सलोना सा सजन है और मै हू - एक सर्वोत्तम गझल!

एका वाग्दत्त वधूचे किंवा प्रेयसीचे भावविश्व व्यक्त करणारी एक सर्वश्रेष्ठ गझल !

सलोना सा सजन है और मैं हूँ

आता माझा सुंदर सजणा आणि मी हेच माझे विश्व आहे असे सांगत आपल्या भावविश्वाचे सुंदर वर्णन या गजलेत ही तरुणी करते.
शबी अब्बास यांचे शब्द , गुलाम अली यांचे स्वर्गीय संगीत आणि आशा भोसले यांची अष्टपैलू गायकी यांनी सजलेली हि गजल रसिकांना भावून गेली नाही तरच नवल! व्हायोलिन चा लाजवाब प्रयोग संगीतात आहे.

मिराज ए गजल या अल्बम मधील ही गजल ! या अल्बम मधील सर्व गजल लाजवाब आहेत.
ही गजल मराठीतील मेहेंदीच्या पानावर किंवा फुलले रे क्षण माझे फुलले रे या गाण्यांप्रमाणेच !

ही सुंदर युवती पुढे म्हणते, मनात प्रेमाच्या भावनांनी आग लागली आहे तसेच माझ्या प्रियकराच्या रूपाच्या सावलीत एक थंड ज्वाला आहे. विरोधाभास व्यक्त करणारा अलंकार! आता भान हरपणे आणि रात्रीची झोप त्याच्या विचाराने उडणे नित्याचे झाले आहे. तशातच हि लाज लपवत असताना त्याच्यासमोरच हा चंचल पवन पदर उठवतो आणि लाजून मी आणखी चूर होते. .

क्षणोक्षणी , विवाहाच्या प्रसंगी सजणाऱ्या मेंदीचा विचार आणि मी हेच माझे आता भावविश्व आहे,

शांत संगीत , कमीत कमी वाद्यांचा वापर आणि अर्थपूर्ण अलंकारिक काव्यकृती याने सजलेली हि गजल म्हणजे गज़लप्रेमींसाठी पर्वणीच!

स्त्रीचे असे सुंदर वर्णन करणारी काव्ये या दुनियेत केली जात असताना , पुरुष स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करतात यासारखी दुसरी शोकांतिका नाही .

ही गजल खालील युट्युब दुव्यावर आपण ऐकू शकाल !

https://www.youtube.com/watch?v=uPV3pXVMBPM

सलोना सा साजन है और मै हूँ
जिया मे एक अगन है और मै हूँ

तुम्हारे रूप की छाया में साजन
बडी ठंडी जलन है और मै हूँ

चुराये चैन रातों को जगाये
पिया का यह चलन है और मै हूँ

पिया के सामने घूंघट उठा दे
बडी चंचल पवन है और मै हूँ

रचेगी जब मेरे हातों मी मेहेंदी
उसी दिन की लगन है और मैं हूँ

a

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

रचेगी जब मेरे हातों मी मेहेंदी
उसी दिन की लगन है और मैं हूँ

या विवाहोत्सुक ओळींनी वातावरणनिर्मितीचा पार पार नाश झालेला आहे. अत्यंत गोड गाणं, शेवटच्या "कमिटमेन्ट च्या दुराग्रहामुळे" ऐकवत नाही.
___
पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे - वागदत्त वधूचे भावविश्व असल्याने ... रिलेटच करता येत नाही Sad
यापेक्षा फक्त पहीली कडवी असती तर जनरिक तरी झाली असती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!
शुचि छान पर्स्पेक्टिव्ह आहे तुमचे.
पण गझल आणि संगीत मस्तच आहे याबद्द्ल दुमत नसावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओम शान्ति ओम

ओह येस्स्स अप्रतिम आहेत दोन्ही. आपला लेख आवडला. यातील जियामे अगन आणि तेरे रुप की छाया मे ठंडी अगन या उपमा तर निव्वळ जीवघेण्या आहेत.
.

चुराये चैन रातों को जगाये
पिया का यह चलन है और मै हूँ

या ओळींवर फक्त एकच होतं - काळजाचा ठोका चुकतो Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बट अबाउट फुल्फिल्मेंट..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

याच संग्रहातली 'करु मैं याद मगर' ही गजल म्हणायला अत्यंत कठीण आहे, तरीही लाजवाब आहे, विशेषत:, सुरवातीचा व्हॉयोलिनचा पीस अंगावर काटा आणणारा आहे.
सलोना ही गजलही माझी आवडती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती

स्त्रीचे असे सुंदर वर्णन करणारी काव्ये या दुनियेत केली जात असताना , पुरुष स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करतात यासारखी दुसरी शोकांतिका नाही .

या ओळींनी वातावरणनिर्मितीचा पार पार नाश झालेला आहे मेबी प्लाटफोर्म कंपेटीबेलिटी म्हणून ते योजलं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!