चार्वाक‌, च‌क्र‌ध‌र‌ आणि चांडाळ

दै. लोक‌स‌त्ता म‌धील ही बात‌मी वाचलीत का?

http://www.loksatta.com/anvyartha-news/kerala-congress-chief-mm-hassan-w...

या लेखात उधृत केलेला गणंग विशिष्ट धर्माचा असला तरी ही प्रवृत्ती दुर्दैवाने सार्वत्रिक आहे आणि हिंदू धर्मात प्रचंडच. लेखाच्या शेवटी मला यापूर्वी माहिती नसलेले चक्रधरस्वामींचे मासिक पाळीबद्दलचे आठशे वर्षांपूर्वीचे बोल:

‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’

वाचून हरखून गेलो (विशेषत: "प्रेतदेह होए" हा शाप! ). हा माणूस वाचायलाच हवा. त्याच्याही पूर्वी बरीच शतके चार्वाकाने (ही एकच व्यक्ती नव्हती) तत्सम सांगीतलेले आहे म्हणे - संदर्भ आठवत नाही.

(अर्थात व्यक्तिश: मला वाटते की पाळी सुरू असताना किंवा नसताना, कोणत्याही लिंगाच्या कोणत्याही व्यक्तीने देवळात जाऊच नये - असो)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोर आहे हे !!! कुठे शोधलंत ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय‌द‌वे म‌हानुभाव‌ स‌माजात‌ स‌ध्या लोकांचे याब‌द्द‌ल‌ म‌त‌ काय‌? पाळी आलेली अस‌ताना मठात‌ गेलेलं चाल‌तं काय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च‌क्र‌ध‌र‌स्वामींच्या अनुयायांना लिंगाय‌त‌ म्ह‌ण‌तात‌ ना? ऊप्स‌ ब‌हुधा ब‌स‌वेश्व‌रांच्या अनुयायांना म्ह‌ण‌तात‌.

[मी अज्ञानी आहे. म‌ध्य‌ंत‌री कुणीत‌री सीकेप्यांना ब्राह्म‌ण‌ म्ह‌णाले त‌सा घोर‌ अप‌राध‌ नाही ना घ‌ड‌ला माझ्याक‌डून‌?]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म‌ध्य‌ंत‌री कुणीत‌री सीकेप्यांना ब्राह्म‌ण‌ म्ह‌णाले त‌सा घोर‌ अप‌राध‌

ही काय भान‌ग‌ड आहे ब्वॉ?

(मागे एक‌दा चुकून क‌धीत‌री मंगेश‌क‌र हे सार‌स्व‌त‌ असावेत ही (चुकीची) स‌म‌जूत‌ व्य‌क्त‌ केली होती, त्याव‌र‌ झालेला सार‌स्व‌तांचा थ‌य‌थ‌याट हा केव‌ळ‌ 'काल‌चा गोंध‌ळ ब‌रा होता' टैपात‌ला होता. त‌सेच म‌ध्य‌ंत‌री कोठेत‌री कोणीत‌री कोण्या 'साम‌ंतां'चा उल्लेख‌ चुकून 'साव‌ंत‌' म्ह‌णून केला, त्याव‌र निरीक्षिलेली प्र‌तिक्षिप्त‌ प्र‌तिक्रिया निव्व‌ळ रोच‌क होती. असो. होते असे क‌धीक‌धी. चालाय‌चेच‌.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फाटा फुटे कुणाला? मज मूळही रुतावे, हा दैवयोग आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>बाय‌द‌वे म‌हानुभाव‌ स‌माजात‌ स‌ध्या लोकांचे याब‌द्द‌ल‌ म‌त‌ काय‌? पाळी आलेली अस‌ताना मठात‌ गेलेलं चाल‌तं काय‌? आमच्या स्टाफ पैकी दोघे महानुभाव आहेत . ( त्यांच्या शब्दात म्हानुभाव !!!) पण हा प्रश्न विचारण्याएवढी सलगी नाहीये त्यांच्याशी .
( त्या दोघांच्या घरी फक्त आज्जी आणि हे दोन नातू एवढेच म्हानुभाव आहेत . बाकी त्यांच्याच शब्दात "नार्मल "आहेत . हे असं पण असतंय हे नवीन माहिती या सदरात ....)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय‌द‌वे म‌हानुभाव‌ स‌माजात‌ स‌ध्या लोकांचे याब‌द्द‌ल‌ म‌त‌ काय‌? पाळी आलेली अस‌ताना मठात‌ गेलेलं चाल‌तं काय‌?

चाल‌तं. देव‌पूजा केलेली चाल‌ते. (काही ज‌व‌ळ‌चे नातेवाईक‌ म‌हानुभाव‌ आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महाराष्ट्रातील महानुभाव पंथाविषयी फार कमी लिहिलं गेलंय . ( त्यामानाने वारकरी संप्रदायाबद्दल खूप माहिती उपलब्ध आहे ) . मलातर अजिबातच काही माहित नाही . विशेषतः घरातील काहीच लोकं अनुयायी आणि काही नाहीत वगैरे हे कसाकाय असतं . ( आमच्या स्टाफ मधील वर उल्लेखिलेले दोघेजण धनगर समाजाचे आहेत . त्यांच्या घरी मुख्य सणांना तसेच वार्षिक उरुसाच्या वेळी बोकड कापणे `हे रुटीन असते . पण हि मंडळी ते खात नाहीत त्याच घरात /उत्सवात भाग घेऊनही ... वगैरे )
या पंथाविषयीची सद्यस्थितीतील माहिती कुठे मिळू शकेल ?
@ बोका : तुम्ही काही लिहू शकाल का ? किंवा अजून कोणी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॅा. वि. भि.कोलते हे महानुभाव पंथावरील अल्टिमेट ॲथॅारीटी आहेत.
त्यांनी महानुभाव या विषयावर आयुष्य देउन सखोल संशोधन केलेले आहे.
बुकगंगावर त्यांचे पुस्तक मिळेल.
महानुभावांचे ग्रंथ ज्ञानेश्वरीच्याही अगोदरचे आद्य मराठी ग्रंथ
हा रॅडीकल अँटी वैदीक संप्रदाय होता.
भयावह विरोधामुळे त्यांनी मग पोथ्यांचे साठी सांकेतिक कठीण अशी कोड लिपी तयार केली त्यात ग्रंथ लिहून वाचवले.
ती लिपी शिकून कोलतेंनी मुळ ग्ंथ डीकोड केले.
यांतील एकांना खड्डा खणून त्यात पाणी चुना कालवुन पुरले.
ज्ञानेश्वरपुरव आद्य मराठी महाकाव्य महानुभावाचे पहिले मराठी लव्ह लेटर त्यातीलच रुकमीणीचे
पतीच्या मता ला अनुसरणारी विनासायास स्वर्गात जाते म्हणणारे ज्ञानेश्वर एकीकडे
आणी वरील मासिक पाळी चे विधान
सर्व आमनेसामने तूलनेसाठी उपलब्ध आहे
हाच वर्तमानाचा ग्रेटनेस आहे
असो
डॅा. सुहासीनी इरलेकरांची दोन संबंधित पुस्तक
महदंबेचे धवळे नरेंद्र चे रुकमीणी स्वयंवर यांत सखोल माहिती व उगमावरील मराठी चे नमुनेदार दर्शन घेतां येते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version

च्यामारी कितीवेळा लिपी डिकोड‌ क‌र‌णार‌? इतिहासाचार्य‌ राज‌वाडे अन वि ल भावे या दोघांनी त्या लिप्या अगोद‌र‌च डिकोड‌ केलेल्या की, ते म‌हंत‌ द‌त्त की ल‌क्ष‌राज‌ यांच्या म‌द‌तीने. पुन्हा रीइन्व्हेण्ट‌ द व्हील‌ का क‌रावे ते क‌ळ‌ले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जाणकारांनी त्यांवर असे सांगितले की
कोड लिपी एकच एक वापरली गेली की अर्जुन होत्या इथपासून मारामारीत होते.
दुसरे एक जरी मान्य केली तरी काळ प्रांत शैली संकेत अर्थनिर्णय मध्ये पुन्हा विद्वान भिडतात
तिसरे म्हणजे त्यातली सीक्रसीची भानगड. काही सनातन महानुभाव महंत शेअरींग के सख्य खिलाफ आहेत.
सर्वात भारी म्हणजे काही गर्ंथ पोथ्या सनातनी महंतांनी आजही लपवलेल्या आहेत. ज्या संशोधकांच्या रेंज मध्येच अजून नाहीत.
कोलतेना एका महंताने

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version

धन्यवाद मारवा जी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा, म‌ग स‌हीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मात्र त्याविषयी काहीच लिहीलेले नाही
चांडाळ म्हणजे ब्राह्मण स्त्री ला शूद्र पुरुषा पासुन झालेला पुत्र
अर्थात हे मोठे पाप च त्यामुळे हा सर्वाधिक घ्रुणीत शब्द शिवीसारखा प्रचलित
पण तुम्हाला काय म्हणायच होते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version

असा अर्थ‌ आहे काय्? म‌ला वाटाय‌चे की जो व‌ध क‌र‌तो म्ह‌ण‌जे ते काम क‌र‌तो तो चांडाळ्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी |
तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधू, षड्रिपुकुळ माझे तोडि याचा समंधू ||

सॉरी : मला मासिक पाळीमध्ये स्त्रीला अपवित्र मानणाऱ्या लोकांबद्दल टीकापर शब्द वापरायचा होता. शीर्षक लिहिताना 'चांडाळ' म्हणणार होतो, पोस्त लिहिताना 'गणंग' शब्द ज्यास्त योग्य वाटला, म्हणून तो वापरला. मात्र त्यानुसार शीर्षक बदलायचे राहून गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संतसूर्य तुकारामांचा कळस चक्रधरांच्या शेजारी ठेवुन तुलना करता येईल कारण बाई म्हणजे ॲसीड टेस्ट
http://vinodhavanke.blogspot.in/2015/08/blog-post_31.html
हा अभंग पहा
दुर्जनांच अंगी अखंड विटाळ वाणी रजस्वला स्रवे जैशी
अजुन एक अभंग असा
तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Do not judge, or you too will be judged" Bible
Matthew 7:1-6 New International Version

पुर्ण अभ‌ंग

माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥१॥
आपआपणामध्यें मिळो । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥
घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥२॥
तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥३॥

वरचा अभंग वाचता इथे विटाळशी शब्दाचा अर्थ दुसरा असेल असं वाटतंय....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुकारामाची थोरवी निर्विवाद आहे, पण या अभंगांतील या ओळींच्या बाबतीतली त्याची भूमिका साफ चुकीची आहे, हे मान्यच करावयास हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0