मराठीतील पहिल्या वेब कंटेट चॅनेलची वर्षपूर्ती

भाडिपा : भारतीय डिजिटल पार्टी
उदाहरणार्थ मराठीतील पहिला वेब कंटेट चॅनेल वगैरे वगैरे

तर 'ऐसी अक्षरे'वरील माझ्या पहिल्या लेखास बऱ्यापैकी प्रतिसाद (चक्क तीनशे एकोणपन्नास रीडस् आणि सत्तावीस प्रतिसाद - त्यातील अकरा चुकून माझेच आहेत, हा भाग वेगळा)मिळाल्याने, हा पुढील लेखाचा (!) खटाटोप...
----------
जवळपास वर्षभरापूर्वी सुरू झालेला हा युट्यूबवरील चॅनेल. 'कास्टिंग काऊच' ही त्यांची पहिली वेब सिरीज. राधिका आपटे ते अगदी अलीकडच्या, आठव्या एपिसोडमधील महेश मांजरेकर यांच्यासोबत मिळून अमेय वाघ व निपुण धर्माधिकारी यांनी धमाल आणली. याचे संवादलेखन, पटकथा, इत्यादी गोष्टी मला बऱ्यापैकी आवडतात.
यानंतर आता 'आपल्या बापाचा/ची...' ही सिरीज सुरू आहे. उपरोध, विडंबन, इत्यादींचा अप्रतिम नमुना म्हणजे ही सिरीज.
मात्र, तिसरी, 'कँडिड गप्पा' या सिरीजमधील पहिल्याच भागाने थोडीशी निराशा केली. या एपिसोडखालील कमेंट्समधून तरी तसं दिसतं. पण, यानंतर आला तो एपिसोड. 'आपल्या बापाची सोसायटी' या एपिसोडने पुन्हा एकदा धमाल आणली.

हे झालं वरवरचं निरीक्षण (पक्षी : कमेंट्स). मात्र, 'भाडिपा'ने सुरूवात केल्यामुळे युट्यूबवर जास्तीत जास्त मराठी वेब कंटेंट आणि वेब सिरीज दिसण्यास सुरूवात झाली आहे. 'भाडिपा'ने सांगितल्यानुसार आणखी परिपूर्ण विनोद आणि कंटेंट ते आणत राहतीलच. तशी अपेक्षाही आहेच. पण, या अपेक्षा पूर्ण करता यायला हव्यात. नाहीतर फार अपेक्षा निर्माण करून त्या पूर्ण करता न आल्याने काय होते त्याची अनेक उदाहरणे आहेतच. असो.

'भाडिपा'ची स्ट्रॅटेजी तशी उत्तमच. कारण, 'कास्टिंग काऊच'मध्ये राधिका आपटे, सई ताम्हणकर, यांच्याशिवाय टीम 'दिल दोस्ती दुनियादारी' व टीम 'सैराट' यांच्यासोबत त्यांनी तयार केलेल्या कंटेंटने 'भाडिपा'ची प्रसिद्धी, वातावरण व कंटेंट सगळे काही तयार झाले.
यानंतरच्या 'आपल्या बापाचा रस्ता'मध्ये पुष्कराज चिरपुटकर व नचिकेत पूर्णपात्रे यांना आणून आणि तितकाच उत्तम म्हणता येईल असा कंटेंट देऊन त्यांनी ही सिरीजही जवळपास यशस्वी केलीच आहे. 'आपल्या बापाची सोसायटी' या एपिसोडने यावर शिक्कामोर्तबच केले.

काही आठवड्यांपूर्वी या 'कास्टिंग काऊच'चा दुसरा सीझनही आलाय. त्याचे भागही मी पाहिले. हेही चांगलेच आहेत. मुळात संवाद लेखकाला विनोदाची चांगली जाण आहे, असे दिसते. कोटीयुक्त संवाद, वगैरेंवर भर आहे. त्याहीपेक्षा त्याचे सादरीकरण भारी ठरते. सारंग साठ्येचं दिग्दर्शन आणि गंधारचं संगीत उत्तमच.

कँडिड गप्पा आणि शष्प टीव्ही ह्या दोन सिरीज वगळता, इतर कंटेंट उत्तम आहे. शिवाय, 'चावट' या मराठीतील दुसऱ्या युट्यूब चॅनेलने चांगलं चांगलं म्हणता म्हणता उथळपणा सुरू केला आहे. त्यामुळे आता भाडिपा कडूनच अपेक्षा आहेत.

हा चॅनेल सुरू होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे 'थोबाडपुस्तकावर' प्रसिद्ध केलेला ह्या लहानशा लेखात काही बदल करून आणि थोडासा वाढवून तो प्रकाशित केला आहे. त्यामुळे आधी कुठेतरी वाचलंय, असे वाटत असले तरीही हे मीच लिहिलंय बरं का...
------------
कास्टिंग काऊच विथ अमेय अॅण्ड निपुणचा अलीकडील भाग इथे पहा.
आपल्या बापाचा रस्ताचा भाग इथे पहा.
आपल्या बापाची सोसायटीचा भाग इथे पहा.
यातील आपल्या बापाचा/ची चेहरे दोन्ही भाग मी सुचवतोय म्हणून तरी पहाच.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कास्टिंग‌ काऊच‌ फार‌स‌ं आव‌ड‌लं न‌व्ह‌त‌ं. प‌ण 'आप‌ल्या बापाची सोसाय‌टी' छान‌ आहे. म‌ध्य‌ंत‌री "अरे स‌ंतोष" नावाचा काहीत‌री म‌हाभिकार‌ प्र‌कार‌ आण‌ला होता.

प‌ण अनेकांना आव‌ड‌लेला आहे भाडिपा हा प्र‌कार‌. क‌दाचित‌ या प्र‌कार‌च्या ढोब‌ळ विनोदाशी माझं ज‌म‌त‌ न‌साव‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

हेच बहुतेक शष्प टीव्ही म्हणून ओळखलं जात होतं. ते भिकारच होतं. पण कास्टिंग काऊच चांगलं आहे. शेवटी ज्याची त्याची आवड. कमीत कमी हे मराठीत वेगळा प्रयोग तर करीत आहेत. आणि चला हवा येऊ द्यासारखे मूर्ख प्रकार टीव्हीवर पाहण्यापेक्षा हे कधीही चांगले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला हवा येऊ द्यासारखे मूर्ख प्रकार टीव्हीवर पाहण्यापेक्षा

दोन्हींची तुलना करणं मला तितकंसं योग्य वाटत नाही. 'हवा येऊ द्या'चा प्रेक्षकवर्ग महाराष्ट्राच्या खेडोपाडी पसरलेला आहे आणि भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम वगैरे आजच्या महाराष्ट्राचे सुपरस्टार आहेत. त्या तुलनेत तुम्ही म्हणता त्या वेब सीरीज प्रामुख्यानं 'फ्रेंड्स' वगैरेंवर पोसलेल्या शहरी उच्चवर्गीय तरुण मराठी वर्गासाठी आहेत. हा डेमोग्राफिक गटच इतका अल्पसंख्य आहे आणि त्यांच्या आस्थाविषयांमध्ये इतका फरक आहे, की त्या दोन्हींची तुलना वाजवी होत नाही. म्हणजे एक प्रकारे पूर्वीचे दादा कोंडकेंचे चित्रपट वाईट होते आणि त्याच काळात अमोल पालेकर ज्यांचा नायक असे ते मध्यमवर्गीय तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले हिंदी सिनेमेच चांगले असं काहीसं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हेही बरोबरच आहे , पण तुलना करायचा हेतू नाहीच मुळी. शेवटी दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहेच. दोघांच्या प्रेक्षकांना एकमेकांचा कंटेंट आवडणं दरवेळी शक्य नाहीच. तुम्ही म्हणता तसा प्रत्येकाचा चाहतावर्ग वेगळा आहे. पण त्यामुळे तर आता तोचतोचपणा वाढत आहे. आणि याला जवळजवळ सर्व लोक कंटाळले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मीही कार्यक्रम पाहत नाही. पाहिला तरी तेचतेच पंच ऐकून व तोचतोच प्रकार पाहून बदलतो. पॅरडी अथवा विडंबन करावं. पण ते एकदा हिट झालं म्हणून त्याचा अतिरेक होऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.
शिवाय फू बाई फू'मध्ये किमान लेखक वेगवेगळे होते. इथे विषय सुचवणारे अनेक असले तरी लिहिता हात एकच आहे, हे सतत जाणवते. त्यामुळेही असेल कदाचित. आणि चला... मधील सगळंच वाईट आहे, असंही नाही. पण सगळं चांगलं आहे, असाही त्याचा अर्थ नाही. कंटेंटवर आणखी काम व्हायला हवं, असं माझं तरी मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१०

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

कमीत कमी हे मराठीत वेगळा प्रयोग तर करीत आहेत.
.......या मालिकेद्वारे ते न‌क्की काय‌ प्र‌योग क‌र‌त आहेत, त्याचे काय‌ उद्देश‌ आहेत‌ अस‌ं वाट‌त‌ं तुम्हांला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, 'माझ्या बापाचा र‌स्ता' ब‌घित‌लाय‌त का? 'सोसाय‌टी' पेक्षा भारी आहे. बाकी म‌राठी वेब सिरीज 'वास‌रात लंग‌डी गाय' या न्यायानेच ब‌ऱ्या आहेत म्ह‌ण‌ता येईल‌. त्यात‌ल्या त्यात आप‌ल्या संतोष‌- कुश‌ल‌ची 'स्ट्र‌ग‌ल‌र साला' ध‌माल आण‌ते काही एपिसोड‌स‌म‌ध्ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

नाही. पाह‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

हे(धर्माधिकारी गॅंग) लोक आपला कंम्फर्ट झोन सोडायला अजिबात तयार होत नाहीत.
स्वत:च्याच ग्रुप मध्ये शेंबडात-माशी-छाप घोळण्याच्या शापातून ते मुक्त होणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोलवा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला हवा येऊ द्या मध्ये विडंबन असते. ते चांगले आहे.काही एपिसोड कंटाळवाणे होतात हे मान्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विडंबन आहे हे मान्य, पण त्यातही फालतूपणा वाढत जातोय दिवसेंदिवस!विडंबनाला विरोध नाही. ते तर टीव्हीएफ किंवा एआयबीवालेही करतात. कमीतकमी त्या विडंबनात तोचतोचपणा टाळायला हवा. शिवाय फालतूपणा करत राहिल्याने विडंबन बीभत्स बनत जातं. हो, आता ज्यांना ते आवडतं त्यांना ते आवडतंच. त्याला कोण काय करणार. कुणाला चला... आवडतं, तर कुणाला भाडिपा, एआयबी. शिवाय दोघांच्या चाहत्यांना एकमेकांचा कंटेंट आवडेलच हेही दरवेळी शक्य नाही. (चला... पूर्वी आवडायचं आता पाहतही नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला हवाईतील भाऊ कदम अनेकदा विनोदाची असामान्य उंची गाठतो.त्याचा मुसलमान गायक च पात्र जबरा धमाल होता. माहेरची साडी इ. अनेक विडंबने जिनीयस होती. ठिक आहे कधी तरी रीपीटेशन येणारच. तरी टीम फार फार क्रीएटीव्ह आहे यांत शंका नाही.
तुम्ही म्हणत असलेल्या टीमने हवा इतके एपिसोड दिल्यावर कीत्ती रीपीट मारेल ?
म्हणजे तोवर अॅान एयर तरी राहील का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

There's too much blood in my caffeine system.

वरचे प्रतिसादही वाचा. शिवाय भाऊ व इतरही अप्रतिम आहेतच.शिवाय बहुतुल्ला खान हे पात्र मुळात फू बाई फू मधील आहे. पण रिपीटेशनचं काय? आणि पुन्हा तुम्ही म्हणता की मी म्हणत असलेल्या टीमने अमुक एपिसोड केल्यावर, वगैरे. मुळात मी तुम्ही अमुक कार्यक्रम पहाच असं म्हटलेलं नाहीये किंवा तमुक पाहूच नका असे म्हटलेले नाहीये. आणि तुम्ही म्हणता तसं आपल्याकडे 'नंबर्स' मॅटर करतात. कुठलीही गोष्ट थोडक्यात संपवली नाही तर रिपीटेशन होणारच. याच चॅनेलवरील दिल दोस्ती दुनियादारी एका वर्षाआत संपवलीच ना. मग त्यामुळे का होईना ती मालिका ताणली गेली नाही. शेवटी रिपीटेशन हा ताणण्याचाच प्रकार नाही का?जर एखादी मालिका कंटेंटच्या अभावापायी लवकर संपवली तर कुठे बिघडतं?माझ्या मते तरी रिपीटेशन हे कथानक ताणल्यामुळे होतं. जर असे होत असेल तर एखादा ब्रेक घ्यावा ना. परदेशात प्रत्येक मालिका दरवर्षी ब्रेक घेते. ब्रेकनंतर पुन्हा ऑन एअर येते. आपल्याकडेही असे घडते पण रिअॅलिटी शोज पुरतेच. यामुळेच तर प्रेक्षकांना नावीण्यपूर्ण काही पहायला मिळत नाही. एखाद्यावेळी रिपीटेशन झालं तर ठीक. पण दरवेळी ते होऊ द्यावं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही जे म्हणताय ते ही बरोबरच आहे.
उत्क्रुष्ठ विनोद अभिनय , मात्र भयावह केविलवाण रीपीटेशन च एक उदाहरण म्हणजे
वराड निघाल लंडनला मी त्यांचा अगदी अखेरच्या काळातील प्रयोग जेव्हा बघत होतो
तेव्हा ते त्यांच्या वयं , हसविण्याचा केविलवाणा प्रयत्न मला एका रीअलीस्टीक पातळीवरून फारच ट्रॅजीक वाटलेला. म्हणजे एक पॅरलल चालणारी ट्रजेडी.
त्यांना प्रयोगानंतर भेटलो तेव्हा अंदाज खरा निघाल्याची जखम झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

There's too much blood in my caffeine system.

चिंजंची प्र‌तिक्रिया अग‌दी नेम‌की आहे. मुळात श्रोतृवृंदाच्या पार्श्व‌भूमीप्र‌माणे कुठ‌ल्याही क‌लाकृतीब‌द्द‌ल वेग‌वेग‌ळी म‌तं काय‌म नोंद‌व‌ली जातात.
इथे मुंब‌ईत, विनोदी क‌लांच्या म‌राठी श्रोतृवृंदाचे स‌र‌ळ तीन विभाग आहेत.
१. फू बाई फू, ह‌वा येउ द्या इ. मालिका व ग‌ल्लीत गोंध‌ळ..., जाऊ द्या ना बाळासाहेब आदी ग्रामीण चित्र‌प‌ट र‌सिक.
२. भाडिपा, दिल दोस्ती... इ. मालिका आव‌ड‌णारे
३. फ‌क्त केनी, बिस्व, र‌सेल पीट‌र्स, एआय‌बी, टिव्हीएफ इं.व‌र पोस‌लेले.
१ आणि २ म‌धील फ‌र‌क प‌ट‌क‌न दाख‌वाय‌चा असेल त‌र झी गौर‌व म‌ध‌लं क‌ट्यार...चं विडंब‌न प‌हा.
ह्या तिघांत फार तुल‌ना केली जाऊ श‌क‌त नाही. ह्यांचे इंटर‌सेक्श‌न्सही प‌र‌त वेग‌वेग‌ळे अस‌तात. त्यात‌ल्या ब‌ऱ्याच मोठ्या व‌र्गाला मुळात भाडिपा, कास्टिंग कोच (की काऊच्?) मुळात फार आव‌ड‌लेलं न‌व्ह‌तं. ह्या व‌र्गाला म‌राठीत‌ले भाषिक विनोद फार रुच‌त (क‌ळ‌त?) नाहीत. त्यांच्याक‌डून भाडिपाला फार‌सा पाठिंबा मिळ‌णं क‌ठीणे.

त‌र, मुळात म‌राठीत द‌र्जेदार कंटेंटची इत‌की वान‌वा आहे, की त्या पार्श्व‌भूमीव‌र न‌वीन अक्ष‌र‌श: काहीही केलेलं लंग‌डी गाय ठ‌रून जातं; आणि त‌रीही भाडिपा, दिदोदुसार‌खा कंटेंट 'पुणेरी' हे लेब‌ल लावून नाकार‌ला जातो. ख‌रोख‌र तिन्ही व‌र्गांना आव‌डेल असा एखादाच 'एक डाव धोबीप‌छाड' क‌धीत‌री निघ‌तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

तुम‌चे मुद्दे ब‌रोब‌र आहेत, मात्र, उदाह‌र‌णांत किंचित अस‌ह‌म‌ती नोंद‌व‌तो -

>>जाऊ द्या ना बाळासाहेब आदी ग्रामीण चित्र‌प‌ट र‌सिक<<

'जाऊ द्या...' ह्यात ब‌स‌त‌ नाही, कार‌ण तो एका श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गीय (स्प‌ष्ट सांगाय‌चं त‌र, ब्राह्म‌णी) विचार‌स‌र‌णीतून ग्रामीण विनोद क‌र‌ण्याचा प्र‌य‌त्न होता. गाणी आणि जाहिराती रोच‌क‌ होत्या प‌ण चित्र‌प‌ट भ‌यंक‌र‌ फ‌स‌ला होता. 'ह‌वा येऊ द्या...'च्या प्रेक्षकाला त्याचं काहीच आक‌र्षण वाट‌ल‌ं नाही.

>>भाडिपा, दिल दोस्ती... इ. मालिका आव‌ड‌णारे<<

क‌दाचित तुम्हाला आश्च‌र्य वाटेल, प‌ण एर‌वीच्या संध्याकाळ‌च्या कौटुंबिक मालिका पाह‌णाऱ्या व‌र्गात 'दिल दोस्ती...' प्र‌चंड‌ लोक‌प्रिय झाली. इत‌की, की त्याच्या जोराव‌र‌ 'झी'नं 'युवा' हे न‌वं चॅन‌ल सुरू केलं, आणि 'दिल दोस्ती'च्या लोकांना घेऊन निघालेलं 'अम‌र फोटो स्टुडिओ' हे नाट‌क‌ मुंब‌ई-पुण्यात चांग‌लं चाल‌लंय. 'भाडिपा'ला हा ज‌नाधार अजिबात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गीय (स्प‌ष्ट सांगाय‌चं त‌र, ब्राह्म‌णी) विचार‌स‌र‌णीतून ग्रामीण विनोद क‌र‌ण्याचा प्र‌य‌त्न

ग्रामीण‌ विचार‌स‌र‌णीतून‌ श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गी विनोद‌ क‌र‌ण्याचा प्र‌य‌त्न‌ क‌धी पाह‌ण्यात‌ वा ऐकिवात‌ आहे काय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>ग्रामीण‌ विचार‌स‌र‌णीतून‌ श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गी विनोद‌ क‌र‌ण्याचा प्र‌य‌त्न‌ क‌धी पाह‌ण्यात‌ वा ऐकिवात‌ आहे काय‌?<<

माझ्या आठ‌व‌णीत‌ त‌री नाही. श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गीयांव‌र‌ विनोद क‌र‌ण्याचे प्र‌य‌त्न अर्थात आहेत, प‌ण त्यांच्यासार‌खे आठ‌व‌त‌ नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गीयांव‌र‌ विनोद क‌र‌ण्याचे प्र‌य‌त्न अर्थात आहेत, प‌ण त्यांच्यासार‌खे आठ‌व‌त‌ नाहीत.

ध‌न्य‌वाद‌. म्ह‌ण‌जेच‌ ग्रामीणांना प‌र‌कायाप्र‌वेश‌ क‌राय‌ची इच्छाही होत‌ नाही त‌र‌. सो म‌च‌ फॉर‌ श‌ह‌री झाप‌ड‌बंद‌ विचार‌स‌र‌णी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>म्ह‌ण‌जेच‌ ग्रामीणांना प‌र‌कायाप्र‌वेश‌ क‌राय‌ची इच्छाही होत‌ नाही त‌र‌. सो म‌च‌ फॉर‌ श‌ह‌री झाप‌ड‌बंद‌ विचार‌स‌र‌णी.<<

त्यातून न‌क्की काय निष्क‌र्ष काढ‌ता येईल ते म‌ला माहीत नाही, प‌ण सिनेमापुर‌त‌ं आणि म‌हाराष्ट्रापुर‌तं सांगाय‌चं त‌र‌ ग्रामीण‌ बाजार‌पेठ मोठी आहे त्यामुळे तिच्यात पुष्क‌ळ‌ ज‌णांना वाव‌ आहे. त्या मानानं श‌ह‌री खूप‌च म‌र्यादित‌ आहे आणि खूप‌च‌ विशिष्ट आहे. म्ह‌ण‌जे मुंब‌ई-पुण्याच्या बाहेर‌च्या श‌ह‌रांत‌ही त्याला फार‌ स्थान नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ग्रामीण बाजार‌पेठ म्ह‌ण‌जे तुम्हाला सोलापुर, लातुर, जाल‌ना , ज‌ळ‌गाव अशी श‌ह‌रे म्ह‌णाय‌चे आहे का?

ग्रामीण‌ बाजार‌पेठ मोठी आहे

हे ख‌रे आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ग्रामीण बाजार‌पेठ म्ह‌ण‌जे तुम्हाला सोलापुर, लातुर, जाल‌ना , ज‌ळ‌गाव अशी श‌ह‌रे म्ह‌णाय‌चे आहे का?<<

तंबूत‌ही सिनेमा दाख‌व‌ला जातो अशी छोटी ठिकाणंही अद्याप म‌हाराष्ट्रात आहेत. तिथ‌ले सिनेमे मुंब‌ईपुण्यात क‌धीच‌ येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तंबूत‌ही सिनेमा दाख‌व‌ला जातो अशी छोटी ठिकाणंही अद्याप म‌हाराष्ट्रात आहेत

अशी न‌क्कीच ठिकाणे आहेत, प‌ण त्या बाजार‌पेठेचा ( रेव्हेन्यु च्या भाषेत ) आकार पुण्याच्या म‌राठी सिनेमाच्या बाजार‌पेठेपेक्षा क‌मी असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>त्या बाजार‌पेठेचा ( रेव्हेन्यु च्या भाषेत ) आकार पुण्याच्या म‌राठी सिनेमाच्या बाजार‌पेठेपेक्षा क‌मी असावा.<<

त्यानं माझ्या मुद्द्यात फ‌र‌क‌ प‌ड‌त नाही. त्या बाजार‌पेठेत‌ र‌स्तेका माल स‌स्तेमे विक‌तो. इक‌डे फ‌क्त झी व‌गैरेंचे म‌हागात‌ले सिनेमे चाल‌तात‌. तिक‌ड‌चा माल क्व‌चित क‌धी श‌ह‌रात आलाच‌, त‌र तो असा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम‌च्या मुद्यात फ‌र‌क प‌ड‌तो. कार‌ण तुम‌चा मुद्दा "म‌हाराष्ट्रापुर‌तं सांगाय‌चं त‌र‌ ग्रामीण‌ बाजार‌पेठ मोठी आहे " होता.

म‌राठी सिनेमाची ग्रामिण बाजार‌पेठ ( त‌ंबुत‌ल्या सिनेमांची ) इग्नोर क‌र‌ण्या इत‌की छोटी आहे. ग‌ब्बु च्या भाषेत फ‌ड‌तुस आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>म‌राठी सिनेमाची ग्रामिण बाजार‌पेठ ( त‌ंबुत‌ल्या सिनेमांची ) इग्नोर क‌र‌ण्या इत‌की छोटी आहे. ग‌ब्बु च्या भाषेत फ‌ड‌तुस आहे.<<

ज्यांना फ‌ड‌तूस‌ वाट‌ते त्यांना ती वाटू देत. जे असे सिनेमे ब‌घ‌तात‌ आणि क‌र‌तात‌ त्या लोकांना ग‌ब्ब‌र‌च्या म‌तानंच‌ काय, अख्ख्या अस्तित्वानंही काही फ‌र‌क प‌ड‌त‌ नाही. माझा मुद्दा हाच‌ होता. त्यांना पुण्यामुंब‌ईच्या साडेतीन‌ ट‌क्के सॉफिस्टिकेटेड‌ लोकांसाठी सिनेमा क‌राय‌चाच‌ नाही. त्यासाठी झीवाले साने व‌गैरे लोक आहेत. हां, त्यांना सैराट‌मुळे फ‌र‌क‌ प‌ड‌तो. आता त्यामुळे त्यांना सैराट‌ फॉर्म्युला आत्म‌सात क‌राय‌चा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आप‌ण "फ‌क्त्" बाजार‌पेठेच्या आकाराब‌द्द‌ल बोल‌त आहोत्. तुम्ही विष‌य भ‌र‌क‌व‌ट‌ता आहात्.
मुळात बाजार‌पेठेच्या आकाराचा विष‌य तुम्हीच काढ‌ला होता, आता तुम्ही वेग‌ळेच बोल‌ता आहात्.

बाकी म‌राठी सिनेमाब‌द्द‌ल तुम‌च्या च‌र्चेत म‌ला प‌डाय‌चे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आकार‌ म्ह‌ण‌जे लोक‌संख्येब‌द्द‌ल बोल‌त होतो. असो. आणि माझा मूळ विषय बॅट‌मॅन‌च्या प्र‌श्नाला उत्त‌र‌ देणं हा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्मम्... मी व‌र्ण‌न केलेल्या दोन व‌र्गांत एक छुपी विस‌ंग‌ती येऊन गेली.

प‌ण एर‌वीच्या संध्याकाळ‌च्या कौटुंबिक मालिका पाह‌णाऱ्या व‌र्गात 'दिल दोस्ती...' प्र‌चंड‌ लोक‌प्रिय झाली.

त्याचं कार‌ण ते 'लंग‌डी गाय' आहे म्ह‌ण‌ता येईल. आजकाल‌च्या झीम व‌र‌च्या मालिका लिहीणाऱ्यांचा मेंदू ड्रायक्लीन क‌राय‌ची इच्छा म‌ला द‌र‌रोज होते. आधीच बिचाऱ्या म‌राठी युवाव‌र्गाला, त्यांच्या भाषेत‌लं काही उप‌ल‌ब्धच नाहीये फार‌सं. म‌ग त्यात‌ल्या त्यात ज‌Sरा युवासंबंधित सिरीअल मिळाली की तिचा उदोउदो होणं स्वाभाविक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

What is history but a fable agreed upon

हेच तर, मुळात नवीन कंटेंट व कल्पनांची वानवा आहे मराठीत. काहीतरी बाळबोध मालिका चालत असतात सध्या तर.
मला आठवतंय, एका ठिकाणी मुलाखतीत चित्रपट पटकथा लेखक संजय पवार यांना एक प्रश्न विचारला. (हे माझ्यासमोरच झालंय, माझ्याकडे रेकॉर्डिंगही आहे. ) ते म्हणाले -मला तर वाटतं या सगळ्या मालिका गृहिणींकडून लिहून घेतात. म्हणजे थोडंफार घरकाम करायचं. आणि मोकळ्या वेळी मालिका लिहायच्या. म्हणजे सासूला खलनायक दाखवायचं, नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवायचं, वगैरे आपल्या सर्व सुप्त इच्छा पूर्ण करायच्या. आता यात अतिशयोक्ती असली तरी हे काही फारसं खोटं नाही. त्यामुळे नवीन काहीतरी पाहण्यासाठी हपापलेल्या प्रेक्षकाला काहीही आवडेलच. दिल दोस्ती लोकप्रिय झाली कारण कंटेंट नवीन होता. लिखाण चांगलं होतं. रोज घडतील अशा घटना होत्या. अतिशयोक्ती थोडीशीच होती. हे सगळे जुळून आल्याने ती हिट झाली. आता झी युवा काहीही फार ग्रेट नाही. आता त्यावरही तोचतोचपणा आहे. थोडक्यात, कंटेंटच्या वानवेमुळे सगळं काही होतंय, असं मानायला हरकत नाही.

म्हणजे मराठीत कपिल शर्मा सारखं काहीतरी नव्हतं, मराठीत पॅरडी फारशा होत नव्हत्या, यामुळे हवा येऊ द्या आलं. नवीन काहीतरी हवं म्हणून व शहरी व थोडेफार ग्रामीण प्रेक्षक टार्गेट ऑडियन्स म्हणून दिले दोस्ती आलं. इंटरनेटवर मराठीतील फारसं काही नव्हतं म्हणून भाडिपा, चावट आलं, असं एकूण सगळं काही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाच‌ त‌र‌ साला प्रॉब्लेम‌ आहे ना. "क्ष‌य‌झ‌सार‌खं आता म‌राठीत‌ही..."

अग‌दी ठार‌ ओरिजिन‌ल‌ ह‌व‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
बॉईस प्लेड वेल.

ग्रामीण‌ विचार‌स‌र‌णीतून‌ श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गी

आणि

ठार‌ ओरिजिन‌ल‌ ह‌व‌ं.

ठार‌ ओरिजिन‌ल‌ माझ्याम‌ते म‌हेश‌ कोठारेचे सिनेमे असावेत‌, ध‌डाकेबाज‌, थ‌र‌थ‌राट‌ व‌गैरे. (झ‌पाट‌लेला ब‌हुधा उच‌ल‌लेला आहे. ) हे खूप लोकांना, ग्रामीण‌/श‌हरी, आव‌ड‌ले होते/आव‌ड‌तात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

एकतर एखाद्या आधीच्या कार्यक्रमाला पॅरलल काहीतरी करायचं नाहीतर वर्षानुवर्षे जे चाललंय तेच चालू ठेवायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या तिन्ही विषयीची तुमची मतं बरोबरच. शिवाय, भाडिपा बद्दलचं मत जरा जास्तच खरं. यातील कंटेंटवर पुणेरी असा शिक्का बसल्याने तो बाजूला पडला. शिवाय, तुम्ही म्हणता तसं त्यातील भाषिक विनोदांमुळेही तो सामान्य प्रेक्षकांच्या मनात भरत नाही किंवा त्यांना तो त्यांच्या पातळीचा वाटत नाही.
याउलट त्यांना शिव्यांचा भडिमार असलेला स्ट्रगलर साला जास्त आवडतो. स्ट्रगलरची थीम भारीच. पण आजकाल शिव्या फार वाढलेल्या दिसतात.

मुळात या पुणे मुंबई किंवा ग्रामीण शहरी आणि महत्त्वाचं म्हणजे ब्राम्हण ब्राम्हणेतर वादामध्ये मराठीतील मोठा कंटेंट बाजूला पडतो.
अशाच अनेक गोष्टींमुळे ह्या तिन्ही गटांमधील दरी जास्त वाढत जात आहे.
आणि दिल दोस्ती दुनियादारीला पुणेरी लेबल लावणे म्हणजे कहर आहे. उलट ती आत्तापर्यंतच्या मराठीतील उत्तम मालिकांपैकी एक आहे. पण, बहुतांशी प्रेक्षक हा आता सुरू असलेल्या मालिका पाहतो, तर त्याच चालू ठेवाव्यात म्हणत नवीन नाकारलं जातं. आणि नवीन काही देण्याचा प्रयत्न केला तर त्यावर अमुक गटासाठीचं म्हणून शिक्का बसतो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते अमेय निपुण चे सगळे कंटेंट मोस्ट बोअरिंग न पुचाट वाटतेत. बघवत नाहीत. चला हवा येऊ दया बरेच चांगले. फु बाई फु काही भाग जबरदस्त. दर्शन कुशल भाऊ चे . पुण्यामुम्बै बाहेर प्रचंड चाहते आहेत त्यांचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटी ज्याची त्याची अभिरुची...
मलाही अमेय निपुणचा सगळाच कंटेंट आवडतो असं नाही. हेच हवा... बाबत. सुरूवातीला नावीन्य होतं, आता ते वाटत नाही. मुळात रूचतही नाही.
फू बाई फू मधीलही बहुतांशी कंटेंट चांगला असायचा. शिवाय, आशिष पाथरे, हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव वगैरे लेखकमंडळी चांगली होती, आहे. भाऊ-सुप्रिया, भारत-सागर, कुशल-हेमांगी, इ. जोड्या भारी होते.आता हवामध्ये फार दम आहे, असं वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेम‌ंत ढोमे? ओढुन ताणुन अॅक्टींग्वाला? इत‌कं ग‌चाळ म‌राठी उच्चार‌ण क‌धिहि ऐक‌लं न‌व्ह‌तं.
त्याचे तोंड पाह्य‌लं कि अक्श‌य‌कुमार‌सार‌खि उडुन फाईट हाणावी वाट‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌राठीत‌ल्या विनोदाबाब‌त चाल‌ल‌ंय म्ह‌णोओन विचार‌तो-
पूर्वी दूर‌द‌र्श‌न‌व‌र‌ लाग‌णारा "ग‌ज‌रा" कुठे उप‌ल‌ब्ध‌ आहे का? प्र‌भाव‌ळ‌क‌रांच्या आत्म‌च‌रित्रात‌ त्याचे फार‌ छान‌ उल्लेख‌ आहेत‌, ते वाचून‌ हा कार्य‌क्र‌म पहाण्याजोगा वाट‌तोय‌.
म्ह‌ण‌जे छोटी छोटी स्किट्स‌ अशा स्व‌रूपात‌ला म‌राठीत‌ला आद्य‌ कार्य‌क्र‌म‌ असावा ब‌हुधा.
काही VCD/DVD/CD/Cassatte - व‌गैरे उप‌ल्ब्ध‌ असेल‌ का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुतेक तुम्ही याविषयी म्हणत आहात. एक भाग इथे आहे. हाच आहे का हेही मला कळवा.

शिवाय, दूरदर्शनवरील अनेक मालिका आता मिळत नाहीत. त्यांच्याकडेही त्या आहेत की नाही, याविषयी शंकाच आहे. बहुधा त्यांनीही त्या जपून ठेवण्यावर भर दिला नाही. त्यादिवशी सुमीत राघवन ही दूरदर्शन विषयी बोलताना त्यानेही याविषयी खंत व्यक्त केली. दूरदर्शनने या व इतरही मालिकांचे जतन करून ठेवले नाही, हे वारंवार आढळून आले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही हा चिम‌ण‌राव‌चा भाग‌ वाट‌तोय‌ हो ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही तेच वाटलं. म्हणजे चिमणराव वगैरे ऐकलं. पण, म्हटलं कुछ भी नहीं से कुछ तो अच्छा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी web series पानचट आहेत. काहीकाही तर भिकार आहेत. त्यामानाने tvf च्या pitcher वगैरे बऱ्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा हीही हूहू हेहै फीस्स

भिकार काय, काहीकाही तर कहर आहेत. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन सगळं काही सुमार. पण तरीही आम्ही वेब सिरीज काढतो म्हणून मिळवायचं. त्याच्या मानाने या तरी बऱ्या असतात. चावट च्याही बऱ्यापैकी बऱ्या असतात.
मध्यंतरी बॅकबेंचर्स म्हणून एक पाहिली होती. अजिबात आवडली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0