ही बातमी समजली का - १२१
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____
आणखी काही चिंकाऱ्यांची 'शिकार' - कीटकनाशकांमुळे. बातमीचा दुवा.
उघडं गुपित
उत्तरेतल्या हिमालयीन नद्या सोडल्या तर भारतात बारमाही वाहाणार्या नद्या नाहीतच. सह्याद्रीत उगम पावणार्या बहुतेक नद्यांवर त्या उगमपर्वत सोडून पठारावर उतरल्या रे उतरल्या की धरणे(त्यातली बहुसंख्य महाराष्ट्रात) बांधलेली आहेत. धरणानंतर नद्या अगदी रोडावलेल्या असतात. दूरच्या प्रदेशांत बांधलेली धरणे कधीच भरत नाहीत. उदा. उजनी, जायकवाडी. कर्हाडातली आ. अत्र्यांच्या साहित्यातली कर्हा-कोयना अथवा सांगलीतली कृष्णा आता बघवत नाही. नदीत पोहोणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. फार तर डोहात डुंबता येते. किंवा धरणांच्या बॅक-वॉटर्सच्या काठाकाठाने. कृष्णा पाणीतंटा लवादाने जेव्हढे पाणी महाराष्ट्राला देऊ केले होते ते महाराष्ट्राने अमुक एका मुदतीत अडवून वापरायचे होते. नाही तर ते कर्नाटकाला वापरता येणार होते. महाराष्ट्राने ते अडवले नाही हा एका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनला होता. कृष्णाखोरे विकासासाठी एका विरोधी पण काही काळ सत्तेत आलेल्या पक्षाने १७%इतक्या भरमसाट व्याजाचे रोखे काढले होते. ती सगळी मोठी मनोरंजक हकीगत आहे. मुळात कृष्णेत पाणीच उपलब्ध नाही. कोयना ही महाराष्ट्रातली कृष्णेत सर्वात जास्त- कृष्णेच्या पाण्यापेक्षाही जास्त पाणी ओतणारी नदी होती. (तरीसुद्धा कृष्णा-कोयना संगमानंतर कोयनेचे नाव न राहाता कृष्णेचे नाव राहिले. 'कृष्णा मिळाली कोयनेला' या जुन्या भावगीताच्या ओळीतून हे सूचकतेने आले आहे.) असे म्हणतात की महाराष्ट्राने कोयनेवर धरण बांधायचे ठरवले तेव्हा कर्नाटकाने आपल्या पाणीवाट्यावर गदा येईल म्हणून आक्षेप घेतला तेव्हा 'आम्ही कोयनेवर धरण बांधत आहोत, कृष्णेवर नाही, कर्नाटकात जाणार्या पाण्यात फारसा फरक पडणार नाही' असे सांगण्यात आले आणि कर्नाटकाने ते मानलेही! अर्थात ही किंवदन्तीच असावी. पण प्रचलित आहे. कर्नाटकातून येणार्या नद्यांमुळे कृष्णेला पुढे थोडेसे तरी पाणी असते. गोदावरीची स्थिती बिकट आहे. विदर्भातल्या नद्यांमुळे ती तगून आहे. नर्मदा धरण झाल्यावर भडोचला मुखापाशी नदीप्रवाह उरलेला नाही. समुद्राचे पाणी खोलवर आत येऊन चिखल झाला आहे. नर्मदापरिक्रमा करणार्यांसाठी नदीसागर संगमबिंदूवर आरंभबिंदूवरचे जवळ बाळगलेले नर्मदाजल समारंभपूर्वक सागराला अर्पण करण्याचा विधी असतो. आता त्यांना त्यासाठी चिखलपाणी तुडवत नावेत बसून खूप दूरवर जावे लागते. उत्तरेतही फक्त ईशान्येकडच्या नद्यांमध्ये पाणी उपलब्ध असते. पंजाबात पाणी मुबलक असले तरी सिंधूनदी पाणीकरारामुळे ते वापरता येणार नाही. तिथली धरणे बांधताना दूर राजस्थानच्या तहानलेल्या वाळवंटी प्रदेशासाठी हे पाणी आवश्यक आहे अशी भूमिका भारताने मांडली होती. (ती नंतर इंदिरा गांधी कालवा बांधून प्रत्यक्षात आणली गेली) अन्यथा जलसंपन्न पंजाबसाठी इतके पाणी मिळाले नसते.
तर नद्यांत पाणी उपलब्ध नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे. राजा कधीचाच नागडा आहे.
दारिद्र्य!
भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकर ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिच्याबद्दल आज ह्या बातम्या दिसत आहेत. Gymnastics: No obstacle insurmountable for Karmakar coach ह्या बातमीतून -
Karmakar followed up winning a bronze medal in the 2014 Glasgow Commonwealth Games by becoming the first Indian to reach an apparatus final at the world championships in 2015.
"Some people were so jealous of Dipa, they would not give her any access to the apparatus during her training sessions," he said.
... "However, I feel no pressure because if I can just produce what I have trained for all these years, I will be happy. More than anything, I am delighted that Indians now know what gymnastics is all about."
३० मेच्या 'न्यू यॉर्कर'मध्ये अमेरिकेच्या सिमोन बाईल्सबद्दल आलेला मोठा लेख - A Full Revolution
मोदींना याची जबर किंमत मोजावी लागेल
मोदींना याची जबर किंमत मोजावी लागेल असं विहिंप म्हणत्ये - गौरक्षकांनी दलित व्यक्तींवर केलेला हल्ला हा हिंदु व्यक्तींनी एकत्र येऊन, हिंदु धर्माच्या (हिंदु धर्मात पूजनीय असलेल्या गायीच्या रक्षणाच्या) नावाखाली, हिंदु व्यक्तींवर केलेला दहशतवाद आहे. यामागचे मोटिव्हेशन, प्रेरणा धर्म हेच आहे. ह्याला भगवा दहशतवाद का म्हंटले जाऊ नये ?? व त्याउप्पर ह्या अशा धमक्या ??
--
मेहबूबा मुफ्ती असं म्हणतात की ....मोदींनी काश्मिरातल्या जनतेला बरनॉल लावावे
बाय द वे ... भाजपा व पीडीपी च्या आघाडीच्या संयुक्त कार्यक्रमात - केंद्राने हुरियत शी चर्चा केली पायजे असेही एक कलम आहे.
नाही हो असं काही
नाही हो असं काही नसतं..
म्हंजे काय ?? बघा हं ... मी एकच नियम लावतो - विशिष्ट धर्माच्या रक्षणाच्या उद्देशाने किंवा विशिष्ठ धर्मियांच्या रक्षणाच्या/हितसंबंधांच्या पूर्तीच्या उद्देशाने त्या विशिष्ठ धर्मातून प्रेरणा घेऊन दहशत निर्माण होईल असे कृत्य करणे व ते सुद्धा निरपराध लोकांना हिंसात्मक कृत्याचे लक्ष्य बनवून - तो धार्मिक दहशतवाद.
न्याय म्हंजे Applying the same standard to everyone.
मुसलमानांनी असं केलं की मी त्याला न चुकता इस्लामी दहशतवाद म्हणतो. इथे ऐसी वरच अनेक पुरावे आहेत. मग याला भगवा दहशतवाद का म्हणू नये ? ( इथे तर केस अत्यंत सिरियस आहे. इथे हिंदु धर्माच्या रक्षणार्थ, हिंदु धर्मातून प्रेरणा घेऊन निरपराध हिंदु धर्मीयांनाच लक्ष्य केले जात आहे.)
---
विनाकारण (आणि धर्मासाठी ??) ठार मारणं
दहशतवादी हे विनाकारण हिंसा करतात हे धादांत असत्य आहे.
ही वेबसाईट बघाच. मला तरी
ही वेबसाईट बघाच. मला तरी माहीती नव्हती.
मला फार काही कळले नाही पण पूर्ण देशाची आणि प्रत्येक राज्यांची लाइव्ह वीजेची गरज आणि कीती भागवली गेली, कीती सरप्लस आहे वगैरे दिसते. ह्या क्षणाची किंम्मत पण दिसते.
सुषमा स्वराज काय ऐकत नाही
सुषमा स्वराज काय ऐकत नाही आजकाल...
----
Chinese tourist who lost wallet in Germany ends up in refugee shelter
----
Venezuela is stuck in a doom loop that's become a death spiral. Its stores are empty, its people are starving, and its government is to blame. It has tried to repeal the law of supply and demand, and.... - व्हेनेझुएला ची कहाणी अध्याय चौथा, पाचवा...
इशान्य भारतातल्या संघाच्या कामाबद्दल
संघ आणि त्याच्याशी संबंधित (नसलेल्या) इतर संघटनांचं इशान्य भारतात काही काम आहे असं कानावर येतं. त्या संदर्भात हा लेख; ह्यात वर्णन केलेल्या गोष्टीच तिथे चालत असतील आणि इतर काही (बरं) घडत नसेल असं (मला) वाटत नाही. पण हा एक वाचनीय (दीर्घ) लेख -
Operation #BetiUthao
The full, 11,350-word text of Neha Dixit's five-part investigation "Operation #BabyLift" on how the Sangh Parivar flouted every Indian and international law on child right to traffic 31 young tribal girls from Assam to Punjab and Gujarat to 'Hinduise' them.
'विवेक'मध्ये घेतलेली दखल
ह्या लेखाची 'विवेक'मध्ये दखल घेतलेली आहे. दुवा
लेखामध्ये कुठेही ह्या मुलींचा त्यांच्या पालकांशी संपर्क का नाही, त्या मुलींच्या घरच्या अन्नसंस्कृतीला नाकारण्याचे प्रयत्न करणं योग्य आहे का, वगैरे मुद्द्यांबद्दल एकही शब्द नाही. त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. पण ह्या लेखाच्या निमित्ताने बरंच स्मरणरंजन झालं. एकेकाळी आमच्या घरी 'विवेक' येत असे.
थत्तेचच्चांना धक्का बसेल असं वाक्य लेखाच्या शेवटी आहे - ... भाजपाला पराभूत करायचे असेल, तर संघाला बदनाम करावे लागेल... संघ आणि भाजपचा संबंध आहे असं 'विवेक'ने छापलंय. थत्तेचच्चांचं काय होणार! :प
बाणेदारपणा
>>
संघ आणि त्याच्याशी संबंधित (नसलेल्या) इतर संघटनांचं इशान्य भारतात काही काम आहे असं कानावर येतं. त्या संदर्भात हा लेख; ह्यात वर्णन केलेल्या गोष्टीच तिथे चालत असतील आणि इतर काही (बरं) घडत नसेल असं (मला) वाटत नाही. पण हा एक वाचनीय (दीर्घ) लेख -
Operation #BetiUthao
The full, 11,350-word text of Neha Dixit's five-part investigation "Operation #BabyLift" on how the Sangh Parivar flouted every Indian and international law on child right to traffic 31 young tribal girls from Assam to Punjab and Gujarat to 'Hinduise' them.
२९ जुलैला हा रिपोर्ट प्रकाशित झाला. ४ ऑगस्टला एफआयआर दर्ज झाला, आणि १३ ऑगस्टला संपादकाची उचलबांगडी :
Days after FIR filed against Outlook magazine, publisher appoints a new Editor
ह्यात काही कार्यकारणभाव वाचायचा की नाही, ते आपलं आपण ठरवा. संपादकांनी दिलेल्या एका मुलाखतीतून -
“Threats against journalists may be an occupational hazard but what we are seeing today is a more serious attempt to shoot the messenger. The country is fast hurtling down a fascist mode and this fiction of public narrative of demonizing journalists is dangerous for free speech,” said Outlook editor Krishna Prasad.
अटेम्प्ट टू शूट द मेसेंजर
पल्याड दिलेला एक प्रतिसाद इथेही लागू आहे.
===
इथे विचारवंतांचा दुटप्पीपणा दिसतो बर्याचदा, अगदी अलिकडे राणा अयुब नावाच्या 'पत्रकार' बाईने ( इशरत 'प्रकरण' जिने बाहेर काढलं ती) २००२च्या दंगलीबद्दल एक स्फोटक पुस्तक प्रसिद्ध केलं. ज्यासाठी तिने गुजरातेत जाऊन गुप्तपणे इन्वेस्टिगेशन केलं. वरिष्ठ पोलिसांशी वगैरे बोलली ज्यांनी मोदी-शहा जोडीबद्द्ल स्फोटक माहिती तिला देली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर कोणीही त्याची फार दखल घेतली नाही. त्यावर तिने असं म्हणणं सुरू केलं की ज्या लोकांवर मी आरोप केले त्यांनी माझ्या बद्दल एकही तक्रार केली नाही ना माझ्यावर खटला भरला. म्हणजेच मी लिहिलेलं खरं आहे.
याउलट, गेल्या आठवड्यात आउटलुक मासिकात एका पत्रकाराने संघ/समिती ईशान्य भारतातून तरूण मुलींची वाहतूक करत आहे आणि त्यांच्यावर जाणून बुजून हिंदू संस्कार करत आहे अशी स्टोरी लिहिली. यावर संघाने रितसर खटला दाखल केला आहे. हे झाल्यावर लगेच पत्रकार भावंडांनी आरडाओरडा सुरू केला की तुम्ही पत्रकारांवर असं दडपण कसं आणू शकता, ही दंडेलशाही आहे वगैरे वगैरे.
ही डबल ढोलकी आहे.
===
अजून वरील स्क्रोलच्या बातमीतच अपॉइंटमेंट एका महिन्यापूर्वीच ( 'ती' स्टोरी बाहेर येण्यापूर्वीच ) झाली होती असही लिहिलं आहे. पण सनसनी हेडलाईन कशी मिळणार जर हेडलाईनमध्ये मिस्लिंडिंग काही नसेल तर?
Meanwhile, Ramachandran confirmed his appointment. “Yes, I have been appointed as the new Editor-in-Chief after having been in conversation with Outlook for about a year,” he said in an email response. “My appointment was done almost a month ago.” Ramachandran will be the third editor-in-chief of the magazine.
सरसकटीकरण
मला वाटतं ह्यात थोडं सरसकटीकरण होतं आहे.
>>हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर कोणीही त्याची फार दखल घेतली नाही. त्यावर तिने असं म्हणणं सुरू केलं की ज्या लोकांवर मी आरोप केले त्यांनी माझ्या बद्दल एकही तक्रार केली नाही ना माझ्यावर खटला भरला. म्हणजेच मी लिहिलेलं खरं आहे.
ह्या पुस्तकाची इतकी दखल घेतली गेली की अॅमेझॉनवर लोकांनी जाऊन ट्रोलिंग केलं. बीबीसी आणि वॉशिन्ग्टन पोस्टपासून माध्यमांनी पुस्तकाची आणि ह्या ट्रोलिंगची दखल घेतली. मुख्य प्रवाहातल्या ज्या भारतीय माध्यमांनी दखल घेतली नाही त्यांच्याबद्दलही लिहून आलं. बााकी भक्तांनी सोशल मीडीयावरही सगळीकडे ट्रोलशिटून ठेवलं होतंच. थोडक्यात सांगायचं तर गेल्या काही दिवसांतलं अतिचर्चेत राहिलेलं हे पुस्तक आहे. राहिला मुद्दा तो आरोपांचा. तहलकाच्या स्टिंगपासून ते थत्तेचाचांना दिसणार्या मोदीमतदार लोकांपर्यंत अनेक घटक पाहता 'गुजरातमधले दंगे सरकारप्रेरित किंवा पाठिंबित किंवा किमान वरदहस्तयुक्त होते' हे जनमानसात परसेप्शन असावं हे नाकारण्यात फार हशील दिसत नाही. इतकंच नव्हे, राणा अयूबला खोटं ठरवण्याचे प्रकार फारसे गांभीर्यानं होत नाहीत ह्या दाव्यात सकृतदर्शनी तथ्यच असावं.
>>अजून वरील स्क्रोलच्या बातमीतच अपॉइंटमेंट एका महिन्यापूर्वीच ( 'ती' स्टोरी बाहेर येण्यापूर्वीच ) झाली होती असही लिहिलं आहे.
असं ज्याची नेमणूक झाली आहे तो म्हणतो आहे. म्हणजे ह्यात स्वार्थ नाहीच असं म्हणता येत नाही.
>>यावर संघाने रितसर खटला दाखल केला आहे. हे झाल्यावर लगेच पत्रकार भावंडांनी आरडाओरडा सुरू केला की तुम्ही पत्रकारांवर असं दडपण कसं आणू शकता, ही दंडेलशाही आहे वगैरे वगैरे.
ही डबल ढोलकी आहे.
आता आला मुद्दा ताज्या घडामोडींचा. जी एफआयआर 'संघाने रीतसर दाखल केली' आहे ती allegedly promoting enmity among different groups on grounds of religion ह्या कारणासाठी आहे. हे अतिशय बोलकं आहे. ह्यात मुद्दाम त्रास देण्याचा हेतू आहे असं पत्रकार म्हणत असतील तर त्यात काही सकृतदर्शनी गैर दिसत नाही. असे खटले कायद्याचा ससेमिरा पाठी लावण्यासाठी आणि दडपण आणण्यासाठी दाखल केले जातात हे खरंच आहे.
दंगलीसारख्या एखाद्या गंभीर गोष्टीशी अशा एका खटल्याची तुलना करून तुम्हाला त्यात विचारवंतांचा दुटप्पीपणा शोधायचा असला तर अर्थात तुम्ही मुखत्यार आहात. राणा अयुबच्या पुस्तकामागची किंवा आउटलुकची शोधपत्रकारिता त्यामुळे मलीन होते असं मात्र वाटत नाही.
दखल बोले तो त्या पुस्तकात
दखल बोले तो त्या पुस्तकात ज्यांच्यावर आरोप होते त्या लोकांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही असं म्हणायच होतं.
गुजरातेत काय घडलं, कोणी केलं हा इथे मुद्दा नव्हेच. मुद्दा दोन्ही बाजुंनी बोलण्याचा आहे. दुर्लक्ष केलं तर तुम्ही दोषी, नाही केलत तर तुम्ही माध्यम स्वातंत्र्याचे खुनी. नक्की काय करायच?
दंगलीसारख्या एखाद्या गंभीर गोष्टीशी अशा एका खटल्याची तुलना करून तुम्हाला त्यात विचारवंतांचा दुटप्पीपणा शोधायचा असला तर अर्थात तुम्ही मुखत्यार आहात.
दोन्ही आरोप गंभीर आहेत. पण इतक्या गंभीर आरोपांना दोन विरुद्ध प्रतिक्रिया आल्या तरी विचारवंतांना प्रॉब्लेम आहेच. नक्की कशी प्रतिक्रिया देणं अपेक्षित आहे?
विवेक
दोन्ही बाजुंनी बोलण्याचा आहे. दुर्लक्ष केलं तर तुम्ही दोषी, नाही केलत तर तुम्ही माध्यम स्वातंत्र्याचे खुनी. नक्की काय करायच?
एखाद्या गोष्टीकडे, व्यक्तीकडे, लेखाकडे, पुस्तकाकडे लक्ष देणं म्हणजे फक्त पत्रकाराच्या विरोधात धार्मिक अशांतता पसरवण्याचा दावा गुदरायचा, सोशल मिडीयावर आपल्या मर्जीतली टोळधाड सोडायची किंवा संपादकांची उचलबांगडी असं नव्हे! उदाहरणार्थ, 'विवेक'ने नेहा दिक्षीतच्या लेखाची दखल घेतली आहे. (हे वाक्य मी कधी लिहेन असं वाटलं नव्हतं पण) 'विवेक' नावाला (आणि लौकीकालाही) जागला असं म्हणता येईल.
माझ्या आकलनाच्या मर्यादा
मुद्दा समजला नाही.
>>दखल बोले तो त्या पुस्तकात ज्यांच्यावर आरोप होते त्या लोकांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही असं म्हणायच होतं.
'त्या' लोकांना पुस्तकाची दखल घेणं एक तर गैरसोयीचं आहे, शिवाय त्यांची ट्रोलधाड पुस्तकाची दखल घ्यायला समर्थ आहे (जी त्यांनी घेतलीच). त्यामुळे अशी अपेक्षा कुणी का करावी, ते समजलं नाही.
>>दुर्लक्ष केलं तर तुम्ही दोषी, नाही केलत तर तुम्ही माध्यम स्वातंत्र्याचे खुनी. नक्की काय करायच?
सोपं आहे. जर आरोप विनातथ्य असतील, तर सिद्ध करा की त्यांच्यात दम नाही. मुद्दाम त्रास देण्यासाठी 'दोन समाजांमध्ये वितुष्ट आणण्याचे प्रयत्न' वगैरे खटले दाखल केलेत तर 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली' म्हणून बोंबलणं हा पत्रकारांचाच काय, सामान्य नागरिकांचादेखील लोकशाहीदत्त हक्क आहे.
.अरुणा रॉय पियुष गोयल वि
.
अरुणा रॉय वि. पियुष गोयल वि सुनील भारती मित्तल.
.
.
अरुणा रॉय या बिनदिक्कत पणे असं म्हणतात की - It is government's responsibility to prevent the social media from being misused. म्हंजे काय ?? सोशल मिडिया वरच्या लोकांची अभिव्यक्ती रेग्युलेट करायची ?? का ?? तर म्हणे सिव्हिल सोसायटी च्या लोकांना सोशल मिडिया वर (मोदीभक्तांकडून) टार्गेट केलं जातं ("pilloried"). म्हंजे काय की मोदीसरकार हे अभिव्यक्तीविरोधी आहे पण आमच्या लोकांनी त्यांचं म्हणणं व्यक्त केलं (म्हंजे मोदींवर टीका केली) की त्यांच्यावर शाब्दिक हल्ले करणार्यांना (मोदीभक्तांना) वेसण घातली की लगेच मोदी सरकार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मित्र होतील ?? ( पियुष गोयल नेहमी प्रमाणे लबाडी करतायत. म्हणे गुजरातेत बेकारी नाही.)
.
.
.
---------------
.
.
.
ज्योतिरादित्य यांच्या कारला धडकून वृद्धाचा मृत्यू
तो वृद्ध चालत होता की सायकलवर होता की रस्त्यात बसला होता की रस्याच्या कडेला बसला होता ? तो कार ला कसा धडकला ? कार त्याला धडकली की तो कार ला धडकला ?
.
.
.
--------------------
.
.
.
बालमजूर कायद्यातल्या दुरुस्त्या चिंताजनक आहेत असं दै. हिंदु म्हणतोय
.
.
.
Two, section 3 in Clause 5 allows child labour in “family or family enterprises” or allows the child to be “an artist in an audio-visual entertainment industry”. Since most of India’s child labour is caste-based work, with poor families trapped in intergenerational debt bondage, this refers to most of the country’s child labourers. The clause is also dangerous as it does not define the hours of work; it simply states that children may work after school hours or during vacations. Think of the plight of a 12-year-old coming home from school and then helping her mother sow umpteen collars on shirts to meet the production deadline of a contractor. When will she do her homework? How will she have the stamina to get up the next morning for school?
It is government's
It is government's responsibility to prevent the social media from being misused.
या वाक्यात सो.मी ऐवजी प्रिंट मिडिया टाकलं तर काय गहजब होईल. अनेक विचारवंत सो.मीवर खार खाऊन असतात. वरवरचं कारणं शिवराळ भाषा हे असलं तरी (शिवराळ भाषा काय अगदी प्रत्येक रस्त्यावर ऐकू येते. ) खरी दुखती नस मिडियावर त्यांचा कंत्रोल राहिला नाही ही असते. संभाषित (बोले तो, डिस्कोर्स) ते डिक्टेट करू शकत नाहीत ही असते. पूर्वी वाचकांच्या पत्रव्यवहारात ज्यांची बोळवण होत असे असे लोक ब्लॉग, स्वतःच्या सायटी अशा अनेक प्रकारे स्वतःचं मत पसरवू शकतात. विचारवंत/ पेपर-चॅनल मालक जे म्हणतील तेच पेप्रात/चॅनलवर दिसणार. ही व्यवस्था बदलली हेच चांगलं आहे.
खरी दुखती नस मिडियावर त्यांचा
खरी दुखती नस मिडियावर त्यांचा कंत्रोल राहिला नाही ही असते.
अगदी.
एक अमेरिकन संपादक या विषयावर बोलत होता ... तो म्हणाला की सोशल मिडिया मुळे झालेय काय ... की The person's first thought is his final statement.
अर्नब गोस्वामी पण राज ठाकरेंना म्हणाला होता की तुम्ही आम्हा मिडियावाल्यांना नावं ठेवता ... पण आमचे कंटेंट काय असावे ते तुम्ही (राज) कसंकाय ठरवणार ? मग राज ठाकरेंनी तोच प्रश्न उलट केला - की राजकीय पक्षांचे कंटेंट काय असावे ते तुम्ही का ठरवणार ?
मग मिडियावाल्यांचं टुमणं सुरु होतं ... की .... बट यू आर सो पॉवरफुल ... आणि म्हणून तुम्ही, राजकारण्यांनी, थोडं संयमानं घ्यायला हवं (उदा मेगन केली). ऑ ? मग मिडिया पॉवरफुल नाही म्हणताय ?? ऑ ?
मोदींभक्तांच्या बाबतीतच बोलायचं झालं तर ते (नमोभक्त) टो़ळी करून टार्गेट करतात (सोशल मिडियावर) असा आरडाओरडा सुरु असतो.
स्वातंत्र्य हे मूल्य त्यांच्या खिजगणतीतही नसते!
कुठल्याही गोष्टीवर "बंदी घाला" असे आपले डावे आणि उजवे फार सहजपणे म्हणतात . स्वातंत्र्य हे मूल्य त्यांच्या खिजगणतीतही नसते असे वाटते . इंटरनेट वर पॉर्न असते म्हणून संबंध इंटर्नेटवरच बंदी घाला अशा प्रकारच्या मागण्या मी पाहिल्या आहेत. मूर्खांचा बाजार!
आणि लोकशाहीत राजकारण, समाजकारणात उतरायचे तर कातडी गेंड्याची लागते, इतकी नाजूक असून चालत नाही हेही सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे.
आणि लोकशाहीत राजकारण,
आणि लोकशाहीत राजकारण, समाजकारणात उतरायचे तर कातडी गेंड्याची लागते, इतकी नाजूक असून चालत नाही हेही सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे.
मुद्दा मान्य आहे ओ !!!
पण मग सत्ताधीशांना उपेक्षितांप्रति संवेदनशीलता, सहृदयता असावी अशी आरोळी ठोकताना ह्याचा विचार का केला जात नाही ?
जर व्यक्ती राजकारणात उतरली व तिची कातडी गेंड्याची असेल तर "रंजल्या गांजल्यांप्रति" त्याला संवेदना असेल का ? कशी व का असेल ? एकच व्यक्ती एकाच वेळी गेंड्याची कातडी युक्त व त्याच वेळी संवेदनशील, सहृदय असेल का ??
कातडी गेंड्याची हो, मन नाही !
एकच व्यक्ती एकाच वेळी गेंड्याची कातडी युक्त व त्याच वेळी संवेदनशील, सहृदय असेल का ?? कातडी गेंड्याची हो, मन नाही ! दोन-चार शिव्या, टवाळकी , धमक्या खाणे हे पचनी पडणार नसेल तर मग उतरूच नये. विरुद्ध पक्षालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवावेच लागेल.
कातडी गेंड्याची हो, मन नाही !
कातडी गेंड्याची हो, मन नाही ! दोन-चार शिव्या, टवाळकी , धमक्या खाणे हे पचनी पडणार नसेल तर मग उतरूच नये. विरुद्ध पक्षालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवावेच लागेल.
म्हंजे काय ?
दहा बारा वर्षं एखाद्याला हिंस्त्र टीकेचे लक्ष्य करायचं आणि त्याची फक्त कातडी गेंड्याची असावी व मन मात्र "मृदूनि कुसुमादपि" असावं अशी अपेक्षा करायची तर कसं होणार ओ ?
या पाकिस्तानी मंडळींना भारतीय
या पाकिस्तानी मंडळींना भारतीय नागरिकत्व हवंय ...
‘जन्मापासून आम्ही पाकिस्तानमध्ये राहत असलो तरी आता आम्हाला भारतीय म्हणून अस्तित्व हवे आहे. आमचे आयुष्य तर तिथे गेले मात्र माझ्या मुली आणि नातवंडांना भारताचे नागरिकत्व मिळावे असे वाटते. तिकडची परिस्थिती आता खुपच कठीण आहे. मी दोन वर्षांचा व्हिसा घेऊन इथे आलो आहे. आमचे आर्जव ऐका आणि माझ्या पुढील पिढीला तरी भारतीय म्हणून जगण्याचा सन्मान मिळवून द्या..माझ्या पुढच्या पिढीला तरी भारतात जन्मू द्या’. धनजी फुफ्फल आपली व्यथा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यापुढे पोटतिडकीने मांडत होते. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित भारतीय नागरिकत्व देण्याविषयीच्या विशेष शिबीरांमध्ये धनजी फुफ्फल यांच्यासारख्या ४४ नागरिकांनी सहभाग नोंदवून नागरिकत्व देण्याची मागणी केली. यावेळी मुळच्या पाकीस्तानी असलेल्या नागरिकांचे आर्जव ऐकून उपस्थित अक्षरश हेलावून जात होते. केंद्रीय गृह मंत्रालयाचे संचालक प्रवीण होरो सिंग यांच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडले.
सर्वांसाठीच नरक
टोकाची कडवी विचारसरणी ही सर्वांसाठीच घातक असते. शत्रू क्रमांक एकचा खातमा झाला की शत्रू क्रमांक दोनची क्रमांक एकवर पदोन्नती होते. अशा प्रकारे पायरी पायरीने सगळेच खातम्यास लायक ठरतात. सुन्नींमधल्या बुरखा न घालणार्या बायका, पाचच्या पाच वेळा नमाज न पढणारे, दाढी न राखणारे, इंग्लिश माध्यमातून शिकणारे अशा सगळ्यांची यथावकाश पदोन्नती होईल.
टोकाची कडवी विचारसरणी ही
टोकाची कडवी विचारसरणी ही सर्वांसाठीच घातक असते. शत्रू क्रमांक एकचा खातमा झाला की शत्रू क्रमांक दोनची क्रमांक एकवर पदोन्नती होते
हे काही लोकांना नावे ठेवावी लागु नयेत म्हणुन केलेले सरसकटीकरण आणि अतिसुलभीकरण आहे.
मोस्टली बर्याच समाजात/धर्मात एखाद्या काळापुरती टोकाची विचारसरणी आल्याचे दिसते ( जसे कॅथलिक-प्युरीटंट वाद , शैव-वैष्णव, हिंदु-बुद्ध , अगदी देशस्थ-कोकणस्थांच्या भांडणात रक्त सांडले आहे. ) पण शत्रु क्रमा़क एक नंतर शत्रु क्रमांक दोन वगैरे होत नाही. ती लाट असते, आणि ती गेली की मतभेद मिटले नाहीत तरी मान्य केले जातात.
पण एक विचारसरणी गेल्या १४०० वर्षापासुन नाश करणे थांबवतच नाहीये. पण तिच्या वकीलीसाठी बाकीच्यांना नका नावे ठेऊ.
हा मुद्दा आपल्याअ पं.प्रंनी
हा मुद्दा आपल्याअ पं.प्रंनी निवडणुकपूर्व काळात मांडला होता. की पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या पर्सिक्युटेड धर्मांना भारतात आश्रल दिला गेला पाहिजे (त्याचं पुढे काही केलं का हे नाही माहिती :( ). त्यावेळेला तुम्ही फक्त धर्मावर आधारित धोरण कसं ठरवू शकता असा आरडाओरडा झाला होता. इथे देखील बहुधा ऋने या बद्दल विरोध दर्शवला होता.
त्यावेळेला तुम्ही फक्त
त्यावेळेला तुम्ही फक्त धर्मावर आधारित धोरण कसं ठरवू शकता असा आरडाओरडा झाला होता. इथे देखील बहुधा ऋने या बद्दल विरोध दर्शवला होता.
हो. व मी ऋ ला विरोध केला होता.
(१) परकीय नागरिकांना (भारताचा व्हीसा देताना) धर्मनिरपेक्ष वागणूक देणे अथवा न देणे हा भारत सरकारचा विकल्प असायला हवा. कर्तव्य नाही.
(२) भारत सरकारने धर्मनिरपेक्ष वागणूक फक्त भारतीय नागरिकांना देणे हे भारत सरकारचे कर्तव्य असायला हवे.
(३) भारत देश ही पब्लिक प्रॉपर्टी आहे पण फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे. बाहेरच्यांसाठी एंट्री रिस्ट्रिक्शन्स आहेत व असाव्यात.
(४) तुमच्या घरातल्या लोकांना तुमच्या घरातल्या खोल्यांमधे मुक्त संचार असतो. बाहेरच्यांना घरात घेताना तुम्ही कोणतेही निकष लावू शकता. केवळ एखाद्याचे केस आवडले नाहीत म्हणून तुम्ही प्रवेश निषेध करू शकता. तुम्ही अॅक्च्युअली दारावर अशी पाटी सुद्धा लावू शकता की "टक्कलवाल्या लोकांना, व क्ष धर्माच्या लोकांना इथे प्रवेश बंद आहे".
ही ती चर्चा (मनोबाच्या
ही ती चर्चा (मनोबाच्या प्रतिसादाची जाहिरात)
देवाघरची श्वान
सरमा ही देवांची कुत्री. तिची मुलं म्हणजे सारमेय.
(अवांतर - कोणेएकेकाळी प्राणी, दैत्य लोकांच्या बाबतीत आईवरून मुलांची नावं देण्याची पद्धत असावी. सरमेची मुलं - सारमेय, दितीची मुलं - दैत्य. पण ही मुलं बाय डीफॉल्ट पुल्लिंगीच असणार. सारमेया किंवा दैत्या असे शब्दप्रयोग वापरात दिसत नाहीत.)
दोघांच्याही!
आई बाबा दोघांच्याही नावावरून नावे ठेवत.
पण मुल॑चे नाव आईवरून आणि मुलीचे वडिलांवरून शक्यतो असे.
वडिलांवरून मुलीच्या नावाची उदाहरणे - जानकी , द्रौपदी
आईवरून मुलाच्या नावाची- कौंतेय, सारमेय
गावावरून - कुंती, गांधारी, माद्री.
आमची आई लहानपणी दूध प्यायलो नाही की 'सरमे, पिब दूग्धं - अणि ब्ला ब्ला ब्ला' असा कायसा डायलॉग संस्कृतात मारायची.
ते म्हणे दैत्यांच्या सरमा नावाच्या कुत्रीला फसवायला दैत्य कामधेनूचे दूध तिला प्यायला घालायचे अमिष दाखवित असतात त्यावेळचा डायलॉग आहे.
मला सरमा म्हटल्यावर त्यामुळे प्रचंड राग यायचा. दूध प्यायला तर अजूनही आवडत नाही.
;)
हा भारत सरकारचा विकल्प असायला हवा
हिंदूंना घेतलेच पाहिजे असा कायदा करा कोण म्हणतंय ? स्वेच्छेने त्यांना घ्यावे असे रेकमेंडेशन करतोय इतकेच. तसेच गैर-सुन्नी मुसलमान , खिश्चन इत्यादीना सुद्धा मानवतेवर आधारित राजकीय आश्रय द्यावा , कारण त्यांच्या देशात त्यांची धर्मावर आधारित हत्या, छळ इ. होत आहे.
ट्रम्पची निवडणूक-मोहीम संपल्यात जमा आहे असे म्हटले जात आहे.
ट्रम्पची निवडणूक-मोहीम संपल्यात जमा आहे असे म्हटले जात आहे. 4 मोठ्या राष्ट्रीय मत-चाचणीत हिलरी ट्रम्पच्या 10-13 टक्क्यांनी पुढे आहे. 50 संरक्षण तज्ज्ञांनी - ज्यात अनेक रिपब्लिकन आहेत-ट्रम्प हा राष्ट्राध्यक्ष व्हायला लायक नाही असे पत्रक काढले आहे. सहा रिपब्लिकन सिनेटर्स आणि 10 काँग्रेस-सदस्यांनी ट्रम्पचा पाठिंबा काढून घेतला आहे. बंदूक धारण करण्याचा मूलभूत हक्क देणारी दुसरी घटनादुरुस्ती रद्दबातल करण्याचा हिलरीचा डाव असून ते घडले तर काय करायचे हे तुम्हाला माहितीच आहे (तिला गोळ्या घाला? : सुप्त प्रोत्साहन ) हाही चर्चेचा मोठा विषय झाला आहे . विशेष म्हणजे स्थितिवादी (काँझर्व्हेटिव्ह) प्रवृत्तीच्या लोकांकडूनच ट्रम्प वर आजकाल अधिक टीका होत आहे. मी हरलो तर मला काय फरक पडतो ? मी मोठ्ठ्या सुट्टीवर आनंदाने जाईन , निवडणूक नाहीतरी शंकास्पदच असतात या जातीचे बोलणे ट्रम्पने सुरु केले आहे.
the Libertarians are fiscal conservatives but social liberals
The Libertarians are fiscal conservatives but social liberals. (My brother is a card-carrying Libertarian. I am waaaaay too left for him. We have stopped discussing politics long ago.) And fairly anti-Christian beliefs. Thus they will not agree with Republicans on gay marriage (they will be for it), right to choose for women (for it) etc etc. They will also be against all foreign wars, period! Not easy for a "true" Republican to stomach!
मेल्टडाऊन
टाईम साप्ताहिकातला लेख.
हा प्रकार जरा जास्तच टोकाचा वाटला - Most highly regarded Republican operatives have stayed away from the campaign, wary of being blackballed for future gigs. “If someone applied for a job and brought in a résumé that had Trump 2016 on it,” says a GOP fundraising consultant, “I wouldn’t give them an interview.”
ऑलिंपिक, माध्यमं आणि स्त्रिया
Why men shouldn’t get the credit when women win in Rio
मूळ लेखनातून उद्धृत -
Sometimes the word “women” appears, but for the wrong reason. “You see women’s football,” says Grieves. “But for the men, it’s just ‘football.’ It’s very rare to see ‘men’s football.’ As if men own the original term for the sport. The same dichotomy occurs with cycling, horse-riding, golf and, according to the research, track and field events. So while Jamaican Shelly-Ann Fraser-Pryce is the two-time reigning Olympic champion in “women’s 100-metre,” her countryman Usain Bolt has the distinction of being the two-time reigning 100-metre Olympic champion—not “men’s 100-metre.”
डावीकडच्या चित्रात - रिओत ४ सुवर्ण, १ रौप्य पदक मिळवणारी, अमेरिकी, जलतरणपटू केटी लेडेकी
प्रश्न
स्त्रीयांचे खेळ पुरुषांपेक्षा कमी दर्जाचे असतात असं सध्यापुरतं मान्य केलं तर आणखी प्रश्न आहेत -
- उदाहरणार्थ, जलतरणात सध्या अमेरिकी खेळाडू पदकं लुटत आहेत; मायकल फेल्प्सने एकट्याने जेवढी पदकं कमावलेली आहेत त्यापेक्षा १२० कोटी लोकसंख्येच्या भारताने कमावलेली नाहीत. मग पदकं, जलतरण किंवा ऑलिंपिकला सगळ्या भारतीय भाषांमध्ये फेल्प्सचं नाव द्यायचं का, किंवा कसं?
- वीर्यापेक्षा बीजांडांमध्ये अधिक वस्तुमान असतं; गर्भ-अर्भकात स्त्रियांची शारीरिक गुंतवणूक पुरुषांपेक्षा खूप अधिक असते; मग मुलांना नावं देताना आईचं नाव-आडनाव का देत नाहीत?
- खेळ सोडून इतर कशाकशांत स्त्रियांची कामगिरी खालच्या दर्जाची असते, शेती, मतदान, गणित, इमारतींचं बांधकाम, इत्यादी?
- .
- .
- .
आणि बरंच, पण सध्या इतकंच.
>>उदाहरणार्थ, जलतरणात सध्या
>>उदाहरणार्थ, जलतरणात सध्या अमेरिकी खेळाडू पदकं लुटत आहेत; मायकल फेल्प्सने एकट्याने जेवढी पदकं कमावलेली आहेत त्यापेक्षा १२० कोटी लोकसंख्येच्या भारताने कमावलेली नाहीत. मग पदकं, जलतरण किंवा ऑलिंपिकला सगळ्या भारतीय भाषांमध्ये फेल्प्सचं नाव द्यायचं का, किंवा कसं?
गल्ली चुकली.
जलतरण किंवा ऑलिंपिक्सला जलतरणच म्हणायचं. भारतीय खेळाडू खेळतात त्याला "भारतीय जलतरण" म्हणायचं. पुरुष खेळतात तो फुटबॉल महिला खेळतात तो 'विमेन्स फुटबॉल' या धर्तीवर.
पण असो. इतक्या फालतू गोष्टींवर स्त्रीवादाने भर देऊ नये.
-----------------------------------------------------------------
टेनिस मध्ये मात्र मेन्स फायनल आणि विमेन्स फायनल असं म्हटलं जातं.
["तो" डबा आणि "ती" डबी वादाला घाबरणारा) नितिन थत्ते
मुळात...
पुरुष खेळतात तो फुटबॉल महिला खेळतात तो 'विमेन्स फुटबॉल' या धर्तीवर.
मुळात पुरुषांचे नि स्त्रियांचे संघ वेगळे का असावेत? (नाहीतर मग पूर्वी दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांचे नि काळ्यांचे वेगळे संघ असत, त्यातच एवढे बहिष्कार टाकण्याइतपत आक्षेपार्ह असे काय होते?)
आंतरलैंगिक चढाओढी झाल्याच पाहिजेत!
they will be allied with whatever the local fraud is!
The catholic church's complicity in imperialist, capitalist expansion is well known (they even supported slavery!). capitalism carries such "Christian" legacy everywhere it goes. Locally, they will be allied with whatever the local fraud is: Hinduism, Confusianism, Shinto, Islam etc etc.
The Chinese communist party gives land gifts in the farming sector to only newborn sons, not daughters. Daughters are routinely aborted, killed at birth or abandoned at a young age in today's China. A fucking national shame for China. Americans have adopted more than 100,000 such daughters. But the numbers will be in the millions, looking at the skewed sex ratio in China. They are worse than even us, in this respect.
बाय द वे : इतिहासातला सर्वात मोठा नरसंहार करणारा कोण होता ?
काही पटलं नाही. आर्ग्युमेंट कमकुवत आहे.
----
बरं, कम्युनिस्टांमध्ये
बरं, कम्युनिस्टांमध्ये सत्ताधारक व्यक्तींमध्ये किती स्त्रियांची नावे सांगू शकाल?
(०) तुमच्या प्रश्नास माझ्या कडे खरोखर सबळ उत्तर नाही. तेव्हा तुमचा मुद्दा मान्य. सहर्ष मान्य.
(१) मार्क्सवाद हा मार्क्सने/एंगल्स नी प्रपोझ केल्याप्रमाणे जर पाहिलेत तर पुरुष धार्जिणा किंवा स्त्रीविरोधी नाही - त्यांचा मूळ मुद्दा कष्टकरी वि. बूर्झ्वा वि. लक्ष्मीपती असा आहे. I am pathologically opposed to communism... व मी कम्युनिझम बद्दल खूप काही वाचलेले आहे. म्हंजे कम्युनिस्टांनी व कम्युनिस्ट विरोधकांनी लिहिलेले. माझ्या वाचनात तरी असे कुठे आलेले नाही की कम्युनिस्ट्स हे पुरुष धार्जिणे असतात. छुपे असतीलही.
(२) खरंतर कम्युनिझम च्या टीकाकारांमधे/विरोधकांमधे सुद्धा स्त्रिया नगण्य आहेत. (थॅचर, आंग सान सू की ही मोजकी नावे. ती सुद्धा दणकट उदाहरणे नाहीत. )
मराठी ही गोव्यातली दुसरी सरकारी/अधिकृत भाषा !!!
मराठी ही गोव्यातली दुसरी सरकारी/अधिकृत भाषा होणार का ??
-----
जी डी बक्शींचे आयायटीतले भाषण द्वेषपूर्ण होते म्हणे...
जीडी बक्शी हे निवृत्त सेनाधिकारी आहेत. ते त्यांच्या विषयाबद्दल बोलणार हे तुम्हाला आधीच माहीती होते. द्वेष च्या उलट आहे प्रेम, दोस्ती, सद्भावना. गेली अनेक दशके प्रेम, दोस्ती, सद्भावना यांच्या आधारावर प्रचंड बातचीत, चर्चा, मुशायरे, वाटाघाटी, सलोखासत्रं, समझौता एक्सप्रेस, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करण्यात आले. त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही. आता हा नवीन प्रयत्न केला तर काय हरकत आहे ? एखादी गोष्ट एकाच मार्गाने सातत्याने करत राहणे व वेगळ्या परिणामांची अपेक्षा करणे हे चक्रमपणाचे लक्षण आहे. तेव्हा वेगळा परिणाम हवा असेल तर वेगळे काहीतरी करायलाच हवे.
-----
Clump ची चुकलेली व्यापारी गणिते... ट्रान्सपॅसिफिक पार्टनरशिप मधे भारत घुसु शकला तर बरंच आहे. पण क्लंप ची व्यापारी गणितं मात्र चुकलेली आहेत.
TPP would eliminate 18,000 tariffs now imposed on U.S. exports to other TPP countries. Nearly 90 percent of those duties would go to zero upon enactment, and nearly all would be eliminated within 16 years. U.S. duties would also be phased out almost completely, with the steepest reduction on imported apparel and footwear, delivering benefits directly to low-income U.S. households.
-----
आजच्या दिनवैशिष्ट्यातून ....
१९६६ : चीनचा सर्वेसर्वा माओने सांस्कृतिक क्रांती जाहीर केली. ह्या अंतर्गत माओने आपल्या विरोधकांचा नायनाट केला; अंदाजे २० लाख मृत.
पण माओ ने त्यापूर्वी सुद्धा ४.५ कोटी मारले होते. १९५८-१९६२ च्या दरम्यान. कम्युनिझम ची सुमधुर फले. तपशील इथे आहे. . Frank Dikötter यांनी नुकताच प्रकाशित केलेल्या संशोधनावर आधारित आहे. लिंक खाली देत आहे.
यात त्या सांस्कृतिक क्रांतीच्या सनावळ्या चुकल्यात की काय असं वाटतं. या संशोधनानुसार सांस्कृतिक क्रांती १९६२ मधे सुरु झाली असं वाटतं. १९६२ मधे भारत चीन युद्ध पण झालं होतं. ब्याट्या तुझं काय मत ?. विकिपेडिया वर 1966 until 1976 अशी सनावळी दिलेली आहे.
(अवांतर) पाकदोस्ती!!!
द्वेष च्या उलट आहे प्रेम, दोस्ती, सद्भावना. गेली अनेक दशके प्रेम, दोस्ती, सद्भावना यांच्या आधारावर प्रचंड बातचीत, चर्चा, मुशायरे, वाटाघाटी, सलोखासत्रं, समझौता एक्सप्रेस, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करण्यात आले.
यावरून अाठवले.
पाकदोस्तीचा अर्थ मोल्सवर्थात काही वेगळाच सापडला.
(एकंदरीत fictitious entityच म्हणायची तर...)
तमोदी म्हणतात : पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा आहे.
मोदी म्हणतात : पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा आहे.
-----
"We (Muslims) are a disturbed lot and don't know where to go," he added. - चला .. कमीतकमी आझम खान ला तरी लक्षात आलं की ....
-----
भारतीय Consumer Confidence वधारला
-----
बलुचिस्तान, मोदी, व पाकिस्तान....
------
Venezuela मधे परिस्थिती इतकी बिकट आहे की तिथल्या भुकेल्या लोकांनी प्राणिसंग्रहालयात घुसुन तिथला black stallion मारून खाल्ला - तिथल्या इतर शहरात प्राणिसंग्रहालयातली इतर जनावरे पळवून नेऊन मारून खाण्याच्या घटना सुद्धा घडल्या - समाजवादाचा विजय असो !!!
------
PM Modi needs to move from slogans to action to transform agriculture.
The second FYP (1956-61) was driven by Prime Minister Nehru’s economic philosophy of the mixed economy, with the state playing a dominant role, and focused on heavy industry.
हा हा हा.
...
...
If PM Modi can do these, he will go down in history as having transformed the Indian agri-food space.
नेहरूंनी, इंदिराबाईंनी घाण करून ठेवली. ममोसिंनी ती काही साफ केली नाही. बारामतीकर व कम्युनिस्ट्स साथीला होते तेव्हा सुद्धा नाही.... निर्यात चांगली व आयात वाईट वगैरे मर्कंटलिस्ट संकल्पनांना चिकटून राहिले.... (तपशील खाली...)
आता ... मोदींना गाजर दाखवताय काय लेको ??? यू विल गो डाऊन इन हिस्टरी अॅज .... ब्ला ब्ला ब्ला....
UPA I and UPA II saw the global commodity price boom. Manmohan Singh’s government offered significant increases in minimum support prices. This increased production, stocks and exports to unprecedented levels. India exported more than 60 million tonnes of cereals during 2012-14, and overall agriculture exports touched $42 billion in FY14.
"इथे कमी पडले तर...?" ही खोटी भावना शहरी अभिजनात अत्यंत कॉमन!
अन्नपदार्थांची निर्यात करू नये कारण "इथे कमी पडले तर...?" ही (बरीचशी खोटी!) भावना ही नेहरू-इंदिरेच्या काळात शहरी अभिजनात अत्यंत कॉमन होती . शेतकऱ्याच्या श्रमावर मजा मारणे हे शहरी अभिजनांचे जुनेच स्वप्न आहे , आणि अजूनही ती भावना गेलेली नाही. उगाच इंदिरा-नेहरू यांना वेगळे काढून दोष देण्याचे कारण नाही .
मस्त बातमी.
Crescent Womb’s creator claims the product encourages healthy spine development by allowing the baby to rest in a natural “C Curve” shape, rather than lying flat on their back, which stresses the spine.
http://www.foxnews.com/health/2016/08/15/infant-bed-shaped-to-mimic-wom…
आजचे ट्रम्पचे ओहायो मधले इस्लामिक टेररबद्दलचे भाषण!
आत्ताच ट्रम्पचे ओहायो मधले इस्लामिक टेरर आणि त्याच्याशी सामना कसा करावा याबद्दलचे भाषण ऐकले. पहिल्यांदाच इतके मुद्देसूद भाषण ट्रम्पकडून ऐकले असे म्हणावे लागेल . कोणीतरी बरा सल्लागार भेटलेला दिसतो, आणि ट्रम्पनेही टेलीप्रॉम्प्टर सांगेल त्याच्याबाहेर काहीही भाष्य केले नाही . त्याचा बराचसा प्लॅटफॉर्म हिलरी लवकरच उचलेल अशी आशा करतो. मुख्य बदल पाहिला तो म्हणजे अमेरिकेला टेररशी सामना करताना मध्यपूर्वेतील राष्ट्रांची प्रचंड मदत लागते, याचे आलेले भान. पण गे लोकांबद्दल आणि ज्यू लोकांबद्दल ज्याच्या मनात द्वेष आहे त्याला अमेरिकेत स्थान नाही हे ट्रम्पकडून ऐकल्यावर म्हटले की ट्रम्पचे अमेरिकन दक्षिणेतले खिश्चन "सुवार्ता-प्रसारक " पाठीराखेहि यात येऊ शकतात. असो.
नदीजोड प्रकल्प
नदीजोड प्रकल्पासाठी पुरेसं पाणी नद्यांमध्येच नाही.
... found a significant decrease in rainfall – more than 10 per cent each in the major surplus basins of the Mahanadi, the Godavari, the Brahmani, the Mahi, the Meghna and the multiple small rivers in the Western Ghats and those flowing east. Only the Brahmaputra river basin showed no decrease in rainfall.
“One of the plans of interlinking of rivers is supplying water from a surplus basin to a deficient one,” said Professor Subimal Ghosh, civil engineering department, IITB. “But if the surplus basin itself shows a declining trend of water availability, they will find it difficult to both meet their own demands and also supply the quantum of water committed to the deficit river basins. The project may not be sustainable.”