टिचकीसरशी दोन्ही

कविता

टिचकीसरशी दोन्ही

- सहस्तार्जुन

टिचकीसरशी दोन्ही

तू, थंबनेलमधला गोरा. तू, पाठीमागचा सावळा.
टिचकीसरशी डोअर्बेल वाजून, दार उघडून, दिसता दोघे.
तुम्ही दोघे लगेच फिरवता एकामेकांवरती डोळा
आतला घेतो, बाजूस सारतो, कथानकाचे पिझ्झा-खोके.
"तुला हवंय", "हो", म्हणताच कट्! ... झाले कपडे काढून
गुळगुळीत आंड तोंडात घेऊन डोलवतो आहेस डोके
तू मग... कट्! मांड्या सारून पोच्यात लाळ चोळून
शिरतोस. दोघे विव्हळत झटता. मुठीत ओला मीही होतो.

मी वाचक कल्पक एक, मोहोरलेला. आणि हवा
मला मांसल स्नायू स्पर्शत, मुसमुसत दरवळणारा
माझ्या ओठां- अंगावरच्या केसांवरती रेंगाळणारा
माझा शेजारीचा छोकरा... आसुसून जेव्हातेव्हा
मी बघत असतो... आज धरून असा आवळून झटतो.
टिचकीसरशी कथेत येतो, चिंबचिंब ओला करतो.

---------------------------------------

टिपण : पॉर्नचा माझ्याकरिता प्रमुख उपयोग काय? रतिक्षोभा (orgasm) करिता कामभावनेची तात्पुरती मानसिक परिस्थिती तयार करणे. या हेतूकरिता दोन भिन्न प्रकारच्या पॉर्नकृती आहेत : स्थिर/चलच्चित्रे आणि शिल्पे, अशा दृक्-श्राव्य-स्पर्श्य कृती एकीकडे आणि लिखित साहित्य दुसरीकडे. अगदी वेगवेगळ्या तर्‍हेच्या मानसिक स्थिती निर्माण करून हे दोन प्रकार रतिक्षोभाचा हेतू साधतात. पॉर्न चलच्चित्रे आणि लेखन सध्या आंतरजालावर सहज - टिचकीसरशी - उपलब्ध आहेत. येथे या दोन सहजप्राप्य प्रकारांची तुलना मी केलेली आहे. ही तुलना करण्यासाठी मी पॉर्न शब्दभांडार वापरणारे पद्य, हे माध्यम वापरलेले आहे. अभिजात पद्य काव्यात लय, यमक, वगैरे युक्त्या उत्कट आस्वादानुभव व्हावा म्हणून बेमालूमपणे वापरल्या जातात. येथे मी तंत्र उघडेवाघडे करणार आहे. खर्‍या पॉर्नमध्ये रतिक्षोभाला अनुकूल उत्कट मनःस्थिती निर्माण करायची असते. मला 'वेगवेगळी मानसिक स्थिती' हा युक्तिवाद करायचा आहे; उत्कट आस्वादानुभवाचे पॉर्न वा काव्य घडवायचा माझा हेतू नाही. वेगळी मानसिक स्थिती म्हणजे कुठली, त्याचे वर्णन पद्यातच केलेले आहे. ते येथे पुन्हा देणे अप्रस्तुत आहे.

प्राथमिक हेतू उपयुक्ततावादी असला, तर माध्यमाची तंत्रे उघड आणि ठोकळेबाजपणे राबवता येतात. या युक्तिवादाकरिता वापरले आहे, तसे हे धोरण पॉर्नकृतींमध्येसुद्धा दिसते - उदाहरणार्थ, पॉर्न चित्रपटांत प्रकाशयोजना, नेपथ्यरचना, पार्श्वसंगीत, वगैरे जुळवाजुळव केलेली असते. पॉर्न हे सुंदर असू शकते, सौंदर्यनिर्मिती हेतुपुरस्सरही असू शकते. परंतु कपडा, सुतारकाम, वगैरे अन्य उपभोग्य मालासारखे निर्माता आणि उपभोक्ता दोघांकरिता हे सौंदर्य कार्यक्षमतेच्या, कामचलाऊ तंत्राच्या मानाने दुय्यम असते. या पद्ययुक्तिवादाचे तंत्रविषयक धोरण असेच उपयुक्ततावादी आहे. एका तपशिलापुरता मात्र पुढील पद्य युक्तिवाद वेगळा आहे - फुलांच्या बुट्ट्यांचे कापड आपण ताग्यातून वाटेल तिथे फाडू शकतो, तसेच पॉर्न अनुभवताना सुरुवातीचा भाग सोडून थेट संभोगापर्यंत उडी मारता येते, रतिक्षोभ झाल्यानंतर कथा पूर्ण होण्यापूर्वी सोडून देता येते. मात्र दोन प्रकारच्या पॉर्नची तुलना करणारी ही सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकसंध रचना आहे.

युक्तिवादाकरिता वापरलेली पद्यातली काही तंत्रे ही अशी :

१. पद्य १४ ओळींचे आहे, ८ ओळींचे एक कडवे आणि ६ ओळींचे दुसरे कडवे आहे. पेत्रार्कियन सॉनेटच्या साच्यात पहिल्या ८ ओळींच्या कडव्यानंतर ६ ओळींच्या कडव्यात विषय बदलतो, तसा येथे विषय चित्रफितीकडून चावट कथेकडे वळतो.

२. पहिल्या कडव्यात अंत्ययमकांचा क्रम क-ख-क\ख-ग-ख\ग-घ\\ असा आहे. हा साचा आहे तेर्त्सा रीमा (तिसर्‍या ओळीचे यमक). दर तीन ओळींत मध्येच एक नवीन यमक उद्भवते. पुढच्या तीन ओळींत ते नवीन यमक शिल्लक राहते, जुने बाजूला सारले जाते, आणि पुन्हा मध्ये वेगळेच यमक उत्पन्न होते. अशा प्रकारे यमकांना मागचे मागे सोडून पुढे, पुढे जात राहण्याची गती असते. दुसर्‍या कडव्यात च-छ-छ-च\घ-घ अशी यमके सॉनेटांमध्ये पारंपरिक असलेल्या एका क्रमात येतात. पहिल्या ओळीतले यमक चवथ्या ओळीत परत येते. आणि शेवटच्या दोन ओळींमधले यमक पहिल्या कडव्याच्या शेवटचेच आहे. दृक्श्राव्य आणि कथा माध्यमांमधील साम्यस्थळे ('ओला') आणि फरक सारांशाने सांगण्याकरिता हे आदले यमक पुन्हा अवतरते आहे.

३. पहिल्या कडव्यातली वाक्ये थेट आहेत, तुटक आहेत; फक्त दिसू किंवा ऐकू येणार्‍या घटनांची आणि वस्तूंची वर्णने आहेत. काही ढोबळ अनुप्रास, यमके हे शब्दालंकार सोडल्यास, अर्थालंकार असला तर एकच आहे : 'कथानकाचे खोके बाजूला सारतो' हेसुद्धा चित्रफीत बघणार्‍या पात्राच्या दृष्टीने सामान्य वर्णनच आहे, परंतु कदाचित युक्तिवाद सांगणार्‍या सूत्रधाराने ध्वनित केलेले रूपक आहे. दुसर्‍या कडव्यात स्पर्श आणि गंध हे अनुभव आणि मनातील कल्पना आणि आशा यांची वर्णने आहेत. युक्तिवादातील हा एक मुद्दा या तंत्राद्वारे मांडलेला आहे.

४. पहिल्या कडव्यात शेवटचे रतिक्षोभाचे 'ओला मीही होतो' हे वाक्य सोडल्यास सर्वत्र 'तू / तुम्ही' हे सर्वनाम परत-परत दिसत राहते. दुसर्‍या कडव्यात (सारांशाची शेवटची ओळ सोडून) प्रत्येक ओळीची सुरुवात 'मी / मला / माझ्या' या सर्वनामाने केलेली आहे. दृक्श्राव्य आणि कथामाध्यमासंबंधीच्या कडव्यांत सर्वनामे वेगवेगळी आहेत, हा युक्तिवादातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

५. पहिल्या कडव्यात 'गुळगुळीत' हे वर्णन आहे, ते दुसर्‍या कडव्यातील 'अंगावरच्या केसांवरती'शी फरक दाखवणारे आहे, वगैरे. अशा आणखी काही बारीकसारीक तांत्रिक युक्त्या आहेत. परंतु त्या सर्वांचे परिगणन येथे करत नाही.

***

तळटीप : या लेखात वापरलेले टोपणनाव आणि लेखनशैली पारदर्शक आहेत. जालशोधात अतिशय वेगळ्या विषयांचे लेखन आणि व्यावसायिक माहितीची सरमिसळ होऊन येऊ नये; म्हणून टोपणनाव वापरलेले आहे, इतकेच.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

एरॉटिक आहे.
वाचक-कल्पक हे आवडले, कारण प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका तपशिलापुरता मात्र पुढील वरील पद्य युक्तिवाद वेगळा आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुफान आहे हे !!
सहस्तार्जून हे टोपणनावही मार्मिक! (ब्याचलरांसाठी स्वहस्तार्जूनही चालले असते :प)

दोन सुचवण्या
खालचे टिपण करडे केले तर मुळ कवितेला अधिक न्याय देणारे होईल
दुसरे दोन कडवी म्हणा कवितकं म्हणा अधिक मोकळी जागा असेल तर जे दाखवायचंय ते अधिक नेमकेपणाने पोचेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी पॉर्नची मुख्यत्वेकरून वाचक आहे, प्रेक्षक नाही. मला या दोन कडव्यांमधला विरोधाभास अगदी नेमकेपणानं, आतून कळला. पण पुढचं टिपण मात्र काहीसं रसभंगकारक, नवनीतछाप गायडातून आल्यासारखं भासलं. कुणाला ते तसं वाटलं नसेलही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गाईडचा मुद्दा बरोबर आहे, आणि (किंवा या प्रतिसादशृंखलेत "आणि" ऐवजी "पण") घोषित आहे.

येथे मी तंत्र उघडेवाघडे करणार आहे.

रसभंगाच्या बाबतीत म्हणावे, तर :

मला 'वेगवेगळी मानसिक स्थिती' हा युक्तिवाद करायचा आहे; उत्कट आस्वादानुभवाचे पॉर्न वा काव्य घडवायचा माझा हेतू नाही.

त्यामुळे जर काव्यासारखी रसनिष्पत्ती झाली तर ती अतिरिक्त उपलब्धी (बोनस) आहे. युक्तिवाद हा मूळ हेतू साधताना रसभंग झाला, तर दुय्यम मुद्दा मानून दुर्लक्ष केलेले आहे. (चित्रा-चित्रांचे कापड ताग्यातून फाडताना कातरलेल्या चित्राबाबत रसभंग होतो आहे वा नाही, याकडे आपण जसे दुर्लक्ष करतो तसे. येथे उपमा फाडण्याबाबत नाही [पद्य फाडून युक्तिवादाच्या उपयोगाचे नाही, हे तळटिपेत आहेच], तर रसभंगाबाबत दुर्लक्ष करण्याबाबत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0