स्मरण
मधुबाला (जन्म : १४ फेब्रुवारी १९३३)
दिनवैशिष्ट्य
१६ फेब्रुवारी
जन्मदिवस : थोरले माधवराव पेशवे (१७४५), अभिनेता आय. एस. जोहर (१९२०), सिनेदिग्दर्शक जॉन श्लेसिंजर (१९२६), टेनिसपटू जॉन मॅकेन्रो (१९५९)
मृत्यूदिवस : ‘ए ग्रामर ऑफ द मरहट्ट लँग्वेज’ या मराठी व्याकरणाच्या पुस्तकाचे लेखक व्याकरणकार जेम्स रॉबर्ट बॅलेंटाईन (१८६४), भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके (१९४४), भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद सहा (१९५६)
---
स्वातंत्र्य दिन : लिथुएनिया.
वर्धापनदिन : रेड क्रॉस (१८६३)
१७८५ : पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतात हे लाव्हाझिएने दाखविले.
१९२३ - प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.
१९५९ : फिडेल कॅस्ट्रोचा क्यूबाचा पंतप्रधान म्हणून शपथविधी.
२००५ : जागतिक तापमानवाढीला आळा घालण्यासाठीचा 'क्योटो करार' अमलात. १४० देशांची करारास मान्यता, पण अमेरिका कराराबाहेर राहिली.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- बोका
- पुंबा
- ३_१४ विक्षिप्त अदिती
छान आहे. मागची झाडं लहान हवीत
छान आहे. मागची झाडं लहान हवीत ना?
ते झाकून ठेवलं का?
झाकून ठेवलंय आता .. आणि हो
झाकून ठेवलंय आता .. आणि हो झाडं जरा मोठीच झाली आहेत .. लहान झाडं मस्त दिसतात
आर्किड लावायचे कुणी प्रयोग
आर्किड लावायचे कुणी प्रयोग केले असतील ते हवेत. ( युटुबविडिओ पाहून झालेत.)
पुणे-नाशिक/मुंबईची किनारपट्टीची हवा अथवा बंगळुर कुठे ते हवय.
ऑर्किड लावायचे उद्योग
ऑर्किड लावायचे उद्योग माझ्या पुण्यातल्या भावाने केलेत. अतिशय नाजूक प्रकरण आहे. सकाळचं कोवळं ऊन तेही थोडावेळंच झेपतं त्याला.
बाकी पूर्ण वेळ सावलीत गारव्याला ठेवतो तो. त्याच्याकडे गुलाबी रंगाच मॉथ ऑर्किड आहे.
नर्सरी लाईवच्या साईटवर बऱ्यापैकी माहिती असते. तापमान , आर्द्रता, जमिनीची प्रत वगैरे.
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
युट्युबवरील बय्राच
युट्युबवरील बय्राच व्हिडिओंतून ही क्लिप आवडली.
Top 10 DON'Ts when Growing Orchids - tips for orchid beginners
6:07 11272 likes, 109 dislikes
470,339 views
MissOrchidGirl
Published on Jun 27, 2015
Link:https://youtube.com/watch?v=E7x7rFAF8BE
आता काही आपल्याकडच्या कलावंतांचे यशस्वी ( आणि फसलेलेसुद्धा त्याच चुका टाळण्यासाठी ) अनुभव हवे आहेत. बॅल्कनीतल्या काही भागात ऊन येत नाही ती जागा वापरता येईल.
( जपानी बोनसाइबद्दलची पुस्तके ७०-७५ साली वाचली होती परंतू दहावीस वर्षे नेटाने सतत लक्ष देणे ,जतन करणे अशक्य वाटलेले. )
अबापट,गौराक्का बरीच माहिती असेल तर दिवाळी अंकासाठी लेख दिलात तरी थांबायला तयार आहे. उत्सुकता वाढेलच.
>>ऑर्किड लावायचे हा शब्दप्रयोग आवडला !!! कुठले ऑर्किड लावायचा विचार करताय ? >>
Growing ला काय म्हणणार! प्रथम ऑर्किड या प्रकारातले कोणतेही बघू नंतर मग अमुकच एक वगैरे.
अचरातबाबा , ऑर्किड विषयक
अचरातबाबा , ऑर्किड विषयक माहिती माझ्याकडे नाही .काही प्रश्न असल्यास विचारून माहिती देऊ शकतो . आमच्या कडे पश्चिम घाटावरच्या एरिडीज आणि डेंड्रोबियम ची गोळा करून आणलेली बरीच होती . अजिबात नाजूक वगैरे नव्हती . नवीन ( गच्ची नसलेल्या जागी) स्थलांतर करण्यापूवी काही दत्तक दिली . अजूनही आहेत . बाकी गंगटोक च्या नर्सरीतून बरीच घेतली होती . ती थोडी नाजूक होती .
आचरट बाबा . तात्पर्य दिवाळी
आचरट बाबा . तात्पर्य दिवाळी अंकाकरता थांबू नका .
ऑर्किड लावायचे हा शब्दप्रयोग
ऑर्किड लावायचे हा शब्दप्रयोग आवडला !!! कुठले ऑर्किड लावायचा विचार करताय ? त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून ...( घरी भरपूर ऑर्किडस होती . त्याला मी जबाबदार नाही . पत्नीचा माजी छंद . विचारून माहिती सांगू शकेन )
मी दोन ऑर्किडांची फुलं येणारी
मी दोन ऑर्किडांची फुलं येणारी फांदी मारल्ये. ती दुरुस्त कशी करायची ते विचारून लिहाल का?
मला घराबाहेर झाडं वाढवता येतात, पण घरातली झाडं मी पटापट मारते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
... मी दोन ऑर्किडांची फुलं
... मी दोन ऑर्किडांची फुलं येणारी फांदी मारल्ये. ती दुरुस्त कशी करायची ते विचारून लिहाल का?...
याचा अर्थ काय ?
कुठली ऑर्किड्स ? काय नाव गाव ?
अर्थात अमेरिकेतील ऑर्किड्स संबधी माहिती /डेटा आमच्याकडे सापडेल अशी शक्यता कमी .
घरात ठेवण्याची
ऑर्किड्स घरात ठेवण्याची आहेत; सूचना अशा होत्या की थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. घरातलं तापमान १२ ते २४ अंश सेल्सियसच्या मध्ये असू दे आणि रोज पाणी घालू नका; मुळं पूर्ण सुकली की भरपूर पाणी घाला.
या झाडांची पानं टुणटुणीत आहेत. त्याला एक फांदी असते, तिलाच फुलं येतात. ती फांदीच माझ्या अडाणीपणामुळे सुकून गेली. झाडाचे फोटो दाखवते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कुठे आहेत फोटो ?
कुठे आहेत फोटो ?
अंमळ उशीरच झाला
हा फोटो दिसतोय का?
याला अशासारखीच पिवळी-जांभळी फुलं होती.

यातली वाळलेली काटकी एकेकाळी हिरवी होती, तिला दोन फुलं होती. पुढे मी काहीतरी घोळ घातला आणि ही काटकी सुकली. पानं मात्र अशीच आहेत. असंच आणखी एक, जुनं झाड आहे, त्याची काटकीही गळून गेली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Terrestrial orchid होतं का ?
Terrestrial orchid होतं का ? नसल्यास मुळांना हवा , वारा मिळाला नाही हे कारण असू शकू शकेल ...
कल्पना नाही.
जशा डबीत ऑर्किड आलं तसंच ते ठेवलं होतं. त्यात माती नाही, वाळलेल्या खोडांचे तुकडे असावेत असं बघून वाटतं. ते काही बदललं नव्हतं, नाही.
ही फुलांची काडी पुन्हा वाढवण्यासाठी काही करता येईल का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कुठली ऑर्किडस ? नाव गाव ?
कुठली ऑर्किडस ? नाव गाव ? ऑर्किडस ना रोज पाणी 'घालू' नका हा शब्दप्रयोग लक्ष्यात येत नाहीये .माझ्या understanding मध्ये काही गल्लत होतीय बहुधा . ग्राउंड ऑर्किडस होती का ? कशात/कशावर लावली होती ऑर्किडस ?
ऑर्किडस हा एक झाडांचा वेगळा
ऑर्किडस हा एक झाडांचा वेगळा प्रकार आहे हे लक्षात आलय. त्यामुळे नावाला महत्त्व न देता सुरुवात तर करणार आहे. आता समारंभात स्टेजच्यामागे जांभळ्या रंगाची फुले वापरतात ती याचीच.
तयारी केली आहे. पावसात काही मोठ्या झाडांच्या काटक्या खाली पडतात ( आंबा, रेनट्री) त्या आणून एका कापडी पिशवीत भरल्या. पिशवी टांगली. पाणी दिल्यावर लाकडं भिजतात ती दमटपणा आणतील आणि हवाही खेळती ( आतमध्ये झाडाच्या मुळांभोवती )राहील. ऊन न येणाय्रा बॅल्कनीतल्या जातेत टांगल्यात पिशव्या. पिशवीतून पाणी खाली पडुल तिथे ट्रेमध्ये दुसरी झाडे आहेत. कमी ऊन लागणारे,हवेतली मुळे ( adventitious roots) असणारे हाताशी असणारे मनिप्लांट त्या पिशवीत सध्या लावले आहे खरे आर्किड मिळेपर्यंत.
आचरट बाबा , तुम्ही ट्रेकिंग
आचरट बाबा , तुम्ही ट्रेकिंग करता . घाटावरच्या कुठल्याही ट्रेक ला तुम्हाला झाडावर ऑर्किडस दिसतील . बऱ्याच वेळा ती एरिडीज जिनस ची असतात .त्यालाही जांभळट रंगाचा झुबका येतो फुलांचा . पंधरा पंधरा दिवस याची फुले ताजी टिकतात . हे कुठल्या फ्लोरिस्ट कडे दिसत नाही . पण हे इथले . पुण्या मुंबईत सहज रुजते , वाढते . तर ट्रेक ला गेलात तर आंब्याच्या , जांभळाच्या झाडावर या ऑर्किडस दिसतील . त्यातील एखादे काढून आणावे . मुळांना धक्का न लावता . 10-12 फुटांवर खोडावर असतात . आंबा घाट उतरल्यावर , गोवा हायवे च्या अलीकडे 20-30 किमी मध्ये तर रस्त्याच्या बाजूला लावलेल्या झाडांवर हाताला येईल एवढ्या उंचीवर असत .( अजूनही असावीत ) सुरुवात इथून करावी . बाकी पुढच्या भागात . तुम्ही समारंभात दिसणारी म्हणता ती बहुधा डेंड्रोबियाम म्हणत असावात. त्याचे कमर्शियल cultivation होते . एरिडीज लावा . आज्याबात नखरे न करता नक्की टिकतील
आचरट बाबा ,
आचरट बाबा ,
http://richardiana.com/pdfRich/Richardiana-vol16-13-Maharashtra.pdf
हि लिंक उघडा . यात पान न. पीडीएफ चा पान न. १२ उघडा , त्यात महाराष्ट्रातील ऑर्किड्स चे फुले असतानाचे फोटो आहेत . त्यातील B फोटो बघा . Aerides maculosa हे ऑर्किड आहे . मी वर ज्याचा उल्लेख केला आहे ते हेच. मुबलक आहे . अजिबात नखरेल नाही . वर्षात एकदाच फुले येतील ती या फोटो प्रमाणे दिसतील . उन्हाळयाच्या शेवटी . चांगली १५ दिवस टिकतील ( मी काढलेले फोटो रात्री जमल्यास शोधून पाठवीन ) . अजून काही लिंक मिळाल्या तर पाठवीन .
व्वा!
छान आहे साइट!

रानात बरीच आर्किड्स, बांडगुळे दिसतात. खाली हाताशी येणारं दिसलं की छोटंसं काढून आणेन. प्रयोगासाठी नक्कीच कामाला येईल शिवाय बॅल्कनीतला तो भाग हिरवा दिसेल.
हा धडा पहिला-
कापडी पिशवीत काटक्या भरून मनीप्लांट टांगला. माती नाही. नारळाच्या शेंडीचे प्रयोग फसले आहेत अगोदरचे. लाकडाचा रंधा मारून निघालेले शेविंग्ज उत्तम ठरलेले मनीप्लांटला. पण हल्ली हे मिळत नाही प्लाइवुडमुळे.
उत्तम आयडिया आहे , पण ऑर्किड ला नको .
आचरट बाबा , फेसबुकावर तुमचा आर्किड ची तयारी चा फोटो बघितला . हि तयारी फक्त terrestrial ऑर्किड करता कामाला येईल . झाडाच्या खोडावर उगवणारी ऑर्किड लावायची असतील तर पहिली माती काढून टाका . अशा ऑर्किड च्या मुळांनाही हवा , वारा गरजेचा . माती वर्ज्य . ओलावा ठेवायचाच असेल तर कुठल्याही छोट्या फांदीवर मॉस बांधा . ती पिशवी काढा . फांदी कशाचीही चालेल . फक्त सपोर्ट म्हणून कामाची . मुळे फांदी ला स्वतः हून बिलगून घेईपर्यंत सुतळीने / बारीक तारेने हलके बांधून घेऊ शकता .
( फार मास्तरकी होतीय का ? हळू घ्या .. च्यायला असं कधी वाटलं नव्हतं कि तुम्हाला मी बागकामाबद्दल काही सांगू शकीन . )
बांडगुळं येगळी आणि ऑर्किड येगळी
आणि एक .. बांडगुळं येगळी आणि ऑर्किड येगळी . बांडगुळं झाडावर पूर्ण किंवा पार्शल पॅरासायटीक असतात . बहुतांशी ऑर्किड हि झाडाचा उपयोग मुख्यतः सपोर्ट करता करून घेतात . अन्ना करीत नाही .
मास्तरकी नाही होत आहे.
मास्तरकी नाही होत आहे. बय्राचदा आपण गार्डनिंगचे व्हिडिओ पाहतो त्यात बघा माझे झाड कसे छान असे दाखवतात पण अगदी सुरुवातीपासूनची तयारी दाखवत नाहीत. भारतातल्या विशेष दक्षिणेतल्या टेरेस गार्डनचे हे असतं. कॅम्रा गरागरा फिरवायचा दुधीपासून गुलाब निवडुंगापर्यंत घरच्या लोकांसह दाखवायचं पण how to हा शब्द फक्त विडिओच्या नावातच असतो.
पिशवीत माती नाही,काटक्या आहेत.
बांडगुळ हे वेगळे खरेच.
रानकांदा
अन त्याची फुले
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
स्पायडर लिली
अरे! ही स्पायडर लिली तर नव्हे ना? ह्यालाच रानाकांदा म्हणतात होय.
लिली
अरेच्चा, मी ह्याला लिलीच समजत होतो. पावसाळ्यात भरपूर येतात आणि संध्याकाळी सहाच्या सुमारास पटकन उमलतात.
त्यावरूनच, एक जुनी आठवण!
याचे वै नाव अमरेल लिलि असं
याचे वै नाव अमरेल लिलि असं काही आहे त्याचेच लोकांनी 'अमर लिलि' केले.
पहिल्या फोटोत बरीच फुले आहेत!
क्राय्नम एशियटिकम्
हे तर Crinum Asiaticum. सर्वत्र आढळणारी वनस्पती. दादर फूलबाजारात ही फुले अतिशय स्वस्त आणि टोपल्या भरभरून असतात. पुढचे परागकेसर आणि लांब पाकळ्या कापून टाकून आकार आटोपशीर करतात आणि हारांत गुंफतात. कुठल्याही मोठ्या हारात ही फुले असतातच. निशिगंधही असतोच.
ते crinum नावच बरोबर आहे पण
ते crinum नावच बरोबर आहे पण अमर लिलि हे डोक्यात बसलय. लिलि वर्गात नाहीच आहे.वरचा प्रतिसाद चुकलाय.
अंगणात छोटोसे तळे केले असेल
अंगणात छोटोसे तळे केले असेल तर कडेने हे लावता येते.

Search "Mexican sword "
Wiki :
Echinodorus palifolius, also known as
Mexican sword plant.
मला आरे कॉलनीच्या रस्त्यावर ,
मला आरे कॉलनीच्या रस्त्यावर , कडेला उगवलेली रोपं असतात, त्यातलं एक उचलून आणायचं आहे. त्याला जमिनी लगतच खोडाच्या जागी पांढरी गुलाबी फुलं येतात. फुलं वेणीच्या पेडासारखी दिसतात. मला नाव नाही माहित. जमल्यास फोटो काढून आणेन.
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
गौराक्का
गौराक्का
Tree Appreciation Walks Mumbai
Public Group
हा फेसबुक ग्रुप पाहा. दर महिन्याला एक बागेला भेट असते. ५०-७० जण येतात. रविवार सकाळी ७-१०. कार्यक्रम जाहीर होतो पेजवर. मागच्या रविवारी संगांनॅशनल पार्क सिलोंदा रूट होता.
अरे वा! छान आहे की...
अरे वा! छान आहे की...
तुम्ही जाता का?
---------------------------------------------------------------------
नवीन ग म भ न टंकायला लै वैताग येतोय...
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
हो जातो.पुढचा प्रोग्राम कळवेन
हो जातो.पुढचा प्रोग्राम कळवेन.लिडर उषा देसाइ ,रिनि व्यास गेले आठ वर्षं नेमाने करत आहेत. मागचे चार कांदिवली,मालाड,बोरिवलीमध्ये होते.
हे ते फुल... मस्त आहे नं??
हे ते फुल... मस्त आहे नं??
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
ही रानहळद आहे! काढू नका.
ही रानहळद आहे! काढू नका. पावसात सगळ्या डोंगरांत उगवते.
का हो? मी घरी नेउन लावायच्या
का हो? मी घरी नेउन लावायच्या विचारात होते.
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
रानकेळही येतात
याचप्रकारे सह्याद्रीत रानकेळ असते. माळशेज घाटात बरीच आहेत. रानआले असते त्याला छान लाल फुले येतात.
मी कंदासकटच काढणार होते. आज
मी कंदासकटच काढणार होते. आज उकरणं नेलं नव्हतं उद्या घेऊन जाईन.
सल्ला देणं का बरोबर नाही हो?
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
रानशेपू
डोंगरात रानशेपू पण येतो पावसाळ्यात, आम्ही तो कच्चाच खायचो.
अवांतर :
पावसाळ्यात गावाकडली मज्जा वेगळीच असते (मानली तर). डोंगराकडल्या शेताजवळून नदी वाहते त्यातले झिंगे पकडायचे. त्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती असायच्या. भाकरीचा तुकडा नाही तर एखादा खेकडा कुचून एका पातेल्यात टाकायचा अन त्यावर एक छिद्र असलेला कपडा बांधायचा. गुढघाभर पाण्यात हे पातेलं पाण्यात वाळूवापरून फिट्ट करायचा. मासे त्याच्या वासाने आतमध्ये जायचे पण बाहेर नाही येत यायचं. मग हे झिंगे दगडावर घासून स्वच्छ करायचे अन तीन दगडाची चूल मांडून पुढचा कार्यक्रम उरकायचा. हि सगळी प्रक्रिया लहर येईल त्या दिवशी रिपीट करायची. झालं
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
ब्रोमिलियाड?
गौराक्का, हे ब्रोमिलियाड आहे का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही, हे वाईल्ड टरमरीक
नाही, हे वाईल्ड टरमरीक (Curcuma aromatica).
हे फक्त दक्षिण आशियामध्ये सापडतं. मुख्यतः पश्चिम घाटात.
आय यु सी एन च्या रेड लिस्ट मध्ये आहे हे. जगात फार थोड्या प्रमाणात शिल्लक आहेत ही झाडं
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
झाडे वाचवा ,जगवा!
म्हणूनच काढायची नाहीत झाडं.
मी काही काढून फेकून नाही
मी काही काढून फेकून नाही देणारे... लावणारच आहे.. मग काय हरकत आहे?
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
काही हरकत नाहि गौराबाई.
काही हरकत नाहि गौराबाई. बिन्धास्त लावा तुमच्याकडे. उलट त्याची २-४ नविन रोपे करुन अचरटबाबांना द्या.
अनु तैंचा सपोर्ट असणे म्हणजे
अनु तैंचा सपोर्ट असणे म्हणजे खारुताईंच्या पाठीवर साक्षात श्री रामांचा हात.
अनु तै, अशीच कृपा असु द्या.
लक्ष असु द्या बाबाजी
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
कधी नॅचरलिस्ट लोकांच्या बरोबर
कधी नॅचरलिस्ट लोकांच्या बरोबर गेलात तर खरडपट्टी निघेल.
अश्या लोकांपासुन ४ हात दुर
अश्या लोकांपासुन ४ हात दुर राहवे - हे एक.
दुसरे म्हणजे हिच नॅचरलिस्ट लोक तोडमोड करण्यात पुढे असतील.- हे दोन.
तुम्हाला रान हळद हवी आहे की नाही हे एकदा ठरवा अचरटबाबा म्हणजे तुम्हाला बाजु घेणे सोप्पे पडले. - हे तोसरे
नॅचरलिस्ट नेहमी बरोबर असतात
नॅचरलिस्ट नेहमी बरोबर असतात असं कुठाय?
माझ्या मैत्रिणी पण आहेत. त्या तर काय काय गोळा करुन आणतात, अर्थात रुजवायला, रोपायला कंद, फांद्या वगैरे...
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
ग्रुप टुअर काढणारे, बिएनएचेस
ग्रुप टुअर काढणारे, बिएनएचेस,माझा tree appreciation walk वगैरे लोकांबरोबर गेल्यास असं म्हणायचं आहे॥
कास पठारला लोक फुलं नेतात, रोपटी उपटून नेतात! दहा वर्षांनी काही सापडणार नाही तिथे. (पाचगणीच्या टेबललँडची झाडं घोड्यांनी खाल्ली!)
शिवाय जाहिरपणे संस्थळावर या प्रवृत्तीचे समर्थन करू नये म्हणतात. बाकी मी काय सांगणार?
तुमचं ही बरोबरच आहे म्हणा.
तुमचं ही बरोबरच आहे म्हणा.
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
बघा कि हो...
कालच कंपाउंड बाहेरच्या लिलीला (तुम्हीच सांगितलं तेंव्हा नाव कळलं झाडाचं) लुचून नेलं कुणीतरी. द्वाड कुठचे.
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
खालीलप्रमाणे झाडं खरीदली:
खालीलप्रमाणे झाडं खरीदली:
कापा फणस
हापूस आंबा
लिंबू
मोसंबी
जामफळ
मोस्टली सगळी किमान एक वर्षाची मोठी रोपं(?!) घेतली.
आमच्या बागेतील
सध्या ही फळे तोडलीत



ऐसीकेदारे फळे भारी आहेत!!
ऐसीकेदारे फळे भारी आहेत!!
गुगल फोटो, माइक्रोसॅाफ्टचे
गुगल फोटो, माइक्रोसॅाफ्टचे वन ड्राइवशिवाय इतर कोणत्या साइट्स फोटो शेअरिंगसाठी वापरता येतात-
आइफोनचे आइट्युन्स क्लाउडस्टॅारिज याबद्दल तपासता आले नाही.
१ ) postimg dot org
2) tinypic dot com
या दोन फास्ट आहेत पण https नाहीत. "तसल्या" जाहिरातींतून साइट चालवतात.
३)flickr -( याहू) आता तरी चालू आहे परंतू verizon ने ही yahoo घेतली आहे. पुढे काय होते माहित नाही. फ्री ठेवतील का वगैरे.
४) imgur
5)instagram
6)dropbox
* वरच्या क्र ३,४,५ आणि ६ - यांच्या अॅप्समधून मोबाइलने फोटो तिकडे अपलोड होतात लगेच परंतू फोटोशेअरिंगसाठी लागणारी लिंक त्या अॅपमधून निघत नाही. वेबसाइटचा आधार घ्यावा लागतो.
५)photobucket ही चांगली साइट होती. अजूनही आहे,पुर्वी दिलेल्या लिंक्स चालतात परंतू आता नवीन सुधारणा म्हणजे फ्री अकाउंट अपग्रेड करून पेड करावे लागते.
६) facebook -सर्वात उत्तम साइट. https आहे,फास्ट आहे, कोणत्याही डबडा मोबाइलमधूनही चालते, लिंकही लगेच काढता येते. एक छोटासा दोष म्हणजे तिथले अपलोड केलेले फोटो सर्व फ्रेंडसर्कलला दिसतात. यावर उपाय आहे. एक ग्रुप (क्लोझ्ट ग्रुप) करायचा आणि त्यामध्ये एकच फ्रेंड ठवायचा. फोटो फक्त त्यालाच दिसतात. परंतू लिंक दुसरीकडे चालते. सध्या ४ एमबिपर्यंतचे फोटो अपलोड होतात.
याची कृती माझ्या खरडवहीत दिली आहे.
७) wikicommons :- आपले फोटो खुपच कामाचे आणि माहितीच्या उपयोगाचे असतील तसेच त्यावर मालकी हक्क सोडायचा असेल तर इथे अपलोड करून तिसरी लिंक शेअरिंगसाठी वापरता येते. विकितील लेखासाठी विकिवाले हा फोटो वापरू शकतात.
( अवांतर लेखन दुसरीकडे नेले तरी चालेल.)
काटेकणगर आणि करांदे
माझ्या आईने, उत्साहाच्या भरात एक कुंडीत काटे कणगर आणि करांदे रोपले. त्याच्या वेली असल्या सपाट्याने वाढतायेत की ज्याच नाव ते..
- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.
काटे कणगर आणि करांदेला उशिर
काटे कणगर आणि करांदेला उशिर झालाय तो भरून काढताहेत. मार्च महिन्यात ते कंद झोपेतून जागे होतात, सप्टेंबरपर्यंत वेली फोफावतात. वरच्या पानांच्या बेचक्यातले अगोदर काढतात नवरात्रात, मुळांचे दिवाळीत.
हार्वीची कृपा
शुक्रवारपासून आग्नेय टेक्सासात धुमाकूळ घालणाऱ्या हार्वी चक्रीवादळाच्या कृपेनं आमच्याकडे तीन दिवसांत पिरपिर करत आठेक इंच पाऊस झाला. जमीन खणणं खूपच सोपं झालं. वस्तीतल्या नव्या मैत्रिणीकडून झाड-विनीयम पद्धत वापरून, सेगो पामच्या सहा पोरांच्या बदल्यात रताळ्याचे दोन प्रकारचे वेल आणि बरीच स्पायडर प्लांटं आणली आहेत. रताळी जमिनीत लावलीत ती खाण्यापेक्षाही शोभेची म्हणून लावली आहेत. त्या पानांचा हिरवा आणि जांभळा-अंजिरी रंग फारच आवडला मला. जमिनीवर वाळकी पानं आणि खोडाच्या तुकड्यांचं आच्छादन पसरण्यापेक्षा हळूहळू रताळ्याचे वेल पसरतील, आणि थंडीचे दोन-चार महिने वगळता चांगलंही दिसेल अशी आशा आहे. थंडीत ती सगळी वेल मरते.
शनिवारी सकाळी रताळ्याचे, मुळं फुटलेले वेल जमिनीत लावले. दोन-चार तासांत त्या पानांनी मान टाकली होती. पण एवढा पाऊस आणि दिवसभर साधारण २२-२५० से. तापमान रताळ्यांना फारच मानवलेलं दिसतंय. रविवारी सकाळी बघितलं तर पानं पुन्हा डौलात उभी होती. फार थंडी पडायला अजून दोन महिने बाकी आहेत. तोवर त्या वेलांना रताळी धरली तर पुढच्या वर्षी तिथे आपसूक वेली, पानं फुटतील. नाहीच तर पुढच्या वसंतात नव्या मैत्रिणीकडून पुन्हा वेलींचे तुकडे आणेन.
पाऊस, तापमान उतरणं यामुळे मोगरा पुन्हा पेटलाय. भराभरा नवी पालवी फुटली आणि आता एकाच झाडाला रोज ओंजळभर फुलं येत आहेत. आता अनंतालाही कळ्या येतायत का बघायचं.
एक मित्र गरम ऑस्टीन सोडून थंड न्यूयॉर्कात राहायला गेला. जाताना स्वतः वाढवलेली डाळिंबाची झाडं माझ्या पदरात टाकली. आणली तेव्हा ती थोडी अशक्त दिसत होती, पावसानं तापमान कमी झाल्यामुळे बहुदा, त्यांचाही हिरवा रंग सुधारलाय.
आता कोणत्याच झाडांचे फोटो नाहीत; लवकरच दाखवते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रताळ्याची वेल आणि मोठी कर्णा
रताळ्याची वेल आणि मोठी कर्णा आकाराची जांभळी-पांढरी फुलं सुरेख दिसतात.
+१
या कापलेल्या वेलीच्या एका तुकड्याला जांभळट फूल आहे. नवीन जागा, माती असं सगळं असूनही आजही फूल-वेली टवटवीत दिसत होत्या. आता फक्त थंडीपर्यंत रताळी धरली तर बरं होईल.
रताळ्याचे वेल -
डाळिंबं (आणि इतर) -
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रताळ्यात पांढरी,पांढरट,पिवळसर
रताळ्यात पांढरी,पांढरट,पिवळसर, पिवळसर तंतूमय असे प्रकार विकायला येतात. पहिले दोन पीठ करायला चांगल्या. शेवटच्या उकडून खायला उत्तम. याचे वेल केलेले. ( मोठे रताळे असल्यास त्याच्या दोन टोकांपैकी अधिक निमुळते टोकाचा भाग कापून लावलेला. जमिनीवर पसरणारा वेल असतो पण त्याला मुद्दाम एका काठीच्या आधारावर चढवले. अशा कुंड्या फार छान दिसतात. चार महिन्यांनी आयुष्य संपते त्यांचे.
बोरिवलीजवळच्या
बोरिवलीजवळच्या निसर्गप्रेमींसाठी
नॅशनल पार्क नेचर ट्रेल.
डिटेल्ससाठी माझी खरडवही पाहा.
( मी जाणार नाहीये )
बागकाम
माझ्या कडे एक जास्वंद, गुलाब व लिंबाचे छोटेसे कुंडीतील झाडे आहेत.त्या झाडावर पांढरी बुरशी व आळी चा प्रादुर्भाव दिसुन येत आहे काय करावे?
या पांढय्रा बुरशिचे( तसे
या पांढय्रा बुरशिचे( तसे दिसणारे) दोनचार प्रकार आहेत. यांचा प्रकोप पावसाळ्यानंतर फार दिसतो.
१) एक चिमुकली पांढरी माशीच असते. रात्री यांचा थवा उडून पुन्हा दिवसा झाडावर येतो.
२) एक काळा बारीकसा किटक उडत येऊन झाडावर अंडी घालतो. त्यातून बाहेर पडणारी पिले पांढरीशुभ्र असतात. काटक्या पांढय्रा दिसतात. यांच्याभोवती मुंग्या गोळा होतात.
३) एक जरा मोठा तिळाएवढा किटकही पांढरा असतो. तो गोड रस सोडतो त्याला मुंग्या येतात.
४) उन कमी झाल्याने एक खरीच बुरशि पानांखाली वाढते.
उपाय: मैद्याची पातळ खळ ( कांजी) करून ब्रशने रोज चोपडावी. यासाठी स्प्रेपंप वापरू नका. खळ सुकली की हे किटक/ बुरशि आक्रसून मरते. निर्विषारी असा हा उपाय बॅल्कनीतल्या दहाबारा झाडांवर करता येतो.
२) झाड कापणे : पाने कापून टाका. फांद्या कापा. गुलाबाला फार कापल्यास त्याचा जोम कमी होतो म्हणून अति काटछाट नको. खळ मारणे.
३) कडक ऊन मिळेल अशा ठिकाणी झाडाला हलवणे.
करून पाहा.
मवा
मवा म्हणजे हेच का हो?
माझ्या घरच्या जास्वंदाची पार रया घातली ह्यानी. दोनच काटक्या उरल्यात. उन्हात ठेवल्यावर अजूनच वाया चाल्लय. मोगऱ्याच्या दोन काड्या लावल्या त्याच्यावर गायीने ताव मारला
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
क्रमांक २ मावा.
क्रमांक २ मावा.
क्र ३ मधल्या किटकाच्या शेपटीकडच्या भागातून गोडसर रसाचा थेंब डोळ्यांनी दिसतोही. त्याला मुंग्या येतात आणि त्याचे रक्षण करतात त्याबदल्यात. क्र १ पेरु आणि इतर बय्राच झाडांवर येतात.
कोणी गोमुत्र+तुप+गुळ फवारा म्हणतात पण उद्देश तोच गुळाचा चिकटपणा आखडवतो. चिमुटभर मैद्याची खळ तेच करेल. पाने तोडून टाकून काटक्यांना खळ चोपडली की काम होते.
धन्यवाद
उद्या सुट्टीच आहे. धन्यवाद अचरटबाबा
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
fairy गार्डनचा प्रयोग.. ऑफिस मध्ये आर्ट कॉम्पिटिशन होती ..
खूप सुरेख. अजुन अजुन सुधारणा
खूप सुरेख. अजुन अजुन सुधारणा कर. उत्तम प्रकल्प.
ती झाडं खरी आहेत का खोटी?
ती झाडं खरी आहेत का खोटी? डावीकडचं स्पायडर प्लांट आहे का?
हे असलं काही बनवायला मला आवडतं, पण घरात आधीच एवढा पसारा केला आहे हे बघून मी थांबते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खरी आहे झाडं. रिबन ग्रास,
खरी आहे झाडं. रिबन ग्रास, अरेलिया आणि अर्णथरेल आणि पौंड मध्ये आता वॉटर लेट्युस टाकली .
8 min मध्ये बनवलं ग .. त्यामुळे खूप flaws राहिले
डावीकडच्या गवताचाच बॅल्कनिला
डावीकडच्या गवताचाच बॅल्कनिला कठडा केला आहे मी. उजवीकडच्याला रंगीत झिपरी म्हणता येईल. पुर्वी हारात घालायचे.
मस्त दिसतेय परीची बाग.
अपडेट: कंपोस्ट
कंपोस्टावर आधी जिथे लिहीलंय ते दिसत नाही. मध्यंतरी ५० रुपयांची माती (साधारण ५ लिटर) त्या कंपोस्टात टाकली होती. ते काल उपसलं.
वास भलताच कमी आला. गायबच जवळपास. माती जी काळपट लाल होती ती काळीकुट्ट झालेली आहे.
मुख्य म्हणजे, मातीत गांडूळांनी वसाहतच स्थापन केलेली आहे. ही (रंगाची) बादली बंद होती, तरीही. गांडूळांबरोबर अजून बरेच शेजारी दिसून येतात, बारक्या कोलंबीसदृश. घोणी आहेत. रहा म्हटलं.
पसा पसा भरून माती प्रत्येक झाडात टाकली. त्या झाडांतली ह्या बादलीत परत टाकली. तीही तशीच काळी व्हावी ह्या आशेपोटी. आता बघू.
काही प्रश्न:
१. ती बादली बंद असून वरील मंडळी तिथे रहायला कशी आली?
२. मोगऱ्याचं खोड चांगलं जाडजूड आहे. लांबी सहा फूट. मात्र पानं पिवळी, निस्तेज अशी येतात. मध्यंतरी कीड पडली होती तेव्हा द्रव कीटकनाशक फवारलं होतं. फुलं बघून तर वर्षं झाली आता.
३. कलकत्ता पानवेल घेतली मध्ये, तिच्यात ३ मुख्य वेली होत्या, त्यांतल्या २ करपल्या, एकीने जोम धरलाय. हे का?
४. काही कुंड्यांत कितीही काही पेरलं तरी काहीच कसं उगवत नाही? ती चिकूची झाडं बाकीच्या कुंड्यांत इतकी जोमात आहेत... आंब्यांचीही खोडं जाडजूड झालीहेत. नाचणी पेरून उपटून टाकावी का?
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
मोगऱ्याचं खोड चांगलं जाडजूड
उन मिळतं का मोगऱ्याला?
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
हो... भरपूर!
सगळ्यात जास्त ऊन त्यालाच मिळतं. फोटोच टाकेन सवडीने.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
अचरटबाबांना मोगऱ्यच्या भेटीला
अचरटबाबांना मोगऱ्यच्या भेटीला न्या, ते त्याच्याशी गुजगोष्टी करतील आणि त्याला काय त्रास आहे तो समजुन घेतील. अचरटबाबा थोडी बंगाली जादु पण करतील, त्यांनी सांगितलेले उपाय तुम्ही केलेत आणि झाड ॲग्री झाले तर त्याला फुले येतील.
मोगऱ्याचं खोड चांगलं जाडजूड
चौदावे, ही कारणे असु शकतात.
१. तुम्ही मराठी कविता ऐकवता का मोगऱ्याला, तसे असेल तर झाडानी हाय खाल्ली असेल.
२. झाडाला खिडकि वगैरेतुन तुमचा टिव्हि दिसतो का? तसे असेल तर टिव्हिवर चिमणराव बघुन झाडाला अकाली वार्धक्य आले असेल.
३. मोगऱ्याला रॉक, मेटल वगैरे ऐकवता का?
मोगय्राच्या खोडावर दु
मोगय्राच्या खोडावर दु:खदबावलेप लावा हे राहिलं का?
एकेकाळी याचा फार बोलबाला होता.
उत्तरे.
१.उ.- जास्त व्हायला नको म्हणून काही 'कोमल' कविता ऐकवल्या.
२.उ.- माझ्याकडे टीव्ही नाही. झाडाला संगणक मात्र दिसतो. चिमणराव पाहिला नाही कधी.
३.उ.- अर्थात! रोपलेलं तेव्हा हे, थोडं वाढलं तेव्हा हे, कीड पडायला लागली तेव्हा हे.
तुमची स्तुती करताना एकदा त्याने पाहिलं असावं (पहा २.) तेव्हापासून त्याचं तारुण्य जे ओसरलं म्हणताय!
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
म्हणजे चौदावे, प्रॉब्लेम नं-१
म्हणजे चौदावे, प्रॉब्लेम नं-१ आणि ३ आहेत.
आधी मराठी कविता आणि रॉक मोगऱ्याला ऐकवणे बंद करा. छान हिंदी सिनेमातली रोमँटिक गाणी ऐकवा, भरपुर फुले येतील.
कोणीतरी फुल केसात माळु शकेत अशी व्यक्ती मोगऱ्याला दाखवा, म्हणजे फुले येतील.
ह्यानीही उपाय झाला नाहीतर, माझी स्तुती करा आणि मोगऱ्याला सांगा की अनु नी रिक्वेस्ट केली आहे फुलांची.
++ रॉक मोगऱ्याला ++
++ रॉक मोगऱ्याला ++
ते रॉक नाही . रॉक ची बदनामी थांबवा .
हा हा हा
विशेषत: आरती प्रभू
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
लिहितो नंतर एकेक.
लिहितो नंतर एकेक.
क्र ३) पानवेल
कोणतेही खत टाकू नका. नवी कोरी माती हवी. थेट कडक ऊन नको. पाणी मुळांशी साठता कामा नये. खाली एका ट्रेमध्ये माती पसरून त्यावर कुंडी ठेवा पण कुंडीच्या तळाशी कपच्या नकोत. आतल्या मातीचा खालच्या मातीला स्पर्श झाला तर ओलावा मिळत राहतो. केमिकल फवारे अजिबात नको.
मोगऱ्याची कहाणी
मोगरा हे फार जिवट झाड आहे.
मी उन्हाळ्यात दोन कलमं करायला लावली होती. त्यांतल्या फांदीच्या एका तुकड्याची पानं सगळी गळली नाहीत, नवी पालवी वगैरे फुटली आणि आता नवीन झाड टुणटुणीत आहे. म्हणजे इथल्या थंडीत जितपत टुणटुणीत दिसावं तेवढं. (ते शेजारच्या मैत्रिणीला देऊन टाकलं.) दुसऱ्याची सगळी पानं गळली, पण एकच फूल मात्र येऊन गेलं. एकही पान नाही, पण फूल आलं हे चित्र फारच निराळं होतं. थंडीत मी मोगऱ्याची मोठी झाडंही आत आणून ठेवते, तर हे बिनपानाचं काय जगणार! म्हणून आत, खिडकीच्या तावदानावर ठेवलेलं आहे. ऊन असेल तर दिवसातून तासभर काचेतून गाळून गाळून ऊन मिळतंय. दोन सेंटीमीटर लांबीचं मूळ आणि एकही पान नसलेलं, किंचित हिरवट खोड. वसंत ऋतू येईस्तोवर घरात ठेवेन आणि मग पुन्हा बाहेर उन्हात नेऊन ठेवेन. बघू पानं फुटतात का!
चौदावे, माझा सल्ला असा की झाडाची बरीच छाटणी करा. फार तर वीतभर वगैरे उंची ठेवा. चार पानंही चिकार झाली. पिवळी पानं सांभाळण्यात झाडाची फार ऊर्जा फुकट जाते. तीच ऊर्जा मुळांना मिळून झाडाला नवी पालवी फुटू दे. माती बदलून टाका. सध्या थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे कडक ऊन नसेलच, तेव्हा भर उन्हात ठेवा. कडक उन्हाळा येईस्तोवर झाडाला सावरायला चिकार वेळ मिळेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धन्यवाद अदिती
मला एकदा फोटू टाकेन. झाड आधीच इतकं मरायला टेकलेलं दिसतंय की त्याची छाटणी करायला धजावत नाही. तरीही करून पाहतो.
माती काल बदलली नाही, पण ते सेंद्रीय खत बरंच टाकलं मुळांपाशी.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
कंपोस्ट
कंपोस्टाची बादली बंद असली तरीही मातीत गांडूळं आणि किड्यांची अंडीपिल्ली असतात. पोषक हवामान मिळालं की सगळी बाहेर येतात.
तुमच्या आहे त्या मातीचा रंग बदलणार नाही, पण त्यात स्वयंपाकाचा कचरा आणि पानं टाकत राहिलात की मुळात मातीत असणाऱ्या जिवाणूंना पंचपक्वान्न मिळतील आणि त्यांच्यामुळे मातीची प्रत सुधारेल. त्या 'भेसळी'मुळे मूळ रंग बदललेला दिसू शकतो. जिवाणूंमुळे मूळ मातीत असणारी खनिजं झाडांसाठी उपलब्ध होतील. प्रियदर्शिनी कर्वेंनी ऐसीवरच कंपोस्टाबद्दल लिहिलेलं आहे, त्यांचे लेख इथे वाचा. (दुवा) त्यांच्या सल्ल्यानुसार मोगऱ्यात किंचित साखरपाणीही ओतून पाहा.
त्यांचे लेख वाचून मीही या वर्षी गळलेली पानं चुरून शक्यतोवर आवारातच जिरवत आहे. पानं चुरली नाही तर खालच्या गवताला प्रकाश मिळत नाही, आणि गवत मरतं. पानं लॉन-मोअरनं चुरून ती आवारातच पसरून देत्ये, त्यावर वापरलेल्या कॉफी शिंपडत्ये, म्हणजे कार्बनसोबत नायट्रोजनही मिळेल. शिवाय वापरलेली कॉफी फुकटच मिळते. पुढच्या वर्षी कदाचित त्याचा परिणाम दिसेल, किंवा नाही दिसणार. पण बाहेरचं खत, रसायनं आणून घरात ओतत नाहीये. (शिवाय, आमच्या झाडाची शेजारच्या आवारात पसरलेली पानंही ओढून आमच्या आवारात पसरली. त्यामुळे दोन्ही बाजूंचे शेजारी आमच्यावर फारच प्रसन्न झालेत.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मला कळत नाही , पण वापरलेली
मला कळत नाही , पण वापरलेली कॉफी वापरल्याने नायट्रोजन मिळतो ? कसा ?
मला काय विचारता...
ते जीवजंतूंना विचारा; त्या बाबतीत मी इंटरनेट हुशार आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी तर इंटरनेट हुशार सुद्धा
मी तर इंटरनेट हुशार सुद्धा नाहीये . कॉफी मुळे नायट्रोजन वाढतो असं कुठे वाचनात आलं असेल तर सांगाल ? सहज आपलं ( विदा हा शब्द टाळलाय ,हे चतुर अश्या तुमच्या लक्षात आले असेलच )
दे माय गूगल ठाय
जनरल गूगला. चिकार ठिकाणी कार्बन आणि नायट्रोजन यांची निरनिराळ्या पदार्थांमधली प्रमाणं (ratio) सापडतील. (मी फोनवरून आळस करत्ये.)
वापरलेल्या काॅफीत आम्लाचं प्रमाण कमी असतं, असंही वाचलंय. आच्छादन म्हणून, पाला वाढवण्यासाठी आणि मांजरांना झाडांपासून लांब ठेवण्यासाठी वापरलेली काॅफीपूड उपयुक्त, असं माझं इंटरनेट ग्यान.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्रोटीन्स असणारच
कुठल्याही धान्यामध्ये (वनस्पतीच्या बियांमध्ये) प्रोटीन्स असणारच. कॉफी सारख्या द्विदल मध्ये जराशी जास्तच. कॉफी फिल्टर करताना प्रोटीन्स फारशी निघून जात नसावीत. दळून शिजवलेल्या धान्यावर बक्टेरिया ताव मारेल आणि विद्राव्य बनवेल. अर्थात tanin सगळे leach out झाल्यावरच.
अनेक धन्यवाद
बरेच दिवस युरीया शोधत होतो. एकेकाळी शाळेत ऐकलं होतं की नखभर युरीया साताठ झाडांना घालावा. मुंबईत झाडवाले भरपूर फिरतात. त्यांच्याकडूनच माती आणि खत घेतो, जे कितपत चांगलं असतं माहित नाही. त्यांतल्या एकाने एकदा एक पाकीट दाखवलं होतं, अगदी बारीक साबुदाण्यासदृश गोळ्या होत्या. ते अर्थातच घेतलं नाही. कंपोस्ट खूप भारी खूप भारी ऐकून ते उत्साहाने केलं पण आर्द्रता आणि पावसाने ज्याम वाट लावली त्या उपक्रमाची. असो.
--
त्या लेखांच्या दुव्यांबद्दल अनेक आभार. लेखातल्या गोष्टी खूप उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. आज सगळ्याच झाडांना ते पाणी घालेन. एक बिफोर आफ्टर फोटोही डकवेन सवडीने.
--
कंपोस्टमध्ये आर्द्रता किती हवी, पाणी किती हवं ह्याबाबत काही वाचायला मिळालं तर आवडेल. मी काय करतो:
१. ओला कचरा (जो खरंच ओला असतो, कुजून पाणी सुटल्याने किंवा स्वयंपाकघरात धुतलेला असल्याने) तळाचा थर.
२. माती.
३. गांडूळ खत (विकत घेतलेलं)
४. माती.
(एकदा उत्साहाने जिवंत गांडूळं पकडून टाकली होती.)
मुद्दा हा, की सगळं मिश्रण थेट 'ओलं' असतं. 'दमट' किंवा 'आर्द्र' नव्हे. उन्हात ठेवता येत नाही कारण घमघमाट. तरीही बरेच प्राणी आल्याचं मी सांगितलेलं आहेच.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
चौदावे, तुम्हाला कंपोस्ट
चौदावे, तुम्हाला कंपोस्ट पेक्षा जास्त चांगला उपाय पाहिजे असेल तर हे करा. ह्याला काळ फार लागत नाही. पूर्वी सांगितले आहे पण पुन्हा. ह्यानी लिक्विड खत तयार होते त्यामूळे ते झाडांना घालणे पण सोप्पे आणि स्प्रे पण करता येते.
१. घरातल्या भाज्या, झाडांची हिरवी पाने ( हिरवी, वाळलेली नाहीत. ), फुले घ्या. भाज्या म्हणजे कच्च्या भाज्या ( शिजवुन मसाला टाकलेल्या नाहीत ). भाज्यांची देठे वगैरे.
२. ह्या सर्व गोष्टी मिक्सर मधे बारिक करुन घ्या.
३. एक प्लॅस्टिकची झाकण असलेली बादली किंवा डबा घ्या. त्यात हे मिक्सर मधुन काढलेले बारिक मिश्रण टाका.
४. ह्या ऑर्गॅनिक मिश्रणाच्या दुप्पट ते तिप्पट पाणी टाका.
५. ५ लिटर चा डबा असेल तर पाव किंलो साखर टाका.
६. झाकण बंद करुन डबा सावलीत ठेवुन द्या. घरात यिस्ट वगैरे असले तर ते थोडे टाका.
७. १५ दिवसानी बघा, मिश्रण आंबलेले आहे का? चांगले आंबु द्या.
८. मग ही झाडांची वाईन झाडांच्या मुळाशी घाला. पानांवर स्प्रे करा.
सॉलिड कम्पोस्ट पेक्षा कमी वेळात होणारा आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. झाडे शोषुन पण लवकर घेतात सॉलिड कंम्पोस्ट पेक्षा.
इ एम सोल्युशन नावाचा जादूचा
इ एम सोल्युशन नावाचा जादूचा उपाय अजून कोणी कसा सांगितलं नाही ?
गुळाच्या पाण्याला दह्याचे आणि शेणाचे विरजण
दहा बारा वर्षांपूर्वी "सकाळ पेपर्स" च्या प्रतापराव पवारांनी effective micro -organism नावाच्या "क्रांतिकारक " द्रावणाचा प्रचार चालवला होता, तेच का?.
गुळाच्या पाण्याला दह्याचे आणि शेणाचे विरजण घातलेले असायचे..
मी सांगितलेले पण तसेच आहे,
मी सांगितलेले पण तसेच आहे, फक्त घरी करत असल्यामुळे शेण वापरायचे नाही. सुक्ष्मजीव खुप वेगानी डिकंपोझ करतात. त्यांना सुरुवातीला वाढायला उर्जा म्हणुन साखर किंवा गुळ लागतो.
होय तेच . काही वर्षांपूर्वी
होय तेच . काही वर्षांपूर्वी सकाळ ने दत्तक घेतलेले. त्याची माहितीपत्रके अतिशय धमाल असत . त्यातीलउंच उंच क्लेम्स भारी असत . सध्या का ऐकू येत नाही माहित नाही . अर्थात पंचगव्य आणि गोनाईल पुढे हे टिकले असते काय हा प्रश्न आहेच.
माणूस असो वा मोगरा, वाईन
माणूस असो वा मोगरा, वाईन घेतली की गगनावरी जाणारच!
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
liquid compost
हा शेंगदाण्याच्या फोलपटांचा चिवडा झाला. http://aisiakshare.com/node/4846 ही लिंक आठवली. प्रियदर्शिनी कर्वे यांची...
हा माझा प्रयोग.
पालकाची देठं, एका पुदिनासदृश झाडाच्या फांद्या, निर्माल्य इत्यादी गोळा करून मिक्सरमध्ये अगदी लगदा केला, तो डब्यात भरला आणि त्यात अडीचपट पाणी ओतलं. त्यात एक वाटी साखर घालून हे बंद डब्यात ठेवलेलं आहे.


छायाचित्रे:
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
बेस्ट केलेत चौदावे. चांगले
बेस्ट केलेत चौदावे. चांगले फर्मेंट होउ द्या. पण उन्हात ठेउ नका. सावलीत ठेवा.
१४टॅनचा मोगरा वाचवा बक्षीस
१४टॅनचा मोगरा वाचवा बक्षीस मिळवा -
- चा आणि बागकामप्रेमी ऐसीकर.
माझा मोगरा वाचवा
आणि ऐसीवरून संन्यास घेण्यापासून परावृत्त करा.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
अचरटबाबा
बाबाजी, मै बडे कष्ट में हूं बाबाजी.
दोन पैकी एका पारीजातकाचे पानं पिवळसर पडत चाल्ले आहेत, त्याच्या कळ्याही जळून गेल्यात. दुसऱ्याचे मात्र तसेच आहेत, हिरवे. उपाय सुचवा.
मोगऱ्याच्या तर काटक्या झाल्यात
मै आपको माहितीपुर्ण श्रेणी का प्रशाद चढाऊंगा बाबाजी...क्रिपया क्रिपा करें
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
दोन प्रश्न आहेत सोनचाफा आणि
दोन प्रश्न आहेत सोनचाफा आणि अनंताबद्दल?
१. सोनचाफ्याचं झाड ४ महिन्यांपुर्वी आणलं, साधारण ४ फुट उंच. व्यवस्थित खत-पाणी घालतोय, उन पण पुरेसं मिळतं. पंधरा दिवसांपुर्वी पर्यंत झाडाची काहीच वाढ होत नव्हती. नविन पालवी नाही आणि आहे ती पानंही गळत नव्हती, हिरवी गार आहे तशीच (खोट्या झाडासारखी), फुलांचा तर प्रश्नच नव्हता. झाड मरगळं पण नव्हतं ना वाढत होतं. पण मागच्या पंधरा दिवसांपासून जुनी पानं गळून नवी पालवी फुटली आहे. अता प्रश्न असा की सोनचाफ्याला फुलं कधी एक्सपेक्ट करावीत? ही झाडाची वाढ अशीच स्लो असणार आहे का?
२. अनंताचं रोप सोनचाफ्याबरोबरच आणलं होतं. झाड खूप टरारुन वाढतंय आणल्यापासून. कळ्या मात्र उशिरा लागल्या, २-३ महिन्यांनी. अनंताचा तसा काही इश्यू नाही फक्त हाच प्रश्न विचारायाचा होता की अनंताच्या कळ्या फुलायला वेळ लागतो का? कळीचं फुल व्हायला साधारण १२-१५ दिवस लागतात असं दिसून आलं सध्याच्या कळ्या उमलण्यावरून. हाच साधारण वेळ असतो का अनंताचा कळ्या ते फुल ह्या कालावधीचा?
मोगरा : - कुंडीतले झाड आणि
मोगरा : - कुंडीतले झाड आणि जमिनीतले यात फरक पडतो. पाणी कमी पडल्याचा ताण मोगरा आणि गुलाब सहन करू शकतात पण पाण्यात दोनतीन तास मुळे डुंबून राहिल्यास मुळे मरतात. पाने पिवळी पडणे हे कोणत्याही झाडाचे पाणी तुंबल्याचे लक्षण आहे. (भात पीकास पाणी चालते.) जमिनीला/बागेत कुठे उतार असल्यास पाणी तुंबू शकत नाही. बागेत कुठेच उतार नसल्यास उंचवटे करूनच गुलाब/मोगरा लावावा. कुंडीत पाणी निचरा नाही झाल्यास झाड मरते.
कुंडीतून झाड बाहेर काढा. पांढरी लवदार मुळे नसणे आणि असलेली काळी पडलेली दिसल्यास त्यावर नखाने ओरखडून आत हिरवे आहे का पाहा. नसल्यास ते मूळ मेले आहे. कुंडी खोल असण्यापेक्षा रुंद हवी अठरा इंच वगैरे. कुंडीत तळाशी दगड कपच्या उभ्या बसवून त्यावर शेणखत टाका. मधोमध मोगय्राचा रोपाचा मातीचा गड्डा ठेवून सर्व बाजूने शेणखत भरा. रोपाची सर्व पाने खुडा. कुंडीत एवढेच पाणी द्या की ते खालून वाहून जाणार नाही. शेणखत जेवढा ओलावा धरेल तेवढेच. सकाळी माती तापली पाहिजे, संध्याकाळी जेमतेम पाणी. साधारण एक फेब्रुवारीपासून उन्हाचा चटका जाणवू लागतो तेव्हा वरती जे फुटवे ( नवीन शेंडे येतात )त्यास भरगच्च कळ्या येतात. एक जूनअगोदर वरच्यावर थोडे शेणखत टाकावे लागेल. जानेवारीतले टाकलेले खत पोकळ झालेले सापडेल आणि त्यात रोपाच्या पांढय्रा मुळ्या दिसतील. सप्टेंबर नंतर कळ्या येणार नाहीत,मोगरा फेब्रुवारीपर्यंत विश्रांती अवस्थेत जातो. सर्वच सुगंधी पांढरी फुलझाडे थंडीत विश्रांती घेतात. यावेळी बिनवासाचा काकडा फुलतो.
मोगय्राच्या १)मल्लिगे,* २)गुंडु मल्लिगे**, ३)मदनबाण,*** आणि ४)वेल मोगरा अशा जाती आहेत. क्र१ बंगळुरु, उडुपीकडे आहे. क्र २) मुंबई पुणे. क्र ३ आणि ४ फुले कमी येतात,टपोरी मोठी असतात, कारपार्किंगला उपयोगी.
जमिनीत,कुंपण म्हणून लावलेली मोगय्राची झाडे खूप दूरपर्यंत मुळे पसरवतात, अस्ताव्यस्त वाढून सूर्यप्रकाश खातात, अन्न साठवतात ओक्टोबर ते मार्च. मग धुमधडाका फुले येतात. कवितांची वाट पाहत नाहीत. शेणखतांची कसर उन्हाने भरून काढतात. बॅल्कनीसाठी वेल मोगरा बरा. फुले नसतात तेव्हा छान हिरवी महिरप करतात. मनिप्लांटपेक्षा बरे.
वेल/झुडुप झाड यातला फरक -
झुडुप किंवा झाड या प्रकारात क्र २ येतो. फांद्या घट्ट असतात आणि आकाशाकडे वाढतात. वेल मोगरा ( किवा गुलाब) हा इतर वेली जशा एखाद्या आधारास विळखा घेत सुर्यप्रकाश मिळवण्यासाठी वरवर जातात तसा विळखा घेत नाही. फांद्या झुडुपापेक्षा लवचिक असतात. थोडे वर चारपाचफुट वाढल्यानंतर वाकतात जमिनीकडे वळून सर्व झाडाचा एक छत्री अथवा तंबूसारखा आकार होतो. असे वाकल्यावरच त्या फांद्यांवर कळ्या येतात. तर या फांद्या फार वर चढवू नये अथवा उगाच काटछाट करू नये. हे वेल गुलाबास फार लागू आहे.
मोगय्राला पर्यायीपूरक फुलझाड शेवंती. मोगरा थांबला की शेवंती सुरू होते. ओक्टोबर ते फेब्रुवारी. दोघांस विश्रांती अवस्थेत शेणखत घालून पोसले की भरपूर फुले देतात. फुलांचा हंगाम संपताना 'लेअरिंग पद्धत' वापरून नवीन रोपे करता येतात.
टीपा
* पाकळ्यांची एकच रांग,अति सुवासिक गजय्रासाठी उत्तम.
** गुंडु = जाडा बुटका, पाकळ्यांच्या दोन तीन रांगा,देठ लहान. वेणीसाठी.
*** लांब देठ, लांब कळी,मोठे पाच पाकळ्यांचे फूल. हार गजय्रासाठी नाही.
सोनचाफा /पारिजात/अनंत/जास्वंद
बियांपासून केलेली झाडे खूपच डेरेदार आणि देखणी वाढतात परंतू फुलावर येण्यास तेरा वर्षे लागतात. कलमे /छाट कलमे बरी. ही रोपे नर्सरीतून आणल्यावर जमिनीत खड्डा न खणता एक फुट उंच xतीनफुट गोल उंचवटा करून लावा. सुरुवातीस तीन बाजूंनी बांबू/लाकडाचा आधार देऊन सरळ वर वाढेल असे लक्ष द्यावे. कुंडीतच लावणार असाल तर तयार कुंडी न देता प्लास्टिकचे विणलेले वीस पंचवीस किलोचे पोते वापरावे. हे मातीने भरून ते एका चारपाच इंच खोल काळ्या प्लास्टिक ट्रेमध्ये ठेवावे. त्यात सतत थोडे पाणी राहील हे पहावे. पाण्यात डास होऊ नये म्हणून नारळाची शेंडी/काथ्या भरावा. चांगले सहासातफुटी गच्च झाड ही पद्धत सांभाळते. जास्वंद/ अनंतासाठी ही पद्धत उपयोगी पडते.
अनंताच्या कळ्या शेंड्याला दिसतात. पण पानांच्या तीन जोड्या वरती आल्यावरच त्या कळ्यांची फुले होतात. याकरता जमिनीपासून रोप दोन फुट वर आले की शेंडा तोडा. दोन शेंडे येतील तेही एक फुटावर तोडावे म्हणजे बरेच शेंडे होतात. पुढेपुढे फुले फारच वर लागतात.
मोगऱ्याची छायाचित्रे
छाटणीआधीचे फोटो खाली.


आता तुमचं ऐकून झाड पार भुंडं केलेलं आहे. आता फोटोत फार काही दिसत नाही. मुळं तुम्ही सांगितली तशी खरवडून पाहिली असता पांढरी लवदारच आहेत. झाडाला नवीन हिरवी फांदीही आहे. बहुतेक हे गुंडू मल्लिगे असावं. भरपूर छाटणी केली, कारण बहुतेक पानं पिवळी, तपकिरी होऊ लागलेली अशी होती. हिरवी पानं आणि फांद्या आहे तशाच आहेत.
१.
२.
- श्री टॅनोबा चौदावे
I have had my results for a long time, but I do not yet know how I am to arrive at them. - Gauss
धन्यवाद
अचरटबाबा. माहितीपुर्ण आणि सविस्तर प्रतिसाद
तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी
यापुढील प्रतिसाद
यापुढील प्रतिसादांसाठी नवा धागा काढावा, ही विनंती.