहज स्कँडलाईज होत नाही असं मला वाटतं. पण ह्यातले काही उल्लेख वाचून मानसिकदृष्ट्या जरा सावरून बसायला झालंच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सभ्यतेच्या, उदारमतवादाच्या, प्रक्षोभकतेच्या मर्यादा तुटेपर्यंत ताणणारे (खरंतर करवतीने कापून मग खिडकीबाहेर भिरकावणारे ...किंवा त्याचं अजूनही काही करणारे) मूळ लेखन आणि त्याचे मराठी भाषांतर करणारे आमचे चिपलकट्टी यांनी वाचकवर्गाला घाबरवून सोडायचं ठरवलेलं दिसतंय. Biggrin

एका अर्थाने हेच सगळं आजचे भांडवलशहाही म्हणतात असं दिसतं, सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट आणि एव्हरीथिंग इज इथिकल अ‍ॅजपर अवर नॅचरल इन्स्टिंग्ट्स वगैरे वगैरे. हे पॉर्न मात्र अजिबात नाही नितीमत्ता, स्वातंत्र्य, समानता, धर्म या सगळ्यांवर लिहिलेलं एक प्रक्षोभक लेखन आहे असा समज करून घेत मनाची समजूत घालून घेतेय.

एका अर्थाने हेच सगळं आजचे भांडवलशहाही म्हणतात असं दिसतं, सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट आणि एव्हरीथिंग इज इथिकल अ‍ॅजपर अवर नॅचरल इन्स्टिंग्ट्स वगैरे वगैरे.

असं ते म्हणतात खरं; पण त्यांना फडतूसांची मारायला व स्वतःच्या मालकीहक्काची राखण करायला धर्मसंस्था किंवा राज्यसंस्थेची गरज असते. फडतूसांनी त्यांचे शारीरिक व एकीचे बळ वापरायला त्यांची हरकत असते म्हणून मग नाईलाजाने बाकीचेही तथाकथित नीतिनियम किमान कागदावरतरी लिहावे लागतात जे मूर्ख व फडतूस लोकांना पाळावे लागतात/लावले जातात (इथे मध्यमवर्गीय कामी येतात). अनार्किस्ट+प्रिमिटिव्हिस्ट लोक ज्या मालकीहक्करहित माणूस व निसर्गशक्ती अशा ओरिजिनल फ्री-मार्केटचे समर्थन करतात ते ह्या दांभिकांना नको असते.

Hope is NOT a plan!

पहिली अनुवादाबद्दल, जो अप्रतिम झालेला आहे. भाषा रासवट आणि रांगडी ठेवल्याबद्दल विशेष आभार. शुद्ध तुपातले शब्द न वापरल्याबद्दल अजूनच आभार.
दुसरी content बद्दल. मला हा प्रकार भयंकर विनोदी वाटला. वाचल्यावर हसायला आलं. युजेनीची आई आल्यानंतरचे संवाद आणि प्रसंग तर कहर विनोदी आहेत. आणि हो, हे नाटक किंवा एकांकिका किंवा जे काही असेल ते - animation मध्ये केलं तर मजा येईल. कोणत्याही मानवी अभिनेता/अभिनेत्रीला हे झेपेल असं वाटत नाही.

म्यांव!

अरे हो अ‍ॅनिमेशन हे माध्यम माझ्या डोक्यातच आलं नव्हतं. हे लिहिलंय ते ठिक (लिहिता काय काहिहि येईल) पण हे असं स्टेजवर किंवा कोणत्याही मेनस्ट्रीम चित्रपटांत करणार कोण असंच डोक्यात येत होतं!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कितीही काहीही म्हटलं तरी अनेक गोष्टी वाचून मला चांगलीस किळस वाटली. (तोच लेखकाचा उद्देशही असावा)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

किळस, घृणा व तत्संम बरेच. यक्क झालं. थिअरी प्रकार बराच बरा. असा एक अॅलिस इन वंडरलँड चित्रपट (?) पाहीला होता ज्यात अॅलिसला थिअरी, डेमो व प्रॅक्टीकल दिले जाते. मला educational video म्हणून दिलेला, बाकीच्या गोष्टींची किळस वाटते म्हणून.

असं स्टेजवर किंवा कोणत्याही मेनस्ट्रीम चित्रपटांत
करणार कोण असंच डोक्यात येत होतं!

बाब्बौ तुम्हाला फ्रांस सिनेसृष्टिची नक्कीच डीटेल माहिती नाही की
तुम्ही एखाद्या A list दिग्दर्शकाची नाझी-लैंगिक फैंटसीधारित कृष्ण धवल सिन्नेमे पाहिले नाहित.

वर्ल्ड इज फुल ऑफ़ सरप्रैजेस गुड और bad is another thing...

actions not reactions..!...!

फ्रेन्च का? ती काम आम्ही औटसोर्स केलीत एका गुर्जींकडे Tongue

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

A Performance artist stood still for 6 hours to let people do what they wanted with her body. What happened next ?
https://www.elitereaders.com/performance-artist-marina-abramovic-social-...

बीभत्स रस मला कायमच महत्त्वाचा वाटतो. त्याच्या सगळ्या परिसीमांचा वेध घेतलाय यात.
आणि विशेष आभार अनुवादकाचे. कमालीचा अनुवाद झाला आहे. ग्रेट!

मर्मभेद, रत्नप्रतिमा,रक्तरेखा आदि शशी भागवतांच्या पुस्तकात देखील सर्व म्हणजे ९ रस अनुभवायास मिळतात.

ह्या पुस्तकाच्या संदर्भात दोन उल्लेख सांगतो. एक तर जी ए कुलकर्णी यांनी त्यांच्या एका पत्रात हे पुस्तक वाचले आहे असे लिहिले आहे(मला वाटते अवचाल यांच्या बरोबरच्या पत्रव्यवहारात). हा उल्लेख त्यांच्या पत्रसंग्रहात आहे. त्यात ते अवचल यांना चेष्टेने म्हणतात की त्यांनी अशी बरीच पिवळी पुस्तके वाचली आहेत. दुसरा आहे तो अनपेक्षित व्यक्तीकडून. ते म्हणजे प्रसिद्ध विचारवंत नरहर कुरुंदकर. त्यांच्या पत्रसंग्राहाच्या प्रस्तावनेत विनय हर्डीकर लिहितात की कुरुंदकरांनी हे पुस्तक वाचले होते, आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया एका देशमुख प्रकाशनच्या सुलोचना देशमुख यांना पत्रातून कळवतात. हे सर्व झाले ३५-४० वर्षांपूर्वी. ते पत्र मुळातून वाचावे असे आहे(पान १३७, निवडक पत्रे, सं. जया दडकर).

पत्रसंग्रहाचा उल्लेख आला आहे म्हणून लिहितो. 'सर्वमंगल क्षिप्राबद्दल' हा हरिभाऊ मोटे यांच्या आत्मचरित्राच्या संदर्भात आलेल्या पत्रांचा संग्रह नुकताच वाचला. एकूणच पत्रांचे जग या विषयावर मी येथे लिहिले आहे. जरूर पहा.

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

भाषा! त्याबद्दल प्रोफेश्वरांना शिरसाष्टांग नमस्कार. असल्या लेखनाचा अनुवाद करण्याचा एक क्षीण प्रयत्न मी करून पाहिला आहे. शब्द निवडताना फेफे होतेच. पण निवडीबद्दल पूर्ण खातरी असली, तरी शब्द वापरताना उडते ती फेफे निराळीच. त्या अनुभवामुळे या जुन्या वळणाच्या भाषेचं इतकं सहज, ओघवतं मराठीकरण करण्यामागे काय भाषिक कौशल्य असेल, त्याची कल्पना करता आली आणि मस्तक नत झालं!

आशयाबद्दल : हे प्रकरण मराठीत आलं नसतं तर मी कदापि वाचलं नसतं. आणि लैंगिक स्वातंत्र्याविषयीचा मजकूर किती प्रकारे मूलभूत राजकीय विचार करायला लावतो, ते समजून घेण्यास मुकले असते. प्रोफेश्वरांचे कितीही वेळा आभार मानले तरी कमीच आहेत.

जाता जाता : मराठी रंगभूमीवर सादच्या नाटकाचा प्रयोग करायची कल्पना सोडा - निदान अभिवाचन तरी करायची कल्पना कुणी केली, तर काय हाहाकार उडेल, अशी कल्पना सुचून थोडं खिन्न मनोरंजन झालं.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

थिअरी आणि प्रॅक्टिकल - भाग १, भाग २ दोन्ही वाचले. मेंदूच्या वळ्या अजून गुंतवळल्या आणि झीट आली.

गर्दीतला दर्दी