CPEC आणि OBOR

China-Pakistan economic corridor (CPEC) आणि One Belt One Road (OBOR) ह्या चीन‌क‌डून‌ पुढे आण‌ण्यात‌ आलेल्या दोन‌ म‌ह‌त्त्वाकांक्षी योज‌नांव‌र‌ स‌ध्या ब‌रीच‌ साध‌क‍बाध‌क‌ च‌र्चा होत‌ आहे. CPEC चे त‌प‌शील‌ 'डॉन‌' वृत्त‌प‌त्राम‌धील‌ ह्या लेखाम‌ध्ये पाह‌ता येतील‌. OBOR साठी हा विकिपीडिया लेख‌ प‌हा.

CPEC पाकिस्तान‌व्याप्त‌ काश्मीर‌म‌धून‌ जाणार‌ अस‌ल्याने भार‌ताने OBOR म‌ध्ये स‌ह‌भाग‌ घेण्यास‌ न‌कार‌ द‌र्श‌विला आहे. OBOR म‌धून‌ बाहेर‌ राहिल्याने भार‌त‌ स्व‌त:चेच‌ नुक‌सान‌ क‌रून‌ घेत‌ आहे आणि भार‌त‌ एक‌टा प‌डू श‌केल‌ अशी भीति काही भार‌तीय‌ वृत्त‌प‌त्रांम‌धून‌ व‌र्त‌व‌ली जात‌ आहे. उदा. हिंदुस्तान‌ टाईम्स‌चा हा लेख‌ प‌हा. ह्याविरुद्ध‌ छोट्या देशांना त्यांच्या ताक‌दीबाहेर‌ची क‌र्जे देऊन‌ चीन‌ त्यांच्या अर्थ‌व्य‌व‌स्था आप‌ल्या क‌ह्यात‌ आण‌ण्याचा डाव‌ प‌द्ध‌त‌शीर‌प‌णे र‌च‌त‌ आहे अशीहि श‌क्य‌ता व‌र्त‌व‌ली जात‌ आहे.

खुद्द‌ पाकिस्तानात‌हि CPEC ला ब‌राच‌ विरोध‌ आहे असे 'डॉन‌' वृत्त‌प‌त्राच्या व‌र‌ दाख‌विलेल्या लेखाखालील‌ म‌त‌म‌तान्त‌रांव‌रून‌ दिस‌त‌ आहे. पाकिस्तान‌ला पूर्ण‌प‌णे आप‌ल्या विळ‌ख्यात‌ बांधून‌ पाकिस्तान‌ची शेत‌ज‌मीन‌,
पाकिस्तान‌ची ख‌निज‌ स‌ंप‌त्ति, पाकिस्तान‌ची मोठी बाजार‌पेठ‌ ह्यांच्याव‌र‌ क‌ब्जा क‌राय‌चा आणि पाकिस्तान‌ला प‌र‌व‌ड‌णार‌ नाही असे क‌र्ज‌ त्याच्या ग‌ळ्यात‌ बांधाय‌चे हा चीन‌चा कावा आहे असे ब‌ऱ्याच‌ ज‌णांना वाट‌त‌ आहे. ही एक‌ न‌वी East India Company ज‌न्माला येत‌ आहे असे ब‌रेच‌ म‌त‌ दिस‌ते.

आप‌ले प्र‌च‌ंड‌ भांड‌व‌ल‌ आणि आकार‌ वाप‌रून‌ स‌र्व‌ ज‌ग‌भ‌र‌ आप‌ले व‌र्च‌स्व‌ प्र‌स्थापित‌ क‌र‌ण्याचे जे प्र‌य‌त्न‌ चीन‌ क‌र‌त‌ आहे त्याचाच‌ हा भाग‌ आहे काय‌?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आप‌ले प्र‌च‌ंड‌ भांड‌व‌ल‌ आणि आकार‌ वाप‌रून‌ स‌र्व‌ ज‌ग‌भ‌र‌ आप‌ले व‌र्च‌स्व‌ प्र‌स्थापित‌ क‌र‌ण्याचे जे प्र‌य‌त्न‌ चीन‌ क‌र‌त‌ आहे त्याचाच‌ हा भाग‌ आहे काय‌?

हे ऑब्व्हिअस नाहिये का? हा प्र‌श्न का प‌डावा हे क‌ळ‌ले नाही.

शांघाय‌ ते लंड‌न रेल्वे नी जाय‌ला मिळ‌ण्याचे माझे स्व‌प्न‌ आहे. म‌स्त म‌जा येइल्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते काय‌ आत्ताही जाता येईल‌. शांघाय‌ - बेजिंग‌ - मॉस्को - पॅरिस‌ - ल‌ंड‌न‌. चार‌ वेग‌वेग‌ळे व्हिसे लाग‌तील‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

माझे स्व‌प्न चीन च्या ओबीओआर व‌र अव‌ल‌ंबुन नाहीये, माझ्या रीसोर्सेस‌ व‌र अव‌ल‌ंबुन आहे.

बाद‌वे ओबीओआर मॉस्कोला जात नाही असे वाट‌त‌य्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओबीओआर‌ न‌व्हे. ट्रान्स‌ म‌ंगोलिय‌न‌ रेल्वे. बेजिंग‌ - उलान‌ बातोर‌ - मॉस्को.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

त्यात ट्रेन ब‌द‌लाय‌ला लाग‌ते.

ओबीओआर म‌धे म‌ला वाट‌ते तिच ट्रेन एन्ड टु एन्ड लंड‌न प‌र्य‌ंत जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एव्ह‌ढा मोठा विषय फ‌क्त‌ ५ प्र‌तिसादात आटोप‌ला ? तेही फ‌क्त‌ रेल्वे या विषयाव‌र ! म‌ज्जा आहे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

उगाच का म्ह‌ण‌तात ऐसीव‌र‌च्या च‌र्चा डाव्या अंगाने जातात ते... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0