राष्ट्रगीताची सक्ती : 'Curiouser and curiouser!” Cried Alice...

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा ह्यांच्या प्रस्तुत निर्णयाची पार्श्वभूमि आणि तत्संबंधी काही अन्य बाबी पाहताच Alice in Wonderland मधील 'Curiouser and curiouser!” Cried Alice... ह्याची आठवण येते.

राष्ट्रगीताला पुरेसा आदर मिळावा ह्या स्तुत्य हेतूने ह्याच अर्जदाराने - श्याम नारायण चोकसी - १३ वर्षांपूर्वी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात 'कभी खुशी कभी गम' च्या निर्मात्यांवर दावा लावला होता. त्या कोर्टाचा निर्णय येथे उपलब्ध आहे.अर्जदाराचा दावा मान्य करणारे त्यावेळचे तेथील न्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा हेच होते. त्यांच्या निर्णयाने - जो निर्णय अनेक वृत्तपत्रसंदर्भांप्रमाणे अनावश्यक इतका शब्दबंबाळ आणि अस्थानी पाण्डित्यदर्शक होता - अर्जदाराचा दावा मान्य करण्यात आला. तो निर्णय तीन न्यायाधीशांच्या पीठाकडून सर्वोच्च न्यायालयात मर्यादित प्रमाणामध्ये फिरविण्यात आला.

आता तोच अर्जदार तेच मुद्दे घेऊन सर्वोच्च न्यायालयाकडे सार्वजनिक हिताचा दावा घेऊन आलेला आहे आणि पुनः सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस दीपक मिश्रा ह्यांनीच निर्णय देऊन चित्रपटाच्या प्रारंभी राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे केले आहे.

ह्या निर्णयाचे जे काय व्हायचे ते होईल पण मध्यप्रदेश-निर्णयात वापरलेल्या भाषेबद्दल मला थोडे वाटले ते लिहू इच्छितो.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय १-२ दिवसांचाच जुना आहे आणि त्याकारणाने जालावर उपलब्ध नसावा पण मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय उपलब्ध आहे. त्यातील पुढील उतारा पहा:

"National Anthem is to be sung with magna cum laude and nobody can ostracize (?) the concept of summa cum laude. In the case at hand, as we have noted earlier the son of the protagonists sings the National Anthem as a surprise item. The presentation, according to us, is in medias res. The child actor forgets the line and utters the term "sorry". To some it may appear lapsus linguae, slip of the tongue or a natural forgetting but if the whole thing is perceived, understood and appreciated in complete scenario, it is the script writer's fertile imagination and the Director's id est. It is deliberate. A deliberate slip of the pen. It is because there is in a way, deliberation to project a dramatic effort to show that the scene depicted in the film is on an absolute terra firma. The writer and director have totally forgotten that they were portraying the National Anthem of a great country." (लॅटिन शब्दांचा रंग आणि प्रश्नचिह्न माझे आहेत.)

ह्या उतार्‍यातील प्रत्येक लॅटिन शब्दाला समर्पक, सोपा, रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द उपलब्ध आहे. असे शब्द टाळून हट्टाने लॅटिन शब्द वापरणे हे प्रख्यात जुना इंग्रज लेखक फाउलर (Henry Watson Fowler, A Dictionary of Modern English Usage) ह्याच्या मते पाण्डित्यप्रदर्शन - Pedantry - आहे. तो म्हणतो:

"Pedantry may be defined, for the purpose of this book, as the saying of things in language so learned or so demonstratively accurate as to imply a slur upon the generality, who are not capable or desirous of such displays."

विद्वान न्यायमूर्तींनी असे अनावश्यक लॅटिन वापर टाळले असते तर बरे झाले असते असे वाटते.

लॅटिननंतर न्यायमूर्ति संस्कृतकडे वळतात. तेथे त्यांनी दाखविलेला श्लोक धादान्त अशुद्ध आहे आणि त्याचे तेथे स्थान काय तेहि कळत नाही. ते म्हणतातः

"In 'Shashtras' this great country has been described as under :
"ASMAD DESHA PRASUTASYA SAKASADAGRA JANMAMAH SWAM SWAM CHARITRAM SCHIKSERAN PRITHIVYAM SARVA MANAVAN."

हे 'शास्त्र' कोणते हे न्यायाधीश स्वतः सांगत नाहीत पण ते 'मनुस्मृति' आहे. 'मनुस्मृती'मध्ये २.२० येथे असा श्लोक आहे:

एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मन: ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवा: ॥

ह्या श्लोकात कोणत्याच great country चे वर्णन नाही. काय आहे तर असा आदेश की 'ह्या देशात जन्मलेल्या ब्राह्मणापासून (एतद्देशप्रसूतस्य अग्रजन्मनः सकाशात्) सर्व लोकांनी आपण कसे वागावे ते शिकावे (स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन्). (क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्यांनी जन्माने सर्वोच्च असलेल्या - अग्रजन्मन् - कडून आपापल्या जातीस योग्य असे वर्तन शिकावे.) ह्या कालबाह्य निर्देशनाला येथे का आणले आहे? आणि ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?

ह्यापुढेच खालील पाण्डित्य दिसते:

"Not for nothing, in one of the ancient epics of India it has been so said :
"API SWARNAMAYI LANKA NA ME ROCHATE LAKSHMAN JANANI JANMA-BHUMISCHA SWARGADAPI GARIYASI."

हा श्लोक म्हणजे
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
हा श्लोक आहे. हा प्राचीन असून रामायणाच्या सुन्दरकाण्डात आहे अशी सार्वत्रिक गैरसमजूत आहे पण तेथे तो कोठेच सापडत नाही. तो प्राचीनहि वाटत नाही. त्यातील जननी आणि जन्मभूमि ह्या दोन संकल्पना स्पष्टपणे परकीय उगमाच्या आहेत आणि श्लोकात व्याकरणहि गंडले आहे. ('गरीयसी' नाही 'गरीयस्यौ'- द्विवचन.) ह्यावर बरीच चर्चा जालावर पाहावयास मिळते. हा श्लोक विद्वत्ताप्रदर्शनासाठी येथे वापरण्यापूर्वी न्यायमूर्तींनी ती चर्चा डोळ्याखालून घालायला हवी होती असे वाटते.

ह्यापुढे न्यायमूर्ति पुनः लॅटिनकडे आणि दुर्बोध शब्दांकडे वळतात. ते लिहितातः

"They have not kept in mind 'vox populi, vox dei'. The producer and the director have allowed the National Anthem of Bharat, the alpha and omega of the country to the backseat.

On a first flush it may look like a magnum opus of patriotism but on a deeper probe and greater scrutiny it is a simulacrum having the semblance but sans real substance. There cannot be like Caesar's thrasonical brags of "veni, vidi, vici." The boy cannot be allowed to make his innocence a parents rodomontrade, at the cost of national honour. In our view it is contrary to national ethos and an anthema to the sanguinity of the national feeling. It is an exposition of ad libitum.

हे अधिक सुलभ शब्दांमध्ये नसते का सांगता आले?

हा इतका शब्दच्छल मी येथे का केला आहे असा प्रश्न काहींना पडेल. 'राहू द्या, सोडून द्या' असा सल्ला ते मला देतील. पण मला ही बाब अशीच सोडण्याजोगती वाटत नाही. उच्च न्यायालयांचे निकाल चिरस्थायी स्वरूपाचे असतात. देशभर आणि देशाबाहेरहि अनेक विद्वान भाषाप्रभु वेगवेगळ्या कारणांसाठी ते वाचतात. Language thunderous, grammar wondrous अशा धर्तीचे हे निर्णय वाचून त्यांचे भारताच्या न्यायालयांबद्दल आणि एकंदरीतच भारताबद्दल काय मत बनेल?

न्यायमूर्ति मिश्रा हे ज्येष्ठताक्रमानुसार ह्यापुढील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील असे दिसते.

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

कायद्याची भाषा

कोणत्याही पेशाची डिक्शनरी असते तशी कायद्याची पण आहे. यात हे सारे वाक्प्रयोग अतिशय सामान्य मानले जातात. मंत्र रोज म्हणायच्या दिवसांमधे बर्‍याच क्लिष्ट ओळी वकिलांना मुखपाठ असायच्या आणि ते त्या वापरतही.
कंपन्यांच्या भांडणतंट्यांना वैतागलेल्या कोर्टाने कॉट्रक्ट्स साधी भाषा वापरून लिहायला सांगीतलेली.
http://www.rediff.com/money/report/arbit/20080924.htm

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

चिरस्थायी?

उच्च न्यायालयांचे निकाल चिरस्थायी स्वरूपाचे असतात.

हे नविनच ऐकलं.
https://home.kpmg.com/content/dam/kpmg/pdf/2014/11/North-Karnataka-Expre...
या लिंकवर भारतातल्या विविध न्यायालयांनी एकाच विषयावर परस्परविरोधी किती घोळ घातला आहे त्याची चर्चा आहे. इतकेच तर काय, सर्वोच्च न्यायालय एक म्हणत असताना मुंबई हाय कोर्ट दुसरंच काय तरी पालुपद लावतंय. पूर्णतः भिन्न परिणाम साधेल अश्या वेगळ्या कायद्यांधारे डिट्टो सेम विशयावर विरुद्ध निकाल!! इथे कंपन्यांची झोप उडालीय, खटल्यावर खटले पडत आहेत. के पी एम जी सारख्या दिग्गज टॅक्स कंपनीने सुद्धा 'आवर कमेंट्स' मधे जे हात टेकले आहेत, तौबा तौबा.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

उदोउदो

ह्या दिवसात किती लोकांना ब्राह्मण्याचा हा उदोउदो - आणि तोहि मनुस्मृतीच्या आधाराने केलेला - रुचेल?

काय हो, ब्राह्मण हे भारतीय प्रजासत्तकाचे घोषित शत्रू आहेत का? मंजे कोणाला रुचो वा ना रुचो, न्यायालयाने ब्राह्मणांचा (किंवा त्या काळातल्या ब्राह्मण्य नावाच्या संकल्पनेचा) उदोउदो का करू नये?

आणि मनुस्मृतीवर भारत सरकारने बंदी घातली आहे का?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

हिंदू धर्म व हिंदू लोक टाकाऊ,

हिंदू धर्म व हिंदू लोक टाकाऊ, त्यातही साडेतीन टक्केवाले तर महाटाकाऊ, जाळून मारण्याच्याच लायकीचे (पण फक्त पुरुष हां- स्त्रिया नव्हेत) अशी सांप्रत काळी फॅशन आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

ही क्लिप बघा

ह्या विषयावर काही विशेष पांडित्यपूर्ण लिहायची माझी योग्यता नाही, पण अलिकडेच हे पहाण्यात आलं...

https://www.youtube.com/watch?v=r2lTa7Rsvig

भाबडा असेन कदाचित, पण इतके भारतीय एकत्र, एका सुरात राष्ट्रगीत गातांना पाहून आय वॉज इम्प्रेस्ड!!!

"Hic Rhodes, hic salta"

काही दिवसापूर्वी वाचले :
"Hic Rhodes, hic salta"
"हे ऱ्होड्स नावाचे बेट आलेच आहे, आता काय ती तुझी लांब उडी मारून दाखव" : एका ऍथलिटच्या गुलामाने त्याच्या लांब उडीच्या बढायांवर केलेली कॉमेंट . साधारण "बाप दाखव किंवा श्राद्ध कर", किंवा "हा सूर्य आणि हा जयद्रथ" या जातीचे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

रोचक! विविध भाषांमधील सारख्या

रोचक! विविध भाषांमधील सारख्या अर्थाच्या म्हणींचा संग्रह कुणी केल्यास भारी काम होईल.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हाण्ण!!! घरोघरी मातीच्या

हाण्ण!!! घरोघरी मातीच्या चूलीच म्हणा की.

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

नै म्हणजे जाता येता 'अ‍ॅड

नै म्हणजे जाता येता 'अ‍ॅड होमिनेम' , 'लॉजिकल फॅलसी' अथवा 'लिंग्वा फ्रॅका' सारखे शब्द प्रतिसादात फेकणारे विद्वद्जन इथे पण आहेतच की.
त्यांच्या दृष्टीने ही सामान्यांची भाषा असेल तर न्यायमूर्तींना ही तोच न्याय लागू पडेल (त्या बिचार्‍यांना आजूबाजूला असेच बोलणारे भेटत असावेत असं काहीसं).
अन्यथा "पण दुर्बोध शब्द वापरले म्हणजे काही तरी थोरच म्हटलेलं असतं " अशा धारणेतूनच असे शब्द अधे मधे वापरले जातात असा आरोप वापरकर्त्यांवर केला तर तो चूक ठरु नये. (डोळा मारत)

[ ज्यांच्यासाठी आहे ते समजून घेऊन ह. घेतीलच अशी आशा. (स्माईल) ]

सदैव शोधात..

मला तर डावे व उजवे हा फरक

मला तर डावे व उजवे हा फरक अजुनही लक्षात रहात नाही. Sad

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

डावे-उजवे ;)

आमच्याकडे धुता हात व जेवणा हात, असं म्हणतात. अनुक्रमे डावा व उजवा.
पहा ट्राय करून, लक्षात ठेवायला सोपं जातं.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सापेक्ष

>>मला तर डावे व उजवे हा फरक अजुनही लक्षात रहात नाही.<<

सापेक्षतावाद समजून घ्या. तुम्ही उजव्यांमधले असलात, तर डावे डावे असतात; पण तुम्ही दोघांना समोरून पाहिलंत तर उजवे डावे भासतात (आणि डावे उजवे) (डोळा मारत)

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Yeah!! दॅट हेल्प्स

सापेक्षतावाद समजून घ्या. तुम्ही उजव्यांमधले असलात, तर डावे डावे असतात; पण तुम्ही दोघांना समोरून पाहिलंत तर उजवे डावे भासतात (आणि डावे उजवे)

Yeah!! दॅट हेल्प्स (डोळा मारत) (लोळून हसत)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

+१

वन-टू-थ्री नामक एका अजरामर हिंदी चित्रपटात सुनील शेट्टी कायम विचारतो 'तुम्हारा लेफ्ट या मेरा लेफ्ट'

डावे म्हणजे लुटारु, हुकुमशहा,

डावे म्हणजे लुटारु, हुकुमशहा, दुसर्‍यांच्या पैश्यावर जगणार, वृत्तीने नीच, ढोंगी.
डावे असण्याचा आर्थिक नितीशी काही संबंध नाही. डावे म्हणजे शिवीच समज ना.

ए डाव्या असे शिवी एवजी म्हणावे का ?

डावे असण्याचा आर्थिक नितीशी काही संबंध नाही. डावे म्हणजे शिवीच समज ना.

ए डाव्या हा नविन शिवीचा पर्याय वापरावा का ? त्यातल्या त्यात एक शिवीला सभ्य शिवाय काहीसा बौद्धिक पर्याय होइल. त्यातुन तो ना बोलतो ना ते दवणीयच पण काय सांगू शिव्या ही देतो ना त्या ही अगदी श्रवणीय बरका. अज्जिबात डावं उजवं करत नाही या बाबतीत तो.
असे झाल्यास मराठी आंतरजालाने मराठी भाषा एका आगळ्याच उंचीवर नेऊन उजवली असे म्हणता येइल का ?
अन मग ते कसं अ‍ॅडजस्ट करायच उदा.
अमुक अमुक रावसाहेबांचा उजवा हात आहे. अमुक अमुक पक्षाला डावल लं जात आहे.
अमुक अमुक करणे उजव्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे.
आज पत्त्यांचा डाव काही केल्या जमुन आलाच नाही.
एक डाव उजव्यांचा एक डाव भुताचा
ए अग तो डाव देतेस का जरा ?
प्रत्येक ठिकाणी शिवी होउन बसेल डावा हा शब्द.
कोणी लेफ्टी खेळायला तयार होणार नाही अशानं

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

आमच्या भूतपूर्व हापिसात

आमच्या भूतपूर्व हापिसात एकेकाळी "ए डाव्या" ही शिवी होतीच. याचा संदर्भ असा: अबक हा क्षयझचा चमचा आहे = अबक हा क्षयझची 'डावी **' आहे.

-----------
अनावस्था प्रसंग ओढवता कपाळात जाणारा अवयव

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

म्हणजे तुमचा इशारा

ना.धो. ताम्हणकर यांच्या प्रसिद्ध बाल कादंबरीच्या नायकाकडे आहे का ? ज्यावर सिरीयल आली होती ?
की निरागस बालकांच्या एका खेळाकडे तुम्ही लक्ष वेधत आहात ?
पण माझी दोन्ही उदाहरणे पुरुषप्रधान आहेत शिवाय अनेक वचनी आहेत तुमचा इशारा फेमीनीझम मध्ये अभिप्रेत असलेल्या स्वतंत्र स्त्री कडे आहे का ?
म्हणजे अबक हा क्षयझ ची यातल्या ची मुळे वरील चिंतनाला प्रेरणा मिळाली.
कळावे लोभ असावा
बाकी ते तुमच खारी पण भारी होत हा हे सांगायच राह्यल होत.

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

अनावस्था प्रसंग ओढवता कपाळात

अनावस्था प्रसंग ओढवता कपाळात जाणारा अवयव

(लोळून हसत) आवरा. इथे मीटींग चाललीये. अशा कमेन्टसमुळे फिस्सकन हसू फुटतय.

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

डावे म्हणजे लुटारु, हुकुमशहा,

डावे म्हणजे लुटारु, हुकुमशहा, दुसर्‍यांच्या पैश्यावर जगणार, वृत्तीने नीच, ढोंगी.
डावे असण्याचा आर्थिक नितीशी काही संबंध नाही. डावे म्हणजे शिवीच समज ना.

हो मी साधारण तसेच लक्षात ठेवले आहे. डावा हात आपण प्रसादास वापरत नाही तसेच डावे लोक वाईट (डोळा मारत) (लोळून हसत)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

बरोबरे

डाव्यांत एक गट दुसर्‍याचे शोषण करतो,उजवे लोक्स ह्या मंडळींच्या अगदी विरोधी!!

कोणी "उजवे" असू शकते याचे मला फार आश्चर्य वाटते.!

गरिबांच्या, कामगारांच्या , सर्वसामान्य माणसांच्या, इहलोकातील मुक्तिलढ्याच्या बाजूचे ते डावे. भांडवलाच्या , धर्माच्या, "देशभक्तीच्या", "समाज-धारणेच्या" बाजूचे ते उजवे. उजव्या संकल्पनांनी आत्तापर्यंत इतिहासात एव्हढा घोळ घातला आहे, एव्हढी दडपशाही, युद्धखोरी केली आहे, की आजमितीला कोणी "उजवे" असू शकते याचेच मला फार आश्चर्य वाटते.

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

उजव्या संकल्पनांनी

उजव्या संकल्पनांनी आत्तापर्यंत इतिहासात एव्हढा घोळ घातला आहे, एव्हढी दडपशाही, युद्धखोरी केली आहे, की आजमितीला कोणी "उजवे" असू शकते याचेच मला फार आश्चर्य वाटते.

हो का? मलापण युरोपात चर्चच्या राज्याची पुर्नस्थापना का होत नाहीये याचं आश्चर्य वाटतं. म्हणजे डार्विनगीरीच्या नावाखाली कोट्यावधी लोक कापून काढायचे, नंतर दोन महायुद्धे करायची, नंतर शीतयुद्ध आणून जग टेन्स ठेवायचे नि वर चर्चच्या नावाने बोंबलायचे! कमाल आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

ओहोहो, ते गुलाग नामक फाईव्ह

ओहोहो, ते गुलाग नामक फाईव्ह स्टार हाटेलात पाठवणारे लोक उजवेच होते हा शोध नव्याने लावल्याबद्दल आभार!

मी नाही त्यातली अन कडी घाल आतली असे म्हणणारे ते डावे ही खरी व्याख्या.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

सत्ता हीच एक 'उजवी' संकल्पना आहे .

सत्ता हीच एक 'उजवी' संकल्पना आहे . सत्ताधारी "डावा " असूच शकत नाही . सोव्हिएट हुकूमशाहीला विरोध करणारे "रिफ्युजनिक्स" हे खरे डावे . चीनचा ऐ वैवई हा खरा "डावा ", "कम्युनिस्ट" सत्ताधारी नव्हेत .

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

हेच ते ढोंग. अंगाशी आले की

हेच ते ढोंग. अंगाशी आले की सोयीस्करपणे "खरे डावे" वगैरेचा मुद्दा काढायचा. तर्कसुसंगतीची चाड नसलेल्यांना काय त्याचे म्हणा. असो. खालची लिंक बघा जमले तर.

https://en.wikipedia.org/wiki/No_true_Scotsman

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

झोपेचे सोंग घेतलेल्याला उठविताही येत नाही

हे तत्वज्ञान ग्रामचीने मांडून सुमारे शंभर वर्षे झाली . स्टालिनला विरोध करून मेलेल्यात प्रचंड प्रमाणात कम्युनिस्ट पार्टीचे मेम्बर होते. पण इतिहासाचे प्रगाढ अज्ञान असणाऱ्यांना हे समजणारही नाही , आणि झोपेचे सोंग घेतलेल्याला उठविताही येत नाही . असो!

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

स्टालिनला विरोध करून

स्टालिनला विरोध करून मेलेल्यात प्रचंड प्रमाणात कम्युनिस्ट पार्टीचे मेम्बर होते.

हे शेंबडपोरीय ज्ञान आहे हो.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

यातूनही हेच दिसते आहे. ज्या

यातूनही हेच दिसते आहे. ज्या कम्युनिस्ट सत्तांनी जगभर जो गोंधळ घातला ते खरे डावे नाहीतच, असे एकदा झटकून टाकले की मिरवायला मोकळे. झोपेचे सोंग, प्रगाढ अज्ञान आणि त्या अज्ञानाचा अभिमान असलेल्या सेल्फ-रायचस लोकांना दुसरे काय कळणार म्हणा. शिवाय आचार-विचारातली सुसंगती तर कितीच्या भावात विकली हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण अडचणीत आणणारे प्रश्न विचारायचे नाहीत हे माहिती आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

हे आमच्याबरोबर नाहीत.

झोपेचे सोंग, प्रगाढ अज्ञान आणि त्या अज्ञानाचा अभिमान असलेल्या सेल्फ-रायचस लोकांना दुसरे काय कळणार म्हणा.

कॉलेजात असताना माझा एक अत्रंग मित्र होता. रस्त्यातून चालताना मी काही किडा केला की तो जोरात ओरडायचा, "ओ, ही आमच्याबरोबर नाही." ज्यांचं आमच्याकडे लक्ष नसेल त्यांचंही लक्ष जायचं. पण मुद्दा असा की आम्ही एकत्रच चालत असायचो. रस्त्यातल्या अनोळखी माणसाकडे बघून अत्रंग मित्र कधीही "ओ, हे आमच्याबरोबर नाहीत", असं ओरडला नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"राज्यकर्ते" किंवा "सत्ताधिश"

"राज्यकर्ते" किंवा "सत्ताधिश" (मग ते डावे असोत वा उजवे वा कोणीही) या कल्पनेनी आत्तापर्यंत इतिहासात एव्हढा घोळ घातला आहे, एव्हढी दडपशाही, युद्धखोरी केली आहे, की आजमितीला कोणी कोणत्याही राज्यकर्त्यांचे किंवा विचारसरणीचे ठाम समर्थक असू शकते याचेच मला फार आश्चर्य वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+ १

राज्यकर्त्यांचे किंवा विचारसरणीचे ठाम समर्थक असू शकते याचेच मला फार आश्चर्य वाटते: + १
पण राज्यावर आल्यावर, व्यामिश्रतेची कल्पना आल्यावर हा माज उतरतो. मोदींचे तिसरे बजेट बरेच "डावे" होते असे तुम्हाला दिसेल .

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

पण राज्यावर आल्यावर,

पण राज्यावर आल्यावर, व्यामिश्रतेची कल्पना आल्यावर हा माज उतरतो.

जनतेला आयडिऑलॉजिकल प्युरीटी हवीच असते असे नाही. सोव्हिएत युनियन मधे सुद्धा मशीनरी ला विरोध नव्हता. ना क्युबा मधे आहे. ना व्हेनेझुएला मधे आहे ना नॉर्थ कोरिया मधे आहे. मी असं ऐकलंय की सोव्हिएत युनियन मधे लिमोसीन गाड्या होत्या पण फक्त पॉलिटब्युरो च्या मेंबरांसाठी.

मिनार्कीझम बद्दल वाचा असे सुचवतो.

आत्मपरीक्षणाची प्रामाणिक भावना

आत्मपरीक्षणाची व त्याहुन अधिक विचारसरणी परीक्षणाची जर प्रामाणिक भावना स्वतःहुन निर्माण झाली.
म्हणजे बघुया तरी हे विरोधी लोक काय म्हणता एकदा तपासुन असा विचार मनात आला
व आपण मराठी असलो तर पटकन
मानव आणि मार्क्स प्रभाकर पाध्ये वाचुन घ्यावा
नसता इंटरनेटवरही उपलब्ध असलेला हा व्हॅक्लॉव्ह हॅवेल यांचा महान निबंध पॉवर ऑफ पॉवरलेस
आयुष्यात एकदा तरी वाचावाच. फार मोठा ही नाही.
http://vaclavhavel.cz/showtrans.php?cat=clanky&val=72_aj_clanky.html&typ...

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

अगदी. गणिती इगोर शाफरेविच पण

अगदी. गणिती इगोर शाफरेविच पण लक्षणीय होते.

हे बरोबर आहे

<मी असं ऐकलंय की सोव्हिएत युनियन मधे लिमोसीन गाड्या होत्या पण फक्त पॉलिटब्युरो च्या मेंबरांसाठी.>

सोवियत युनियनमधील सोशलिजम हा सर्वसामान्यांसाठी होता. Ча́йка चायका - seagull - नावाची लक्झरी गाडी - रशियातच बनलेली - पॉलिटब्युरो सदस्यांना मिळे. सर्वसामान्यांना गाडी परवडलीच तरी तिच्यासाठी नंबर लावून १० वर्षे तरी वाट पाहावी लागे.

भाजप हा सोशालिस्ट पक्ष आहे -

भाजप हा सोशालिस्ट पक्ष आहे - इति गब्बर सिंग

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

भाजप हा सोशालिस्ट पक्ष आहे -

भाजप हा सोशालिस्ट पक्ष आहे - इति गब्बर सिंग

भारतात कोणता पक्ष सोशॅलिस्ट नाही ?

खरंतर भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक राजकीय पक्षाला सोशॅलिस्ट असणे गरजेचे आहे. कोणताही पक्ष अधिकृत पणे - आम्हास सोशॅलिझम अमान्य आहे - असं म्हणणारा असेल तर त्याला निर्वाचन आयोगाची मान्यताच मिळणार नाही. कै शरद जोशींनी त्याविरुद्ध प्रायव्हेट मेंबर बिल आणले होते पण ते पारित झाले नाही. व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आम्ही यावर निर्णय देऊ शकत नाही व ज्या दिवशी "सोशॅलिझम आम्हाला अमान्य आहे" असा दावा करणारा एखादा राजकीय पक्ष उपस्थित होईल तेव्हा आम्ही मुद्दा विचारासाठी घेऊ - असा निर्वाळा दिला होता. (आणखी इथे वाचायला मिळेल. अतिशय सविस्तर लिहिलेले आहे.)

पुढे - भाजपाचे अध्वर्यू दीनदयाळ उपाध्याय हे सोशॅलिस्टच होते. फक्त त्यांच्या त्या "तत्वज्ञानास" त्यांनी "एकात्मिक मानवतावाद" असं नाव दिलं.

आणखी - The greatest product of socialism is socialists - असं मी म्हणतो. व स्वातंत्र्योत्तर कालात जी काही आदर्शवादी मंडळी निर्माण झाली (उदा. विनोबा भावे, ग प्र प्रधान) त्यांनी सोशॅलिझम ला प्रेरक वातावरण प्रोत्साहित केले. पण बीजं रोवली ती नेहरूंनी, भगतसिंगांनी (उदा. Hindustan Socialist Republican Association च्या स्थापनेची वैचारिक पार्श्वभूमी). इंदिराबाईंनी त्या वातावरणास खतपाणी घातले. ४२ वी घटनादुरुस्ती केली व तो शब्द घटनेत घातला. ब्यांकांचे राष्ट्रीयीकरण केले. भाजपातली आजची पिढी ही त्याच वातावरणाची प्रॉडक्ट & पाईक आहे. नितिन गडकरी एकदा "आदर्श समाजरचने साठी झटावं" वगैरे बोलले होते ते सुद्धा याचेच उदाहरण. मुमजोंनी, सुषमाबाईंनी रिटेल मधे FDI ला विरोध केला होता तो त्यातूनच. मोदींचे डिमॉनेटायझेशन हे त्याचेच उदाहरण (उदा.)

डावे लोक जागतिकीकरणाच्या

डावे लोक जागतिकीकरणाच्या समर्थनात असतात की विरोधात?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

भारतीय कामगारांचे हितसंबंध आंतर-राष्ट्रीय भांडवलाशी जुळणारे!

प्रत्यक्षात पहिले तर भारतीय (आणि तिसऱ्या जगातील ) कामगारांचे हितसंबंध हे बरेच आंतर-राष्ट्रीय भांडवलाशी जुळणारे आहेत . उत्तम, वातानुकूलित कारखान्यात , सर्व बेनेफिट्स घेऊन नोकरी करणे कुणाला नको आहे ? डाव्यांनी संघर्ष करायचा तो प्लांट पातळीवर: अधिकाधिक पगार, बेनेफिट्स मिळविण्यासाठी . राष्ट्रीय पातळीवर बाहेरचे भांडवल आत येऊ देणे फायद्याचेच आहे . (डेंग शाओ पिंग यांनी चाळीस कोटी चिनी लोक गरिबीतून वर काढले!). आंतर-राष्ट्रीय भांडवलाशी खरी लढाई असेल तर ती अडानी -अंबानींची असेल : स्पर्धा कमी करण्यासाठी, राखीव कुरणे वाचविण्यासाठी . त्यात संस्कृती रक्षणाचे ढोंग करून संघ "स्वदेशी" इत्यादी भोंदू नावाखाली त्यांची मदत करेल .

(Member of the vast left-wing conspiracy!)
"A serious and good philosophical work could be written consisting entirely of jokes." -- Ludwig Wittgenstein

अदानी नि अंबानी? दोघेच्च?

अदानी नि अंबानी? दोघेच्च? जिंदाल, बिर्ला, वादिया, टाटा, गोदरेज, मित्तल, रुइया, महेंद्रा, सिंघानिया, अझिम, रेड्डी, हे काँग्रेसधर्जिणे म्हणून संघाचे नव्हे?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

जगातल्या कामगारांनो (की

जगातल्या कामगारांनो (की शोषितांनो) एक व्हा ही त्यांची हाक. म्हणजे ते वरिजनल जागतिकीकरणवाले....

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

सुप्रीम कोर्टाचा अंतरिम आदेश

http://www.firstpost.com/ च्या ह्या अंकामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश पाहण्यास मिळाला. तो आदेश अंतरिम स्वरूपाचा आहे कारण पुढची सुनावणी १४ फेब्रुअरी २०१७ ला ठेवण्यात आली आहे. आदेशाचा operative भाग असा आहे:

It has been averred in the petition that sometimes National Anthem is sung in various circumstances which are not permissible and can never be countenanced in law. The emphasis is on showing requisite and necessary respect when the National Anthem is sung or played. The assertion is that it is the duty of every person to show respect when the National Anthem is played or recited or sung. Having heard the learned counsel for the parties and awaiting the reply from the Union of India, as an interim measure, it is directed that the following directions shall be scrupulously followed:-

(a) There shall be no commercial exploitation to give financial advantage or any kind of benefit. To elaborate, the National Anthem should not be utilized by which the person involved with it either directly or indirectly shall have any commercial benefit or any other benefit.
(b) There shall not be dramatization of the National Anthem and it should not be included as a part of any variety show. It is because when the National Anthem is sung or played it is imperative on the part of every one present to show due respect and honour. To think of a dramatized exhibition of the National Anthem is absolutely inconceivable.
(c) National Anthem or a part of it shall not be printed on any object and also never be displayed in such a manner at such places which may be disgraceful to its status and tantamount to disrespect. It is because when the National Anthem is sung, the concept of protocol associated with it has its inherent roots in National identity, National integrity and Constitutional Patriotism.
(d) All the cinema halls in India shall play the National Anthem before the feature film starts and all present in the hall are obliged to stand up to show respect to the National Anthem.
(e) Prior to the National Anthem is played or sung in the cinema hall on the screen, the entry and exit doors shall remain closed so that no one can create any kind of disturbance which will amount to disrespect to the National Anthem. After the National Anthem is played or sung, the doors can be opened.
(f) When the National Anthem shall be played in the Cinema Halls, it shall be with the National Flag on the screen.
(g) The abridge version of the National Anthem made by any one for whatever reason shall not be played or displayed.

ह्यामधील (d) ते (g) हे भाग अर्जदाराने मागितले म्हणून येथे आले का न्यायालयाने स्वयंप्रेरणेने त्यांना येथे अन्तर्भूत केले आहे ते स्पष्ट नाही. स्वयंप्रेरणा असेल तर सर्वोच्च न्यायालयाने वाघावर बसण्याचे साहस केले आहे असे म्हणता येईल. वाघावर बसणे तुलनेने सोपे असेल पण उतरणे फार अवघड.

डुकाटाआ

.

'नाऱ् या'बाजीबद्दल क्षमस्व, पण...

(e) Prior to the National Anthem is played or sung in the cinema hall on the screen, the entry and exit doors shall remain closed so that no one can create any kind of disturbance which will amount to disrespect to the National Anthem. After the National Anthem is played or sung, the doors can be opened.

राष्ट्रगीत वाजू लागल्यावर समजा जर थेट्रास आग लागली, तर:

१. राष्ट्रगीत चालू असताना लोकांना बाहेर पडू देण्याकरिता (अ) दरवाजा उघडणे, (आ) दरवाजा उघडण्याकरिता आपली 'अटेन्शन'(किंवा 'दक्ष', इफ यू प्लीज़!)वाली पोझ सोडून दरवाजाकडे वाटचाल करणे, (इ) दरवाजा उघडला असता स्वत:चा जीव वाचविण्यासाठी आपली 'अटेन्शन'वाली पोझ सोडून दरवाजामार्फत प्रयाण करणे, हे 'राष्ट्रगीताचा अपमान' या सदराखाली दखलपात्र तथा दंडनीय गुन्हे ठरावेत काय?

२. उलटपक्षी, वरील सर्व करण्यापूर्वी चालू असलेले राष्ट्रगीत मध्येच बंद केल्यास तो 'रा.गी.चा अ.' या स.खाली द. तथा दं. गु. ठरावा काय?

३. की काय वाट्टेल ते झाले तरी रा.गी. चालूच ठेवणे आणि 'अटेन्शन'मध्येच उभे राहणे अपेक्षित आहे? (काय थोडेफार इंडियन्स मरतील ते मरतील. इंडियात माणसाच्या जिवाची किंमत परंपरेने कमीच आहे; त्यात पुन्हा अब की बार... (बादवे ट्रम्पाने या खेपेस तो स्लोगन ढापला होता म्हणे; चालायचेच.) अनायासे लोकसंख्या कमी होईल तेवढीच.)

असो.

वा! शीर्षक तर खासच प्र

वा! शीर्षक तर खासच (स्माईल)
प्र नेहमीप्रमाअणे उ.
____
उ म्हणजे उत्तम की उत्तान की उच्च तुम्ही ठरवा (डोळा मारत)

__________
कबीर पुरुष थे इसलिए बहुत हद तक सामाजिक प्रताड़नाओं से बच गए। लेकिन मीरां स्त्री थीं अतः प्रताड़नाओं से बचने का उसके पास कोई विकल्प नहीं था। अपने जुझारू व्यक्तित्व के बल पर ही वे समस्त बाधाओं को पार करती स्वतंत्र मानवी बन सकीं।

ऑव्ह कॅबेजिस अँड किंग्ज़

शुद्ध स्वच्छ वातावरण आले आले म्हणताना आम्ही हुरळलो होतो.
"द टाइम हॅज़ कम, द वॉलरस सेड,
टु टॉक ऑव्ह मेनी थिंग्ज़,
ऑव्ह शिप्स अँड सेल्स अँड ओपन एअर,
अँड ऑव्ह कॅबेजिस अँड किंग्ज़"
पण छे. बिग ब्रदर इज़ वॉचिंग... एलस (?-मराठीत अ‍ॅलिस्)ची हर्षोत्फुल्लता (वास्तवात वॉल्रसची) लयाला गेलीयसं दिसतंय.

लॅटिन शब्दार्थ

माझे वरचे लेखन 'आगामी कार्यक्रम - राष्ट्रगीताचं सहस्रावर्तन' ह्या धाग्यामध्ये मी लिहिलेल्या एका उप-प्रतिसादामध्ये होते. ते येथे स्वतन्त्र धागा म्हणून आल्याने थोडेसे orphan झाल्यासारखे वाटते.

आता 'या दुर्बोध लॅटिन शब्दप्रयोगांचे अर्थही इथे लिहून ठेवता येतील का?' इकडे वळतो. हे अर्थ सर्वसामान्यपणे असे आहेत. 'सर्वसामान्यपणे' असे मी म्हणतो कारण मी लॅटिन भाषा आणि तिचे व्याकरण जाणत नाही. त्यामुळे त्यांचा नेहमीच्या वाचनात येतात तितकेच अर्थ मला माहीत आहेत. चूभूद्याघ्या. दाखविलेले अर्थ न्यायाधीशांच्या अन्य विवेचनाशी कसे सुसूत्र जुळवून घ्यायचे हे दाखविण्याची जबाबदारी माझी नाही.

magna cum laude आणि summa cum laude हे शब्दप्रयोग अमेरिकन आणि युरोपीय विद्यापीठांमध्ये पदवीदानाच्या वेळी वापरतात आणि त्यांचे अर्थ अनुक्रमे with high honor/praise आणि with highest honor/praise असे आहेत. (honours सारखे.) ह्याखाली cum laude (with honor/praise) अशीहि एक पातळी आहे.

पुढे in medias res म्हणजे into the middle things. एखाद्या वर्णनाच्या ओघामध्ये सुरू केले दुसरे वर्णन.

lapsus linguae म्हणजे slip of the tongue.

id est म्हणजे i.e. चा पूर्ण विस्तार - 'that is'.

Terra firma म्हणजे "solid earth", समुद्राच्या विरोधात.

vox populi, vox dei म्हणजे "the voice of the people is the voice of God. जुन्या ब्लिट्झ साप्ताहिकामध्ये vox populi नावाचा एक वाचकांचा कॉलम असे त्याची आठवण झाली.

alpha and omega हे ग्रीक वर्णमालेतील पहिला आणि अखेरचा वर्ण आहेत. सुरुवातीपासून अखेरपर्यंत.

magnum opus म्हणजे एखाद्या लेखकाचे वा कलाकाराचे सर्वात मोठे, 'defining' म्हटले जावे असे कार्य.

veni, vidi, vici ज्यूलिअस सीझरचे वर्णन - तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले.

ad libitum हा ad lib चा विस्तार - at one's pleasure

माझे ex cathedra मतप्रदर्शन

फाउलरला अनुसरून pedantry हा शब्द जर ‘so demonstratively accurate .. as to imply a slur upon the generality’ या अर्थाने घेतला तर मिश्रश्रेष्ठांची भाषा pedantic म्हणवत नाही. त्यातले अनेक लॅटिन शब्दप्रयोग काहीच्या काही अर्थाने वापरलेले आहेत. उदाहरणार्थ, ‘the scene depicted in the film is on an absolute terra firma’ म्हणजे काय ते बराच वेळ विचार करूनही समजलं नाही. याचप्रमाणे ‘medias res’ हा शब्दप्रयोगही बरोबर वापरलेला आहे असं म्हणवत नाही. असो. मोजायला कंटाळा यावा इतक्या चुका आहेत.

‘कभी खुशी कभी गम’ हा सिनेमा मला आधी ठाऊक नव्हता. यानिमित्ताने ठाऊक झाला आणि यूट्यूबवर ती वादग्रस्त क्लिपही बघून झाली. मला याबाबतीत एकच लीगल पॉइंट सुचतो तो असा की सिनेमातला तो सीन terra firma वर असो-नसो, पण इंग्लंडमधला म्हणजे terra aliena वरचा आहे. मिश्रासाहेब ज्या न्यायासनावर आहेत त्याचे हात तिथपर्यंत पोहोचत नाहीत. तेव्हा ही केस त्यांच्यासाठी ex juris आहे.

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

फाउलर

फाउलरच्या वर्णनातील as to imply a slur upon the generality, who are not capable or desirous of such displays हा भाग न्यायाधीशांच्या निर्णयाला लागतो. म्हणूनच मी म्हटले आहे की सर्वसामान्य शिक्षित लोक ज्या शब्दात लिहितील ते टाळून तेथे मुद्दाम अधिक अवघड आणि अनवट शब्द धुंडाळून वापरायचे आणि आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करायचे ही
न्यायमूर्तींची pedantic भाषा.

मान्य

> तेथे मुद्दाम अधिक अवघड आणि अनवट शब्द धुंडाळून वापरायचे…

मान्यच, पण अवघड आणि अनवट शब्द निदान अचूक वापरले असते तरीही मी त्यांना क्षमा केली असती. ह्यांचं तेही नाही.

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

>>न्यायमूर्ति मिश्रा हे

>>न्यायमूर्ति मिश्रा हे ज्येष्ठताक्रमानुसार ह्यापुढील सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील असे दिसते..<<

हे वाक्य सद्य निर्णयामागील कार्यकारणभाव स्पष्ट करायला पुरेसे आहे असा दावा कुणी केला तर तो कितपत खरा असेल?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

महोदय

महोदय कॉलेजियम कडे व मोदी सरकारच्या कॉलेजियम संदर्भातील धोरणा कडे आपले लक्ष वेधु इच्छितो
आता न्यायाधीश आमचा असेल आता निर्णय आमचा असेल ( मनुस्मृती तर आमची होतीच )
आता पोथ्या उघडुन शास्त्रार्थ होणार पंडित शब्दच्छल करणार !
मजा आहे. एन्जॉय मॅन एन्जॉय !
लॅटीन संस्कृत इंग्लीश ची बहार उडवुन देउ.
निर्णय आमच्या बाजुने लाऊ.
भारतमाता की..........................

गुल से लिपटी हुइ तितली को उडाकर देखों
आँधियो तुमने दरख्तो को गिराया होगा.
दिल-ए-नादाँ ना धड़क, ए दिल-ए-नादाँ ना धड़क,
कोई ख़त ले के पडौसी के घर आया होगा.
https://www.youtube.com/watch?v=cz0_AaixcRg

तुर्तास एक मार्मिक देऊन गप्प

तुर्तास एक मार्मिक देऊन गप्प बसतो (जीभ दाखवत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहितीपूर्ण

या दुर्बोध लॅटिन शब्दप्रयोगांचे अर्थही इथे लिहून ठेवता येतील का?

(एखादा शब्दप्रयोग असेल तर सहज गुगलला जातो; अनेक लोक तेवढेही कष्ट घेत नसतील. पण दुर्बोध शब्द वापरले म्हणजे काही तरी थोरच म्हटलेलं असतं, असा समज पसरण्याची भीती वाटते. म्हणून विनंती. मुळात मी केलेल्या उद्वेगजन्य टवाळीत ही माहिती विरून जाऊ नये म्हणून याचा स्वतंत्र धागा बनवत आहे. त्यामुळे धागालेखक कोल्हटकरांना धाग्याचं शीर्षक आणि वाढीव माहिती तिथेच वाढवता येईल.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे पहा...

काहीसे असेच सांगणारा हा ब्लॉग पहा.