'संततिनियम' - काही लेख
'संततिनियम' - काही लेख
- र. धों. कर्वे
र. धों. कर्वे लिखित 'संततिनियमन' हे मराठीतील या विषयावरचे एक महत्त्वाचे व धाडसी पुस्तक. त्याची पहिली आवृत्ती १९२३ साली प्रकाशित झाली. १९३४ साली प्रकाशित झालेल्या ६व्या सुधारित आवृत्तीतील काही भाग या अंकात पुनर्प्रकाशित करतो आहोत.
मोठ्या चित्रांसाठी ह्या चित्रांवर क्लिक करा.
----
सौजन्य : अमुक
विशेषांक प्रकार
संपूर्ण रधोंच्या
संपूर्ण रधोंच्या पुनर्प्रकाशित साहित्याबद्दल इथेच मत नोंदते आहे. रधोंचं साहित्य अंकात असलं पाहिजे, असं जेव्हा सूचित केलं; तेव्हा समोरच्या व्यक्तीनं चकित प्रश्न विचारला - "का? त्यांचा पॉर्नोग्राफीशी काय संबंध?" तेव्हा पॉर्नोग्राफी हा शब्द किती शिवीवाचक झाला आहे, याची जाणीव मला सर्वप्रथम झाली. माझे अंकाबाबतचे बरेचसे गोंधळ दूर करणारा हा साक्षात्कार होता. हा अंक नक्की काय करू पाहतो आहे, असा प्रश्न मी माझा मला विचारायला सुरुवात केली. पॉर्नोग्राफीच्या व्यसनापासून दूर राहा अशी घोषणा? पॉर्नोग्राफीचा प्रसार आणि प्रचार? तत्त्वचर्चा? चावटपणा? अहं, यांपैकी काहीच नाही. कोणत्याही चिकित्सेविना टॅबू मानला गेलेला विषय डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न. हेच या अंकाचं उद्दिष्ट होतं. त्यात रधों चपखल बसणार नसतील, तर कोण बसणार होतं?
अश्लीलपणाच्या संकल्पनेबद्दल त्यांनी केलेली सांगोपांग तीक्ष्ण चर्चा, तत्कालीन समाजात देवपद प्राप्त झालेल्या गांधींजींच्या ब्रह्मचर्यविषयक मतांबद्दल परखड टीका, लैंगिक स्वातंत्र्याचा धाडसी पुरस्कार (स्त्रियांच्याही - स्त्रियांच्याच!), मोपांसांसारख्या फ्रेंच लेखकाच्या मोकळ्या कथांची केलेली भाषांतरं - हे सगळं संततिनियमनाच्या प्रसारा-प्रचाराइतकंच धाडसी, काळाच्या कितीतरी पुढचं आणि थोर होतं. पण आजवर रधों म्हणजे संततिनियमन या एका वाक्यात त्यांची वासलात लावलेलीच पाहिली होती. त्यापलीकडे जाऊन रधोंवर प्रकाश टाकणं या अंकासाठी अगदी यथोचित होतं.
त्यासाठी वाचन करताना, जाणवत गेलं, की आजही तितकेच महत्त्वाचे ठरतात. त्यांचा अभिमान वाटवून घ्यावा की समाज म्हणून आपली शरम - हा प्रश्न अजूनही निरुत्तरित आहे.
शिशु-सप्ताह म्हणजे देश भिकेला
शिशु-सप्ताह म्हणजे देश भिकेला लावण्याचे डोहाळे - केवढे काळाच्या पुढचे थोर विचार आहेत हे.