Skip to main content

वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणणारे "एपीटॅलोन" हे पेप्टाइड

वार्धक्याबाबतचा अलीकडचा एक अत्यंत महत्वाचा शोध: "एपीटॅलोन" हे पेप्टाइड
व्लादीमीर अनिसिमोव्ह या रशियन शास्त्रज्ञाने जन्मभराच्या प्रचंड संशोधनानंतर "एपीटॅलोन" नावाचे चार अमिनो-अम्लांचे संयुग ('पेप्टाइड ') शोधून काढले आहे, ज्याचे स्ट्रक्चर आहे Alanine-Glutamate-Asparagine-Glycine
हे संयुग आपल्या पेशींची विभाजनाची क्षमता (तारुण्याचा महत्वाचा गुणधर्म) बरीच वाढविते .
रशियात माणसांवर प्रयोग करण्याबाबतचे नियम बरेच शिथिल असल्यामुळे त्यांनी ते करून पाहिले आहेत. (अमेरिकेत नको तितके कडक नियम व खर्च असल्यामुळे ते सहजपणे शक्य झाले नसते!). त्यातील निरीक्षणे :
६० ते ७४ वयाच्या माणसांना याच्या इंजेक्शनचा कोर्स दिल्यावर १२ वर्षात त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण ४४ टक्क्यावरून २२ टक्क्यावर आले.
७५ ते ८९ वयाच्या माणसांना याच्या इंजेक्शनचा कोर्स दिल्यावर ६ वर्षात त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण ८२ टक्क्यावरून ४६ टक्क्यावर आले.
इंजेक्शनचा कोर्स १ ते ३ मिलिग्रॅम / १० ते २० दिवसाचा असून चार ते सहा महिन्याच्या अंतराने तो कायम चालू ठेवता येतो.
दुवा:
http://joshmitteldorf.scienceblog.com/2014/06/26/v-n-anisimov-russian-o…
हे संयुग ('पेप्टाइड ') बनविणे भारतीयांना सहज शक्य आहे (भारतीय लोक सेंद्रिय रसायनशास्त्रात अत्यंत कुशल असतात!) .
चिन्यांनी अर्थातच ते बनवून प्रचंड किंमतीला विकायलाही काढले आहे: .
(https://5kits.bz/login).

मिलिन्द Thu, 22/12/2016 - 22:52

मोठ्या ग्रुपच्या स्टॅटिस्टिक्स वरून.(हा "सरासरी" अंदाज आहे, कोण्या एका व्यक्तीला लागू पडत नाही !) आणि त्यांनी ट्रीटमेंट न दिलेले (कंट्रोल्स ) म्हणून तितकेच लोकही ठेवले होते.

मराठी कथालेखक Fri, 23/12/2016 - 13:46

आयुष्य वाढत राहिले तर निवृत्तीचे वयही वाढवावे लागेल. बेकारी वाढेल. बेकार लोक आत्महत्या करतील, खून करतील...

नितिन थत्ते Fri, 23/12/2016 - 15:33

In reply to by मराठी कथालेखक

>> बेकार लोक आत्महत्या करतील, खून करतील...

म्हातारे जगणं परवडत नाही म्हणून आत्महत्या करतील; बेकार तरूण म्हातार्‍यांचे खून पाडतील आणि म्हातार्‍यांच्या मृत्यूचे प्रमाण पुन्हा पूर्वीसारखेच होईल !!!

मिलिन्द Fri, 23/12/2016 - 23:02

In reply to by नितिन थत्ते

सध्या भारतीय तरुणात निदान २५-३० टक्के बेकारी आहे. वृद्धांचे खून पडताना अजून तरी दिसले नाहीत.(हे बदलू शकते!) .तसेच हे औषध घेणे नाकारणे हा वृद्धांना सोपा पर्याय उपलब्ध आहेच!
आत्महत्येचा महत्वाचा हक्क आपण सर्वांना का नाकारतो हेही गूढ आहेच.

तसेच हे औषध घेणे नाकारणे हा वृद्धांना सोपा पर्याय उपलब्ध आहेच!

काय गिन्यान, काय गिन्यान!!!!
:)

प्रकाश घाटपांडे Sun, 25/12/2016 - 12:34

In reply to by मिलिन्द

तसेच हे औषध घेणे नाकारणे हा वृद्धांना सोपा पर्याय उपलब्ध आहेच!

आपण बहुधा औषध या क्षेत्रात काम करता. पण खरच हा सोपा पर्याय आहे?