निकाल।लागला!

निकाल लागला !!
मराठी हि मोठी अलंकारिक भाषा आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असणे आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असणे हे आपल्या मातृभाषेचे वैशिष्ट्य.. 'निकाल लागला' हा शब्द सुद्धा असाच दोन आशयांनी येणारा. निकाल लागला, असं सौम्यपणे म्हटलं तर निकाल घोषित झाला, असा त्याचा सरळ अर्थ. परंतु हाच शब्द दुसऱ्या संदर्भाने उच्चारला तर त्याचा भलताच अर्थ निघतो. हेच बघा ना, आज गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्याच्या निकालावर दृष्टिक्षेप टाकला तर काहींसाठी हा 'निकाल लागला' आहे तर काहींचा यात 'निकाल लागला' आहे.. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुढील अनेक निकालांचे भवितव्य अवलंबुन असल्याने देशात आजवर झालेल्या तमाम विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यावेळची गुजरातची निवडणूक सर्वांसाठीच प्रतिष्ठेची ठरली होती. म्हणून तर या निवडणुकीत राजकारणाचे सर्व रंग उधळल्या गेले. भाजपा आणि काँग्रेसच्या देशभरातील जवळपास सर्व प्रमुख नेत्यांनी मागील दिवसात गुजरातेत डेरा टाकला होता. आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी पासून ते एकेमकांचं उखळ पांढर करण्याइतपत प्रचार गुजरात मध्ये करण्यात आला. देशातील नेते आणि पक्ष आरोप करण्यासाठी कमी पडले म्हणून कि काय, शेजारच्या राष्ट्रालाही या निवडणुकीत सामील करण्यात आले. साम, दाम, दंड, भेद ही आयुधे निवडणुकीत वापरली गेलीच, तद्वातच नेत्यांचे खासगी जीवनही प्रचाराचा मुद्दा बनला. सेक्स सीडी, 'धर्म' वाद इत्यादींनी राजकारणाची पातळी दाखवून दिली. गुजरातच्या निवडणुकीसाठी संविधानाचे संकेत बासनात गुंढाळून ठेवून अक्षरशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही पुढे ढकलण्यात आले. अखेर आज या महासंग्रामाचे निकाल समोर आले असून बऱ्याच अंशी चित्र स्पष्ट झालं आहे. सुरवातीचा कौल सत्ताधारी भाजपाच्या बाजूने असला तरी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसनेही मोठी मुसंडी मारली आहे. ज्या गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस चित्रातही दिसत नव्हते, ते काँग्रेस आज पंतप्रधांनांना त्यांच्याच होम ग्राउंड मध्ये काट्याची टक्कर देत आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कौल आज हाती येतोय. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निकालातून भविष्यातील अनेक गोष्टींचा निकाल स्पष्ट झाला आहे. अपेक्षेप्रमाणे १०४ जागा घेत सत्ताधारी भाजपाने गुजरातचा गड राखला यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृतवाला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नियोजनाला, मोदी विरोधाचे कितीही मोठे पहाड रचले तरी भाजपाला साथ देणाऱ्या गुजराती जनतेला आणि गुजरात मध्ये काम करणाऱ्या भाजपा नेता- कार्यकर्त्यांना याचे श्रेय द्यावे लागेल. पाटीदार समाजाचे आंदोलन, हार्दिक पटेल सारखा नेता, विकासाच्या मॉडेल ची उडवली गेलेली खिल्ली, राहुल गांधी यांची टोकदार भाषणे, मोदीविरोधाचा सूर आदी विविध कारणांमुळे खरं तर सुरवातीला भाजपाची स्थती थोडीसी चिंताजनक राहील असा अनेकांनाचा दावा होता. एक्झिट पोल वर ही काही जण विश्वास ठेवायला तयार नव्हते. आज अखेर 'दूध का दूध,पाणी का पाणी' झाले आहे. गुजराती जनतेने भाजपाला बहुमत देत आजही गुजरात नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सहाजिकच "विकास" वेडा वैगेरे झाला नसून योग्य मार्गावरचं आहे. याचा निकाल लागला! असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षात मोदी सरकाराने जी धोरणे राबविली, निर्णय घेतले, विकास केला, त्यावरून कितीही राजकारण केल्या जात असले तरी जनता अजूनही मोदी यांच्या सोबत आहे, याचा 'निकाल' गुजरात आणि हिमाचलच्या निकालाने लावला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली, असे म्हणावे लागेल. एकीकडे गुजरात निवडणुकीने पंतप्रधानांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध केले तर दुसरीकडे याच निवडणुकीने काँग्रेसलाही नेतृत्व दिले. राहुल गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठीही गुजरात निवडणुकीचाच मुहूर्त ठरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये राहुल पर्व सुरु होण्यासही गुजरातच कारणीभूत ठरला असं म्हटल्यास अतिशियोक्ती होणार नाही. गुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला देशाने पाहिला. पडझडीच्या भीतीने भल्याभल्या नेत्यांचे चेहरे गुजरातच्या भूमीवर काळे ठिक्कर पडले असताना निकाल व परिणामांची पर्वा न करता राहुल गांधी मैदानात लढत होते. काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी दाखवेलला आत्मविश्वास लक्षणीयचं म्हणावा लागेल.

गुजरात निकालाने तिसरा निकाल लावला तो हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी यांचा.. आंदोलनातील गर्दी निवडणुकीत मतात परिवर्तित होईलच ! याची शास्वती नसते. किंबहुना बहुतांशवेळा आंदोलक नेत्याला निवडणुकीच्या राजकारणात डावलल्या जाते, असा इतिहास आहे. त्याची पुनरावरुत्ती गुजरातेत बघायला मिळाली. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी या तिघांनाही गुजरात जनतेने फारसा कौल दिला नाही. समाजाच्या मागण्या एका जागी आणि राजकारणातील पसंती दुसऱ्या जागी असा काहीसा प्रकार गुजरातमध्ये बघायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून पाटीदार आरक्षणाच्या मुद्द्यवरून हार्दिक पटेल यांचं नेतृत्व समोर आलं. हार्दिकने आंदोलनात जशी गर्दी खेचली तशींचं निवडणुकीच्या जाहीरसभांमध्येही खेचली. परंतु ही गर्दी मतात परिवर्तित होताना दिसली नाही. कदाचित हार्दिक पटेल यांची तथाकथित सेक्स सीडी, काँग्रेसला पाठिंबा आदी कारणे याठिकाणी कारणीभूत ठरली असावी. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासमोर या सर्वांचा 'निकाल लागला!' हे वास्तव आहे.

देशाच्या राजकारणाची दिशा बदलावणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर अर्थातच पुढील अनेक दिवस कवित्व सुरु राहणार आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि हार्दिक पटेल याणी इव्हिम मध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा उपस्थति केला होता. त्यावरूनही आता भविष्यात चर्चांचे फड रंगतील. ईव्हीएम मतदान पद्दती किती सुरक्षित? हा तसा वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकेल ! आपल्यापेक्षा तंत्रद्याने प्रगत असलेल्या देशांमध्ये आजरोजी ईव्हीएम प्रणाली बंद झाली आहे.. त्यांनी पुन्हा बॅलेट पद्दत अवलंबविली आहे. त्यामुळे याबाबतीतील संशय दूर करण्यासाठी प्रयत्न केल्या गेले पाहिजे.ही अपेक्षा रास्त असली तरी " जो जिता वही सिकंदर " या नियमाप्रमाणे आज भाजपा सिकंदर झाली आहे . त्यांच्या विजयांवर शंका उपस्थति करण्यास काहीही अर्थ नाही. गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गर्दी म्हणजे मतं नव्हे, हा मुद्दा नीटसा समजला नाही. जिग्नेश मेवाणी जिंकल्याच्या बातम्या दिसत आहेत.
Gujarat polls: Dalit leader Jignesh Mevani wins

गुजराती राजकारणाकडे माझं फार लक्ष नव्हतं. हार्दिक पटेल उदाहरणावरून हे स्पष्टच आहे की त्याचं वर्तन बेकायदेशीर नसेलही, पण अनेकांना अनैतिक वाटलं असणार. त्याचा मतपेटीवर परिणाम झाला असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुजरात जनतेने भाजपाला स्वीकारले आणि काँग्रेसला नाकारले. ही वास्तुस्थती आहे. - हे मान्य.

-

राहुल गांधी यांची टोकदार भाषणे

हे काही समजले नाही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राहुल गांधी यांची टोकदार भाषणे >> गुजरात निवडणुकीत कधी नव्हे ते राहुल गांधी यांना सुर सापडला होता.. त्यांच्या भाषनांची दखल घेतल्या गेली.. त्यातील टीका टोकदार होत्या म्हणुन टोकदार भाषणे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दी म्हणजे मतं नव्हे, हा मुद्दा नीटसा समजला नाही. जिग्नेश मेवाणी जिंकल्याच्या बातम्या दिसत आहेत. >>मेवानी विजयी झाले आहेत.. मुद्दा असा की हार्दिक जिग्नेश आणि ठाकोर यांच्या प्रचार सभेला जी गर्दी झाली ती मत पेटीत उतरली नाही. नेता म्हणुन हे तिघे जी जादू दाखवतील अशी अपेक्षा केली जात होती ती दिसली नाही. पाटीदार आंदोलन मधे बहुतांश पाटीदार हार्दिक च्या मागे उभा राहिला पण निवडणुकीत तो हार्दिक च्या मागे त्या प्रमाणात गेला नाही. अर्थातच आंदोलन किंव्हा सभा मधे झालेली गर्दी मता त परिवर्तित झाली नाही, हा आशय..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरतमध्ये, भाजपाने क्लीन स्वीप केला आहे. पटिदार आंदोलनाचं/ गिएस्टी विरोधाचं एपिसेंटर सुरत होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पटिदार आंदोलनाचं/ गिएस्टी विरोधाचं एपिसेंटर सुरत होतं.
GST विरोधाचे ठीक , पण पाटीदार आंदोलनाचे सुरत हे एपिसेंटर होते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीचं माहिती नाही पण हार्दिकच्या सुरतेतील सभेला झालेल्या गर्दीचे फोटो फिरत होते नेटवर....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपेक्षेप्रमाणे १०४ जागा घेत

९९ ???
आणि राहुल गांधींच्या टोकदार वैगेरे टिकेमुळे त्यांचा कसलेतरी आदित्य हा शिक्का पुसेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

गुजराथ निवडणूक भाजपसाठी रियालिटी चेक आहे. यानंतर भाजप आणि काँग्रेस दोघांच्याही २०१९ निवडणुकांसाठीच्या स्ट्रॅटेजीज रिकॅलिबरेट होतील. सबब पुढच्या आणि शेवटच्या फुल बजेटमध्ये ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतलेले दिसले तर आश्चर्य वाटायला नको. ग्रामीण भागात भाजप कमकुवत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाकी व्हीव्हीपॅटचं काय झालं काही कळलं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी व्हीव्हीपॅटचं काय झालं काही कळलं का?

जिथे त्यांची मोजणी झाली तिथे बरोब्बर टॅली झाली मतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे कुठे कळले ढेरेशास्त्री?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे कुठे कळले ढेरेशास्त्री?

मी आकाशवाणीवर ऐकलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

++स्ट्रॅटेजीज रिकॅलिबरेट होतील++
हे होईलच . ते संवेदनशील आहेत , निवडणूक या विषयात .
फक्त तुम्ही म्हणता "ग्रामीण भागाला केंद्रस्थानी "तसं होईल , का त्यांच्याकरिता लो हँगिंग फ्रुट म्हणजे ' मंदिर चळवळ जोरात ' हे होईल , ते बघणं रोचक ठरेल येत्या काळात .
हे व्हीव्हीपॅट काय आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे व्हीव्हीपॅट काय आहे ?

ओएमजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुजरातेत खालील गोष्टींचा पराभव झाला.
१. सेक्यूलर जानवे
२. उच्च जात
३. पाटीदार
४. आरक्षण्
५. स्थानिक नेतृत्व
६. अँटी इंकंबंसी
७. काळे पैसे
८. टॅक्स इवेजन्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

शिवाय,
९. सेक्यूलर्
१०. पुरोगामी
११. लिबरल
१२. डावे
हे देखिल तोंडावर आपटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, जाता जाता, जिंकले कोण हे पण सांगुन टाका..

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. ट्रिपल तलाक संपवावा म्हणून सुस्पष्ट भूमिका घेणारे,
२. थर्ड जेंडरच्या लोकांचे बिल आणणारे
३. तिजोरीला डायरेक्ट हात घालणारे
४. कर नीट भरायला लावणारे
५. खानदानी नसलेले
६. ईस्रायलशी मैत्री करणारे
७. हिंदुत्ववादी
८. विकासवादी
९. राममंदिरवादी
१०. गायप्रेमी
११. लवजिहादविरोधक
१२. अतिरेकी निर्दालक्
१३. सेनेचे मनोबल वाढवणारे
१४ राजकीय वचने पाळणारे
१५. जातीयवाद न करणारे
१६. निस्पृह लोकांच्या नेटवर्कच्या आधारे अखंड टिकून राहणारे
१७. भ्रष्टाचारी नसलेले
जिंकले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Gujarat debacle: AAP’s national ambition takes hit, all candidates lose deposit

बरं झालं छान झालं !!!

The Gujarat debacle came after its equally dismal performance in Goa, when 38 of its 39 candidates had their deposits forfeited in the state Assembly elections there.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आप च काय, शिवसेना पण तोंडावर आपटली आहे गुजरातमधे. पूर्वीच्या कठपुतळीच्या खेळांत, एक आडवं पडलेलं बाहुलं असायचं. एरवी ते निपचित पडून रहायचं. पण कुणाचं काही वाईट झालं की ते पोटावर बांधलेला नगारा वाजवून पुन्हा निपचित पडत असे. तसं या शिवसेनेचं झालं आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मला आआप आवडत नाही असं नाही. खरंतर आआप सारख्या पक्षांची गरज आहे. बहुपक्षीय लोकशाही मधे आआप सारखे पक्ष हवेतच. पण त्यांचा सिंगल प्वाईंट अजेंडा झाल्यापासनं .....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आआप आवडत नाही असं नाही.

मला मात्र आप आवडत नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काहो जंतु. मला पण आवडायचा आप, त्यांची मतदार आहे मी. आता खुप कमी आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आप हा नुसता दिखाऊ पक्ष आहे. काँग्रेस/ भाजप सारखा धार्मिक उन्माद पसरवत नाही इतकेच काय ते.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

राष्ट्रवादीच्या काकासाहेबांनी गेम केली म्हणतात काँग्रेसची. ७ च्या आसपास जागा अगदी कमी मतांनी फिरल्या आणि ती मते ( किंवा त्यापैकी काही मते ) राष्ट्रवादीने घेतली. एकूण काका 'पाताळयंत्री' हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. राहुल गांधींनी स्टार वॉर्सचे चित्रपट बघत वेळ घालवण्यापेक्षा २०१९ ची तयारी करावी आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

देशाच्या भवितव्यापुढे माझ्या स्वार्थाला मी थोडी कात्री लावेन ही भुमिका भाजप नेते ठेवत राहतील तोपर्यंत भाजप येत राहिल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0