त्याची कविता

कविता

त्याची कविता

लेखक - मिलिन्द

कण्हत, धापा टाकत तीन मुलांच्या चड्ड्या
हारीने वाळत घालणारी म्हातारीशी आई,
घरासमोर हिरवं गवत,
वाळकी पानं,
नक्षीदार दगडांनी कोरलेला गुलाबाचा वाफा
उलटी पडलेली तिचाकी, हवा गेलेला बॉल
दारातल्या दोन गाड्या : एक नवीन, एक जुनाट .
दारात लटकणारे हॅलोवीनचे काळेशार भूत.
मागे निळाशार पोहण्याचा तलाव
त्यात धबाक धबाक किंचाळणारी मुले
घर तळपत असते, उन्हं झेलत दिमाखात !
पहाटे गवंडीकामाचा ट्रक घेऊन
तो निघतो तिथपासून
ते रात्री कंबरडे मोडेपर्यंत
तो त्याच्या पृथ्वीच्या विरुद्ध बाजूच्या या घराला
प्रदक्षिणा घालत असतो,
कुठेतरी ही ट्यूब पेटून मी खडबडून जागा होतो ,
नतमस्तक होऊन, बूट काढून त्याच्या घरात शिरतो ,
त्याच्या देखण्या स्वागतपर हास्याला विचारतो,
"सुंदर आहे! कधी घेतलंस हे घर?"

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

अगदी खरे आहे. फक्त सुबत्ता नाही तर त्यामागचे अतोनात कष्ट आहेत आणि घरातल्या सर्वांचे टीमवर्क आहे. - कुठेतरी ही ट्यूब पेटून मी खडबडून जागा होतो