बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे
'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.
यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे. या पिढीच्या वाचनसवयींची तुलना त्यांच्या पालकांच्या पिढीशी केली तर साधारण पन्नासेक वर्षांचं चित्र एकत्र पाहता येईल, आणि या काळात झालेले बदलही टिपता येतील.
यासाठी आम्ही दोन सर्वेक्षणं करत आहोत. किंबहुना एकाच सर्वेक्षणाचे हे दोन भाग आहेत. साधारण वाचत्या वयात असलेल्या मुलामुलींनी (वय वर्षे सात ते अठरा) भरायची एक प्रश्नावली आहे. जवळजवळ तशीच, पण थोडं वेगळेपण असलेली प्रश्नावली त्यांच्या पालकांनी भरायची आहे. खाली या प्रश्नावल्यांचे दुवे दिले आहेत. जर तुम्ही सात ते अठरा या वयोगटातल्या मुलामुलींचे पालक असाल, तर ही प्रश्नावली स्वत: भरा आणि आपल्या पाल्याकडूनही भरून घ्या. तुमच्या माहितीत असे आणखी पालक किंवा पाल्यं असतील, तर त्यांच्यापर्यंत या सर्वेक्षणाचे दुवे पोचवा.
या प्रश्नावल्यांतून जमा झालेल्या माहितीचं संकलन आणि त्यातून निघालेले निष्कर्ष घेऊन आम्ही येऊच!
मदतीसाठी आपले अनेक आभार!
पालकांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=15d-pTRH8Sd83-dn5APxKRLxBuU6fSeormMkNj…
पाल्यांसाठीची प्रश्नावली: https://drive.google.com/open?id=1TsILIyGdbh2iy-O449_8i6XolchjcDfs9wKX2…
माहितीमधल्या टर्म्स
दोन्ही पर्याय नाही निवडता
दोन्ही पर्याय नाही निवडता येणार. हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू असा आहे, की तुम्हाला समजा मोकळा दिवस मिळाला तर पुस्तकाकडे वळाल की नाही. तुमचा मोकळा वेळ हा रिसोर्स मानला तर तो रिसोर्स पुस्तक वाचण्यावर घालवाल का? (किती वेळ पुस्तक वाचाल हे - किमान या प्रश्नासाठी तरी - महत्त्वाचं नाही.)
समजा तुम्ही पुस्तकही वाचणार असाल आणि इतर गोष्टीही करणार असाल, तर "पुस्तक वाचेन" हा पर्याय निवडावा.
नमस्कार.
नमस्कार.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्वांचे खूप खूप आभार.
सर्वेक्षणाचं विश्लेषण आणि निरीक्षणं, निष्कर्ष येथे वाचता येतील.
'रेषेवरची अक्षरे'चा बालसाहित्य अंक येथे वाचता येईल.
या लेखावरच्या (आणि संपूर्ण अंकावरच्या) प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
पण हे सगळं काम करणारे लोक हौशी असतात
अगदी मान्य. पण कसं अगोदरच टुमणं लावून ठेवलेलं बर असतयं. नंतर मग पाठपुरावा करण्यात मज्जा येत नाही. मिपावर पै ताईंना मी अस्सच भंडावून सोडलं होतं. त्यांनी बिचाऱ्यांनी काही महिन्यांनी का होईना पण काहि लिंक्स दिल्या.
कालौघात आणि इतर कामाच्या व्यापात नंतर दोन्ही पार्ट्या विसरतात. इतकेच !
ही वेबसाईट हॅक झाली आहे का -
ही वेबसाईट हॅक झाली आहे का - क्रोम वर असा एरर मेसेज / वॉर्निंग येत आहे
Deceptive site ahead
Attackers on js.localstorage.tk may trick you into doing something dangerous like installing software or revealing your personal information (for example, passwords, phone numbers, or credit cards
धन्यवाद!
धन्यवाद!
प्रसार केला जाईल.