जलपर्णीच्या नशिबाचा साडेतिसरा फेरा : औट - द म्युझिकल

कथा

उपोद्घात | पहिला फेरा | दुसरा फेरा | तिसरा फेरा | साडेतिसरा फेरा

_________

जलपर्णीच्या नशिबाचा साडेतिसरा फेरा : औट - द म्युझिकल

- आदूबाळ

कहीं आग लगने से पहले । उठता है ऐसा धुंआ ॥
जैसा है इधर का नज़ारा । वैसा ही उधर का समा ॥

दिनमणी उगविला तोच सोनेरी किरणे घेवोन. कालची सायङ्‌काळ आनन्दध्वजासाठी काही चांगली गेली नव्हती. उलट रचलेले सगळे डाव उलट पडले होते, बान्धलेल्या सगळ्या नाड्या सुटावयास आल्या होत्या. रमाबाईंचा पूर्णस्तम्भ उदरी रिचवोन आनन्दध्वज सुदानातच अस्ताव्यस्त कलण्डला होता. प्रत्येक घोरिकेबरोबर सुरागन्धाचा अस्पष्ट ढग आसमन्ती सोडून देत होता.

रुद्रप्रयागास तो दिसला तो याच स्थितीत. आनन्दध्वजाचे भ्रमणध्वनिचा करुण अन्त आपण आदले भागांत पाहिला. 'हा भ्रमणध्वनि व्याप्तिक्षेत्राच्या बाहेर आहे' हे टेपितभाषण ऐकोन कण्टाळलेला रुद्रप्रयाग आनन्दध्वजाचे गृही गेला होता. तेथेही कुलुपिका पाहोन शेवटचा पर्याय म्हणोन सुदान चैनिजधामी आला होता.

"ऊठ गारू, ऊठ!" आनन्दध्वजास गदागदा हालवीत तो म्हणाला. "मी जिङ्कलो, गारू. विजयी झालो."

आनन्दध्वजाने डोळे किलकिले केले. रुद्रप्रयागाचे पीनोपनेत्र तयांचे दृष्टीसमोर तरळले.

"जा, रुद्रप्रयागा. कालच्या नागिनधुरळियात सगळियाचा अन्त झाला आहे. जीव वाचव आणि पळ..."

"सगळियाचा अन्त? गारू, ऊठ. सगळं आत्ता तर कोठे सुरू होत आहे. तू महान आहेस, गारू." आनन्दध्वजाचे मुखावर जलप्रोक्षण करीत रुद्रप्रयाग म्हणाला.

"म्हणजे?"

"मधुकशेने आज प्रभाती मजला उत्तीर्ण केले! अखेर! जे मला गेले दोन सप्ताह साधत नव्हते ते काल साधले. काल मधुकशा काही निराळीच भासली. नेहेमीचे कुसुमादपि मार्दव जावोन वज्राची कठोरता आली होती. प्रथम मी बावचळलो. कळवळलो. हडबडलो. धडपडलो. मग सटकलो. म्हटलो च्यायला हिच्या तर, घेतोच आता. पण मी सहन केले, म्हटले सन्धीची वाट पाहावी. मग काय! सन्धि मिळतांच हिसकावला तो चर्मदण्ड आणि वाजविला नगारा. ते झालियावर मग तियेला हस्तपाशी गुंतवोन हाती घेतला तो ताडक..." हात हवेत फटकारीत रुद्रप्रयाग अभिमानाने म्हणाला.

आनन्दध्वज अवाक् होवोन पाहत राहिला. मग धडपडोन उठला.

"मधुकशा कोठे आहे? क्षेम आहे ना ती?"

"शान्तम्, गारू. मधुकशेने मजला नीट शिकविले आहे. एक परवल आगोदरच ठरलेला असतो. वेदना असह्य झालियास तो परवल उच्चारावयाचा. मग ते सर्व थांबवायचे असते. याआधी माझियावर परवल उच्चारायची वेळ वारंवार येई, आणि मधुकशेवर कधीही येत नसे. पण काल बरोबर उलट घडले."

"हम्म. मग मधुकशा बरी आहे तर..."

"बरी? अरे ती बहुत प्रसन्न जाहली. डोळियांत आनन्दाश्रू आले. इतर अश्रूंच्या गर्दीत चटकन दिसले नाहीत, पण आनन्दाश्रूच असावेत. एकदा मेख लक्षात आलियावर काल रात्रीच दोनदा पुनर्प्रयोग केला. आज पहाटे ती म्हणाली, आता गारूकडे जा. तुझिया पुढील कामना, पुर्‍या करेल बरे तो नाना. मजकडे तुझियासाठी अधिक काही नाही. आणि तिचिया डोळियात परत पाणी की रे तरारले. काल मी उत्साहात जरा अधिकच ताडन केले असावे; ठणकत असेल."

"तिचे काय काय ठणकते आहे तुजला कल्पना नाही, रुद्रप्रयागा." आनन्दध्वज विषादाने म्हणाला. "असो. ही गांठ उकलली म्हणावयाची. आता तुजला जलपर्णीस भेटवतो. माझे बाकी जग उन्मळोन पडले तरी तुम्ही सुखीं असा..."

"जलपर्णीस भेटवतो म्हणजे? असेच? डायरेक?"

"हो तर! हिरोला हिर्विणीस भेटावयासाठी सविस्तर व्यूहरचना करावी लागायास हा काय यशराजाचा शिनुमा काय रे? जी गोष्ट 'बाई वाड्यावर या' या तीन शब्दांनी साध्य होते तियेसाठी मल्टिप्रेक्षात तीन तास आणि तीनशे टके का मोजावयाचे?" आनन्दध्वज आपले शरीर आवरीत उभा राहिला. "तू सुदानच्या गर्भगृहीं बैस. अशाच कामांसाठी त्या कक्षाची योजना आहे. मी जलपर्णीस निरोप देवोन येतो."

सांसों में बड़ी बेकरारी । आँखों में कई रत जगे ॥
कभी कहीं लग जाये दिल तो । कहीं फिर दिल ना लगे ॥

आनन्दध्वज परतला तेव्हा तयाला बरेच बरे वाटत होते. नेटकेची धमकी अजूनही कानीं घुमत होती. मालकारूच्या भेटीची तलवार अजूनही मानेवर लटकत होती. मधुकशेच्या मनःस्थितीवर अजूनही उपाय सापडला नव्हता. पण कृष्णमेघांच्या दाटीतून एक किरण जरी चमकला तरी तयाचाच आधार वाटतो. मानवी मन असे अभिनत असते.

जलपर्णीशी भेट मात्र सुरळीत झाली होती. मागे लिहिल्याप्रमाणे जलपर्णीच्या या आवडीला आगोचर समजले जाई. जलपर्णीचा स्वभावही एकाच नरावर अनुरक्त राहावयाचा नव्हता. त्यातून तियेसमोर कोणी सहसा फार काळ टिकत नसे. ऐशा परिस्थितीत नवनवी पाखरे कोठून मिळावयाची? कालान्तराने ती आनन्दध्वजाकडे येई आणि तयाच्या गारुत्वाला आवाहन करीत 'कोणास तरी शोधा मजसाठी' म्हणोन धोशा लावी. त्यामुळे 'नवविहगम् आगच्छति' ही बातमी देतांच ती त्वरेने येणार याची तयाला खातरीच होती.

जमाना बदल गया प्यारे, पुरानी बात नहीं होगी

सुदानमध्ये प्रवेशिताच आनन्दध्वजाला बदल जाणवला. वातावरणात एक टैन्शन्य भरले होते. जणू टिचकी मारता ते फुटेल आणि काही प्रलय ओढवेल ऐसे वाटत होते. सुदान अजून सुरू जाहले नव्हते, तयामुळे ग्राहक बसणियाची जागा मोकळीच होती. तयाच्या बरोबर मध्यभागी एकटे नीलकमलासन माण्डले होते. तयांवर एक धूम्रकापोत सफारीवसनाङ्कित किरकोळ मूर्ती बैसली होती. चण जरी लहानखुरी असली तरी बैसण्याच्या पद्धतीतून रुबाब, अधिकार ओसण्डोन वाहत होता.

उपोद्धात

आनन्दध्वज समजला. मनीं चरकला.

"मालकारू!" नीलकमलासनाभिमुख होत्साता लीनतेने वदला.

मुद्रिकास्फीत हात विद्युल्लतेच्या वेगाने उठला. आनन्दध्वजाच्या गालावर पञ्चाङ्गुलीची निशाणी रेखोन गेला.

"मजला क्षमा करा, मालकारू! आणखी दोन हाणा, परन्तु आपले म्हणा. मी चुकलो. तुम्ही माझे अन्नदाते. आपणांशी ऐसे भाषण करावयांस नको होते. परन्तु मजला माझिया मनींचा क्षोभ आवरेना." आनन्दध्वज पश्चात्तापदग्ध स्वरात म्हणाला.

मालकारूचे नेत्रही तयाच्या सफारीसारखेच धूम्रवर्णी होते. त्या नेत्रांकडे जवळोन पाहताच आनन्दध्वजाच्या स्मृतीत काही चाळवले. नेमके काय ते पकडीत येईना. दृष्टीस दृष्टी भिडवोन त्या नेत्रांचा रहस्यभेद आनन्दध्वज करीत असतांच मालकारूने 'बैस' ऐसी खूण केली.

दुसरे आसन नव्हते. निरुपायाने आनन्दध्वज मालकारूचे पायांशी बसला. धूम्रवर्णी नेत्र थण्डपणे पाहत होते, पण तयांत प्रश्न होता.

"मी खूप यत्न केले, मालकारू. कोणी लेखक सापडत नाही..." आनन्दध्वज सगळे कर्मकथन करीत होता, तोच आतल्या कक्षाचे द्वार उघडिले, आणि रुद्रप्रयाग बाहेर आला.

"गारू! आलास का परत? आवाज ऐकला तुझा. दिलास का निरो..." आणि बाहेरचे दृश्य पाहोन थबकला.

"रुद्रप्रयागा! ये ये, तुझा परिचय करोन देतो." आनन्दध्वज म्हणाला. "हे मालकारू, आपलिया 'खचाखच गचागच'चे. मालकारू, हा रुद्रप्रयाग - आपला लेखक. येयाच्या कथांमुळेच आपले प्रकाशन एवढे लोकप्रिय जाहले. यानेच सध्या लेखनसीमा घालोन घेतली आहे, तयाकारणे नवे लेखक शोधतो आहे."

रुद्रप्रयागाच्या भालावर आठिया पडल्या. "गारू? 'खचाखच गचागच'ला काही अडचण आहे का? ही काय भानगड आहे?"

"काय साङ्गू तुजला, रुद्रप्रयागा. खप दिनोदिनी कमी होतो आहे. मालकारू चिन्तेत आहेत, मी खप वाढविण्यासाठी प्रयत्नांत आहे, आणि तू असा अढी घालोन बसला आहेस." आनन्दध्वज निराशेने म्हणाला.

पण रुद्रप्रयाग मान हलवीत होता. तयाच्या चेहर्‍यावर पुसटसे हास्य होते.

"नवनवीन लेखकांचा आणि खपाचा सम्बन्धच काय? गारू, खप काय अशाने वाढेल काय?"

"मग कशाने वाढेल?"

रुद्रप्रयाग आनन्दध्वजाशेजारी माण्डा ठोकून बैसला. "मालकारूंची परवानगी असेल तर माझे मत साङ्गतो."

'बोलत राहा' या अर्थाची हस्तमुद्रा जाहली.

"कोणत्याही प्रकाशनाचा खप दोन घटकांवर अवलम्बून असतो. विषयवस्तु, म्हणजे तयात प्रसिद्ध होणारे साहित्य, हा पहिला घटक. 'खचाखच गचागच' त्या बाबतीत तगडे आहे. माझे एक सोडा, पण अन्य कथाही कमी नाहीत. किम्बहुना 'दीपगृहांतले दणके' ही कथा वाचूनच माझ्या मनी पहिली चावटिका प्रकाशली."

रुद्रप्रयाग क्षणभर विसावला. श्रोतृवर्ग एकाग्रचित्ताने ऐकत होता. समाधानाने तो पुढे बोलू लागला.

"तर आता दुसरे घटकाविषयी बोलू. तो घटक म्हणजे वितरणसारिणी, अर्थात आंग्लभाषेत डिस्ट्रिब्यूशन चॅनल. आपण 'खचाखच गचागच' छापतो, आणि विकतो कोठे, तर मार्गपरिवहनस्थानकात असलेल्या टपराट दुकानांत! उठा, मालकारू, जागृत व्हा. जग बदलतं आहे. आता खचाखचनेही बदलायची वेळ जाहली आहे!"

रुद्रप्रयाग थांबला. अखिल सुदानात टाचणीविस्फोट शान्तता पसरली होती. मालकारूचे धूम्रवर्णी नेत्र एकटक रुद्रप्रयागाकडे रोखलेले होते. आनन्दध्वज तयारीत होता. कोणत्याही क्षणी तो हात परत उठला असता. आपल्या मित्रासाठी तो वार आपल्या गालीं झेलायला गारू सज्ज होता.

पण धूम्रवर्णी नेत्र परत आनन्दध्वजाकडे वळले. मान रुद्रप्रयागाच्या दिशेने हलली. तो सङ्केत उमजोन आनन्दध्वज म्हणाला,

"रुद्रप्रयागा, तुझिया मनांत काही भरीव-ठाशीव असे आहे का? की हा आपला तोंडचा उबारा?"

"अलबत् आहे! सध्या वाचक 'खचाखच'साठी त्या दुकानापर्यंत जातो आहे. आतां 'खचाखच'ने वाचकापर्यंत जावे. हल्ली सर्वांकडे चतुरभ्रमणध्वनि. खचाखचचे ऐन्दराईद ऐप बनविल्यास प्रत्येकाचे हाती खचाखच. अनेक छुप्या वाचकांस त्या दुकानी जावोन खचाखच मागणियास शरम वाटते. आता बोटाचे एके ठोक्यात मासिक तुमचे हाती. ना छापावयाचा खर्च, ना विक्रेत्याची दलाली. पटते आहे काय?"

प्रथमच मालकारूच्या चेहर्‍यावर हास्यरेखा उमटली. खाली वाकोन तयाने रुद्रप्रयागाचे मस्तकावर आपला हात ठेविला.

जो झुंजार । हो तय्यार । वही सरदार सा लागे ॥

बाहेरच्या बन्द दरवाजावर कोणी ठोठविले. कोण असणार याची आनन्दध्वजाला कल्पना होती. तो उठोन गेला. अपेक्षेप्रमाणेच बाहेर जलपर्णी उभी होती. जलपर्णीस पाहतांच आनन्दध्वजाच्या मस्तकातली न्यूरॉनिये एकमेकांवर आदळली. मघांपासोन चाळवलेली स्मृती ढवळोन वर आली. माहितीचे एक बुडूख जगाला अक्षरशः पालथियाचे उलथे करू शके. क्षणार्धात समीकरणे बदलली. आनन्दध्वजाचे जग पालटले. पण तयांला विचाराला वेळ पाहिजे होता.

काही न बोलता त्याने तियेस आत घेतले. उकाडियास न जुमानता तिने पायघोळ कोट ल्यायला होता. कोटाचे आतले बारूद रुद्रप्रयागासाठी होते. तिजला अंतर्गृहाचा रस्ता दाखवणार, तितक्यांत आरोधरम्भांचा तो चिरपरिचित आवाज आला.

आपले खिल्लार घेवोन दाबङ्ग्य प्रकटले होते.

ऐसे भोले बन कर हैं बैठे । जैसे कोई बात नहीं ॥
सब कुछ नज़र आ रहा है । दिन है ये रात नहीं ॥

"तू!" जलपर्णी आश्चर्याने उद्गारली.

"मीच!" नेटके किञ्चित कम्पित स्वरांत उत्तरला.

"कन्नड शिवी"

मालकारू ताठ उभे राहिले होते. मागे नीलकमलासन कलण्डले होते. त्या कन्नड गालीकलिकेबरोबर मुखीच्या गुटिकेचाही स्फोट जाहला होता, आणि आरक्त ओघळ हनुकेवर आल्यामुळे एक वेअरवुल्फीय व्यंग्यचित्र तयार जाहले होते. आनन्दध्वजाला हास्याच्या उकळ्या फुटत होत्या.

"डॅडी!" आपलिया कोटाचे बन्द आवळत जलपर्णी चीत्कारली.

"सर!" नेटकेने टाचा खटकावीत एक कडक सलाम ठोकला.

"" मालकारू बिन जलपर्णीचे डॅडी बिन नेटकेचे भूतपूर्व वरिष्ठ स्वतःशी पुटपुटले.

जब गगन अगन बरसावे रे । वो ठंडी पवन बन जावे रे । जो सब का भार उठावे रे । वोही दबंग ॥
हो जब घडी कठिन सी आवे रे । वो झट से सबल बन जावे रे । जो सब को पार लगावे रे । वोही दबंग ॥

कथा जवळजवळ संपलीच. तपशिलांत जाणेची आता गरज उरली नाही. दैवगतीचे हे साडेतीन फेरे पडोन या पांचही जणांचे दैव पालटले. रुद्रप्रयाग मालकारूचे नेत्रनक्षत्र कसे झाला हे आपण वर पाहिलेच आहे. आनन्दध्वज सम्पादकस्थानी अढळ राहिला, पण विपणनप्रमुखपदी मालकारूने रुद्रप्रयागाची प्रतिष्ठापना केली. ऐशा कर्तबगार पुरुषावर आपली कन्यका अनुरक्त असेल तर त्यांस कोणता पिता आक्षेप घेईल? (अर्थात पित्याच्या आक्षेप घेण्या-न-घेण्याला जलपर्णीने केव्हाच फाटियावर कोलिले होते हे वेगळे. पण आनन्दध्वजाच्या सांगण्यावरून तिने आज्ञाधारक कन्येचे रूप धारण केले होते, आणि या दैवकृत्यावर नृत्य केले होते.)

नेटकेला काहीही साङ्गणेची गरज नव्हती. जलपर्णीचा वियोग तयाला सहन करावयाला लागणारच होता, परन्तु आपलिया भूतपूर्व वरिष्ठाचे विरोधात उभे ठाको नये एवढी बुद्धी तयांस होती. एकाएकी तो आनन्दध्वजाचा सखा जाहला. मिष्टभाषणे करोन आनन्दध्वजाचे सुग्रन्थात यावयाचा यत्न करो लागला. रेडादि टाकावयाचा आता प्रश्नच उरला नव्हता. बरोबर आणलेल्या रेडियांस थापाचे पदार्थ खाऊ घालोन आनन्दध्वजाने त्यांची रवानगी केली. मालकारू निघतांना नेटकेने तयांचे चरणस्पर्श केले.

जलपर्णी रुद्रप्रयागासमवेत स्वगृही रवाना जाहली होती. तिथल्या रङ्गमहाली आता बहुप्रतीक्षित खेळ रङ्गणार होता.

आनन्दध्वज आपल्या आसनी रेलला. नितम्बसुराकुपीत दोन बोटे जीव होता. आनन्दध्वजाचे नेत्र मिटले. लॉन्ग वीक.

उपसंहार एक: आनन्दध्वजाचे नेटकेस पत्र

तूं धरूनि स्वाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणत आहासी ॥
तरी नेटक्या तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी हाणिता तूं नव्हेसी । हे हाण्य नव्हती ॥
जैसें स्वप्नामाजिं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांही नाहीं ॥
तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया काया । परि आंगी न रुपे ॥
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥

उपसंहार दोन: जोड्या जुळवा

"येयाचा अर्थ काय, गारू?" पत्र फडकावीत नेटके म्हणाला. हल्ली गारू हे सम्बोधन आतून येत असे. त्यातला उपरोध गळोन पडला होता.

"म्हणजे नेटक्या, इतुके देवदास व्हावयाची गरज नाही. ते पाहा..."

सुदान चैनिजाच्या कोपरियातल्या मेजावर मधुकशा एकटीच बैसली होती. तिचाही चेहरा उदास होता.

"गारू..."

आनन्दध्वजाने नेटकेची विनन्ती मध्येच तोडली.

"परत साङ्गतो. हा यशराजाचा शिनुमा नव्हे. मी तुजला मार्ग दाखविला. इत:पर मार्गक्रमणेचा स्वामी तूच. मी केवळ पथप्रदीप."

--समाप्त--

__________
biased

---

चित्रश्रेय : अमुक

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

वा! सुंदर. पण मधुला, रुद्र मिळावयास पाहीजे होता :(.
_______
ज्या मधुकशेबरोबर रुद्रची कामकला इव्हॉल्व्ह होत गेली तिला मधुला मिळायला हवा होता. ही जलपर्णी की जलार्पिणी फक्त आयत्या बिळावर नागोबा आहे. असो.
_____
पण मधुला अगदीच वारांगन केलेली असल्याने .... तिला कसा काय मिळावा रुद्र?

अंदाज आलेला शेवटाचा तसाच झाला. आदुबाळाची सेपरेट डिक्शनरी तयार करायला घ्यायलाच हवी. एका कथेत इतके नवशब्द प्रसवणे म्हणजे साधेसुधे काम नाही.

खचाखच गाचागच आभार!
फॅंटास्टिक ओके डन!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी सुदान हे नाव चैनीज दुकानाला द्यावे असे का वाटले ब्रे?

म्यांव!

खरं नाव "सुदीन चायनीज" (sic) होतं, पण वेलांटी पडून गेल्याने ते सुदान झालं. हा तपशील कथेसाठी अवांतर वाटल्याने घेतला नाही.

*********
आलं का आलं आलं?

दैवकृत्यावर नृत्य = चान्स पे डान्स हे आज लक्षात येऊन खूप हसले.

अखेरीस रुद्रप्रयागास जलपर्णी मिळाली तर...आवडले.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ऋणनिर्देश

सर्वप्रथम सर्व वाचकांचे अनेक आभार. अनेकांनी कथेखालीच प्रतिक्रिया दिल्या. अनेक व्यनि आले, खरडी आल्या. इथे, मिपावर अनेकांनी भरभरून कौतुक केलं. माझ्यासारख्या हौशी लेखकासाठी हा प्रतिसाद खूप खूप महत्त्वाचा आहे. नवा प्रयोग करायचं बळ अशा प्रतिसादांनी वाढलं आहे.

सप्लाय-साईड ऋणनिर्देशामध्ये मुख्य म्हणजे मेघना आणि अमुक. असे संपादक मिळायला माझ्या कुंडलीतला कुठलासा ग्रह कोणत्याशा भारी ठिकाणी पडला असणार. कथा लिहिणं माझ्यासाठी एकलकोंडी क्रिया आहे. वहावत जाऊन काहीपण लिहू शकतो. अशा ठिकाणी हे संपादकद्वय बरोब्बर टोकतं. कथावस्तूतल्या अंतर्गत लॉजिकला आव्हान देणे, अमकं पात्र असंच का वागतं / वागत नाही, शेवट असा पाहिजे/नाही पाहिजे वगैरेवर खुंदल खुंदल के चर्चा होतात. "मेघनामुकचा ब्रेक, उत्तम ब्रेक" असा फ्लेक्ष बनवायला टाकला आहे.

या कथेसाठी भाषाही तितकीच महत्वाची होती. अनेकदा भाषेची घसरलेली चड्डी मेघनामुकने सावरलेली आहे. प्रथम माझा संस्कृत आणि संस्कृतोद्भव शब्दांवर जोर होता, पण नेहेमीच्या इंग्राठी शब्दांनाही संस्कृत लुगडं नेसवता येईल हे त्यांनी लक्षात आणून दिलं. या सर्व संपादकिंगसाठी मी ऋणी आहे.

कथेला साजेशी चित्रं अमुकने काढली. मेघनाने त्या चित्रांच्या बाबतही 'अमोल' सूचना दिल्या. मला सर्वात आवडलेलं चित्र जलपर्णीचं - तिचा हॉटपणा आणि अकड अमुकने पर्फेक्ट पकडली आहे.

अभिजीतला (अभ्या..) नेटके साकारावासा वाटला. त्याने तो बरोब्बर पकडला आहे. विशेषतः त्याचा भांग. (अभ्याने नेटके पाठवला तेव्हा मी अतिशय रटाळ मीटिंगमध्ये होतो. नेटकेचा भांग पाहून बाहेर पळ काढला आणि पोटभर हसून घेतलं.)

संस्कृतमध्ये काही अडलं की मी नेहेमी ब्याटम्यानाकडे धाव घेतो. एका भागात आलेल्या मूळ इंग्रजी 'आर्योक्ती'चं त्याने झटक्यात 'आर्यीकरण' करून दिलं. तसंच अनेक नवशब्दांचं मूळ 'स्पोकनसंस्कृत' या सायटीत सापडेल - तो दुवाही त्यानेच मागे कधीतरी दिला होता.

[इतर अवांतर - फॅनफिकबद्दल - नंतर लिहिणार आहे.]

*********
आलं का आलं आलं?

आबासाहेब
ही सीरीज मुद्दाम बाजुला ठेवत होतो आज वाचु उद्या वाचु एकत्र वाचु. आज सलग वाचुन काढली.
क्लीन बोल्ड झालो.
अरारा काय प्रतिभेचा थयथयाट आहे धन्य धन्य झालो वाचुन.
काय ती शब्द निर्मीती काय ती शैली काय ते आधुनिक पौराणिक मिक्शर भेळ
डिक्शनरी स्वतंत्र आदुबाळलीलामृत सोबत स्पेशल तुम्ही निर्मीलेल्या शब्दांची डिक्शनरी बनलीच पाहीजे.
आम्हाला कृपया तुमचे नवनिर्मीत शब्द वापरण्याची परवानगी दयावी श्रेय प्रत्येक ठीकाणी देऊच.
धन्य झालो
आनंदध्वजाच्या कथा वाचलेल्या नाहीत पण फारशी गरजही आता वाटत नाही
बायदवे ते तुमच सुदान चायनीज नेमक कुठेशी आहे सांगणे
आम्ही तीर्थस्थळासारखी भेट देऊ या टेबलावर बुड टेकवुन आदुबाळांना कल्पना सुचलेली असेल त्या ठीकाणी बसले असतील
अस फ्यान टाइप करु म्हणतो.
अनेक धन्यवाद या भन्नाट कथेसाठी

A Performance artist stood still for 6 hours to let people do what they wanted with her body. What happened next ?
https://www.elitereaders.com/performance-artist-marina-abramovic-social-...

प्रतिभेचा थयथयाट

लोल! धन्यवाद.

---------

आता जंगली महाराज रस्त्यावर जिथे मॅकडोनाल्ड्स आहे त्याच्या समोर, एकेकाळी - म्हणजे पंधराएक वर्षांपूर्वी, एक स्वस्तसं चायनीज हॉटेल होतं. त्याचं नाव सुदिन चायनीज होतं. त्यात मिळणार्‍या पदार्थांत मुद्दा कमी आणि एम्बेलिशमेंट्स जास्त असत. (उदा. चिकन हाक्का नूडल्समध्ये चिकन कमी कोबी जास्त वगैरे.) त्यामुळे एक मित्र त्याला सुदान चायनीज म्हणत असे. (सुदानसारखं गरीब म्हणून.) तिथून हे नाव डोक्यात राहिलं होतं. असो. त्या खर्‍या सुदिन चायनीजचं कथेतल्या सुदान चैनीजशी नावापलिकडे साधर्म्य नाही. कथेची तयारी म्हणून "सुदान" नावाची बॅक स्टोरी बनवली होती, पण ती कथेत घ्यायची संधी मिळाली नाही.

*********
आलं का आलं आलं?

सुदानसारखं गरीब म्हणून.

हे आणखी कोणतं पात्र? मला सुदामा माहीते.

सुदान देश.

*********
आलं का आलं आलं?

अरे हां. थँन्क्स.

शालेय जीवनाचे दशक संपूर्ण करण्यास एक वर्ष कमी असताना, अरबप्रांती पिता असलेल्या मित्राच्या घरी, त्याची माता नसताना, निद्रासुखकारी चौकटीवरील कार्पासपट्टीकेच्या खाली गोपनीय स्थळी दडवून ठेवलेल्या गतानंदध्वजाच्या रम्य कथा आठवल्या. दिवसाच्या त्या उष्ण अपराह्ण काळाची ती सर्वांगोष्णकारी आठवण आज वयाच्या चत्वारिंशत्काळात अतीव सुखदायी आहे. गोष्ट दाता सुखी भव….

कथालेखन डेंजर आहे. अध्येमध्ये सोळा सोमवारच्या कथांचे विडंबन केल्यास कशी मजा येईल तसे वाटत होते. काही ठिकाणी याचे 'हॅमिल्टन' सदृश नाटक करता येईल की काय अशी शंका वाटून गेली.

अशी भाषा वापरायचे काही कारण आहे का? मूळ कथा अशा भाषेत आहेत? इतके शब्द, अन अशा भाषेत लिहायचं म्हणजे किती कष्ट पडतील अशा विषारानेच छाती दडपली.

मूळ पुस्तक अश्याच भाषेत आहे

हाहा.. धमाल कथा!

Hope is NOT a plan!

जाहीर ऋणनिर्देशाबद्दल आबांचे जाहीर आभार मानून तो हिशेब संपवल्याचे जाहीर करण्यात येत आहे.

या कथेबद्दल काय लिहावं? आबांच्या या 'खेपे'च्या बाळंतपणात शेजारी गरम पाणी, कातरी आणि जुन्या मऊ धोतराची फडकी घेऊन तय्यार राहण्याची संधी - आणि सुखरूप बाळ-बाळंतिणीकडे कृतार्थ होऊन बघण्याचं श्रेय - मिळाल्याबद्दलची धन्यताच अजून ओसरलेली नाही!

पण सिर्यसली - ज्या प्रकारचा अत्युच्च टाईमपास आपल्याला कळला म्हणून आपल्याला आपल्याबद्दल लई भारी वाटतं, असल्या प्रकारची ही अत्युच्च भंकस आहे. भाषेचे नागमोडी चाळे, कथेची सीटहादरवू वळणं आणि विडीबंडलाचा धागा-पारू-लिंबं-धरू-वच्छी-मच्छी-टंच टोम्याटो-उभार उडीद.... या प्रकारची चवचाल चळ लावणारी शैली....

'थांब उद्याचे माऊली, तीर्थ पाउलीचे घेतो'च्या चालीवर - आबांमध्ये उद्याचा बहुप्रसव लेखक दडला आहे, त्याच्या पायीचे तीर्थ घेत आहे.

चित्रांबद्दल काय बोलावे? कौशेयाच्या पायतळीची चैन काय, स्तनभार कंचुकीत न मावल्याने आलेले उभार काय, गारूच्या ओसंडत्या पोटामुळे तटतटलेल्या गुंड्या काय, रुद्रप्रयागाचे खुंट काय, दबंगरावांचा भांग आणि मिशा काय... मी पुनश्च नतमस्तक आहे. "हं... येऊ द्या..." इतकेच काय ते.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बरेचदा कथा वाचली. बरेचदा प्रतिक्रिया लिहावी असं म्हटलं. पण कथा वाचताना किती हसले हे शब्दांत पकडणं कठीण. विशेषतः आबांच्या 'प्रतिभेचा थयथयाट' आणि 'अत्युच्च भंकस' अशा प्रतिक्रिया आल्यानंतर! शब्द संपले म्हणून चित्र काढून डकवावं तर ती कला अवगत नाही आणि अमुक-अभ्याने ती सोयही ठेवलेली नाही.

जलपर्णी हटवणार आहेत ह्या बातमीला सेन्सॉरचा राडा म्हणावं का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.