प्राण्यांचं ऑलिंपिक

सध्या अर्थातच आमच्या घरी सगळ्या मनुष्यप्राण्यांना ऑलिंपिकचा ज्वर चढलेला आहे. संध्याकाळी जेवताना फ्रेजर किंवा साईनफेल्ड बघण्याऐवजी ऑलिंपिक बघितलं जातंय. नेमका उसेन बोल्ट जोरदार धावत असतो आणि आमची (अखंड कुमारी) तिर्री टीव्हीसमोर येऊन थडकते. तिच्या लवेचेप्र सफल होतात. पण टीव्ही अमेरिकन आकाराचा असल्यामुळे उसेन बोल्टऐवजी शर्यतीत सहावा आलेलाच मनुष्य झाकला जातो. त्याबद्दल आम्ही तक्रार कशाला करू!

तेव्हा मनात विचार आला की प्राण्याची ऑलिंपिकं भरवली तर त्यात काय काय स्पर्धा असतील! मी मांजरांचाच अभ्यास केल्यामुळे मांजरांसाठी काही स्पर्धा सुचवू शकते. तुम्ही आपापल्या अभ्यास अथवा प्रेमविषयक प्राण्यांसाठी स्पर्धा सुचवू शकता. प्रत्येक जातीसाठी स्पर्धा निराळ्या भरवल्या जातील. कोणत्याही जातीला अधिक प्राधान्य मिळणार नाही ह्याची जाणीव ठेवावी. स्पर्धा सुचवताना पाळायचं एकमेव पथ्य म्हणजे ज्या विषयात प्राण्यांना अजिबात गती नाही, त्यासाठी स्पर्धा भरवायच्या आहेत. उदाहरणार्थ, इतर प्राण्यांशी तुलना करता माणूसप्राणी शारीरिक बळात अगदीच फडतूस. ऑलिंपिकमध्ये शारीरिक ताकद, लालित्य, ह्यालाच अधिक महत्त्व असतं.

तर मांजरांच्या ऑलिंपिक स्पर्धा भरवताना त्यांचे निरनिराळे वयोगट करावे लागतील, जसे कुस्तीत वजनाचे वयोगट असतात. हे वयोगट ०-२ आठवडे, २-१२ आठवडे, ३-६महिने, ६-१२ महिने असे काहीतरी करावे लागतील. ह्या स्पर्धांचे प्रकार -

 • भरपूर अन्न समोर ठेवलं तर कोणतं मांजर सगळ्यात जास्त खाईल, ती जिंकेल.
 • समोर एखादी वस्तू हलवायची. जी मांजर सगळ्यात जास्त वेळ डावली न मारता राहू शकेल ती जिंकेल. ह्यात उपप्रकार करता येतील - लेझर डान्स, लंबकाची हालचाल, फडफडणारं कापड. (१०० मीटर, २०० मीटर, १०० मीटर हर्डल हे प्रकार असतात तसे.)
 • पाण्याचा फवारा पाठीवर मारला तर जी मांजर सगळ्यात जास्त वेळ शांत पडून राहील ती जिंकेल.

ह्यात भर घाला आणि प्राण्यांच्या ऑलिंपिकची स्थापना करणाऱ्या समितीत बघताय काय सामील व्हा!

हालचाल

१. मांजर
२. लक्ष वेधण्याचे प्रयोग
३. दांडगा
४. प्राण्यांची
५. समजलात काय! हे ऐसी आहे.
६. गब्बरला हाफव्हॉली.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आमच्या हावरट गिनीपिग्स समोर चेरी, द्राक्ष किंवा गाजर धरा व पहा कोण जास्ती वेळ संयम ठेऊ शकतो. दोघंही तुटून पडतात. काल आंबा घेऊन समोरुन जात होते तर आधी गोड आवाज काढून मागीतला. तरी देत नाही हे पाहून रागाने दातांचा "कटकटाट" केला तेजायला. मी उडालेच.
___
वरती केलेले vine का काय मजेशिर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कासव निश्चितच मेराथान जिंकेल. बेचारा ससा पुन्हा झोपेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय एकेक कल्पना काढतात ऐसीवर! तुमच्यात नसलेल्या लेखकाला उचकवण्याचे शंभर प्रकार.नलेखकही यात उडी घेणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माऊ कोण किती आळसुंडी आहे त्याची स्पर्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0